1Now I Paul myself beseech you by the meekness and gentleness of Christ, who in presence am base among you, but being absent am bold toward you:
1ख्रिस्ताच्या नम्रतेने व सौम्यतेने मी तुम्हांला उत्तेजन देतो. मी, पौल, जेव्हा तुमच्या समोर येतो तेव्हा ‘भित्रा’ असतो पण जव्हा तुमच्यापासून दूर असतो तेव्हा “धीट” असतो!
2But I beseech you, that I may not be bold when I am present with that confidence, wherewith I think to be bold against some, which think of us as if we walked according to the flesh.
2मी आशा करतो की, जेव्हा मी येतो तेव्हा, काही लोक ज्यांना असे वाटते की आम्ही जगाच्या रीतीप्रमाणे जगतो त्यांच्याबाबतीत लोक जितकी अपेक्षा करतात, तितका मी धीट असणार नाही, जितकी मी अपेक्षा करतो.
3For though we walk in the flesh, we do not war after the flesh:
3कारण जरी आम्ही जगामध्ये राहत असलो, तरी जगाप्रमाणे लढाई करीत नाही.
4(For the weapons of our warfare are not carnal, but mighty through God to the pulling down of strong holds;)
4ज्या शस्त्राने आम्ही लढाई करतो ती जगातल्या शस्त्रांसारखी नाहीत. उलट, त्यांच्यामध्ये दैवी शक्ति आहे ज्यामुळे शत्रूचे बुरुज नष्ट होतात.
5Casting down imaginations, and every high thing that exalteth itself against the knowledge of God, and bringing into captivity every thought to the obedience of Christ;
5आम्ही वाद आणि जे देवाविषयीच्या ज्ञानाविरुद्ध उभे राहते ते नष्ट करतो आणि प्रत्येक विचार पकडून त्याला ख्रिस्ताच्या आज्ञा पाळायला लावतो.
6And having in a readiness to revenge all disobedience, when your obedience is fulfilled.
6आणि तुमचा आज्ञाधारकपणा पूर्ण झाल्यावर आम्ही प्रत्येक आज्ञाभंगाच्या कृतीला शिक्षा करण्यास तयार असू.
7Do ye look on things after the outward appearance? If any man trust to himself that he is Christ's, let him of himself think this again, that, as he is Christ's, even so are we Christ's.
7तुम्ही वरवर बघता, जर कोणी तो ख्रिस्ताचा आहे याविषयी खात्री बाळगतो तर त्याने हे लक्षात घ्यावे की जितका तो ख्रिस्ताचा आहे तितके आम्हीसुद्धा आहोत.
8For though I should boast somewhat more of our authority, which the Lord hath given us for edification, and not for your destruction, I should not be ashamed:
8आणि जो आमचा अधिकार प्रभुने आम्हांस खाली पाडण्यास नव्हे, तर तुमच्या वाढीसाठी दिला आहे त्याविषयी जरी काही विशेष अभिमान बाळगला, तरी मी लज्जित होणार नाही.
9That I may not seem as if I would terrify you by letters.
9हे मी यासाठी बोलतो की, मी माझ्या पत्राद्वारे तुम्हांला भीति घालणारा असा वाटू नये.
10For his letters, say they, are weighty and powerful; but his bodily presence is weak, and his speech contemptible.
10कोणी म्हणतो की, त्याची पत्रे वजनदार आणि जोरदार आहेत पण व्यक्तिश: तो प्रभावहीन आणि बोलण्यात कमकुवत असा आहे.
11Let such an one think this, that, such as we are in word by letters when we are absent, such will we be also in deed when we are present.
11अशा लोकांना हे समजावे की, जेव्हा आम्ही नसतो तेव्हा आम्ही आमच्या पत्रात जे असतो तसे जेव्हा आम्ही प्रत्याक्षात हजर राहू आमच्या कृतीमध्ये सुद्धा असू.
12For we dare not make ourselves of the number, or compare ourselves with some that commend themselves: but they measuring themselves by themselves, and comparing themselves among themselves, are not wise.
12जे कित्येक स्वत:ची प्रशंसा करतात, त्यांच्याबरोबर आम्ही आपणांस समजायला किंवा त्यांच्याशी आपली तुलना करायचे धाडस करीत नाही, ते तर स्वत:स स्वत:कडून मोजत असता व स्वत:ची स्वत:बरोबर तुलना करीत असता बुध्दिहीन असे आहेत.
13But we will not boast of things without our measure, but according to the measure of the rule which God hath distributed to us, a measure to reach even unto you.
13परंतु आम्ही आमच्या आम्हांला आखून दिलेल्या मर्यादेपलीकडच्या गोष्टीविषयी प्रशंसा करणार नाही. तर जी मर्यादा देवाने आम्हांस घालून दिली आहे, तिच्याप्रमाणे आम्ही प्रशंसा करुन घेतो. ती मर्यादा तर तुम्हापर्यंतही पोहोंचणारी आहे.
14For we stretch not ourselves beyond our measure, as though we reached not unto you: for we are come as far as to you also in preaching the gospel of Christ:
14आमच्या अभिमान बाळगण्यामध्ये आम्ही फार दूर जात आहोत असे नाही. तसे असते तर आम्ही तुमच्याप्रत आलो नसतो. ख्रिस्ताचे शुभवर्तमान सांगण्यासाठी तुमच्यापर्यंत आलो.
15Not boasting of things without our measure, that is, of other men's labours; but having hope, when your faith is increased, that we shall be enlarged by you according to our rule abundantly,
15आम्ही आपल्या मर्यादेपलीकडच्या गोष्टीविषयी, दुसऱ्याच्या श्रमाविषयी नावाजून घेत नाही. किंवा आम्हांला नेमून दिलेल्या कामापेक्षा जास्त करणार नाही, तर आम्हांस अशी आशा आहे की, तुमचा विश्वास वाढेल तेव्हा आम्ही आपल्या मर्यादेच्या प्रमाणात तुम्हांकडून अगदी विस्तर पावलेले असे होऊ.
16To preach the gospel in the regions beyond you, and not to boast in another man's line of things made ready to our hand.
16यासाठी की, शुभवर्तमानाचा तुमच्या पलीकडील प्रदेशात प्रसार करु. कारण दुसन्या माणसाच्या प्रदेशात अगोदरच झालेल्या कामाविषयी अभिमान बाळगण्याचे आम्हाला काही कारण नाही.
17But he that glorieth, let him glory in the Lord.
17पण “जो अभिमान बाळगतो, त्याने प्रभूमध्ये बाळगावा.”
18For not he that commendeth himself is approved, but whom the Lord commendeth.
18[This verse may not be a part of this translation]