1Now Peter and John went up together into the temple at the hour of prayer, being the ninth hour.
1एके दिवशी पेत्र व योहान मंदिराकडे जात होते. त्यावेळी दुपारचे तीन वाजले होते. मंदिरातील प्रार्थनेची ती नेहमीची वेळ होती.
2And a certain man lame from his mother's womb was carried, whom they laid daily at the gate of the temple which is called Beautiful, to ask alms of them that entered into the temple;
2जेव्हा ते मंदिरात जाऊ लागले, तेव्हा त्या ठिकाणी एक मनुष्य होता. हा मनुष्य जन्मापासूनचा लंगडा होता. त्याला चालता येत नव्हते. म्हणून काहीं मित्र त्याला उचलून घेऊन आले. दररोज त्याचे मित्र त्याला मंदिराकडे आणीत असत. ते त्या लंगड्या माणसाला मंदिराच्या एका दरवाजाजवळ ठेवीत असत. या दरवाजाचे नाव सुंदर दरवाजा असे होते. तेथे तो मनुष्य मंदिरात येणाऱ्या लोकांकडे भीक मागत असे.
3Who seeing Peter and John about to go into the temple asked an alms.
3त्या दिवशी त्या लंगड्या मनुष्याने पेत्र व योहानाला मंदिरात जाताना पाहिले. त्याने त्यांच्याकडे पैसे मागितले.
4And Peter, fastening his eyes upon him with John, said, Look on us.
4पेत्र व योहान यांनी त्या माणसाकडे पाहिले व म्हटले. “आमच्याकडे पाहा!”
5And he gave heed unto them, expecting to receive something of them.
5त्या मनुष्याने त्यांच्याकडे पाहिले; त्याला वाटले ते त्याला काही पैसे देतील.
6Then Peter said, Silver and gold have I none; but such as I have give I thee: In the name of Jesus Christ of Nazareth rise up and walk.
6परंतु पेत्र म्हणाला, “माझ्याकडे सोने किंवा चांदी काही नाही, परंतु माझ्याकडे दुसरे काही तरी आहे, ते मी तुला देतो: नासरेथच्या येशू रिव्रस्ताच्या नावाने ऊठ आणि चालू लाग!”
7And he took him by the right hand, and lifted him up: and immediately his feet and ankle bones received strength.
7मग पेत्राने त्या माणासाचा उजवा हात धरला व त्याला उठविले. आणि ताबडतोब त्या मनुष्याच्या पायात व घोट्यात शक्ति आली.
8And he leaping up stood, and walked, and entered with them into the temple, walking, and leaping, and praising God.
8तो माणूस उडी मारुन उभा राहिला व चालू लागला. तो चालत, बागडत, आणि देवाचे गुणगान करीत त्यांच्याबरोबर मंदिरात गेला.
9And all the people saw him walking and praising God:
9[This verse may not be a part of this translation]
10And they knew that it was he which sat for alms at the Beautiful gate of the temple: and they were filled with wonder and amazement at that which had happened unto him.
10[This verse may not be a part of this translation]
11And as the lame man which was healed held Peter and John, all the people ran together unto them in the porch that is called Solomon's, greatly wondering.
11तो लंगडा मनुष्य पेत्र व योहान यांना बिलगून उभा होता. सर्व लोक आश्चर्यचकित झाले होते. कारण तो मनुष्य बरा झाठा होता. ते पेत्र व योहान उभे असलेल्या शलमोनाच्या द्वारमंडपाकडे धावत येऊ लागले.
12And when Peter saw it, he answered unto the people, Ye men of Israel, why marvel ye at this? or why look ye so earnestly on us, as though by our own power or holiness we had made this man to walk?
12जेव्हा पेत्राने हे पाहिले, तो लोकांना म्हणाला, “माझ्या यहूदी बंधूंनो, ह्यामुळे तुम्हांला आश्चर्य का वाटत आहे? तुम्ही आमच्याकडे असे पाहात आहात की जणू काय आमच्या सामर्थ्यानेच हा मनुष्य चालू लागला आहे. तुम्हांला असे वाटते का की, आमच्या चांगुलपणामुळे असे घडले?
13The God of Abraham, and of Isaac, and of Jacob, the God of our fathers, hath glorified his Son Jesus; whom ye delivered up, and denied him in the presence of Pilate, when he was determined to let him go.
13नाही! देवाने हे केले! तो अब्राहामाचा देव आहे, इसहाकाचा देव आहे आणि तो याकोबाचा देव आहे, आमच्या पूर्वजांचा तो देव आहे. त्याचा खास सेवक येशू याला त्याने गौरव दिलेला. परंतु तुम्ही येशूला मारण्याचा निर्णय घेतला, परंतु तुम्ही पिलाताला सांगितले की, तुम्हांला येशू नको.
14But ye denied the Holy One and the Just, and desired a murderer to be granted unto you;
14येशू शुद्ध आणि चांगला (निष्पाप) होता. परंतु तुम्ही म्हणाला तुम्हाला तो नको, तुम्ही पिलाताला सांगितले की येशूऐवजी आम्हांला एक खुनी दे.
15And killed the Prince of life, whom God hath raised from the dead; whereof we are witnesses.
15आणि म्हणून जो जीवन देतो त्याला तुम्ही मारले! परंतु देवाने त्याला मरणातून उठविले, आम्ही त्याचे साक्षी आहो. आम्ही आमच्या डोळ्यांनी ते पाहिले.
16And his name through faith in his name hath made this man strong, whom ye see and know: yea, the faith which is by him hath given him this perfect soundness in the presence of you all.
16येशूच्या सामर्थ्यानेच हा लंगडा बरा झाला. आम्ही येशूच्या सामर्थ्यावर विश्वास ठेवला म्हणून हे घडले. तुम्ही या मनुष्याल पाहू शकता. आणि तुम्ही त्याला ओळखता. येशूवरील विश्वासाने तो पूर्णपणे बरा झाला. तुम्ही हे घडलेले पाहिले!
17And now, brethren, I wot that through ignorance ye did it, as did also your rulers.
17“माझ्या बंधूनो, तुम्ही येशूला जे केले ते तुम्ही अजाणता केले. (तुम्हांला समजत नव्हते, तुम्ही काय करीत आहात. तुमच्या नेत्यांनासुद्धा हे समजले नाही.)
18But those things, which God before had shewed by the mouth of all his prophets, that Christ should suffer, he hath so fulfilled.
18देवाने सांगितले या गोष्टी घडतील. देवाने भविष्यवाद्यांकरवी हे सांगितले की, त्याचा ख्रिस्त दु:खसहन करील व मरेल. मी तुम्हांला सांगितलेले आहे की, देवाने हे कसे घडवून आणले.
19Repent ye therefore, and be converted, that your sins may be blotted out, when the times of refreshing shall come from the presence of the Lord.
19म्हणून तुम्ही तुमची ह्रदये व जीवने बदलली पाहिजेत! देवाकडे परत या आणि तो तुमच्या पापांची क्षमा करील.
20And he shall send Jesus Christ, which before was preached unto you:
20मग प्रभु (देव) तुम्हांला आध्यात्मिक विश्रांतीसाठी वेळ देईल. तो तुम्हाला येशू देईल, ज्याला त्याने रिव्रस्त म्हणून निवडले.
21Whom the heaven must receive until the times of restitution of all things, which God hath spoken by the mouth of all his holy prophets since the world began.
21परंतु देवाने त्याच्या पवित्र भविष्यवाद्यांच्या तोंडून ज्या गोष्टी आरंभापासूनच सांगितल्या त्या घडून येईपर्यंत त्याला स्वर्गातच राहिले पाहिजे.
22For Moses truly said unto the fathers, A prophet shall the Lord your God raise up unto you of your brethren, like unto me; him shall ye hear in all things whatsoever he shall say unto you.
22मोशे म्हणाला, ‘प्रभु तुमचा देव तुम्हांला संदेष्टा देईल. तो संदेष्टा तुमच्या स्वत:च्या (यहूदी लोकांच्या) मधूनच देईल. तो माझ्यासारखा भविष्यवादी असेल. तो जे तुम्हांला सांगेल ते सारे तुम्ही पाळा.
23And it shall come to pass, that every soul, which will not hear that prophet, shall be destroyed from among the people.
23जो कोणी संदेष्ट्याची (भविष्यवादी) आज्ञा पाळणार नाही, त्याचे आपल्या बांधवांमधून मुळासकट उच्चाटन होईल.’
24Yea, and all the prophets from Samuel and those that follow after, as many as have spoken, have likewise foretold of these days.
24शमुवेल व इतर संदेष्टे (भविष्यावादी) जे शमुवेलानंतर झाले, जे देवासाठी बोलले, ते या आताच्या काळाविषयी बोलले.
25Ye are the children of the prophets, and of the covenant which God made with our fathers, saying unto Abraham, And in thy seed shall all the kindreds of the earth be blessed.
25संदेष्टे ज्या गोष्टीविषयी बोलले, त्या गोष्टी तुम्हांला मिळाल्या आहेत. देवाने तुमच्या वाडवडिलांशी (पूर्वजांशी) जो करार केला तो तुम्हांला मिळाला आहे. देवाने तुमचा पिता अब्राहाम याला म्हटले, ‘तुझ्या कुटुंबामुळे पृथ्वीवरील राष्ट्रे आशीर्वादित होतील.
26Unto you first God, having raised up his Son Jesus, sent him to bless you, in turning away every one of you from his iniquities.
26देवाने आपला खास सेवक येशू याला प्रथम तुमच्याकडे पाठविले, तुमच्या वाईट मार्गापासून तुम्हांला परावृत करण्याकडून.’ तुम्हांला आशीर्वाद देण्यासाठी देवाने येशूला पाठविले.”