1And I heard a great voice out of the temple saying to the seven angels, Go your ways, and pour out the vials of the wrath of God upon the earth.
1मग मी मंदिरातून एक मोठा आवाज ऐकला. तो सात देवदूतांना म्हणाला, “जा, पृथ्वीवर देवाच्या रागाच्या सात वाट्या ओता.”
2And the first went, and poured out his vial upon the earth; and there fell a noisome and grievous sore upon the men which had the mark of the beast, and upon them which worshipped his image.
2पहिला देवदूत गेला आणि त्याने जमिनीवर त्याची वाटी ओतली. तेव्हा सर्व लोकांना ज्यांच्यावर श्र्वापदाचे चिन्ह होते आणि जे त्याच्या मूर्तीची पूजा करीत होते त्यांना अतिशय कुरुप आणि वेदना देणारे फोड आले.
3And the second angel poured out his vial upon the sea; and it became as the blood of a dead man: and every living soul died in the sea.
3दुसऱ्या देवदूताने त्याची वाटी समुद्रावर ओतली. मग समुद्र रक्तासारखा, मेलेल्या माणसाच्या रक्तासारखा झाला. समुद्रातील प्रत्येक जीवधारी प्राणी मेले,
4And the third angel poured out his vial upon the rivers and fountains of waters; and they became blood.
4तिसऱ्या देवदूताने त्याची वाटी नद्या व झऱ्यांवर ओतली. तेव्हा नद्यावझरे रक्तमय झाले.
5And I heard the angel of the waters say, Thou art righteous, O Lord, which art, and wast, and shalt be, because thou hast judged thus.
5मग मी पाण्याच्या देवदूताला हे बोलताना ऐकले: “केवळ तूच एक आहेस, जो तू आहेस आणि जो तू होतास. तू पवित्र आहेस. जे न्याय तू दिलेस ते योग्य दिलेस.
6For they have shed the blood of saints and prophets, and thou hast given them blood to drink; for they are worthy.
6लोकांनी तुझ्या पवित्र लोकांचे रक्त सांडले. तुझ्या संदेष्ट्यांचे रक्त सांडले आता तू त्या लोकांना रक्त प्यावयास दिले आहेस. कारण ते याच पात्रतेचे आहेत.”
7And I heard another out of the altar say, Even so, Lord God Almighty, true and righteous are thy judgments.
7त्यानंतर मी वेदीला असे बोलताना ऐकले की, “होय, प्रभु देवा सर्वसमर्था, तुझा न्याय खरा आणि योग्य आहे.”
8And the fourth angel poured out his vial upon the sun; and power was given unto him to scorch men with fire.
8चौथ्या देवदूताने त्याची वाटी सूर्यावर ओतली. सूर्याला लोकांना अग्नीने जाळून टाकण्याची शक्ती दिली होती.
9And men were scorched with great heat, and blasphemed the name of God, which hath power over these plagues: and they repented not to give him glory.
9भयंकर अशा उष्णतेमुळे लोक जळाले. त्या लोकांनी देवाच्या नावाला शिव्याशाप दिले की ज्याला या संकटांवर ताबा आहे. पण लोकांनी पश्चात्ताप करण्याचे नाकारले व देवाचे गौरव करण्याचे नाकारले.
10And the fifth angel poured out his vial upon the seat of the beast; and his kingdom was full of darkness; and they gnawed their tongues for pain,
10पाचव्या देवदूताने त्याची वाटी श्र्वापदाच्या सिंहासनावर ओतली. आणि प्राण्याच्या राज्यावर अंधार पसरला. दु:खामुळे लोक त्यांच्या जिभा चावत होते.
11And blasphemed the God of heaven because of their pains and their sores, and repented not of their deeds.
11लोकांनी स्वर्गाच्या देवाला शाप दिले. कारण त्यांना वेदना होत होत्या व फोड आले होते. पण लोकांनी आपल्या पापकृत्यांपासून पश्चात्ताप करण्याचे नाकारले.
12And the sixth angel poured out his vial upon the great river Euphrates; and the water thereof was dried up, that the way of the kings of the east might be prepared.
12सहाव्या देवदूताने त्याची वाटी फरात नदीवर ओतली. नदीतील पाणी सुकून गेले. त्यामुळे पूर्वेकडून येणाऱ्या राजांसाठी रस्ता तयार झाला.
13And I saw three unclean spirits like frogs come out of the mouth of the dragon, and out of the mouth of the beast, and out of the mouth of the false prophet.
13तेव्हा मी तीन अशुद्ध आत्मे जे बेडकासारखे दिसत होते ते पाहिले. ते प्रचंड सापाच्या मुखातून बाहेर आले. श्र्वापदाच्या मुखातून बाहेर आले, खोट्या संदेष्ट्याच्या मुखातून बाहेर आले.
14For they are the spirits of devils, working miracles, which go forth unto the kings of the earth and of the whole world, to gather them to the battle of that great day of God Almighty.
14हे सर्व दुष्ट आत्मे सैतानाचे आत्मे आहेत. ते चमत्कार करातात, हे आत्मे सगळ्या जगातील राजांकडे जातात व त्यांना सर्वसमर्थ देवाच्या महान दिवशी लढाईसाठी एकत्र जमवतात.
15Behold, I come as a thief. Blessed is he that watcheth, and keepeth his garments, lest he walk naked, and they see his shame.
15“पाहा, जसा चोर येतो तसा मी येईन. तेव्हा लोकांसमोर आपली लज्जा दिसू नये म्हणून जो जागा राहील. आणि आपले कपडे तयार ठेवतो तो धन्य.”
16And he gathered them together into a place called in the Hebrew tongue Armageddon.
16मग दुष्ट आत्म्यांनी हर्मगिदोन नावाच्या ठिकाणी सर्व राजांना एकत्र आणले.
17And the seventh angel poured out his vial into the air; and there came a great voice out of the temple of heaven, from the throne, saying, It is done.
17मग सातव्या देवदूताने त्याची वाटी हवेत ओतली. तेव्हा मंदिरातून सिंहासनाजवळून मोठा आवाज आला. तो म्हणाला, “हे पूर्ण झाले आहे.”
18And there were voices, and thunders, and lightnings; and there was a great earthquake, such as was not since men were upon the earth, so mighty an earthquake, and so great.
18मग विजा चमकू लागल्या. गोंगाट, गडगडाट व फार प्रचंड भूकंप झाला. लोक पृथ्वीवर असल्यापासून असला प्रचंड भूकंप कधी झालाच नव्हता.
19And the great city was divided into three parts, and the cities of the nations fell: and great Babylon came in remembrance before God, to give unto her the cup of the wine of the fierceness of his wrath.
19महान शहर तीन विभागात विभागले गेले. राष्ट्रांतील शहरे नष्ट झाली. आणि देव महान बाबेलला विसरला नव्हता. त्याने त्यांच्या भयंकर रागाच्या द्राक्षारसाचा पेला बाबेलला दिला.
20And every island fled away, and the mountains were not found.
20प्रत्येक बेट नाहीसे झाले. आणि पर्वत पूर्णपणे नष्ट झाले.
21And there fell upon men a great hail out of heaven, every stone about the weight of a talent: and men blasphemed God because of the plague of the hail; for the plague thereof was exceeding great.
21लोकांवर आकाशातून गारांचा वर्षाव झाला. या प्रत्येक गारा 100 पौंड वजनाच्या होत्या, या गारांच्या संकटामुळे लोकांनी पश्चात्ताप करण्याऐवजी देवाला शाप दिले कारण ही पीडा खरोखरच महाभयंकर होती.