King James Version

Marathi

Revelation

5

1And I saw in the right hand of him that sat on the throne a book written within and on the backside, sealed with seven seals.
1मग मी, जो सिंहासनावर बसला होता त्याच्या उजव्या हातात गुंडाळी पाहिली. गुंडाळीवर दोन्ही बाजूंनी लिहिले होते. आणि ती गुंडाळी सात शिक्के मारुन बंद केली होती.
2And I saw a strong angel proclaiming with a loud voice, Who is worthy to open the book, and to loose the seals thereof?
2आणि मी एक सामर्थ्यशाली देवदूत पाहिला. तो देवदूत मोठ्या आवाजात म्हणाला, “गुंडाळीचे शिक्के तोडून ती उघडण्यास कोण पात्र आहे.?”
3And no man in heaven, nor in earth, neither under the earth, was able to open the book, neither to look thereon.
3परंतु स्वर्गात, पृथ्वीवर किंवा पृथ्वीखाली कोणीही ते शिक्के तोडण्यास आणि त्यामध्ये पाहण्यास समर्थ नव्हता.
4And I wept much, because no man was found worthy to open and to read the book, neither to look thereon.
4मी खूप रडलो कारण ती गुंडाळी उघडून आतमध्ये काय आहे हे पाहण्याच्या योग्यतेच कोणीही नव्हते.
5And one of the elders saith unto me, Weep not: behold, the Lion of the tribe of Juda, the Root of David, hath prevailed to open the book, and to loose the seven seals thereof.
5पण वडीलांपैकी एकजण मला म्हणाला, “रडू नकोस! पहा, यहूदा वंशाचा सिंह, दाविदाचा अंकुर हा विजयी झाला आहे. तो गुंडाळी उघडण्यास व तिचे सात शिक्के उघडण्यास समर्थ आहे.”
6And I beheld, and, lo, in the midst of the throne and of the four beasts, and in the midst of the elders, stood a Lamb as it had been slain, having seven horns and seven eyes, which are the seven Spirits of God sent forth into all the earth.
6मग मी एक कोकरा पाहिला. सिंहासनाच्या मध्यभागी उभा असलेला व त्याच्या भोवती चार जिवंत प्राणी असलेले मी पाहिले. व वडीलही त्याच्याभोवती होते. कोकरा बांधल्यासारखा दिसत होता. त्याला सात शिंगे आणि सात डोळे होते. आणि हे जणू देवाचे सात आत्मे असून ते सर्व जगभर पाठविले होते.
7And he came and took the book out of the right hand of him that sat upon the throne.
7कोकरा आला आणि त्याने जो, सिंहासनावर बसला होता, त्याच्या उजव्या हातातून ती गुंडाळी घेतली.
8And when he had taken the book, the four beasts and four and twenty elders fell down before the Lamb, having every one of them harps, and golden vials full of odours, which are the prayers of saints.
8आणि जेव्हा त्याने ती घेतली तेव्हा चार जिवंत प्राणी व चोवीस वडीलजन कोकऱ्यासमोर उपडे पडले. प्रत्येकाजवळ वीणा व प्रत्येकाच्या हातात सुवासिक उदाने भरलेल्या सोन्याच्या वाट्या होत्या. या वाट्या म्हणजे देवाच्या लोकांच्या प्रार्थना होत्या.
9And they sung a new song, saying, Thou art worthy to take the book, and to open the seals thereof: for thou wast slain, and hast redeemed us to God by thy blood out of every kindred, and tongue, and people, and nation;
9आणि त्यांनी नवे गाणे गाईले: “तू गुंडाळी घेण्यास आणि तिचे शिक्के उघडण्यास समर्थ आहेस, कारण तुला वधण्यात आले आणि तू आपल्या रक्ताने मनुष्यांना प्रत्येक वंशातून, वेगवेगळ्या भाषा बोलणाऱ्या जमातीतून, आणि राष्टांतून विकत घेतले.
10And hast made us unto our God kings and priests: and we shall reign on the earth.
10तू त्यांना राज्य आणि पृथ्वीवर आपल्या देवासाठी याजक बनविले आणि नंतर ते पृथ्वीवर सत्ता गाजवितील”
11And I beheld, and I heard the voice of many angels round about the throne and the beasts and the elders: and the number of them was ten thousand times ten thousand, and thousands of thousands;
11मग मी पाहिले सिंहासन आणि, चार जिवंत प्राणी व वडीलजन यांच्या सभोवती अगणित देवदूतांची वाणी ऐकली, त्यांची संख्या अयुतांची अयुते व हजारो हजार होती.
12Saying with a loud voice, Worthy is the Lamb that was slain to receive power, and riches, and wisdom, and strength, and honour, and glory, and blessing.
12देवदूत मोठ्या आवाजात म्हणाले, “जो वधलेला कोकरा होता तो सामर्थ्य, संपत्ति, शहाणपण आणि शक्ति, सन्मान, गौरव आणि स्तुतीस पात्र आहे!”
13And every creature which is in heaven, and on the earth, and under the earth, and such as are in the sea, and all that are in them, heard I saying, Blessing, and honour, and glory, and power, be unto him that sitteth upon the throne, and unto the Lamb for ever and ever.
13प्रत्येक निर्माण केलेली वस्तु आकाशात व पृथ्वीवर, पृथ्वीखाली व समुद्रातील अवघ्यांना मी असे गाताना ऐकले की, “जो सिंहासनावर बसतो त्याला व कोकऱ्याला स्तुति, सन्मान, गौरव आणि सामर्थ्य अनंतकाळपर्यंत असो!”
14And the four beasts said, Amen. And the four and twenty elders fell down and worshipped him that liveth for ever and ever.
14चार जिवंत प्राणी म्हणाले, “आमेन!” मग वडीलजनांनी खाली पडून त्याला अभिवादन केले.