1And he causeth me to turn back the way of the gate of the outer sanctuary that is looking eastward, and it is shut.
1नंतर त्या माणसाने मला परत, पूर्वेकडे तोंड असलेल्या, बाहेरच्या प्रवेशद्वारापाशी आणले. आम्ही प्रवेशद्वारा बाहेर होतो व ते बंद होते.
2And Jehovah saith unto me, `This gate is shut, it is not opened, and none doth go in by it, for Jehovah, God of Israel, hath come in by it, and it hath been shut.
2परमेश्वर मला म्हणाला, “हे बंदच राहील. ते उघडणार नाही. ह्यामधून कोणीही प्रवेश करणार नाही. का? कारण इस्राएलच्या परमेश्वराने ह्यातून प्रवेश केला. म्हणून ते बंदच राहिले पाहिजे.
3The prince, who [is] prince, he sitteth by it to eat bread before Jehovah, by the way of the porch of the gate he cometh in, and by its way he goeth out.`
3लोकांचा राजा बंधुत्वदर्शक पदार्थ परमेश्वराबरोबर खाताना या प्रवेशद्वारात बसेल. प्रवेशद्वाराजवळच्या द्वारमंडपातून तो ये-जा करील.”
4And he bringeth me in the way of the north gate unto the front of the house, and I look, and lo, filled hath the honour of Jehovah the house of Jehovah, and I fall on my face.
4मग त्या माणसाने मला उत्तरेकडच्या दारातून मंदिरासमोर आणले. मी पाहिले तर काय, परमेश्वराची प्रभा, परमेश्वराच्या मंदिरात, पसरत होती. मी जमिनीला डोके टेकवून नमस्कार केला.
5And Jehovah saith unto me, `Son of man, set thy heart, and see with thine eyes, and with thine ears hear, all that I am speaking with thee, of all the statutes of the house of Jehovah, and of all its laws; and thou hast set thy heart to the entrance of the house, with all the outlets of the sanctuary,
5परमेश्वरा मला म्हणाला, “मानवपुत्रा, अगदी लक्षपूर्वक पाहा! तुझ्या डोळ्यांचा आणि कानांचा वापर कर. ह्या गोष्टी पाहा आणि परमेश्वराच्या मंदिराच्या विधिनियमाबाबत मी जे सांगतो, ते लक्षपूर्वक ऐक. मंदिराचे प्रवेश-मार्ग व पवित्र जागेचे बाहेर जाण्याचे मार्ग काळजीपूर्वक पाहा.
6and hast said unto the rebellious, unto the house of Israel: Thus said the Lord Jehovah: Enough to you — of all your abominations, O house of Israel.
6मग माझे म्हणणे ऐकण्याचे नाकारणाऱ्या इस्राएलच्या सर्व लोकांना पुढील संदेश दे. त्यांना सांग. की परमेश्वर, माझा प्रभू, पुढील गोष्टी सांगतो: ‘इस्राएलच्या लोकांनो, तुम्ही केलेल्या भयंकर गोष्टी मला अति झाल्या आहेत.
7In your bringing in sons of a stranger, uncircumcised of heart, and uncircumcised of flesh, to be in My sanctuary, to pollute it, even My house, in your bringing near My bread, fat, and blood, and they break My covenant by all your abominations,
7ज्यांची खरोखरच सुंता झालेली नाही, जे पूर्णपणे माझे झाले नाहीत, अशा परक्यांना तुम्ही माझ्या मंदिरात आणले. अशा रीतीने तुम्ही माझे मंदिर अमंगळ केले. तुम्ही आपला करार मोडला, भयंकर कृत्ये केली आणि मला भाकरी, चरबी आणि रक्ताचे अर्पण केले पण ह्यामुळे माझे मंदिर अशुद्ध, अमंगळ झाले.
8and ye have not kept the charge of My holy things, and ye set [them] for keepers of My charge in My sanctuary for you.
8माझ्या पवित्र वस्तूंची तुम्ही काळजी घेतली नाही. माझ्या पवित्र जागेची जबाबदारी तुम्ही परक्यांवर टाकली.”
9`Thus said the Lord Jehovah: No son of a stranger, uncircumcised of heart, and uncircumcised of flesh, cometh in unto My sanctuary, even any son of a stranger, who [is] in the midst of the sons of Israel,
9परमेश्वर, माझा प्रभू, पुढील गोष्टी सांगतो: ‘कोणीही खरोखरीची सुंता न झालेला परका जरी तो कायमचा इस्राएल लोकांच्यात राहत असला तरी-माझ्या मंदिरात येता कामा नये. मंदिरात येण्याआधी त्यांची सुंता केली गेलीच पाहिजे, व त्याने संपूर्णपणे मला वाहून घेतले पाहिजे.
10but — the Levites who have gone far off from me, in the wandering of Israel when they went astray from Me after their idols, and they have borne their iniquity.
10भूतकाळात, इस्राएलने जेव्हा माझ्याकडे पाठ फिरवीली, तेव्हा लेवींनी मला सोडले. आपल्या मूर्तीना अनुसरण्यासाठी, इस्राएलने माझा त्याग केला. लेवींच्या पापाबद्दल लेवींना शिक्षा होईल.
11And they have been in My sanctuary ministrants, overseers at the gates of the house, and ministrants at the house; they slay the burnt-offering and the sacrifice for the people, and they stand before them to serve them.
11माझ्या पवित्र जागेची सेवा करण्यासाठी लेवींची निवड केली गेली होती. ते मंदिराच्या प्रवेशद्वारांचे रक्षण करीत, मंदिरात सेवा करीत. बळी देण्यासाठी लोकांनी आणलेल्या प्राण्यांचा ते बळी देत व लोकांसाठी होमार्पणे करीत. लोकांना मदत करण्यासाठी आणि त्यांची सेवा करण्यासाठी त्यांची निवड केली गेली होती.
12Because that they serve them before their idols, and have been to the house of Israel for a stumbling-block of iniquity, therefore I have lifted up my hand against them — an affirmation of the Lord Jehovah — and they have borne their iniquity.
12पण त्या लेवींनी माझ्याविरुध्द पाप करण्यात आणि त्यांच्या मूर्तींची पूजा करण्यात लोकांना मदत केली. म्हणून मी ‘त्यांना त्यांच्या पापाबद्दल शिक्षा होईल. असे वचन देतो.”‘ परमेश्वर, माझा प्रभू, हे म्हणाला.
13And they draw not nigh unto Me to act as My priest, and to draw nigh unto any of My holy things, unto the holy of holies, and they have borne their shame and their abominations that they have done,
13“म्हणून याजकाप्रमाणे, लेवी मला अर्पण करण्यास काही आणणार नाहीत. ते माझ्या ‘पवित्र’ किंवा ‘अती पवित्र’ गोष्टींच्या जवळ येणार नाहीत. त्यांनी केलेल्या भयंकर कृत्यांचा काळिमा त्यांना वाहवा लागले.
14and I made them keepers of the charge of the house, for all its service and for all that is done in it.
14पण मी त्यांना मंदिराची काळजी घेऊ देईन. ते मंदिरातील आवश्यक ती कामे करतील.
15`And the priests, the Levites, sons of Zadok, who have kept the charge of My sanctuary in the wandering of the sons of Israel from off Me, they draw near unto Me to serve Me, and have stood before Me, to bring near to Me fat and blood — an affirmation of the Lord Jehovah:
15“सर्व याजक लेवी - वंशाचे आहेत. पण जेव्हा इस्राएलचे लोक माझ्या विरोधात गेले, तेव्हा फक्त सादोकच्या घराण्यातील लोकांनी माझ्या पवित्र जागेची काळजी घेतली. म्हणून फक्त सादोकचे वंशजच मला अर्पण करण्याच्या वस्तू माझ्याकडे घेऊन येतील. बळी दिलेल्या प्राण्यांची चरबी व रक्त मला वाहण्यासाठी तेच फक्त माझ्यापुढे उभे राहतील.” परमेश्वराने, माझ्या प्रभूने, ह्या गोष्टी सांगितल्या.
16they come in unto My sanctuary, and they draw near unto My table to serve Me, and they have kept My charge.
16“ते माझ्या पवित्र जागेत प्रवेश करतील. ते माझी सेवा करण्यासाठी माझ्या टेबलाजवळ येतील. मी त्यांना दिलेल्या गोष्टींची ते काळजी घेतील.
17And it hath come to pass, in their going in unto the gates of the inner court, linen garments they put on; and no wool cometh up on them in their ministering in the gates of the inner court and within.
17ते आतल्या अंगणाच्या प्रवेशद्वारातून आत आले की तागाची वस्त्रे घालतील. आतल्या अंगणाच्या प्रवेशद्वारात काम करताना अथवा मंदिरात सेवा करताना ते लोकरीची वस्त्रे वापरणार नाहीत.
18Linen bonnets are on their head, and linen trousers are on their loins, they are not restrained with sweat.
18ते तागाचे फेटे बांधतील. त्यांची अंतर्वस्त्रेही तागाची असतील. ज्यामुळे घाम येईल अशा प्रकारची कोणतीही वस्त्रे ते घालणार नाहीत.
19And in their going forth unto the outer court — unto the outer court unto the people — they strip off their garments, in which they are ministering, and have placed them in the holy chambers, and have put on other garments; and they do not sanctify the people in their own garments.
19माझी सेवा करताना घातलेली वस्त्रे, बाहेरच्या पटांगणात लोकांमध्ये जाण्यापूर्वी ते उतरवून ठेवतील ते ही वस्त्रे पवित्र खोल्यांत ठेवतील. मग ते दुसरे कपडे घालतील. अशा प्रकारे ते त्या पवित्र वस्त्रांना लोकांना शिवू देणार नाहीत.
20And their head they do not shave, and the lock they do not send forth; they certainly poll their heads.
20“हे याजक मुंडन करणार नाहीत वा केस लांब वाढविणार नाहीत तेव्हा ते फक्त आपले केस कातरुन बारीक करतील.
21And no priest doth drink wine in their coming in unto the inner court.
21आतल्या अंगणात जाताना याजकाने द्राक्षरस पिऊ नये.
22And a widow and divorced woman they do not take to them for wives: but — virgins of the seed of the house of Israel, and the widow who is widow of a priest, do they take.
22कोणत्याही याजकाने विधवेशी वा घटस्फोटितेशी लग्न करु नये. त्यांनी इस्राएली कुमारिकेशी लग्न करावे. अथवा याजकाच्या विधवेशी लग्न केले तरी चालेल.
23`And My people they direct between holy and common, and between unclean and clean they cause them to discern.
23“तसेच याजाक लोकांना पवित्र व सामान्य ह्यातील भेद शिकवितील. ते लोकांना शुद्ध व अशुद्ध ह्यातील फरक समजवण्यास मदत करतील.
24And concerning controversy, they stand up for judgment; with My judgments they judge it; and My law and My statutes in all My appointed places they keep; and My sabbaths they sanctify.
24याजक न्यायालयाचे न्यायाधीश असतील. लोकांना न्याय देताना ते माझे कायदे पाळतील. ते माझ्या विशेष सणांचे विधिनियम पाळतील, माझ्या खास सुट्ट्यांच्या दिवसांचा मान आणि पावित्र्य राखतील.
25And unto any dead man they come not for uncleanness, but for father, and for mother, and for son, and for daughter, for brother, for sister who hath not been to a man, they defile themselves.
25मृताच्या जवळ जाऊन ते अशुध्द होणार नाहीत, पण मृत व्यक्ती जर याजकाची स्वत:ची वडील, आई, मुलगा, मुलगी, भाऊ अथवा अविवाहित बहीण असेल, तर मात्र मृताजवळ गेले व अशुध्द झाले तरी चालेल.
26`And after his cleansing, seven days they number to him.
26याजकाला शुद्ध केल्यावर, त्याने सात दिवस थांबले पाहिजे.
27And in the day of his coming in unto the sanctuary, unto the inner court, to minister in the sanctuary, he bringeth near his sin-offering — an affirmation of the Lord Jehovah.
27मग तो पवित्र जागी जाऊ शकतो. पण ज्या दिवशी तो पवित्र जागेची सेवा करण्यासाठी आतल्या अंगणात जाईल, तेव्हा त्याने स्वत:साठी पापार्पण करावे.” परमेश्वर, माझा प्रभू, असे म्हणाला.
28And it hath been to them for an inheritance; I [am] their inheritance: and a possession ye do not give to them in Israel; I [am] their possession.
28“लेवींच्या मालकीच्या जमिनीबद्दल: मी त्यांची मालमत्ता आहे. त्यांना इस्राएलमध्ये तुम्ही काहीही मालमत्ता (जमीन) देऊ नका. मी त्यांचा इस्राएलमधील वाटा आहे.
29The present, and the sin-offering, and the guilt-offering, they do eat, and every devoted thing in Israel is theirs.
29“त्यांना धान्यार्पणे, दोषार्पणे, पापार्पणे खायला मिळतील. इस्राएलच्या लोकांनी परमेश्वराला अर्पण केलेली प्रत्येक गोष्ट त्यांची असेल.
30And the first of all the first-fruits of all, and every heave-offering of all, of all your heave-offerings, are the priests`: and the first of your dough ye give to the priest, to cause a blessing to rest on thy house.
30प्रत्येक पिकाच्या बहराचा पहिला भाग याजकाचा असेल. मळलेल्या पिठाचा पहिला भागसुद्धा तुम्ही याजकाला द्यावा. त्यामुळे तुमच्या घराला आशिर्वाद मिळतील.
31Any carcase and torn thing, of the fowl, and of the beasts, the priests do not eat.
31आपोआप मेलेला व हिंस्र श्र्वापदांनी मारुन फाडलेला कोणताही प्राणी वा पक्षी याजकानी खाऊ नये.