Young`s Literal Translation

Marathi

Hosea

8

1`Unto thy mouth — a trumpet, As an eagle against the house of Jehovah, Because they transgressed My covenant, And against My law they have rebelled.
1“रणशिंग फुंकून इषारा द्या परमेश्वराच्या घरावरील गरुडाप्रमाणे व्हा. इस्राएल लोकांनी माझा करार मोडला आहे त्यांनी माझे नियम पाळले नाहीत
2To Me they cry, `My God, we — Israel — have known Thee.`
2‘परमेश्वर, आम्ही इस्राएलमधील लोक तुला ओळखतो’ असे ते किंचाळून मला म्हणतात.
3Cast off good hath Israel, an enemy pursueth him.
3पण इस्राएलने चांगल्या गोष्टी नाकारल्या म्हणून शत्रू त्याचा पाठलाग करतात.
4They have made kings, and not by Me, They have made princes, and I have not known, Their silver and their gold they have made to them idols, So that they are cut off.
4इस्राएल लोकांनी त्यांचा राजा निवडला, पण सल्ला विचारण्यासाठी ते माझ्याकडे आले नाहीत. इस्राएल लोकांनी नेते निवडले, पण मी ओळखत असणाऱ्या लोकांची निवड त्यांनी केली नही. इस्राएल लोकांनी त्यांच्याजवळील सोन्या-चांदीचा उपयोग स्वत:साठी मर्ती तयार करण्याकंरिता केला. म्हणून त्यांचा नाश होईल.
5Cast off hath thy calf, O Samaria, Burned hath Mine anger against them, Till when are they not capable of purity?
5[This verse may not be a part of this translation]
6For even it [is] of Israel; an artificer made it, And it [is] not God, For the calf of Samaria is fragments!
6[This verse may not be a part of this translation]
7For wind they sow, and a hurricane they reap, Stalk it hath none — a shoot not yielding grain, If so be it yield — strangers do swallow it up.
7इस्राएल लोकांनी मूर्खपणा केला. तो वाऱ्याला पेरण्याप्रमाणे होता. म्हणून त्यांच्यावर संकटे येतील-ते वावटळीचे पीक निर्माण करतील. शेतांत पीक वाढेल, पण त्यापासून अन्न मिळणार नाही. जर काही पिकलेच, तर परकेच ते खाऊन टाकतील.
8Israel hath been swallowed up, Now they have been among nations, As a vessel in which is no delight.
8कोणालाही नको असलेल्या ताटासारखा इस्राएल असल्यामुळे त्याचा नाश केला गेला. इस्राएलला दूर फेकण्यात आले. म्हणून इस्राएल लोक इतर राष्ट्रांत विखुरले गेले.
9For they — they have gone up [to] Asshur, A wild ass alone by himself [is] Ephraim, They have hired lovers!
9एफ्राईम त्याच्या ‘प्रेमिकाकडे’ गेला. रानटी गाढवाप्रमाणे तो अश्शूरकडे भटकला गेला.
10Also though they hire among nations, Now I gather them, and they are pained a little, From the burden of a king of princes.
10इस्राएल लोक इतर राष्ट्रांतील आपल्या ‘प्रियकरांकडे’ गेले. पण मी इस्राएलींना एकत्र गोळा करीन. पण त्या सामर्थ्यवान राजाच्या ओझ्यामुळे त्यांना थोडासा त्रास झालाच पाहिजे.
11Because Ephraim did multiply altars to sin, They have been to him altars to sin.
11एफ्राईमने पुष्कळ वेद्या बांधून पापच केले. त्या वेद्या एफ्राईमच्या पापाच्या वेद्या बनल्या आहेत.
12I write for him numerous things of My law, As a strange thing they have been reckoned.
12मी एफ्राईमसाठी जरी 10,000 नियम लिहिले, पण एफ्राईमने ते परक्यासाठी असल्याप्रमाणे मानले.
13The sacrifices of Mine offerings! They sacrifice flesh, and they eat, Jehovah hath not accepted them, Now doth He remember their iniquity, And inspect their sin, They — [to] Egypt they turn back.
13इस्राएलींना बळी देणे आवडते. ते मांसाचा नैवेद्य दाखवून ते खातात. परमेश्वर त्यांनी दिलेले बळी स्वीकारीत नाही. त्याला त्यांची पापे स्मरतात. म्हणून तो त्यांना शिक्षा करील. कैदी म्हणून त्यांना मिसरला नेण्यात येईल.
14And forget doth Israel his Maker, and buildeth temples, And Judah hath multiplied cities of defence, And I have sent a fire into his cities, And it hath consumed their palaces!
14इस्राएलने राजवाडे बांधले. पण तो आपल्या कर्त्याला विसरला आता यहूदा गढ्या बांधतो आहे. पण मी यहूदातील गावाला आग लावीन आणि ती आग त्या गढ्यांना बेचिराख करील!”