1For lo, in those days, and in that time, When I turn back [to] the captivity of Judah and Jerusalem,
1“त्या वेळी, यहूदा व यरुशलेम यांची कैदेतून सुटका करून, मी त्यांना परत आणीन.
2Then I have gathered all the nations, And caused them to go down unto the valley of Jehoshaphat, And I have been judged with them there, Concerning My people and Mine inheritance — Israel, Whom they scattered among nations, And My land they have apportioned.
2मी, सर्व राष्ट्रांनासुध्दा गोळा करून, खाली यहोशाफाटाच्या दरीत आणीन. तेथे मी त्यांचा न्यायनिवाडा करीन. त्या राष्ट्रांनी माझ्या माणसांना म्हणजेच इस्राएल लोकांना पांगविले. त्यानी त्याना बळजबरीने इतर राष्ट्रात राहण्यास भाग पाडले म्हणून त्या राष्ट्रांना मी शिक्षा करीन. त्या राष्ट्रांनी माझा देश वाटून घेतला.
3And for My people they do cast a lot, And they give the young man for an harlot, And the young woman have sold for wine, That they may drink.
3त्यांनी माझ्या लोकांकरिता चिठ्या टाकल्या. वेश्या खरीदण्यासाठी त्यांनी मुलगा विकला आणि मद्य खरीदण्यासाठी मुलगी विकली.
4And also, what [are] ye to Me, O Tyre and Zidon, And all circuits of Philistia? Recompence are ye rendering unto Me? And if ye are giving recompence to Me, Swiftly, hastily, I turn back your recompence on your head.
4“सारे, सीदोन व पेलेशेथच्या सर्व प्रांतानो, माझ्या दृष्टीने तुम्हाला अजिबात महत्व नाही. माझ्या कृत्याबद्दल तुम्ही मला शिक्षा करीत आहत का? तुम्हाला कदाचित् तसे वाटत असेल. पण लवकरच मी तुम्हाला शिक्षा करीन.
5In that My silver and My gold ye took, And My desirable things that are good, Ye have brought in to your temples.
5तुम्ही माझे सोने-चांदी घेतली. तुम्ही माझा अमूल्य खजिना घेऊन आपल्या मंदिरात ठेवलात.
6And sons of Judah, and sons of Jerusalem, Ye have sold to the sons of Javan, To put them far off from their border.
6“तुम्ही यहूदाच्या व यरुशलेमच्या माणसांना यावनी लोकांना विकले. अशा रीतीने, तुम्ही त्यांना देशोधडीला लावू शकला.
7Lo, I am stirring them up out of the place Whither ye have sold them, And I have turned back your recompence on your head,
7तुम्ही त्या खूप दूर असलेल्या प्रदेशात माझ्या लोकांना पाठविले. पण मी त्यांना परत आणीन, आणि तुम्ही जे काही केले, त्याबद्दल तुम्हाला शिक्षा करीन.
8And have sold your sons and your daughters Into the hand of the sons of Judah, And they have sold them to Shabeans, Unto a nation far off, for Jehovah hath spoken.
8तुमच्या मुला-मुलींना मी यहूद्यांना विकीन. मग ते त्या मुंला-मुलींना दूरच्या शबाच्या लोकांना विकतील.” परमेश्वरानेच हे सांगितले.
9Proclaim ye this among nations, Sanctify a war, stir up the mighty ones, Come nigh, come up, let all the men of war.
9[This verse may not be a part of this translation]
10Beat your ploughshares to swords, And your pruning-hooks to javelins, Let the weak say, `I [am] mighty.`
10फाळ मोडून त्यांच्या तलवारी करा.कोयत्यापासून भाले करा. “दुबळ्याला मी बलवान योध्दा आहे” असे म्हणू द्या.
11Haste, and come in, all ye nations round, And be gathered together, Thither cause to come down, O Jehovah, Thy mighty ones.
11सर्व राष्ट्रांनो, त्वरा करा! त्या जागी एकत्र या. हे परमेश्वरा, तुझे बलवान योध्दे आण
12Wake and come up let the nations unto the valley of Jehoshaphat, For there I sit to judge all the nations around.
12राष्ट्रांनो, उठा! यहोशाफाटच्या दरीत गोळा व्हा. तेथे मी सभोवतालच्या राष्ट्रांचा न्याय करायला बसेन.
13Send ye forth a sickle, For ripened hath harvest, Come in, come down, for filled hath been the press, Overflowed hath wine-presses, For great [is] their wickedness.
13विळा आणा, कारण पीक तयार झाले आहे. या आणि द्राक्षे तुडवा. कारण द्राक्षकुंड भरून गेले आहे. पिंप भरून वाहत आहेत. कारण त्यांचे पाप मोठे आहे.
14Multitudes, multitudes [are] in the valley of decision, For near [is] the day of Jehovah in the valley of decision.
14निर्णयाच्या दरीत पुष्कळशी माणसे आहेत. परमेश्वराचा विशेष दिवस जवळ आला आहे.
15Sun and moon have been black, And stars have gathered up their shining.
15चंद्र-सूर्य काळवंडतील. तारे निस्तेज होतील.
16And Jehovah from Zion doth roar, And from Jerusalem giveth forth His voice, And shaken have the heavens and earth, And Jehovah [is] a refuge to his people, And a stronghold to sons of Israel.
16परमेश्वर देव सियोनेहून गर्जना करील तो यरुशलेमहून ओरडेल. आणि आकाश व पृथ्वी कापेल पण परमेश्वराच्या लोकांना तो सुरक्षित स्थान असेल. इस्राएलच्या लोकांना तो सुरक्षित जागा असेल.
17And ye have known that I [am] Jehovah your God, Dwelling in Zion, My holy mountain, And Jerusalem hath been holy, And strangers do not pass over into it again.
17“मगय तुम्हाला कळेल की मीच तुमचा परमेश्वर देव आहे. माझ्या पवित्र पर्वतावर म्हणजे सियोनावर मी राहतो. यरुशलेम पवित्र होईल. त्या नगरीतून पुन्हा कधीही परके जाणार नाहीत.
18And it hath come to pass, in that day, Drop down do the mountains juice, And the hills do flow [with] milk, And all streams of Judah do go [with] water, And a fountain from the house of Jehovah goeth forth, And hath watered the valley of Shittim.
18त्या दिवशी, पर्वत गोड द्राक्षरसाने पाझरतील, टेकड्यांवरून दूध वाहील, आणि यहूदाच्या कोरड्या पडलेल्या नद्यांमधून पाणी वाहील, परमेश्वराच्या मंदिरातून कारंजे उडतील आणि शिट्टीमाच्या दरीला पाणी पुरवतील.
19Egypt a desolation becometh, And Edom a desolation, a wilderness, becometh, For violence [to] sons of Judah, Whose innocent blood they shed in their land.
19मिसर उजाड होईल. अदोमाचे रान होईल. का? कारण ते यहूद्यांशी क्रूरपणे वागले. त्यांनी त्यांच्या देशातील निष्पाप लोकांना मारले
20And Judah to the age doth dwell, And Jerusalem to generation and generation.
20परंतु, यहूदामध्ये नेहमीच लोक राहतील. ते यरुशलेममध्ये पिढ्यान्पिढ्या वास करतील.
21And I have declared their blood innocent, [That] I did not declare innocent, And Jehovah is dwelling in Zion!
21त्या लोकांनी माझ्या लोकांना ठार केले. म्हणून मी त्यांना खरोखरच शिक्षा करीन.” कारण परमेश्वर देव सियोनमध्ये वस्ती करील.