1Thus said the Lord Jehovah to Edom, A report we have heard from Jehovah, And an ambassador among nations was sent, `Rise, yea, let us rise against her for battle.`
1हा ओबद्याचा दृष्टांन्त आहे. परमेश्वर, माझा प्रभू अदोमाबद्दल पुढील प्रढील प्रमाणे म्हणाला: आम्ही परमेश्वर देवाकडून हकिगत ऐकली. राष्ट्रांकडे दूत पाठविला गेला. तो म्हणाला, “आपण अदोमाविरुध्द लढण्यास जाऊ या.”
2Lo, little I have made thee among nations, Despised [art] thou exceedingly.
2“अदोम, मी तुला लहान राष्ट्र करीन. लोक तुझा खूप तिरस्कार करतील.
3The pride of thy heart hath lifted thee up, O dweller in clifts of a rock, (A high place [is] his habitation, He is saying in his heart, `Who doth bring me down [to] earth?`)
3तुझ्या गर्वाने तुला मूर्ख बनविले. उंच कड्यावरील गुहांत तू राहतोस. तुझे घर टेकडीवर उंच ठिकाणी आहे. म्हणून स्वत:शी म्हणतोस, ‘मला कोणीही खाली जमिनीवर आणू शकत नाही.”‘
4If thou dost go up high as an eagle, And if between stars thou dost set thy nest, From thence I bring thee down, An affirmation of Jehovah.
4परमेश्वर, देव, असे म्हणतो, “जरी तू गरुडाप्रमाणे वर जातोस, आणि ताऱ्यांमध्यो घरटे बांधतोस, तरी मी तुला खाली आणील.”
5If thieves have come in to thee, If spoilers of the night, How hast thou been cut off! Do they not steal their sufficiency? If gatherers have come in to thee, Do they not leave gleanings?
5तुझा खरोखरीच नाश होईल. तुझ्याकडे चोर येतील. रात्री लुटारु येतील, ते चोर त्यांना पाहिजे ते सर्व नेतील. तुझ्या मळ्यातील द्राक्षे तोडताना मजूर काही द्राक्षे मागे ठेवतात.
6How hath Esau been searched out! Flowed out have his hidden things,
6पण एसावचा लपविलेला खजिना शत्रू कसोशीने शोधेल. आणि त्यांना ते सर्व सापडेल.
7Unto the border sent thee have all thine allies, Forgotten thee, prevailed over thee, have thy friends, Thy bread they make a snare under thee, There is no understanding in him!
7तुझे मित्र असलेले लोकच तुला देशातून बळजबरीने बाहेर काढतील. तुझे मित्र तुला फसवतील व चुकीच्या गोष्टी करण्यासाठी तुझी खात्री करतील. युध्दात तुझ्याबरोबर असलेले सोबती तुझ्यासाठी सापळा रचायचा बेत करीत आहेत. ते म्हणतात, ‘ते तुझ्या लक्षात येणार नाही’.
8Is it not in that day — an affirmation of Jehovah, That I have destroyed the wise out of Edom, And understanding out of the mount of Esau?
8परमेश्वर म्हणतो, “त्याच दिवशी, मी अदोममधील सुज्ञांचा नाश करीन. एसावच्या पर्वतातून समजूत नष्ट करीन.
9And broken down have been thy mighty ones, O Teman, So that every one of the mount of Esau is cut off.
9[This verse may not be a part of this translation]
10For slaughter, for violence [to] thy brother Jacob, Cover thee doth shame, And thou hast been cut off — to the age.
10तू अप्रतिष्ठेने माखशील. आणि तुझा कायमचा नाश होईल. का? कारण तू, तुझा भाऊ याकोब याच्याशी क्रूरपणे वागलास.
11In the day of thy standing over-against, In the day of strangers taking captive his force, And foreigners have entered his gates, And for Jerusalem have cast a lot, Even thou [art] as one of them!
11तू इस्राएलच्या शत्रूंना जाऊन मिळालास; परक्यांनी इस्राएलचे धन लुटून नेले परदेशी इस्राएलच्या गावाच्या वेशीतून आत शिरले; त्यांनी यरुशलेमचा कोणता भाग घ्यायचा ह्यासाठी चिठ्या टाकल्या; आणि तू अगदी तेथेच तुझ्या वाटणीची वाट बघत उभा होतास.
12And — thou dost not look on the day of thy brother, On the day of his alienation, Nor dost thou rejoice over sons of Judah, In the day of their destruction, Nor make great thy mouth in a day of distress.
12तुझ्या भावाच्या संकटांना तू हसलास. तू असे करायला नको होतेस. लोकांनी जेव्हा यहूदाचा नाश केला तेव्हा तू आनंद मानलास, तू तसे करायला नको होतेस. त्याच्या संकटसमयी तू प्रौढी मिरविलीस; असेही तू करायला नको होतेस.
13Nor come into a gate of My people in a day of their calamity, Nor look, even thou, on its misfortune in a day of its calamity, Nor send forth against its force in a day of its calamity,
13माझ्या लोकांच्या वेशीतून तू आत आलास; आणि त्यांच्या समस्यांकडे पाहून हसलास; तू असे करायला नको होतेस त्यांच्या संकटसमयी तू त्यांची संपत्ती घेतलीस, तू असे करायला नको होतेस.
14Nor stand by the breach to cut off its escaped, Nor deliver up its remnant in a day of distress.
14जिथे रस्ते एकमेकांना छेदतात तिथे तू उभा राहिलास आणि पळून जाण्याचा प्रयत्न करणाऱ्यांचा नाश केलास. तू असे करायला नको होते. जिवंत सुटलेल्यांना तू पकडलेस तू असे करायला नको होते.
15For near [is] the day of Jehovah, on all the nations, As thou hast done, it is done to thee, Thy deed doth turn back on thine own head.
15परमेश्वराचा दिवस लवकरच सर्व राष्ट्रांकडे येत आहे; तू दुसऱ्या लोकांशी वाईट कृत्ये केलीस त्या वाईट गोष्टी तुझ्या बाबतीत घडतील. तू केलेली दुष्कर्मे तुझ्या डोक्यावर येऊन आदळतील.
16For — as ye have drunk on My holy mount, Drink do all the nations continually, And they have drunk and have swallowed, And they have been as they have not been.
16का? कारण तू माझ्या पवित्र पर्वतावर रक्त सांडलेस म्हणून दुसरी राष्ट्रेही तुझे रक्त सांडतील. तू संपशील. तू कधी अस्तित्वात नव्हतास, अशीच तुझी दशा होईल.
17And in mount Zion there is an escape, And it hath been holy, And the house of Jacob have possessed their possessions.
17पण सियोन पर्वतावर काही वाचलेले असतील. ते माझे खास लोक असतील. याकोबाचे राष्ट्र त्याच्या मालकीच्या गोष्टी परत स्वत:कडे घेईल.
18And the house of Jacob hath been a fire, And the house of Joseph a flame, And the house of Esau for stubble, And they have burned among them, And they have consumed them, And there is not a remnant to the house of Esau, For Jehovah hath spoken.
18याकोबाचे घराणे आगीप्रमाणे होईल योसेफाचे घराणे जाळासारखे असेल पण एसावाचे राष्ट्र राखेप्रमाणे होईल यहुदाचे लोक अदोम जाळतील, ते अदोमचा नाश करतील. एसाव राष्ट्रात मग कोणी शिल्लक राहणार नाही.” का? कारण परमेश्वर देव असे म्हणाला आहे.
19And they have possessed the south with the mount of Esau, And the low country with the Philistines, And they have possessed the field of Ephraim, And the field of Samaria, And Benjamin with Gilead.
19नेगेवचे लोक एसावाच्या पर्वतावर राहतील डोंगराच्या पायथ्याशी राहणारे लोक पलिष्ट्यांचा देश आपल्या ताब्यात घेतील. ते एफ्राईमाच्या व शोमरोनच्या भूमीवर राहतील. गिलाद बन्यामीनच्या कबजात जाईल.
20And the removed of this force of the sons of Israel, That [is with] the Canaanites unto Zarephat, And the removed of Jerusalem that [is] with the Sepharad, Possess the cities of the south.
20इस्राएलच्या लोकांना त्यांची घरे बळजबरीने सोडावी लागली, पण ते सारफथ पर्यंतचा कनानचा प्रदेश घेतील यहूदाच्या लोकांना बळजबरीने यरुशलेम सोडावे लागले व ते सफारदमध्ये राहतात. पण ते नेगेवची गावे घेतील.
21And gone up have saviours on mount Zion, To judge the mount of Esau, And the kingdom hath been to Jehovah!`
21विजेते सियोन पर्वतावर जातील, एसाव पर्वतावर राहणाऱ्या लोकांवर ते राज्य करतील. आणि राज्य परमेश्वराच्या मालकीचे होईल.