1في السنة السادسة والثلاثين لملك آسا صعد بعشا ملك اسرائيل على يهوذا وبنى الرامة لكيلا يدع احدا يخرج او يدخل الى آسا ملك يهوذا.
1आसाच्या राज्याच्या छत्तिसाव्या वर्षी बाशाने यहूदावर स्वारी केली. बाशा हा इस्राएलचा राजा. रामा हे नगर निवडून त्याने त्याची मजबुती केली. यहूदाचा राजा आसा याच्याकडे कोणालाही येण्याजाण्याला प्रतिबंध व्हावा हा त्याचा त्यामागचा हेतू होता.
2واخرج آسا فضة وذهبا من خزائن بيت الرب وبيت الملك وارسل الى بنهدد ملك ارام الساكن في دمشق قائلا
2तेव्हा आसाने परमेश्वराच्या मंदिरातील आणि राजमहालातील सोने आणि चांदी काढून घेतली. अरामचा राजा बेन - हदाद दिमिष्काला राहात होता. आसाने त्याच्याकडे सोने, आणि चांदी पाठवून त्याला निरोप पाठवला,
3ان بيني وبينك وبين ابي وابيك عهدا. هوذا قد ارسلت لك فضة وذهبا فتعال انقض عهدك مع بعشا ملك اسرائيل فيصعد عني.
3“आपण आपसात एक करार करु. आपल्या दोघांच्या वडीलांमध्येही तसा करार केलेला होता. मी माझ्याकडचे सोने - रुपे तुझ्याकडे पाठवत आहे. इस्राएलचा राजा बाशा याच्याबरोबरचा तुझा करार मोड म्हणजे तो माझ्याकडे पाठ फिरवेल आणि मला त्रस्त करणार नाही.”
4فسمع بنهدد للملك آسا وارسل رؤساء الجيوش التي له على مدن اسرائيل فضربوا عيون ودان وآبل المياه وجميع مخازن مدن نفتالي.
4बने - हदाद या गोष्टीशी सहमत झाला. त्याने इस्राएली नगरांवर आपले सैन्याचे सरदार पाठवले. त्या सरदारांनी ईयोन, दान आबेल मईम या नगरांवर हल्ला केला. कोठारे असलेल्या नफतालीच्या नगरांवरही त्यांनी चढाई केली.
5فلما سمع بعشا كف عن بناء الرامة وترك عمله.
5या चढायांचे वृत्त बाशाच्या कानावर गेले. तेव्हा त्याने रामानगराच्या मजबुतीचे काम अर्धवट सोडून दिले.
6فاخذ آسا الملك كل يهوذا فحملوا حجارة الرامة واخشابها التي بنى بها بعشا وبنى بها جبع والمصفاة
6राजा आसाने मग सर्व यहूदींना बोलावले. या लोकांनी रामा नगर बांधण्यासाठी वापरलेले दगड, लाकूड ही सामग्री हस्तगत केली. त्यांनी ती गेबा आणि मिस्पा या नगरांच्या बांधकामासाठी वापरली.
7وفي ذلك الزمان جاء حناني الرائي الى آسا ملك يهوذا وقال له من اجل انك استندت على ملك ارام ولم تستند على الرب الهك لذلك قد نجا جيش ملك ارام من يدك.
7यावेळी हनानी नावाचा द्रष्टा यहूदाचा राजा आसा याच्याकडे आला व त्याला म्हणाला, “आसा तू मदतीसाठी तुझ्या परमेश्वर देवावर भरवंसा न ठेवता अरामच्या राजावर अवलंबून राहिलास. तू परमेश्वराचे साहाय्य घ्यायला हवे होतेस. पण तू परमेश्वराचा धावा केला नाहीस म्हणून अरामचे सैन्य तुझ्या हातातून सुटून गेले आहे.
8ألم يكن الكوشيون واللوبيون جيشا كثيرا بمركبات وفرسان كثيرة جدا. فمن اجل انك استندت على الرب دفعهم ليدك.
8कूशी आणि लुबी यांचे सैन्य तर केवढे बलाढ्य होते! त्यांच्याकडे कितीतरी रथ आणि स्वार होते. पण तेव्हा तू परमेश्वरावर भरवंसा ठेवलास आणि परमेश्वराने तुला विजय मिळवून दिला.
9لان عيني الرب تجولان في كل الارض ليتشدد مع الذين قلوبهم كاملة نحوه. فقد حمقت في هذا حتى انه من الآن تكون عليك حروب.
9अखिल पृथ्वीवर कोणाची आपल्यावर श्रध्दा आहे याचा शोध परमेश्वराची नजर सतत घेत असते व अशांना तो आपले पाठबळ देतो. पण आसा, तू मात्र मूर्खपणा केला आहेस. तेव्हा यापुढे तुला लढायांना तोंड द्यावे लागेल.
10فغضب آسا على الرائي ووضعه في السجن لانه اغتاظ منه من اجل هذا. وضايق آسا بعضا من الشعب في ذلك الوقت.
10हनानीच्या या बोलण्याचा आसाला राग आला व क्रोधाच्या भरात त्याने हनानीला तुरुंगात डांबले. कधी कधी आसा काही लोकांशी फार निर्दयतेने वागे.”
11وأمور آسا الاولى والاخيرة ها هي مكتوبة في سفر الملوك ليهوذا واسرائيل.
11‘यहूदा आणि इस्राएल राजांचा इतिहास’ या पुस्तकात आसाच्या कारभाराचे साद्यंत वर्णन आहे.
12ومرض آسا في السنة التاسعة والثلاثين من ملكه في رجليه حتى اشتد مرضه وفي مرضه ايضا لم يطلب الرب بل الاطباء.
12आपल्या राज्याच्या एकोणचाळीसाव्या वर्षी तो पायाच्या दुखण्याने बेजार झाला. त्याचा आजार खूप बळावला तरी त्याने दुखण्यात परमेश्वराचा धावा केला नाही. त्याने वैद्यांकरवी इलाज करुन घेतला.
13ثم اضطجع آسا مع آبائه ومات في السنة الحادية والاربعين لملكه
13आपल्या करकीर्दीच्या 41 व्या वर्षी तो वारला व आपल्या पूर्वजांबरोबर त्याने चिरविश्रांती घेतली.
14فدفنوه في قبوره التي حفرها لنفسه في مدينة داود واضجعوه في سرير كان مملوّا اطيابا واصنافا عطرة حسب صناعة العطارة واحرقوا له حريقة عظيمة جدا
14दावीदनगरात त्याने आधीच स्वत:साठी करुन घेतलेल्या कबरीत लोकांनी त्याचे दफन केले. विविध सुवासिक द्रव्ये आणि मसाले घातलेल्या बिछान्यावर लोकांनी त्याला ठेवले. त्याच्या सन्मानार्थ सुगंधी द्रव्ये जाळली.