1حينئذ قال سليمان. قال الرب انه يسكن في الضباب.
1मग शलमोन म्हणाला, “मी मेघासारख्या अंधकारात वास करीन असे परमेश्वर म्हणाला आहे.
2وانا بنيت لك بيت سكنى مكانا لسكناك الى الابد.
2परमेश्वरा, तुझ्या निवासासाठी मी हे घर बांधले आहे. तू येथे चिरकाल राहावेस म्हणून हे उच्च कोटीचे घर आहे.”
3وحول الملك وجهه وبارك كل جمهور اسرائيل وكل جمهور اسرائيل واقف.
3मग शलमोनाने मागे वळून सर्व इस्राएल समुदायांना आशीर्वाद दिला. आणि ते सर्व उभे
4وقال مبارك الرب اله اسرائيل الذي كلم بفمه داود ابي واكمل بيديه قائلا
4शलमोन पुढे म्हणाला, “इस्राएलाच्या परमेश्वर देवाचे स्तवन करा. माझे वडील दावीद यांच्याशी तो जे बोलला ते त्याने खरे करुन दाखवले आहे. परमेश्वर देवाने असे वचन दिले होते
5منذ يوم اخرجت شعبي من ارض مصر لم اختر مدينة من جميع اسباط اسرائيل لبناء بيت ليكون اسمي هناك ولا اخترت رجلا يكون رئيسا لشعبي اسرائيل.
5‘माझ्या लोकांना मी मिसरमधून बाहेर आणल्यानंतर इस्राएल वंशातील कोणतेही नगर मी माझ्या नावाचे घर तिथे बांधले जावे म्हणून निवडले नाही. तसेच, माझ्या इस्राएल लोकांचे आधिपत्य करण्यासाठी कोणाएकाची निवडही केली नाही.
6بل اخترت اورشليم ليكون اسمي فيها واخترت داود ليكون على شعبي اسرائيل.
6पण आता यरुशलेम हे स्थान मी माझ्यासाठी निवडले आहे आणि दावीदाला इस्राएल लोकांवर नेमले आहे.’
7وكان في قلب داود ابي ان يبني بيتا لاسم الرب اله اسرائيل.
7“इस्राएलचा देव परमेश्वर याच्या प्रीत्पर्थ माझे वडील दावीद यांना मंदिर बांधायचे होते.
8فقال الرب لداود ابي من اجل انه كان في قلبك ان تبني بيتا لاسمي قد احسنت بكون ذلك في قلبك.
8पण परमेश्वर त्यांना म्हणाला, ‘दावीद, माझ्या नावाने मदिर बांधायचा विचार तुझ्या मनात आला हे चांगले झाले.
9الا انك انت لا تبني البيت بل ابنك الخارج من صلبك هو يبني البيت لاسمي.
9पण ते तू बांधू शकत नाहीस पण तुझा मुलगा हे काम करील.’
10واقام الرب كلامه الذي تكلم به وقد قمت انا مكان داود ابي وجلست على كرسي اسرائيل كما تكلم الرب وبنيت البيت لاسم الرب اله اسرائيل.
100आता परमेश्वराने कबूल केले तसे झाले आहे. माझे वडील दावीद यांच्या जागी मी नवीन राजा झालो आहे. मी इस्राएलचा राजा आहे. असे होईल हे वचन परमेश्वराने दिले होते. आणि मी इस्राएलचा देव परमेश्वर याच्या नावाने मंदिर बांधले आहे
11ووضعت هناك التابوت الذي فيه عهد الرب الذي قطعه مع بني اسرائيل
11मी करारकेश मंदिरात ठेवला आहे. इस्राएलच्या लोकांशी परमेश्वराने केलेला करार या कोशांत आहे.”
12ووقف امام مذبح الرب تجاه كل جماعة اسرائيل وبسط يديه.
12शलमोन परमेश्वराच्या वेदीसमोर उभा राहिला. तेथे जमलेल्या सर्व इस्राएल लोकांपुढे तो उभा होता. त्याने आपले बाहू पसरले.
13لان سليمان صنع منبرا من نحاس وجعله في وسط الدار طوله خمس اذرع وعرضه خمس اذرع وارتفاعه ثلاث اذرع ووقف عليه ثم جثا على ركبتيه تجاه كل جماعة اسرائيل وبسط يديه نحو السماء
13बाहेरच्या आवारात प्रत्येकी 7 1/2 फूट लांबी, रुंदी आणि उंची असलेला एक पितळी चौरंग शलमोनाने बसवला होता. त्यावर चढून तो समस्त इस्राएल लोकांसमोर गुडघे टेकून बसला आणि त्याने आकाशाकडे हात पसरले
14وقال. ايها الرب اله اسرائيل لا اله مثلك في السماء والارض حافظ العهد والرحمة لعبيدك السائرين امامك بكل قلوبهم.
14शलमोन म्हणाला,”हे इस्राएलच्या परमेश्वर देवा, स्वर्गात किंवा पृथ्वीवर तुझ्यासारखा दुसरा कोणीही देव नाही. तुझे जिवाभावाने अनुसरण करणाऱ्या आणि योग्य आचरण करणाऱ्या तुझ्या सेवकांना तुझे प्रेम आणि तुझी कृपा यांचे दिलेले वचन पाळणारा तू परमेश्वर आहेस.
15الذي قد حفظت لعبدك داود ابي ما كلمته به فتكلمت بفمك واكملت بيدك كهذا اليوم.
15दावीद याला दिलेले वचन तू पाळलेस. दावीद माझे वडील होते. तू आपल्या मुखानेच त्यांना वचन दिलेस आणि आज आपल्या हाताने ते प्रत्यक्षात आणले आहेस.
16والآن ايها الرب اله اسرائيل احفظ لعبدك داود ابي ما كلمته به قائلا لا يعدم لك امامي رجل يجلس على كرسي اسرائيل ان يكن بنوك طرقهم يحفظون حتى يسيروا في شريعتي كما سرت انت امامي.
16तसेच आता, हे इस्राएलच्या परमेश्वर देवा, दावीद या सेवकाला दिलेले हे वचनही खरे कर. तू असे म्हणाला होतास: ‘माझ्यासमक्ष इस्राएलच्या गादीवर न चुकता तुझ्या वंशातीलच कोणीतरी येत जाईल. मात्र तुझ्या मुलांनी काटेकोर वर्तन केले पाहिजे. तुझ्याप्रमाणेच त्यांनीही माझा करार पाळला पाहिजे.’
17والآن ايها الرب اله اسرائيل فليتحقق كلامك الذي كلمت به عبدك داود.
17तेव्हा आता, हे इस्राएलच्या परमेश्वर देवा, हे ही शब्द खरे होऊ देत. आपला सेवक दावीद याला तू तसा शब्द दिला आहेस.
18لانه هل يسكن الله حقا مع الانسان على الارض. هوذا السموات وسماء السموات لا تسعك فكم بالاقل هذا البيت الذي بنيت.
18“परमेश्वर पृथ्वीवर लोकांमध्ये वस्ती करु शकत नाही ही गोष्ट, हे देवा, आम्हाला माहीत आहे. आकाश आणि त्या पुढचे अवकाशही तुला सामावून घ्यायला असमर्थ आहेत. या मी बांधलेल्या मंदिरातही तू मावू शकत नाहीस हे आम्ही जाणतो
19فالتفت الى صلاة عبدك والى تضرّعه ايها الرب الهي واسمع الصراخ والصلاة التي يصليها عبدك امامك.
19पण माझी एवढी प्रार्थना ऐक. मी करुणा भाकतो तिच्याकडे लक्ष दे. परमेश्वर देवा, माझी आर्त हाक ऐक. मी तुझा एक दास आहे.
20لتكون عيناك مفتوحتين على هذا البيت نهارا وليلا على الموضع الذي قلت انك تضع اسمك فيه لتسمع الصلاة التي يصلّيها عبدك في هذا الموضع
20या मंदिराकडे अहोरात्र तुझी दृष्टी असो असे मी तुला कळकळीने विनवतो. तुझे नाव इथे राहील असे तू म्हणाला होतास. मी या मंदिराकडे तोंड करुन प्रार्थना करीन तेव्हा ती तू ऐक.
21واسمع تضرعات عبدك وشعبك اسرائيل الذين يصلّون في هذا الموضع واسمع انت من موضع سكناك من السماء واذا سمعت فاغفر.
21तुझ्या इस्राएल लोकांनी तसेच मी केलेल्या प्रार्थना तू ऐक. या प्रार्थनास्थलाकडे तोंड करुन आम्ही प्रार्थना करु तेव्हा तिच्याकडे तू लक्ष दे. तुझ्या आकाशातील स्थानावरुन तुझे इथे लक्ष असू दे. आमच्या प्रार्थना ऐक आणि आम्हाला क्षमा कर.
22ان اخطأ احد الى صاحبه ووضع عليه حلف ليحلفه وجاء الحلف امام مذبحك في هذا البيت
22“एखाद्याने दुसऱ्याची काही आगळीक केल्याचा आरोप त्याच्यावर आला आणि तो तुझे नाव घेऊन आपण निर्दोष आहोत असे सांगू लागला तर तो वेदीसमोर तसे शपथ घेऊन सांगत असताना,
23فاسمع انت من السماء واعمل واقضي بين عبيدك اذ تعاقب المذنب فتجعل طريقه على راسه وتبرر البار اذ تعطيه حسب بره.
23तू स्वर्गातून ऐक. तुझ्या सेवकाचा योग्य न्यायनिवाडा कर. ज्याच्या हातून आगळीक घडली असेल त्याला शासन कर. त्याच्यामुळे इतरांना जसा त्रास झाला तसाच याला होऊ दे. ज्याचे वागणे उचित होते तो निर्दोष असल्याचे सिध्द कर.
24وان انكسر شعبك اسرائيل امام العدو لكونهم اخطأوا اليك ثم رجعوا واعترفوا باسمك وصلّوا وتضرعوا امامك نحو هذا البيت
24“इस्राएल लोकांनी तुझ्याविरुध्द पाप केल्यामुळे जर शत्रूंनी तुझ्या इस्राएल लोकांचा पराभव केला आणि अशावेळी इस्राएल लोक तुझ्याकडे येऊन तुझ्या नावाने क्षमायाचना करु लागले, या मंदिरात येऊन विनवणी करु लगले तर
25فاسمع انت من السماء واغفر خطية شعبك اسرائيل وارجعهم الى الارض التي اعطيتها لهم ولآبائهم
25तू स्वर्गातून ते ऐकून इस्राएल लोकांना क्षमा कर. तू त्यांना आणि त्यांच्या पूर्वजांना दिलेल्या भूमीवर त्यांना पुन्हा परत आण.
26اذا اغلقت السماء ولم يكن مطر لكونهم اخطأوا اليك ثم صلّوا في هذا المكان واعترفوا باسمك ورجعوا عن خطيتهم لانك ضايقتهم
26“इस्राएल लोकांनी पाप केल्यामुळे आकाश बंद होऊन पर्जन्यवृष्टी झालीच नाही आणि त्यावेळी पश्चात्तापाने इस्राएल लोकांनी मंदिराच्या दिशेने पाहात क्षमायाचना केली, तू केलेल्या शिक्षेमुळे पापाचरण थांबवले,
27فاسمع انت من السماء واغفر خطية عبيدك وشعبك اسرائيل فتعلمهم الطريق الصالح الذي يسلكون فيه واعطي مطرا على ارضك التي اعطيتها لشعبك ميراثا.
27तर स्वर्गातून त्यांचे ऐकून घे. त्याचे ऐक आणि त्यांना माफ कर. इस्राएल लोक तुझे दास आहेत. त्यांना जगण्याचा सन्मार्ग दाखव. तुझ्या भूमीवर पाऊस पाड. ती तूच तुझ्या लोकांना दिलेली जमीन आहे.
28اذا صار في الارض جوع اذا صار وبأ او لفح او يرقان او جراد او جردم او اذا حاصرهم اعداؤهم في ارض مدنهم في كل ضربة وكل مرض
28“कदाचित् एखादेवेळी दुष्काळ, भयानक साथीचा रोग, किंवा पिकांवर रोग अथवा टोळ, नाकतोडे यांची धाड अशी काही आपत्ती किंवा लोकांच्या राहत्या नगरांवर शत्रूचा हल्ला झाला, असे काही झाल्यास
29فكل صلاة وكل تضرع تكون من اي انسان كان او من كل شعبك اسرائيل الذين يعرفون كل واحد ضربته ووجعه فيبسط يديه نحو هذا البيت
29तुझे इस्राएल लोक तुझी करुणा भाकतील आणि प्रार्थना करतील. जो तो आपले क्लेश किंवा दु:ख ओळखून, या मंदिराच्या दिशेने बाहू उभारुन प्रार्थना करु लागेल.
30فاسمع انت من السماء مكان سكناك واغفر واعط كل انسان حسب كل طرقه كما تعرف قلبه لانك انت وحدك تعرف قلوب بني البشر.
30तेव्हा तू ते स्वार्गातून ऐक. तू स्वर्गात राहातोस. तू ऐकून त्यांना क्षमा कर. प्रत्येकाचा मनोदय तुला माहीत असल्यामुळे ज्याला जे योग्य असेल त्याला ते दे. मानवाचे मन फक्त तूच ओळखतोस.
31لكي يخافوك ويسيروا في طرقك كل الايام التي يحيون فيها على وجه الارض التي اعطيت لآبائنا.
31असे झाले म्हणजे तू आमच्या पूर्वजांना दिलेल्या या भूभागावर त्यांची वसती असेपर्यंत लोक तुझा धाक बाळगतील आणि तुझे ऐकतील.
32وكذلك الاجنبي الذي ليس هو من شعبك اسرائيل وقد جاء من ارض بعيدة من اجل اسمك العظيم ويدك القوية وذراعك الممدودة فمتى جاءوا وصلّوا في هذا البيت
32“तुझ्या इस्राएल प्रजेपेक्षा वेगळा असा कोणी उपराही कदाचित् दूर देशाहून इथे आलेला असेल. तुझ्या नावाची महती, आणि तुझे समर्थ बाहू यांच्यामुळे तो आलेला असेल. त्याने येऊन या मंदिराकडे पाहात प्रार्थना केली तर
33فاسمع انت من السماء مكان سكناك وافعل حسب كل ما يدعوك به الاجنبي لكي يعلم كل شعوب الارض اسمك فيخافوك كشعبك اسرائيل ولكي يعلموا ان اسمك قد دعي على هذا البيت الذي بنيت
33तू ती स्वर्गातून ऐक. त्याची मागणी पुरव. म्हणजे इस्राएल लोकांप्रमाणेच पृथ्वीवरील इतर लोकांनाही तुझ्या नावाचा महिमा कळेल आणि त्यांना तुझ्याविषयी आदर वाटेल. हे मी बांधलेले मंदिर तुझ्या नावाचे आहे हे पृथ्वीवरील सर्व लोकांना कळेल.
34اذا خرج شعبك لمحاربة اعدائه في الطريق الذي ترسلهم فيه وصلّوا اليك نحو هذه المدينة التي اخترتها والبيت الذي بنيت لاسمك
34“शत्रूशी लढण्यासाठी जेव्हा तू आपल्या लोकांना दुसऱ्या ठिकाणी पाठवशील आणि तिथून ते तू निवडलेल्या या नगराच्या आणि मी बांधलेल्या मंदिराच्या दिशेने पाहात प्रार्थना करु लागतील.
35فاسمع من السماء صلاتهم وتضرعهم واقضي قضائهم.
35तर तू स्वर्गातून त्यांची प्रार्थना ऐक आणि त्यांच्या विनंती प्रमाणे त्यांना मदत कर.
36اذا اخطأوا اليك لانه ليس انسان لا يخطئ وغضبت عليهم ودفعتهم امام العدو وسباهم سابوهم الى ارض بعيدة او قريبة
36“पाप कोणाच्या हातून होत नाही? तेव्हा लोक तुझ्या विरुध्द पाप करतील तेव्हा तुझा त्यांच्यावर कोप होईल. तू शत्रूंकरवी त्यांचा पाडाव करशील, बंदी म्हणून त्यांना बळजबरीने इथून दूरच्या किंवा एखाद्या जवळच्या ठिकाणी नेले जाईल.
37فاذا ردّوا الى قلوبهم في الارض التي يسبون اليها ورجعوا وتضرعوا اليك في ارض سبيهم قائلين قد اخطأنا وعوجنا واذنبنا
37पण तिथे त्यांचे ह्दयपरिवर्तन होऊन, परभूमीत कैदी होऊन पडलेले ते महणतील, ‘आम्ही चुकलो, आमच्या हातून पाप घडले आहे. आम्ही दुराचरण केले आहे.’
38ورجعوا اليك من كل قلوبهم ومن كل انفسهم في ارض سبيهم التي سبوهم اليها وصلّوا نحو ارضهم التي اعطيتها لآبائهم والمدينة التي اخترت والبيت الذي بنيت لاسمك
38असतील तिथून ते अंतरीच्या उमाळ्याने तुला शरण येतील. या देशाच्या तू त्याच्या पूर्वजांना दिलेल्या देशाच्या दिशेने आणि तू निवडलेल्या नगराच्या दिशेने पाहात ते प्रार्थना करतील. तुझ्या नावाखातर मी बांधलेल्या या मंदिराच्या दिशेने पाहात ते प्रार्थना करतील.
39فاسمع من السماء من مكان سكناك صلاتهم وتضرعاتهم واقضي قضاءهم واغفر لشعبك ما اخطأوا به اليك.
39असे होईल तेव्हाही तू तुझ्या स्वर्गातील निवासस्थानातून ऐक. त्यांच्या विनवणीला कान दे, त्यांना मदत कर. ज्यांनी तुझ्या विरुध्द पाप केले आहे अशा तुझ्या लोकांना क्षमा कर.
40الآن يا الهي لتكن عيناك مفتوحتين واذناك مصغيتين لصلاة هذا المكان.
40आता, हे परमेश्वरा, माझी तुला विनवणी आहे की तू तुझे कान आणि डोळे उघड. आम्ही इथे बसून जी प्रार्थना करणार आहोत ती लक्षपूर्वक ऐक.
41والآن قم ايها الرب الاله الى راحتك انت وتابوت عزّك. كهنتك ايها الرب الاله يلبسون الخلاص واتقياؤك يبتهجون بالخير
41“आता, हे परमेश्वर देवा, तुझे सामर्थ मिरवणाऱ्या या करारकोशाजवळ, आपल्या विश्रामस्थानी ये. तुझे याजक उध्दाराने भूषित होवोत. तुझे भक्त या सुजनतेने सुखी होवोत.
42ايها الرب الاله لا ترد وجه مسيحك. اذكر مراحم داود عبدك
42हे परमेश्वर देवा, तुझ्या अभिषिक्त राजाचा स्वीकार कर. तुझा एकनिष्ठ सेवक दावीद याचे स्मरण असू दे.”