American Standard Version

Marathi

Leviticus

14

1And Jehovah spake unto Moses, saying,
1परमेश्वर मोशेला म्हणाला,
2This shall be the law of the leper in the day of his cleansing: he shall be brought unto the priest:
2“महारोग बरा झालेल्या लोकांना शुद्ध करून घेण्याविषयीचे नियम असे: याजकाने महारोग्याला तपासावे.
3and the priest shall go forth out of the camp; and the priest shall look; and, behold, if the plague of leprosy be healed in the leper,
3त्याने छावणीच्या बाहेर जाऊन त्या महारोग्याला तपासावे व त्याचा महारोग बरा झाला आहे किंवा नाही ते पाहावे.
4then shall the priest command to take for him that is to be cleansed two living clean birds, and cedar wood, and scarlet, and hyssop:
4तो बरा झाला असल्यास त्याने त्याला शुद्ध होण्यासाठी दोन जिवंत शुद्ध पक्षी, गंधसरुचे लाकूड, किरमिजी रंगाचे कापड व एजोब घेऊन येण्यास सांगावे.
5And the priest shall command to kill one of the birds in an earthen vessel over running water.
5मग वाहत्या पाण्यावर मातीच्या पात्रात त्यातला एक पक्षी मारण्याची याजकाने त्याला आज्ञा द्यावी.
6As for the living bird, he shall take it, and the cedar wood, and the scarlet, and the hyssop, and shall dip them and the living bird in the blood of the bird that was killed over the running water:
6याजकाने जिवंत पक्षी, गंधसरुचे लाकूड, किरमिजी रंगाचे कापड व एजोब ही सामग्री घेऊन जिवंत पक्षासह वाहत्या पाण्यावर मारलेल्या पक्ष्याच्या रक्तात बुडवावी;
7And he shall sprinkle upon him that is to be cleansed from the leprosy seven times, and shall pronounce him clean, and shall let go the living bird into the open field.
7आणि ते रक्त महारोगापासून शुद्ध ठरवावयाच्या माणसावर सात वेळा शिंपडावे; मग तो शुद्ध झाला आहे असे सांगावे व त्यानंतर याजकाने माळरानात जाऊन त्या जिवंत पक्ष्याला सोडून द्यावे;
8And he that is to be cleansed shall wash his clothes, and shave off all his hair, and bathe himself in water; and he shall be clean: and after that he shall come into the camp, but shall dwell outside his tent seven days.
8“मग शुद्ध ठरवावयाच्या माणसाने आपले कपडे धुवावे, आपले मुंडन करुन घ्यावे आणि पाण्याने स्नान करावे म्हणजे तो शुद्ध ठरेल; त्यानंतर त्याने छावणीत यावे; तरी त्याने सात दिवस आपल्या तंबूबाहेर राहावे;
9And it shall be on the seventh day, that he shall shave all his hair off his head and his beard and his eyebrows, even all his hair he shall shave off: and he shall wash his clothes, and he shall bathe his flesh in water, and he shall be clean.
9सातव्या दिवशी त्याने आपले डोके, दाढी, भुवया व अंगावरील एकंदर सर्व केस मुंडवावे; आपले कपडे धुवावे व पाण्याने स्नान करावे, म्हणजे तो शुद्ध होईल.
10And on the eighth day he shall take two he-lambs without blemish, and one ewe-lamb a year old without blemish, and three tenth parts [of an ephah] of fine flour for a meal-offering, mingled with oil, and one log of oil.
10“आठव्या दिवशी त्या माणसाने दोन निर्दोष कोकरे, एक वर्षाची निर्दोष मेंढी, अन्नार्पणासाठी तेलात मळलेला चोवीस वाट्या-तीन दशांश एफा-मैदा, व दोन तृतीय अंश पिंट-एक लोगभर तेल ही सामग्री याजकाकडे आणावी;
11And the priest that cleanseth him shall set the man that is to be cleansed, and those things, before Jehovah, at the door of the tent of meeting.
11आणि शुद्ध ठरविणाऱ्या याजकाने शुद्ध ठरवावयाच्या माणसाला, त्या अर्पण करावयाच्या सामग्रीसह परमेश्वरासमोर दर्शनमंडपाच्या दारापाशी उभे करावे.
12And the priest shall take one of the he-lambs, and offer him for a trespass-offering, and the log of oil, and wave them for a wave-offering before Jehovah:
12मग याजकाने दोषार्पणासाठी एक कोकरु व एक लोगभर तेल अर्पावे; ते ओवाळणीचे अर्पण म्हणून ओवाळावे;
13and he shall kill the he-lamb in the place where they kill the sin-offering and the burnt-offering, in the place of the sanctuary: for as the sin-offering is the priest's, so is the trespass-offering: it is most holy:
13मग याजकाने पवित्र स्थानात जेथे पापबली व होमबली ह्यांचा वध करतात तेथे ते कोकरु वधावे कारण पापबली प्रमाणेच दोषबलीवरही याजकाचा हक्क आहे; हे अर्पण परमपवित्र आहे.
14and the priest shall take of the blood of the trespass-offering, and the priest shall put it upon the tip of the right ear of him that is to be cleansed, and upon the thumb of his right hand, and upon the great toe of his right foot.
14“मग याजकाने दोषबलीचे काही रक्त घेऊन शुद्ध ठरवावयाच्या माणसाच्या उजव्या कानाच्या पाळीला, उजव्या हाताच्या अंगठ्याला व उजव्या पायाच्या अंगठ्याला लावावे.
15And the priest shall take of the log of oil, and pour it into the palm of his own left hand;
15याजकाने लोगभर तेलातले थोडेस तेल आपल्या डाव्या तळ हातावर ओतावे;
16and the priest shall dip his right finger in the oil that is in his left hand, and shall sprinkle of the oil with his finger seven times before Jehovah:
16मग त्याने आपल्या उजव्या हाताचे बोट आपल्या डाव्या तळहातावरील तेलात बुडवून त्यातले काही परमेश्वरासमोर सात वेळा बोटाने शिपडावे.
17and of the rest of the oil that is in his hand shall the priest put upon the tip of the right ear of him that is to be cleansed, and upon the thumb of his right hand, and upon the great toe of his right foot, upon the blood of the trespass-offering:
17त्याच्या तळहातावर जे तेल उरेल त्यातले काही घेऊन याजकाने शुद्ध ठरवावयाच्या माणसाच्या उजव्या कानाच्या पाळीवरील, उजव्या हाताच्या अंगठ्यावरिल दोषार्पणाच्या रक्तावर लवावे.
18and the rest of the oil that is in the priest's hand he shall put upon the head of him that is to be cleansed: and the priest shall make atonement for him before Jehovah.
18तळहातावर उरलेले तेल याजकाने शुद्ध ठरवावयाच्या माणसाच्या डोक्याला लावावे आणि अशा प्रकारे त्या माणसासाठी याजकाने परमेश्वरासमोर प्रायश्चित करावे.
19And the priest shall offer the sin-offering, and make atonement for him that is to be cleansed because of his uncleanness: and afterward he shall kill the burnt-offering;
19“मग याजकाने पापबली अर्पावा आणि शुद्ध ठरवावयाच्या माणसासाठी प्रायश्चित करावे; त्यानंतर त्याने होमबलीचा वध करावा;
20and the priest shall offer the burnt-offering and the meal-offering upon the altar: and the priest shall make atonement for him, and he shall be clean.
20मग याजकाने होमबली व अन्नबली वेदीवर अर्पून त्या माणसासाठी प्रायश्चित करावे म्हणजे तो शुद्ध ठरेल.
21And if he be poor, and cannot get so much, then he shall take one he-lamb for a trespass-offering to be waved, to make atonement for him, and one tenth part [of an ephah] of fine flour mingled with oil for a meal-offering, and a log of oil;
21“परंतु तो माणूस गरीब असून एवढे आणण्याची त्याला ऐपत नसेल तर त्याने आपल्या प्रायश्चितासाठी ओवळणीचे एक कोंकरु दोषार्पण म्हणून आणावे आणि अन्नार्पणासाठी तेलात मळलेला, आठ वाट्या-एक दशांश एफा-मैदा आणि दोन तृतीय अंश पिंटभर-एक लोगभर-तेल आणावे;
22and two turtle-doves, or two young pigeons, such as he is able to get; and the one shall be a sin-offering, and the other a burnt-offering.
22आणि ऐपतीप्रमाणे दोन होले किंवा पारव्याची दोन पिले त्याने आणावी; त्यातील एक पापबली व एक होमबली व्हावा.
23And on the eighth day he shall bring them for his cleansing unto the priest, unto the door of the tent of meeting, before Jehovah:
23“आठव्या दिवशी आपल्या शुद्धीकरणासाठी त्याने ही सामग्री घेऊन दर्शनमंडपाच्या दारापाशी याजकाकडे परमेश्वरासमोर जावे.
24and the priest shall take the lamb of the trespass-offering, and the log of oil, and the priest shall wave them for a wave-offering before Jehovah.
24मग याजकाने ते दोषार्पणाचे कोंकरु व लोगभर तेल घेऊन ओवाळणीचे अर्पण म्हणून परमेश्वरासमोर ओवाळावे.
25And he shall kill the lamb of the trespass-offering; and the priest shall take of the blood of the trespass-offering, and put it upon the tip of the right ear of him that is to be cleansed, and upon the thumb of his right hand, and upon the great toe of his right foot.
25त्यानंतर याजकाने दोषार्पणाच्या कोंकराचा वध करावा आणि त्याने त्याचे काही रक्त घेऊन शुद्ध ठरवावयाच्या माणसाच्या उजव्या पायाच्या अंगठ्यांना लावावे.
26And the priest shall pour of the oil into the palm of his own left hand;
26याजकाने त्या तेलातले काही आपल्या डाव्या तळहातावर ओतावे;
27and the priest shall sprinkle with his right finger some of the oil that is in his left hand seven times before Jehovah:
27मग त्याने उजव्या हाताच्या बोटाने त्यातील काही तेल परमेश्वरासमोर सात वेळा शिंपडावे.
28and the priest shall put of the oil that is in his hand upon the tip of the right ear of him that is to be cleansed, and upon the thumb of his right hand, and upon the great toe of his right foot, upon the place of the blood of the trespass-offering:
28मग याजकाने आपल्या तळहातावरील काही तेल घेऊन शुद्ध ठरवावयाच्या माणसाच्या उजव्या कानाच्या पाळीवर, उजव्या हाताच्या व उजव्या पायाच्या अंगठ्यांवर, दोषबलीचे रक्त लावलेल्या जागेवर लावावे;
29and the rest of the oil that is in the priest's hand he shall put upon the head of him that is to be cleansed, to make atonement for him before Jehovah.
29याजकाने तळहातावर उरलेले तेल शुद्ध ठरवावयाच्या माणसाच्या डोक्याला परमेश्वरासमोर त्या माणसासाठी प्रायश्चित म्हणून लावावे.
30And he shall offer one of the turtle-doves, or of the young pigeons, such as he is able to get,
30“मग त्याच्या ऐपतीप्रमाणे त्याला मिळालेले होले किंवा पारव्याची पिले ह्यांच्यापैकी एकाचे त्याने अर्पण करावे;
31even such as he is able to get, the one for a sin-offering, and the other for a burnt-offering, with the meal-offering: and the priest shall make atonement for him that is to be cleansed before Jehovah.
31त्यांच्यापैकी एकाचे पापार्पण करावे व दुसऱ्याचे होमार्पण करावे; पक्ष्यांची ही अर्पणे त्याने अन्नार्पणासहित करावी; ह्या प्रकारे याजकाने शुद्ध ठरवावयाच्या माणसाकरिता परमेश्वरासमोर प्रायश्चित करावे; मग तो माणूस शुद्ध होईल.”
32This is the law of him in whom is the plague of leprosy, who is not able to get [that which pertaineth] to his cleansing.
32अंगावरील महारोगाचा चट्ठा बरा झालेल्या माणसाला आपल्या शुद्धीकरणासाठी साहित्य मिळण्याची ऐपत नसलेल्या माणसाच्या शुद्धीकरणासंबंधी हे नियम आहेत.
33And Jehovah spake unto Moses and unto Aaron, saying,
33परमेश्वर मोशे व अहरोन ह्यांना असेही म्हणाला,
34When ye are come into the land of Canaan, which I give to you for a possession, and I put the plague of leprosy in a house of the land of your possession;
34“कनान देश मी तुम्हाला वतन म्हणून देत आहे. तुमचे लोक त्यात जाऊन पोहोंचतील त्यावेळी तुमच्या वतनाच्या देशातील एखाद्या घराला मी महारोगाचा चट्ठा पाडला,
35then he that owneth the house shall come and tell the priest, saying, There seemeth to me to be as it were a plague in the house.
35तर त्या घराच्या मालकाने याजकाला जाऊन सांगावे की, ‘माझ्या घरात चट्ठ्यासारखे काही तरी दिसते.’
36And the priest shall command that they empty the house, before the priest goeth in to see the plague, that all that is in the house be not made unclean: and afterward the priest shall go in to see the house:
36“मग याजकाने लोकांना घर रिकामे करण्याची आज्ञा द्यावी; लोकांनीही घरातील सर्व वस्तू याजक, चट्ठा तपासण्यासाठी घरात जाण्याच्या अगोदर बाहेर काढाव्या नाही तर घरातील सर्व वस्तू अशुद्ध ठरावयाच्या. मग याजकाने रिकाम्या घरात जाऊन ते तपासावे.
37and he shall look on the plague; and, behold, if the plague be in the walls of the house with hollow streaks, greenish or reddish, and the appearance thereof be lower than the wall;
37तो चट्ठा त्याने तपासावा, आणि घराच्या भिंतीवर हिरवट किंवा तांबूस रंगाची छिद्रे किंवा खळगे असतील व ती भिंतीच्या पृष्ठभागाच्या आत गेली असतील.
38then the priest shall go out of the house to the door of the house, and shut up the house seven days.
38तर मग याजकाने घराबाहेर दारापाशी यावे व ते घर सात दिवस बंद करुन ठेवावे.
39And the priest shall come again the seventh day, and shall look; and, behold, if the plague be spread in the walls of the house;
39“मग सातव्या दिवशी याजकाने पुन्हा जाऊन ते घर तपासावे आणि तो चट्ठा घराच्या भिंतीवर पसरला असल्यास,
40then the priest shall command that they take out the stones in which the plague is, and cast them into an unclean place without the city:
40चट्ठा असलेले दगड काढून नगराबाहेर एखाद्या अशुद्ध जागी टाकून देण्याची त्याने लोकांना आज्ञा द्यावी.
41and he shall cause the house to be scraped within round about, and they shall pour out the mortar, that they scrape off, without the city into an unclean place:
41मग त्याने घर लोकांकडून आतून खरडवून घ्यावे आणि खरडवून काढलेला चुना नगराबाहेर अशुद्ध ठिकाणी लोकांनी टाकून द्यावा.
42and they shall take other stones, and put them in the place of those stones; and he shall take other mortar, and shall plaster the house.
42त्या माणसाने त्या दगडांच्या ऐवजी भिंतीत दुसरे दगड बसवावे आणि त्या घराला नव्या चुन्याचा गिलावा करावा.
43And if the plague come again, and break out in the house, after that he hath taken out the stones, and after he hath scraped the house, and after it is plastered;
43“जुने दगड काढून नवीन दगड बसविल्यावर व घर खरडवून नवीन गिलावा केल्यावर जर तो चट्ठा घरात पुन्हा उद्भवला.
44then the priest shall come in and look; and, behold, if the plague be spread in the house, it is a fretting leprosy in the house: it is unclean.
44तर याजकाने आत जाऊन तो तपासावा; घरात तो चट्ठा पसरला असल्यास तो घरात चरत जाणारा महारोगाचा चट्ठा होय; ते घर अशुद्ध आहे.
45And he shall break down the house, the stones of it, and the timber thereof, and all the mortar of the house; and he shall carry them forth out of the city into an unclean place.
45मग त्या माणसाने ते घर खणून पाडावे; त्याचे दगड, लाकूड व सगळा चुना त्याने तेथून काढून नगराबाहेर एखाद्या अशुद्ध ठिकाणी फेकून द्यावा.
46Moreover he that goeth into the house all the while that it is shut up shall be unclean until the even.
46आणि घर बंद असताना त्यात कोणी शिरला तर त्याने संध्याकाळपर्यत अशुद्ध राहावे;
47And he that lieth in the house shall wash his clothes; and he that eateth in the house shall wash his clothes.
47त्या घरात कोणी काही खाल्ले किंवा कोणी त्या घरात निजला तर त्याने आपले कपडे धुवावे.
48And if the priest shall come in, and look, and, behold, the plague hath not spread in the house, after the house was plastered; then the priest shall pronounce the house clean, because the plague is healed.
48“घराला नवीन दगड बसविल्यावर व नवीन गिलावा केल्यावर याजकाने आत जाऊन ते घर तपासावे आणि घरात चट्ठा परत उद्भवला नसेल तर त्या घरातला चट्ठा गेल्यामुळे त्याने ते शुद्ध ठरवावे.
49And he shall take to cleanse the house two birds, and cedar wood, and scarlet, and hyssop:
49“त्या घराच्या शुद्धीकरणासाठी दोन पक्षी, गंधसरुचे लाकूड, किरमिजी रंगाचे कापड व एजोब ही त्याने आणावी;
50and he shall kill one of the birds in an earthen vessel over running water:
50त्याने एक पक्षी वाहात्या पाण्यावर मातीच्या पात्रात मारावा;
51and he shall take the cedar wood, and the hyssop, and the scarlet, and the living bird, and dip them in the blood of the slain bird, and in the running water, and sprinkle the house seven times:
51मग त्याने गंधसरुचे लाकूड, एजोब, किरमिजी रंगाचे कापड व जिवंत पक्षी घेऊन त्या मारलेल्या पक्ष्याच्या रक्तात व वाहात्या पाण्यात बुडवून त्या घरावर सात वेळा शिंपडावे;
52and he shall cleanse the house with the blood of the bird, and with the running water, and with the living bird, and with the cedar wood, and with the hyssop, and with the scarlet:
52ह्या सर्व सामग्रीचा उपयोग करुन ह्या प्रकारे याजकाने ते घर शुद्ध करावे.
53but he shall let got the living bird out of the city into the open field: so shall he make atonement for the house; and it shall be clean.
53मग त्याने तो जिंवत पक्षी नगराबाहेर जाऊन माळरानात सोडून द्यावा; ह्या प्रकारे त्याने घरासाठी केले म्हणजे ते शुद्ध होईल.”
54This is the law for all manner of plague of leprosy, and for a scall,
54सर्व प्रकारचे महारोगाचे चट्ठे, चाई,
55and for the leprosy of a garment, and for a house,
55कपड्यावरील किंवा घराचा महारोग.
56and for a rising, and for a scab, and for a bright spot;
56सूज, खवंद, तकतकीत डाग ह्या सर्वासंबधीचे हे नियम आहेत;
57to teach when it is unclean, and when it is clean: this is the law of leprosy.
57हे केव्हा शुद्ध व केव्हा अशुद्ध हे ठरविण्याचे शिकवतात; हे महारोगासंबंधीचे नियम आहेत.