Cebuano

Marathi

Job

35

1Labut pa niini mitubag si Eliu, ug miingon:
1अलीहूने आपले बोलणे चालू ठेवले. तो म्हणाला:
2Nagahunahuna ka ba nga kini mao ang imong katungod, Kun moingon ka ba: Ang akong pagkamatarung labaw pa kay sa Dios,
2“ईयोब, ‘मी देवापेक्षा अधिक बरोबर आहे’ हे तुझे म्हणणे योग्य नाही.
3Nga ikaw nag-ingon man niana ; Unsa man ang kapuslanan niana alang kanimo? Ug : Unsa man ang akong makapin, labaw pa kong ako nakasala?
3आणि ईयोब तू देवाला विचारतोस ‘जर एखाद्या माणसाने देवाला खुश करण्याचा प्रयत्न केला तर त्याला काय मिळेल? मी जर पाप केले नाही तर त्यामुळे माझे काय चांगले होणार आहे?’
4Tubagon ko ikaw, Ug ang imong mga kauban nga kakuyog nimo.
4“ईयोब, मी (अलीहू) तुला आणि तुझ्या मित्रांना उत्तर देण्याची इच्छा करतो.
5Humangad ka sa kalangitan, ug tuman-aw ka; Ug tan-awa ang mga langit nga labing hataas kay kanimo.
5ईयोब, तुझ्यापेक्षा उंच असणाऱ्या आकाशाकडे, ढगांकडे बघ.
6Kong ikaw nakasala, unsa ang imong mahimo batok kaniya? Ug kong modaghan ang imong mga kalapasan, unsa ang imong mahimo kaniya?
6ईयोब, तू पाप केलेस तर त्यामुळे देवाला कसली इजा होत नाही. तुझ्याकडे पापांच्या राशी असल्या तरी त्यामुळे देवाला काही होत नाही.
7Kong ikaw matarung ugaling, unsa ang ikahatag nimo kaniya? Kun unsa ang madawat niya gikan sa imong kamot?
7आणि ईयोब, तू खूप चांगला असलास तरी त्यामुळे देवाला कसली मदत होत नाही. देवाला तुझ्याकडून काहीच मिळत नाही.
8Ang imong pagkamakasasala makadaut ra sa tawo nga sama kanimo; Ug ang imong pagkamatarung makaayo kaha sa anak sa tawo.
8ईयोब, तू ज्या चांगल्या आणि वाईट गोष्टी करतोस त्यांचा परिणाम तुझ्यावर आणि तुझ्यासारख्या इतरांवर होतो. त्यामुळे देवाला मदत होते किंवा त्याला दु:ख होते असे नाही.
9Tungod sa gidaghanon sa pagpanlupig sila nanagtu-aw; Sila nanagsinggit sa pagpakitabang tungod sa bukton sa makusganon.
9“जर वाईट लोकांना दु:ख झाले तर ते मदतीसाठी ओरडतील. ते सामर्थ्यवान लोकांकडे जातात आणि मदतीची याचना करतात.
10Apan walay nagaingon: Hain ba ang Dios nga akong Magbubuhat, Nga nagahatag ug mga alawiton sa magabii,
10परंतु जे वाईट लोक देवाकडे मदत मागत नाहीत. ते असे म्हणणार नाहीत: ‘मला निर्माण करणारा देव कुठे आहे? लोक दु:खी कष्टी असले की देव त्यांना मदत करतो. आता तो कुठे आहे?’
11Nga nagatudlo kanato labaw kay sa kamananapan sa yuta, Ug naghimo kanato sa labing manggialamon kay sa kalanggaman sa langit?
11‘देवाने आम्हाला पशुपक्ष्यांपेक्षा शहाणे बनवले आहे तेव्हा तो कुठे आहे?’
12Didto sila nanagsinggit, apan walay nagtubag, Tungod sa pagkamapahitas-on sa mga tawong dautan.
12“किंवा त्या वाईट माणसांनी देवाकडे मदत मागितली तरी देव त्यांना उत्तर देणार नाही. का? कारण ते लोक अतिशय गर्विष्ठ आहेत आपण फार मोठे आहोत. असे त्यांना अजूनही वाटते.
13Sa pagkamatuod ang Dios dili mamati sa mga pagsinggit nga kawang lamang.
13देव त्यांच्या तुच्छ याचनेकडे लक्ष देणार नाही हे खरे आहे. सर्वशक्तिमान देव त्यांच्याकडे लक्ष देणार नाही.
14Ni tagdon kana sa Makagagahum. Labi na kong mag-ingon ikaw nga dili ka motan-aw kaniya, Ang imong husay anaa sa iyang atubangan, ug maghulat ka kaniya!
14तेव्हा ईयोब, तू जेव्हा असे म्हणशील की देव तुला दिसत नाही तेव्हा देव तुझ्याकडे लक्ष देणार नाही. तू देवाला भेटण्याची आणि त्याला तू निरपराध आहेस हे पटवून देण्याच्या संधीची वाट पहात आहेस असे म्हण.
15Apan karon, tungod kay wala man siya magdu-aw sa iyang kapungot, Ni magtagad siya pag-ayo sao mga palabilabi.
15“ईयोब, देव वाईट लोकांना शिक्षा करत नाही असे तुला वाटते. तो पापाकडे लक्ष देत नाही असेही तुला वाटते.
16Busa si Job mibuka sa iyang baba sa mga kakawangan; Ug siya nagasapnay sa mga pulong sa walay kahibalo.
16म्हणून ईयोब त्याचे निरर्थक बोलणे चालूच ठेवतो. आपण खूप मोठे असल्याचा आव ईयोब आणतो. परंतु आपण काय बोलत आहोत हे ईयोबला कळत नाही हे सहजपणे समजून येते.”