Danish

Marathi

Deuteronomy

11

1Så elsk da HERREN din Gud og hold hans Forskrifter, hans Anordninger, Lovbud og Bud alle Dage:
1“म्हणून तुमचा देव परमेश्वर ह्यावर प्रेम करा. त्याच्या आज्ञेप्रमाणे वागा. त्याने घालून दिलेल्या नियमांचे, आज्ञांचे पालन करा.
2jeg taler ikke til eders Børn, der ikke har oplevet det og set det; betænk derfor i Dag HERREN eders Guds Optugtelse, hans Storhed, hans stærke Hånd og udstrakte Arm,
2त्याने तुमच्यासाठी केलेले सर्व प्रताप आज आठवा. हे मी तुम्हांलाच सांगत आहे. तुमच्या मुलाबाळांना नव्हे. कारण त्यांनी यापैकी काहीच पाहिले, अनुभवले नाही. त्याची थोरवी, त्याचे सामर्थ्य व पराक्रम तुम्ही पाहिलेले आहे.
3hans Tegn og Gerninger, som han gjorde midt i Ægypten mod Farao, Ægypterkongen, og hele hans Land,
3मिसरचा राजा फारो व त्याचा सर्व देश यांच्या विरुध्द त्याने कोणती कृत्ये केली हे तुम्ही पाहिलेच आहे.
4og hvad han gjorde ved Ægypternes Hærmagt, deres Heste og Vogne, som han, da de forfulgte eder, lod det røde Havs Vande skylle hen over og tilintetgjorde for stedse,
4मिसरचे सैन्य, त्यांचे घोडे, रथ यांची कशी दैना झाली, तुमचा ते पाठलाग करत असताना त्यांच्यावर तांबड्या समुद्राच्या पाण्याचा लोंढा कसा आणला हेही तुम्ही पाहिले. परमेश्वराने त्यांना पूर्ण नेस्तनाबूत केले.
5og hvad han gjorde for eder i Ørkenen, lige til I kom til Stedet her,
5तुम्ही येथे येईपर्यंत रानावनातून तुम्हाला त्याने कसे आणले हे तुम्हाला माहीत आहेच.
6og hvad han gjorde ved Datan og Abiram, Rubens Søn Eliabs Sønner, hvorledes Jorden åbnede sin Mund og slugte dem tillige med deres Huse og Telte og alt, hvad der var i ledtog med dem, midt iblandt hele Israel!
6त्याचप्रमाणे रऊबेनाचा मुलगा अलीयाब याच्या दाथान व अबीराम या मुलांचे देवाने काय केले ते तुम्हांला माहीत आहे. त्यांना आणि त्यांचे कुटुंबिय, त्यांचे तंबू, नोकरचाकर व गायीगुरे यांना सर्व इस्राएलीदेखत पृथ्वीने आपल्या पोटात घेतले.
7Thi med egne Øjne har I set al den Stordåd, HERREN har øvet!
7परमेश्वराची ही महान कृत्ये तुमच्या मुलांनी नाही, तर तुम्ही पाहिलीत.
8Så hold da alle de Bud, jeg i Dag pålægger dig, for at I kan vinde Styrke og komme og tage det Land i Besiddelse, som I skal over og tage i Besiddelse,
8“तेव्हा आज मी देतो ती प्रत्येक आज्ञा कटाक्षाने पाळा त्यामुळे तुम्ही बलशाली व्हाल, यार्देन ओलांडून जो देश ताब्यात घ्यायला तुम्ही सिद्ध झाला आहात तो हस्तगत कराल.
9og for at I kan få et langt Liv på den Jord, HERREN tilsvor eders Fædre at ville give dem og deres Afkom, et Land, der flyder med Mælk og Honning.
9त्या देशात तुम्ही चिरकाल राहाल. तुमच्या पूर्वजांना व त्यांच्या वंशजांना हा प्रदेश द्यायचे परमेश्वराने वचन दिले आहे. या प्रदेशात सुबत्ता आहे.
10Thi det Land, du skal ind og tage i Besiddelse, er ikke som Ægypten, hvorfra I drog ud! Når du der havde sået din Sæd, måtte du vande Landet med din Fod, som en Urtehave;
10तुम्ही जिथे जाणार आहात तो प्रदेश तुम्ही सोडून आलेल्या मिसरसारखा नाही. तेथे तुम्ही पेरणी झाल्यावर भाजीचा मळा शिंपावा तसे पायाने कालव्याचे पाणी ओढून देत होता.
11nej, det Land, I skal over og tage i Besiddelse, er et Land med Bjerge og Dale, der drikker Vand, når Regnen falder fra Himmelen,
11पण आता मिळणारी जमीन तशी नाही. इस्राएलमध्ये डोंगर आणि खोरी आहेत. आकाशातून पडणाऱ्या पावसाचे पाणी या भूमीला मिळते.
12et Land, som HERREN din Gud har Omhu for, og som HERREN din Guds Øjne stadig hviler på, fra Årets Begyndelse og til dets Slutning.
12तुमचा देव परमेश्वर या जमिनीची काळजी राखतो. वर्षांच्या सुरुवातीपासून शेवटपर्यंत त्याची या जमिनीवर कृपादृष्टी असते.
13Og hvis I nu lyder mine Bud, som jeg i Dag pålægger eder, så I elsker HERREN eders Gud og tjener ham af hele eders Hjerte og hele eders Sjæl,
13“परमेश्वर म्हणतो, ‘ज्या आज्ञा मी आज तुम्हांला देत आहे त्यांचे तुम्ही काटेकोरपणे पालन करा. मन:पूर्वक तुमचा देव परमेश्वर याची सेवा करा. त्याच्यावर प्रेम करा.
14så vil jeg give eders Land dets Regn i rette Tid, både Tidligregn og Sildigregn, så du kan høste dit Korn, din Most og din Olie;
14तसे वागलात तर तुमच्या भूमिवर मी योग्य वेळी पाऊस पाडीन. म्हणजे तुम्हाला धान्य, नवीन द्राक्षारस, तेल यांचा साठा करता येईल.
15og jeg vil give Græs på din Mark til dit Kvæg; og du skal spise dig mæt.
15माझ्यामुळे तुमच्या गुराढोरांना कुरणात गवत मिळेल. तुम्हाला खाण्याकरीता पुष्कळ असेल.’
16Men vogt eder, at ikke eders Hjerte dåres, så I falder fra og dyrker andre Guder og tilbeder dem;
16“पण सांभाळा, गाफील राहू नका. या देवापासून परावृत होऊन इतर दैवतांचे भजन पूजन करु नका.
17thi da vil HERRENs Vredeblusse op imod eder, og han vil lukke Himmelen, så der ikke falder Regn, og Jorden ikke giver Grøde, og I skal hurtigt udryddes af det herlige Land, HERREN vil give eder.
17तसे केलेत तर परमेश्वराचा कोप होईल. तो आकाश बंद करील आणि मग पाऊस पडणार नाही. जमिनीत पीक येणार नाही. जो चांगला देश परमेश्वर तुम्हांला देत आहे त्यात तुम्हांला लौकरच मरण येईल.
18I skal lægge eder disse mine Ord på Hjerte og Sinde, binde dem som et Tegn om eders Hånd og lade dem være et Erindringsmærke på eders Pande,
18“म्हणून सांगतो या आज्ञा लक्षात ठेवा. त्या ह्दयात साठवून ठेवा. त्या लिहून ठेवा. आणि लक्षात राहण्यासाठी हातावर बांधा व कपाळावर लावा.
19og I skal lære eders Børn dem, idet I taler om dem, både når du sidder i dit Hus, og når du vandrer på Vejen, både når du lægger dig, og når du står op.
19आपल्या मुलाबाळांना हे नियम शिकवा. घरीदारी, झोपताना, झोपून उठताना त्याविषयी बोलत राहा.
20Og du skal skrive dem på Dørstolperne af dit Hus og på dine Porte,
20घराच्या फाटकांवर, आणि दारांच्या खांबांवर ही वचने लिहा.
21for at I og eders Børn må leve i det Land, HERREN tilsvor eders Fædre at ville give dem, så længe Himmelen er over Jorden.
21म्हणजे जो देश परमेश्वराने तुमच्या पूर्वजांना शपथपूर्वक देऊ केला त्या देशात तुम्ही आणि तुमची मुलेबाळे पृथ्वीवर आकाशाचे छप्पर असेपर्यंत राहाल.
22Thi hvis I vogter vel på alle disse Bud, som jeg i Dag pålægger eder at holde, så I elsker HERREN eders Gud og vandrer på alle hans Veje og hænger fast ved ham,
22“मी सांगतो त्या सर्व आज्ञा नीट पाळा. परमेश्वर तुमचा देव ह्याजवर प्रेम करा. त्याने सांगितलेल्या मार्गाने जा. त्याच्यावरच निष्ठा ठेवा.
23så skal HERREN drive alle disse Folk bort foran eder, og I skal underlægge eder Folk, der er større og mægtigere end I.
23म्हणजे तुम्ही जाल तेव्हा तेथील इतर राष्ट्रांना तो तेथून हुसकावून लावेल. तुमच्यापेक्षा मोठ्या आणि सामर्थ्यवान राष्ट्रांवर तुम्ही ताबा मिळवाल.
24Hver Plet, eders Fodsål betræder, skal tilhøre eder; fra Ørkenen til Libanon og fra den store Flod, Eufratfloden, til Havet i Vest skal eders Landemærker strække sig.
24जेथे जेथे तुम्ही पाय ठेवाल ती जमीन तुमची होईल. दक्षिणेतील वाळवंटापासून उत्तरेला लबानोन पर्यंत आणि पूर्वेला फरात नदीपासून पश्चिमेला समुद्रापर्यंत एवढा प्रदेश तुमचा होईल.
25Ingen skal kunne holde Stand for eder; Skræk og Rædsel for eder skal HERREN eders Gud lade komme over hele det Land, I betræder, således som han lovede eder.
25कोणीही तुमचा सामना करु शकणार नाही. परमेश्वर देवाने तुम्हाला सांगितल्याप्रमाणे, तुम्ही जेथे जेथे जाल तेथे लोकांना तुमची दहशत वाटेल.
26Se, jeg forelægger eder i Dag Velsignelse og Forbandelse,
26“आज मी तुमच्यापुढे आशीर्वाद आणि शाप हे पर्याय ठेवत आहे. त्यातून निवड करा.
27Velsignelsen, hvis I lyder HERREN eders Guds Bud, som jeg i Dag pålægger eder,
27आज मी तुमचा देव परमेश्वर ह्याचा ज्या आज्ञा तुम्हाला सांगितल्या त्या नीट लक्षपूर्वक पाळल्यात तर तुम्हाला आशीर्वाद मिळेल.
28og Forbandelsen, hvis ikke lyder HERREN eders Guds Bud, men viger bort fra den Vej, jeg i Dag foreskriver eder, for at holde eder til andre Guder, I ikke før kendte til.
28पण या आज्ञा न ऐकता भलतीकडे वळलात तर शाप मिळेल. तेव्हा आज मी सांगितल्या मार्गानेच जा. इतर दैवतांच्या मागे लागू नका. परमेश्वराला तुम्ही ओळखता पण इतर दैवतांची तुम्हाला ओळख नाही.
29Og når HERREN din Gud fører dig ind i det Land, du skal ind og tage i Besiddelse, så skal du lægge Velsignelsen på Garizims Bjerg og Forbandelsen på Ebals Bjerg.
29“तुमचा देव परमेश्वर तुम्हाला त्या प्रदेशात घेऊन जाईल. तुम्ही लौकरच तो प्रदेश ताब्यात घ्याल. तेथे गेल्याबरोबर तुम्ही गरिज्जीम डोंगरावर जा, व आशीर्वाद उच्चारा. मग तेथून एबाल डोंगरावर जाऊन शापवाणीचा उच्चार करा.
30De ligger jo hinsides Jordan, bag ved den, mod Vest, i de Kanånæeres Land, der bor i Arabalavningen, lige over for Gilgal ved Sandsigerens Træ.
30हे डोंगर यार्देन नदीच्या पलीकडे, अराबात राहाणाऱ्या कनानी लोकांच्या प्रदेशात, पश्चिमेकडे गिलगाल शहराजवळच्या मोरे येथील ओक वृक्षांजवळ आहेत.
31Thi I står jo nu i Begreb med at overskride Jordan for at gå ind og tage det Land i Besiddelse, som HERREN eders Gud vil give eder. Når I da har taget det i Besiddelse og bosat eder der,
31तुम्ही यार्देन नदी पार करुन जाल. तुमचा देव परमेश्वर देत असलेली जमीन तुम्ही ताब्यात घ्याल. ती तुमची असेल. त्यात वस्ती कराल तेव्हा
32skal I omhyggeligt handle efter alle de Anordninger og Lovbud, jeg i Dag forelægger eder!
32मी आज सांगितलेले नियम, विधी यांचे पालन करा.