Danish

Marathi

Exodus

12

1Derpå talede HERREN til Moses og Aron i Ægypten og sagde:
1मोशे व अहरोन अद्याप मिसरमध्ये असताना परमेश्वर त्यांच्याशी बोलला. तोम्हणाला,
2"Denne Måned skal hos eder være Begyndelsesmåneden, den skal hos eder være den første af Årets Måneder.
2“हा तुमच्या वर्षाचा पहिला महिना असे.
3Tal til hele Israels Menighed og sig: På den tiende Dag i denne Måned skal hver Familiefader tage et Lam, et Lam for hver Familie.
3ही आज्ञा इस्राएलच्या सर्व जनसमूहासाठी आहे; ह्या महिन्याच्या दहाव्या दिवशी प्रत्येक माणसाने आपल्या कुटुंबातील माणसाकरिता एक कोकरा घ्यावा.
4Og dersom en Familie er for lille til et Lam, skal han sammen med sin nærmeste Nabo tage et Lam, svarende til Personernes Antal; hvor mange der skal være om et Lam, skal I beregne efter. hvad hver enkelt kan spise.
4जर तो संपूर्ण कोकरा, घरातील माणसांना सरणार नसेल तर त्याने आपल्या भोजनात वाटेकरी होण्यासाठी आपल्या शेजाऱ्यापाजाऱ्यांना निमंत्रण द्यावे.
5Det skal være et lydefrit, årgammelt Handyr, og I kan tage det enten blandt Fårene eller Gederne.
5तो कोकरा, एक वर्षाचा नर असावा व तो पूर्णपणे निरोगी असावा तो कोकरा मेंढ्यातला किंवा बकऱ्यातला असावा.
6I skal have det gående til den fjortende Dag i denne Måned, og hele Israels Menigheds Forsamling skal slagte det ved Aftenstid.
6ह्या पहिल्या महिन्याच्या चौदाव्या दिवसापर्यंत त्या मेढ्याची किंवा बकऱ्याची निगा राखावी व त्यावर लक्ष ठेवावे. चौदाव्या दिवशी सर्व इस्राएल लोकांनी कातरवेळी म्हणजे सूर्य मावळल्यानंतर व अंधार पडण्यापूर्वी आपापल्या मेंढ्याचा किंवा बकऱ्याचा वध करावा.
7Og de skal tage noget af Blodet og stryge det på de to Dørstolper og Overliggeren i de Huse, hvor I spiser det.
7त्यांचे रक्त गोळा करून ते ज्या घरात त्याचे मांस खाणार आहेत त्याच्या दाराच्या कपाळ पट्ट्यांवर व दोन्ही बाजूंच्या चौकटींना लावावे.
8I skal spise Kødet samme Nat, stegt over Ilden, og I skal spise usyret Brød og bitre Urter dertil.
8“त्याच रात्री तो मेंढा किंवा बकरा विस्तावावर भाजावा आणि कडू भाजी व बेखमीर भाकरी बरोबर त्याचे सर्व मांस खाऊन टाकावे;
9I må ikke spise noget deraf råt eller kogt i Vand, men kun stegt over Ilden, og Hoved, Ben og Indmad må ikke være skilt fra.
9तुम्ही त्याचे मांस कच्चे किंवा पाण्यात शिजवून खाऊ नये तर विस्तवावर भाजून खावे; त्याची मुंडी, पाय व आतंडी ही सुद्धा भाजून खावीत.
10I må intet levne deraf til næste Morgen, men hvad der bliver tilovers deraf til næste Morgen, skal I brænde.
10त्या रात्रीच ते सर्व मांस खावे; त्यातले काहीही सकाळपर्यंत ठेवू नये आणि जर काही उरलेच तर ते आगीत जाळून टाकावे.”
11Og når I spiser det, skal I have Bælte om Lænden ,Sko på Fødderne og Stav i Hånden, og I skal spise det i største Hast. Det er Påske for HERREN.
11ते खाण्या अगोदर तुम्ही प्रवासास जाण्याच्या तयारीने अंगावर कपडे घालावेत, पायात जोडे घालावेत आणि हातात काठी घ्यावी आणि मग घाईघाईने ते मांस खावे; कारण हा परमेश्वराचा वल्हांडण सण आहे.
12I denne Nat vil jeg drage igennem Ægypten og ihjelslå alt det førstefødte i Ægypten både blandt Folk og Fæ; og over alle Ægyptens Guder vil jeg holde Dom. Jeg er HERREN!
12“आज रात्री मी मिसर देशभर फिरेन आणि त्यातील प्रथम जन्मलेल्या मुलांना व जनावरांतील नरांना मी मारून टाकीन, आणि मिसरमधील सर्व दैवतांना धडा शिकवून दाखवीन की मी परमेश्वर आहे.
13Men for eder skal Blodet på Husene, hvor I er, tjene som Tegn, og jeg vil se Blodet og gå eder forbi; intet ødelæggende Slag skal ramme eder, når jeg slår Ægypten.
13परंतु तुमच्या घरांच्या दारावरील रक्त ही एक विशेष खूण असेल. मी जेव्हा ती पाहीन तेव्हा ते घर ओलांडून मी पुढे जाईन. मी मिसरच्या लोकांना मारीन तेव्हा कोणतीही विनाशकारी पीडा तुम्हांवर येणार नाही व तुम्हाला अपाय करणार नाही.
14Denne Dag skal være eder en Mindedag, og I skal fejre den som en Højtid for HERREN, Slægt efter Slægt; som en evig gyldig Ordning skal I fejre den.
14“अशा रीतीने आजची रात्र कायमची तुमच्या आठवणीत राहील. हा दिवस तुम्हासाठी विशेष उत्सवाचा म्हणजे सणाचा दिवस असेल. तुमच्या वंशजांनी येथून पुढे हा सण पिढ्यानपिढ्या कायमचा नियम म्हणून पाळावा.
15I syv Dage skal I spise usyret Brød. Straks den første Dag skal I skaffe al Surdejg bort af eders Huse; thi hver den, som spiser noget syret fra den første til den syvende Dag, det Menneske skal udryddes af Israel.
15तसेच सणाच्या दिवासांत तुम्ही सात दिवस खमीर न घातलेली भाकर खावी; ह्या सणाच्या पहिल्या दिवशी तुम्ही प्रत्येकाने आपल्या घरातील सर्व खमीर काढून टाकावे व पूर्ण सात दिवस तुम्ही खमीर न घातलेली भाकर खावी. तुम्हातील जर कोणी खमीर घातलेली भाकर खाईल तर त्याला तुम्ही इस्राएल लोकांमधून बाहेर टाकावे.
16På den første dag skal I holde Højtidsstævne og ligeledes på den syvende Dag. Intet Arbejde må udføres på dem; kun det, enhver behøver til Føde, det og intet andet må I tilberede.
16या सणाच्या पहिल्या व शेवटल्या म्हणजे सातव्या दिवशी पवित्र मेळा भरवावा; ह्या दोन्ही दिवशी स्वयंपाकाच्या कामाशिवाय इतर कोणतेही काम करु नये.
17I skal holde det usyrede Brøds Højtid, thi på denne selv samme Dag førte jeg eders Hærskarer ud af Ægypten, derfor skal I højtideligholde denne Dag i alle kommende Slægtled som en evig gyldig Ordning.
17बेखमीर भाकरीच्या सणाची तुम्ही आठवण ठेवावी कारण याच दिवशी मी तुम्हा सर्वाना गटगटांनी मिसरदेशातून बाहेर काढून नेले म्हणून तुमच्या सर्व वंशाजांनी हा दिवस पिढ्यान्पिढ्या कायमचा नियम म्हणून पाळावा.
18På den fjortende Dag i den første Måned om Aftenen skal I spise usyret Brød og vedblive dermed indtil Månedens en og tyvende Dag om Aftenen.
18तेव्हा पहिल्या महिन्यातील (निसान महिन्यातील) चौदाव्या दिवसाच्या संध्याकाळपासून ते त्या महिन्याच्या एकविसाव्या दिवसाच्या संध्याकाळपर्यत तुम्ही बेखमीर भाकरी खाव्या.
19I syv Dage må der ikke findes Surdejg i eders Huse, thi hver den, som spiser noget syret, det Menneske skal udryddes af Israels Menighed, de fremmede så vel som de indfødte i Landet.
19ह्या सात दिवसात तुमच्या घरात खमीर नसावे; कारण जो कोणी एखादी खमीराची वस्तू खाईल मग तो परदेशी असो किंवा स्वदेशी असो त्याला इस्राएल लोकांमधून बाहेर टाकावे.
20I må ikke nyde noget som helst syret; hvor I end bor, skal I spise usyret Brød."
20या दिवशी कोणीही खमीर खाऊ नये; तर तुम्ही कोठेही राहात असला तरी बेखमीर भाकरच खावी.”
21Da kaldte Moses alle Israels Ældste sammen og sagde til dem: "Gå ud og hent eder Småkvæg til eders Familier og slagt Påskeofferet;
21म्हणून मग मोशेने इस्राएली लोकांच्या सर्व वडीलधाऱ्यां लोकांना एकत्र बोलावले. तो त्यांना म्हणाला, “तुम्ही आपापल्या घराण्याप्रमाणे एकएक कोकरू घ्यावे; आणि वल्हांडण सणाच्या यज्ञाकरिता त्याचा वध करावा.
22og tag eder Ysopkoste, dyp dem i Blodet i Fadet og stryg noget deraf på Overliggeren og de to Dørstolper; og ingen af eder må gå ud af sin Husdør før i Morgen.
22मग एजोब झाडाच्या पानांच्या जुड्या घेऊन त्या पात्रातील कोकराच्या रक्तात बुचकाळाव्या आणि त्याचे रक्त दाराच्या दोन्ही बाजूंच्या चौकटींना व कपाळ पट्ट्यांवर लावावे. आणि सकाळपर्यंत कोणीही घराबाहेर जाऊ नये.
23Thi HERREN vil gå omkring og slå Ægypterne, og når han da ser Blodet på Overliggeren og de to Dørstolper, vil han gå Døren forbi og ikke give Ødelæggeren Adgang til eders Huse for at slå eder.
23कारण त्यावेळी परमेश्वर मिसरमधील प्रथम जन्मलेल्यांना ठार मारण्यासाठी फिरणार आहे; तो जेव्हा घराच्या दारावरील कपाळ पट्टीवर व दाराच्या चौकटीच्या दोन्ही बाजूला लावलेले रक्त पाहील तेव्हा तो त्या घराचे संरक्षण करील; नाश करणाऱ्याला तुमच्या घरात प्रवेश करु देणार नाही, व तुम्हाला काही अपाय होऊ देणार नाही.
24Dette skal I varetage som en Anordning, der gælder for dig og dine Børn til evig Tid.
24तुम्ही या आज्ञेची आठवण ठेवली पाहिजे की तुम्ही व तुमचे वंशज यानी पाळावयासाठी हा नियम कायमचा नियम आहे.
25Og når I kommer til det Land, HERREN vil give eder, således som han har forjættet, så skal I overholde denne Skik.
25परमेश्वर त्याच्या वचनानुसार जो देश तुम्हाला देणार आहे त्यात तुम्ही गेला तर तेथेही तुम्ही हा नियम पाळण्याची आठवण ठेवावी.
26Når da eders Børn spørger eder: Hvad betyder den Skik, I der har?
26जेव्हा तुमची मुलेबाळे तुम्हाला विचारतील की हा विधी आपण का करीत आहोत?
27så skal I svare: Det er Påskeoffer for HERREN, fordi han gik Israeliternes Huse forbi i Ægypten, dengang han slog Ægypterne, men lod vore Huse urørte!" Da bøjede Folket sig og tilbad.
27तेव्हा तुम्ही त्यांना सांगा, ‘हा परमेश्वराच्या वल्हांडणाचा यज्ञ आहे; कारण आम्ही जेव्हा मिसरमध्ये होतो तेव्हा या दिवशी परमेश्वराने मिसरच्या लोकांना मारले परंतु इस्राएल लोक राहात असलेली घरे ओलाडूंन तो पुढे गेला व त्या घरातील आम्हा सर्वाना त्याने वाचवले’ त्यानंतर इस्राएल लोकांनी परमेश्वरापुढे नतमस्तक होऊन त्याची उपासना केली.
28Og Israeliterne gik hen og gjorde, som HERREN havde pålagt Moses og Aron.
28परमेश्वाने मोशे व अहरोन यांना आज्ञा दिली होती म्हणून इस्राएल लोकांनी त्यांच्या सांगण्याप्रमाणे केले.
29Men ved Midnatstid ihjelslog HERREN alle de førstefødte i Ægypten lige fra Faraos førstefødte, der skulde arve hans Trone, til den førstefødte hos Fangen, der sad i Fangehullet, og alt det førstefødte af Kvæget.
29मध्यरात्री परमेश्वराने मिसरमधील सर्व प्रथम जन्मलेले मुलगे. म्हणजे मिसरदेशाचा राजा फारो याच्या थोरल्या मुलापासून तर तुरुंगात पडलेल्या कैद्याच्या थोरल्या मुलापर्यत सर्व मुलांना तसेच पशूंच्या प्रथम जन्मलेल्या सर्व नरांना मारून टाकले.
30Da stod Farao op om Natten tillige med alle sine Tjenere og alle Ægypterne, og der lød et højt Klageskrig i Ægypten, thi der var intet Hus, hvor der ikke fandtes en død.
30त्या रात्री अवघ्या मिसर देशातील अगदी प्रत्येक घरातून एक ना एकजण तरी मरण पावला. फारो राजा, त्याचे सेवक आणि मिसरचे लोक मोठमोठ्याने रडून शोक करु लागले.
31Og han lod Moses og Aron kalde om Natten og sagde: "Bryd op og drag bort fra mit Folk, I selv og alle Israeliterne, og drag ud og dyrk HERREN, som I har forlangt.
31तेव्हा रात्रीच्या रात्रीच फारोने मोशे व अहरोन यांना बोलावून आणले, फारो त्यांना म्हणाला, “आता उठा आणि आमचे लोक सोडून निघा, तुम्ही म्हटल्याप्रमाणे तुम्ही व तुमचे लोक निघून जा आणि तुमच्या परमेश्वराची उपासना करा.
32Tag også eders Småkvæg og Hornkvæg med, som I har forlangt, og drag bort; og bed også om Velsignelse for mig!"
32आणि तुम्ही म्हणल्याप्रमाणे तुमची शेरमेढरे, व गुरेढोरे ही तुमच्या बरोबर घेऊन जा. येथून निघा! आणि जाताना मलाही आशीर्वाद द्या!”
33Og Ægypterne trængte på Folket for at påskynde deres Afrejse fra Landet, thi de sagde: "Vi mister alle Livet!"
33मिसरच्या लोकांनी सुद्धा इस्राएल लोकांना घाईकरून लवकर निघून जाण्यास सांगितले; कारण ते म्हणाले, “तुम्ही जर येथून निघून जाणार नाही तर आम्ही सर्वजण मरून जाऊ!”
34Og , Folket tog deres Dejg med sig, før den var syret, og de bar Dejtrugene på Skulderen, indsvøbte i deres Kapper.
34इस्राएल लोकांना आपल्या भाकरीच्या पिठात खमीर घालण्यास बिलकुल वेळ मिळाला नाही म्हणून त्यांनी मळलेल्या पिठाच्या काथवटी कापडात गुंडाळल्या आणि त्या आपल्या खांद्यावर टाकून ते घेऊन गेले.
35Men Israeliterne havde gjort, som Moses havde sagt, og bedt Ægypterne om Sølv og Guldsmykker og om Klæder;
35इस्राएल लोकांनी मोशेने त्यांना सांगितल्याप्रमाणे आपल्या मिसरच्या शेजाऱ्या पाजाऱ्यांकडे जाऊन भारी भारी कपडे. सोन्याचांदीचे दागदागिने मागून घेतले होते.
36og HERREN havde stemt Ægypterne gunstigt mod Folket, så de havde givet dem, hvad de bad om. Således tog de Bytte fra Ægypterne.
36मिसरच्या लोकांनी इस्राएल लोकांना त्या त्या वस्तू दयाव्यात म्हणून त्यांच्या मनात परमेश्वराने इस्राएल लोकांविषयी दया निर्माण केली आणि म्हणून मिसरच्या लोकांनी इस्राएल लोकांना मौल्यवान वस्तू दिल्या.
37Så brød Israeliterne op fra Rameses til Sukkot, henved 600.000 Mand til Fods foruden Kvinder og Børn.
37तेव्हा इस्राएल लोक मिसरमधून निघून रामसेस येथून प्रवास करीत सुक्कोथ येथे गेले. मुलेबाळे सोडून ते सर्वजण मिळून सुमारे सहा लाख होते.
38Desuden fulgte en stor Hob sammenløbet Folk med og dertil Småkvæg og Hornkvæg, en vældig Mængde Kvæg.
38त्यांच्या सोबत पुष्कळ शेरडेमेंढरे व गुरेढोरे होती. अनेक प्रकारचे लोक त्यांच्याबरोबर प्रवास करीत होते, ते इस्राएली नव्हते परंतु त्यांनी त्याच्या बरोबर मिसर देश सोडला.
39Og af den Dejg, de havde bragt med fra Ægypten, bagte de usyret Brød; den var nemlig ikke syret, de var jo drevet ud af Ægypten uden at få Tid til noget; de havde ikke engang tilberedt sig Tæring til Rejsen.
39इस्राएल लोकांस आपल्या भाकरीच्या पिठात खमीर घालण्यास अजिबात वेळ मिळाला नाही. तसेच आपल्याबरोबर प्रवासाकरिता खावयास काही विशेष जेवण करता आले नाही; म्हणून त्यांना बेखमीर भाकरीच भाजाव्या लागल्या.
40Den Tid, Israeliterne havde boet i Ægypten, udgjorde 430 År.
40इस्राएली लोक मिसरमध्ये चारशेतीस वर्षे राहिले होते.
41Netop på den Dag da de 430 År var til Ende, drog alle HERRENs Hærskarer ud af Ægypten.
41मग चारशे तीसव्या वर्षातील अगदी शेवटच्या दिवसापर्यंत राहिल्यानंतर परमेश्वराच्या सर्व सेना म्हणजे सर्व इस्राएल लोक मिसर देशातून निघाले.
42En Vågenat var det for HERREN, i hvilken han vilde føre dem ud af Ægypten. Den Nat er viet HERREN, en Vågenat for alle Israeliterne, Slægt efter Slægt.
42म्हणून ज्या रात्री त्यांनी मिसरदेश सोडला त्या रात्री परमेश्वराने त्यांच्या करिता काय केले त्याविषयी त्या विशेष रात्रीची त्यांना आठवण राहील. सर्व इस्राएल लोकांनी त्या रात्रीची आठवण अगदी पिढ्यान् पिढ्या ठेवावी.
43HERREN sagde til Moses og Aron: "Dette er Ordningen angående Påskelammet: Ingen fremmed må spise deraf.
43परमेश्वराने मोशे व अहरोन यांना सांगितले, “वल्हांडण सण पाळण्याविषयीचे नियम असे आहेत. कोणाही परदेशी माणसाने वल्हांडणाचे भोजन खाऊ नये.
44Men enhver Træl, der er købt for Penge, må spise deraf, såfremt du har fået ham omskåret.
44परंतु जर कोणी एखादा गुलाम विकत घेतला असेल आणि त्याची सुंता त्याने करवून घेतली असेल तर मग त्या गुलामाने वल्हांडणाचे भोजन खावे;
45Ingen indvandret eller Daglejer må spise deraf.
45परंतु केवळ तुमच्या देशात राहणारा उपरा माणूस किंवा मोलकरी ह्यापैकी कोणीही ते खाऊ नये. (कारण वल्हांडण सण फक्त इस्राएल लोकांसाठीच आहे.)
46Det skal spises i et og samme Hus, og intet af Kødet må bringes ud af Huset; I må ikke sønderbryde dets Ben.
46“प्रत्येक इस्राएली कुटुंबाने आपले वल्हांडण सणाचे भोजन एकाच घरात खाल्ले पाहिजे; ते भोजन घराबाहेर नेऊ नये. यज्ञपशूचे कोणतेही हाड मोडू नये.
47Hele Israels Menighed skal fejre Påsken.
47सर्व इस्राएल लोकांनी हा सण पाळलाच पाहिजे.
48Dersom en fremmed bor som Gæst hos dig og vil fejre Påske for HERREN, da skal alle af Mandkøn hos ham omskæres; så må han være med til at fejre den, og han skal være ligestillet med den indfødte i Landet; men ingen uomskåren må spise deraf.
48इस्राएली नसलेला कोणी एक जण तुम्हांबरोबर राहात असेल व जर त्याला परमेश्वराच्या वल्हांडण सणाच्या भोजनात सहभागी होण्याची इच्छा असेल तर त्याने सुंता करून घेतलीच पाहिजे. म्हणजे मग तो इस्राएल लोकांसारखा रहिवासी होईल. मग त्याने वल्हांडण सणाच्या भोजनात सहभागी व्हावे; परंतु त्याने सुंताकरून घेतली नाही तर त्याला वल्हांडण सणाच्या भोजनात सहभागी होता येणार नाही.
49En og samme Lov skal gælde for den indfødte i Landet og for den fremmede, der bor som Gæst hos eder."
49हे नियम सर्वासाठी सारखेच आहेत, मग तो इस्राएली असो किंवा तुमच्या देशात राहणारा इस्राएली नसलेला कोणी परदेशी असो. प्रत्येकासाठी सारखेच नियम आहेत.”
50Og Israeliterne gjorde, som HERREN havde pålagt Moses og Aron.
50तेव्हा परमेश्वराने मोशे व अहरोन यांना ज्या आज्ञा दिल्या त्या सर्व इस्राएली लोकांनी पाळल्या.
51På denne selv samme Dag førte HERREN Israeliterne ud af Ægypten, Hærskare for Hærskare.
51अशा रीतीने त्याच दिवशी परमेश्वराने सर्व इस्राएल लोकांना मिसर देशातून बाहेर नेले व ते गटगटांनी गेले.