Danish

Marathi

Genesis

42

1Da Jakob hørte, at der var Korn at få i Ægypten, sagde han til sine Sønner: "Hvad venter I efter?"
1या सुमारास कनानमध्ये ही दुष्काळ पडला होता परंतु मिसरमध्ये धान्य असल्याचे याकोबाला समजले. तेव्हा याकोब आपल्या मुलांना म्हणाला, “आपण येथे काही न करता स्वस्थ का बसलो आहोत.
2Og han sagde: "Jeg hører, at der er Korn at få i Ægypten; drag ned og køb os noget, at vi kan blive i Live og undgå Døden!"
2मिसर देशात धान्य मिळते असे मी ऐकले आहे. तुम्ही जाऊन आपणासाठी धान्य विकत आणा म्हणजे आपण जगू, मरणार नाही.”
3Så drog de ti af Josefs Brødre ned for at købe Korn i Ægypten;
3तेव्हा योसेफाचे दहा भाऊ धान्य विकत घेण्यासाठी मिसरला गेले.
4men Jakob sendte ikke Josefs Broder Benjamin med hans Brødre, thi han tænkte, der kunde tilstøde ham en Ulykke.
4याकोबाने, योसेफाचा सख्खा भाऊ बन्यामीन याला त्याच्या भावाबरोबर पाठवले नाही; कारण योसेफाप्रमाणे बन्यामीनावरही काही वाईट प्रसंग ओढवेल अशी त्याला भीती वाटली.
5Blandt dem, der kom for at købe Korn, var også Israels Sønner; thi der var Hungersnød i Kana'ans Land.
5कनान देशात फारच तीव्र दुष्काळ पडला होता, म्हणून कनानातून पुष्कळ लोक धान्य विकत घ्यावयास मिसराला गेले त्या लोकांत इस्राएलाचे मुलगेही होते.
6Og da Josef var Hersker i Landet, og han var den, der solgte Korn til alt Folket i Landet, så kom Josefs Brødre og kastede sig til Jorden for ham.
6त्या वेळी योसेफ मिसरचा प्रशासक म्हणजे प्रमुख अधिकारी होता. बाहरेच्या देशातून धान्य विकत घ्यावयास मिसरमध्ये येणाऱ्या लोकांना धान्य विकण्याचा अधिकार केवळ योसेफालाच होता; म्हणून योसेफाचे भाऊ त्याजकडे आले आणि त्यांनी त्याला लवून नमन केले.
7Da Josef så sine Brødre, kendte han dem; men han lod fremmed over for dem, talte dem hårdt til og sagde til dem: "Hvorfra kommer I?" De svarede: "Fra Kana'ans Land for at købe Føde!"
7योसेफाने आपल्या भावांना पाहिल्याबरोबर ओळखले परंतु ते कोण आहेत हे माहित नसल्यासारखे दाखवून तो त्यांच्याशी कठोरपणाने बोलला त्याने त्यांना विचारले, “तुम्ही कोठून आला?” त्याच्या भावांनी उत्तर दिले, “महाराज, आम्ही कनान देशातून धान्य विकत घेण्यासाठी आलो आहो.”
8Josef kendte sine Brødre, men de kendte ikke ham.
8योसेफाने आपल्या भावांना ओळखले परंतु त्यांनी त्याला ओळखले नाही.
9Da kom Josef de Drømme i Hu. han havde drømt om dem; og han sagde til dem; "I er Spejdere, I kommer for at se, hvor Landet er åbent!"
9आणि मग योसेफाला आपल्या भावांविषयी पडलेली स्वप्ने आठवली. योसेफ आपल्या भावांना म्हणाला, “तुम्ही हेर आहात! तुम्ही धान्य खरेदी करण्यास नव्हे तर आमच्या देशाचा कमजोरपणा हेरण्यास आला आहात.”
10De svarede: "Nej, Herre, dine Trælle kommer for at købe Føde!
10परंतु त्याचे भाऊ म्हणाले, “नाही नाही, महाराज! आम्ही आपले दास खरोखर केवळ धान्य विकत घ्यावयास आलो आहोत.
11Vi er alle Sønner af en og samme Mand; vi er ærlige Folk. dine Trælle er ikke Spejdere!"
11आम्ही सर्व भाऊ एका पुरुषाचे मुलगे आहोत. आम्ही प्रमाणिक म्हणजे खरेपणाने बोलणारे व चालणारे सरळ माणसे आहोत. आम्ही खरेच धान्य खरेदी करण्यास आलो आहोत.”
12Men han sagde: "Jo vist så! I kommer for at se, hvor Landet er åbent!"
12नंतर योसेफ त्यांना म्हणाला, “नाही, तुम्ही आमचा कमकुवतपणा पाहण्यास आलेले हेर आहात.”
13De svarede: "Vi, dine Trælle. var tolv Brødre, Sønner af en og samme Mand i Kana'ans Land; den yngste er for Tiden hjemme hos vor Fader, og een er ikke mere!"
13परंतु ते भाऊ म्हणाले, “नाही नाही महाराज! आम्ही सर्व भाऊच आहोत. आमच्या कुटुंबातील आम्ही एका बापाचे बारा मुलगे आहोत. आमचा सर्वात धाकटा भाऊ घरी बापाजवळ आहे. आणि आमचा दुसरा एक भाऊ फार पूर्वी मरण पावला. कनान देशातले आम्ही सर्व आपल्या दासासमान आहोत.”
14Men Josef sagde til dem: "Det er, som jeg siger eder: I er Spejdere!
14परंतु योसेफ त्यांना म्हणाला, “नाही, माझे म्हणणे अगदी बरोबर आहे. तुम्ही हेरच आहात;
15Men nu skal I sættes på Prøve: Så sandt Farao lever, slipper I ikke herfra, uden at eders yngste Broder kommer hid!
15परंतु तुम्ही खरे बोलत आहा हे पटवून देण्याची मी तुम्हाला एक संधी देतो; फारोची शपथ! मी वचन देतो की तुमचा धाकटा भाऊ येथे येईपर्यंत तुम्हाला येथून जाता येणार नाही.
16Lad en af eder rejse hjem for at hente eders Broder, og imedens holdes I andre fangne; så vil det. vise sig, om eders Ord er Sandhed; og hvis ikke, så er I, så sandt, Farao lever, Spejdere!"
16तेव्हा तुम्हातील एकाने मागे घरी जाऊन तुमच्या धाकटया भावाला येथे घेऊन यावे, आणि तो पर्यंत तुम्ही इतरांनी येथे तुरुंगात राहावे; मग तुम्ही कितपत खरे बोलता हे आम्हास कळेल. परंतु माझी खात्री आहे की तुम्ही हेरच आहात.”
17Derpå holdt han dem i Forvaring tre Dage.
17मग योसेफाने त्या सर्वांना तीन दिवस तुरुंगात अटकेत ठेवले.
18Men Tredjedagen sagde Josef til dem: "Vil I beholde Livet, så skal I gøre således, thi jeg er en Mand, der frygter Gud:
18तीन दिवसानंतर योसेफ त्यांना म्हणाला, “मी देवभिरु माणूस आहे. म्हणून मी सांगतो तसेच करा, म्हणजे तुमच्या धाकट्या भावाला येथे आणून तुमचा खरेपणा पटवून द्या; मग मी तुम्हाला वाचवू शकेन.
19Er I virkelig ærlige Folk, lad så en af eder blive tilbage som Fange i det Fængsel, som I sad i, medens I andre drager hjem med Korn til at stille Hungeren i eders Huse;
19तुम्ही जर खरेच प्रामाणिक असाल तर मग तुम्हातील एका भावास येथे तुरुंगात ओलीस ठेवा व बाकीचे तुम्ही तुमच्या घरच्या माणसांकरिता धान्य घेऊन जा.
20og bring så eders yngste Broder til mig, så skal eders Ord stå til Troende, og I skal slippe for at dø!" Og således gjorde de.
20मग तुमच्या धाकट्या भावास येथे माझ्याकडे घेऊन या. यावरुन तुम्ही माझ्याशी खरे बोलता किंवा नाही याची मला खात्री पटेल.” आणि तुम्हाला मरावे लागणार नाही.” तेव्हा तसे करण्यास ते भाऊ कबूल झाले.
21Da sagde de til hverandre: "Sandelig, nu må vi bøde for, hvad vi forbrød mod vor Broder, da vi så hans Sjælevånde, medens han bønfaldt os, og dog ikke hørte ham; derfor stedes vi nu i denne Vånde!"
21ते एकमेकांस म्हणाले, “आपला धाकटा भाऊ योसेफ याच्याशी आपण वाईट रीतीने वागलो त्याचा बदला म्हणून आपणास ही शिक्षा होत आहे. त्याने त्याला सोडून द्यावे व त्याचा जीव वाचवावा म्हणून काकुळतीने रडून आपणास विनंती केली परंतु आपण त्याचे ऐकले नाही म्हणून आता आपणास हे भोगावे लागत आहे.”
22Men Ruben tog til Orde og sagde til dem: "Sagde jeg eder ikke dengang: Forsynd eder ikke mod Drengen! Men I vilde ikke høre; se, nu kræves hans Blod!"
22मग रऊबेन त्यांना म्हणाला, “मी तुम्हाला सांगितले की त्या लहान भावाच्या जीवाला, वाईट रीतीने वागून काही अपाय करु नका; परंतु तुम्ही ते ऐकले नाही म्हणून आता त्याच्या मृत्यूबद्दल आपण ही शिक्षा भोगीत आहोत.”
23Således talte de. Men de vidste ikke, at Josef forstod det, thi han forhandlede med dem ved Tolk;
23योसेफ दुभाष्यातर्फे आपल्या भावांशी बोलत असल्यामुळे, योसेफाला आपल्या भोषेतील बोलणे कळत असेल असे त्यांना वाटले नाही. परंतु त्यांचे सर्व बोलणे योसेफाला समजले; त्यामुळे त्याला फार दु:ख झाले व
24og han vendte sig bort fra dem og græd. Siden vendte han sig til dem og talte med dem; og han tog Simeon fra dem og lod ham fængsle for deres Øjne.
24म्हणून तो त्यांच्यापासून बाजूला जाऊन रडला थोडया वेळाने तो परत त्यांच्याकडे आला. आणि त्यांच्याशी बोलला इतर भाऊ पाहात असताना त्याने एका भावाला शिमोनला त्यांच्यातून काढून घेतले आणि बांधले.
25Så gav Josef Befaling til at fylde deres Sække med Korn og lægge Pengene tilbage i hver enkelts Sæk og give dem Rejsekost; og således skete det.
25मग आपल्या भावांच्या पोत्यात धान्य भरण्यास तसेच त्या धान्याबद्दल त्याच्या भावांनी दिलेला परंतु योसेफाने न घेतलेला पैसा गुपचूप ज्याच्या त्याच्या पोत्यात भरण्यास व त्यांच्या परतीच्या प्रवासात वाटेत खाण्यासाठी अन्नसामग्री देण्यास योसेफाने आपल्या काही सेवकांना सांगतिले.
26Så læssede de deres Korn på Æslerne og drog bort.
26तेव्हा त्या भावांनी ते धान्य आपापल्या गाढवावर लादले व तेथून ते माघारी जाण्यास निघाले.
27Men da en af dem i Natteherberget åbnede sin Sæk for at give sit Æsel Foder, fik han Øje på sine Penge, der lå oven i Sækken;
27ते भाऊ रात्रीच्या मुक्कामासाठी एका ठिकाणी थांबले. तेव्हा त्यांच्यापैकी एकाने त्याच्या गाढवाला थोडेसे धान्य देण्यासाठी आपली गोणी उघडली तेव्हा त्याने धान्यासाठी दिलेल पैसे त्याला त्या गोणीत आढळले.
28og han sagde til sine Brødre: "Mine Penge er kommet igen; se, de er i min Sæk!" Da sank Hjertet i Livet på dem, og de så forfærdede på hverandre og sagde: "Hvad har Gud dog gjort imod os!"
28तेव्हा तो आपल्या इतर भावांना म्हणाला, “पाहा! धान्यासाठी मी दिलेले हे पैसे कोणीतरी पुन्हा माझ्या गोणीत ठेवले आहेत!” तेव्हा ते भाऊ अतिशय घाबरले, ते एकमेकांस म्हणाले, “देव आपल्याला काय करत आहे.”
29Og da de kom hjem til deres Fader Jakob i Kana'ans Land, fortalte de ham alt, hvad der var hændet dem, og sagde:
29ते भाऊ कनान देशास आपला बाप याकोब याजकडे गेले आणि त्यांनी घडलेल्या सर्व गोष्टी त्याला सांगितल्या.
30"Manden, der er Landets Herre, talte os hårdt til og holdt os i Forvaring, som var vi Folk, der vilde udspejde Landet;
30ते म्हणाले, “त्या देशाचा (मिसरचा) अधिपति म्हणजे प्रमुख अधिकारी आमच्याशी कठोरपणाने बोलला आम्ही हेर आहोत असे त्याला वाटले;
31men vi sagde til ham: Vi er ærlige Folk og ikke Spejdere;
31परंतु आम्ही हेर नसून प्रामाणिक म्हणजे खरेपणाने वागणारे सरळ माणसे आहोत असे त्याला सांगितले.
32vi var tolv Brødre, Sønner af en og samme Fader; een er ikke mere, og den yngste er for Tiden hjemme hos vor Fader i Kana'ans Land.
32आम्ही त्याला सांगितले की आम्ही बारा भाऊ एका माणसाचे मुलगे आहोत आमचा एक भाऊ वारला तसेच आमचा सर्वात धाकटा भाऊ कनान देशात आजपर्यंत आमच्या बापाजवळच असतो असेही सांगितले.
33Så sagde Manden, der er Landets Herre: Derpå vil jeg kende, at I er ærlige Folk: Lad en af eder blive hos mig, og tag I andre Korn til at stille Hungeren i eders Huse og drag hjem!
33“तेव्हा त्या देशाचा प्रशासक म्हणजे प्रमुख अधिकारी आम्हाला म्हणाला, ‘तुम्ही प्रामाणिक व साळसूद लोक आहात हे पटवून देण्याचा एक मार्ग आहे; तो असा की तुम्ही तुम्हातील एका भावास येथे ओलीस माझ्यापाशी ठेवा; तुम्ही इतरजण तुमच्या कुटुंबातील माणसाकरिता धान्य घेऊन जा.
34Siden skal I bringe eders yngste Broder til mig, for at jeg kan kende, at I ikke er Spejdere, men ærlige Folk; så vil jeg udlevere eders Broder til eder, og I kan frit rejse i Landet."
34आणि नंतर तुम्ही तुमच्या धाकट्या भावाला येथे माझ्याकडे घेऊन या; मग तुम्ही खरेच प्रामाणिक व साळसूद माणसे आहात हे मला पटेल; नाही तर मग तुम्ही तुमच्या सेनापतीच्या हुकुमाने आमचा नाश करावयास आला आहात असे मी समजेन; तुम्ही जर खरे बोलत असाल तर मग मी तुमचा भाऊ परत तुमच्या हवाली करीन आणि मग तुम्हाला आपणाकरिता आमच्या देशातून धान्य विकत घेण्यासाठी ये जा करण्याची परवानगी असेल.”
35Da de nu tømte deres Sække, fandt hver sin Pengepose i sin Sæk; og da de og deres Fader så Pengeposerne, blev de forfærdede.
35मग ते भाऊ आपापल्या पोत्यातून धान्य काढावयास गेले; तेव्हा प्रत्येकाच्या पोत्यात पैशाची पिशवी मिळाली. त्या पैसाच्या पिशव्या पाहून ते भाऊ व त्यांचा बाप हे अतिशय घाबरले.
36Og deres Fader Jakob sagde til dem: "I gør mig barnløs; Josef er ikke mere, og Simeon er ikke mere, og nu vil I tage Benjamin; det går alt sammen ud over mig!"
36याकोब त्यांना म्हणाला, “मी माझ्या सर्व मुलांना मुकावे अशी तुमची इच्छा आहे काय? योसेफ गेला; शिमोनही गेला; आणि आता बन्यामीनालाही माझ्यापासून घेऊन जाण्याची तुमची इच्छा आहे!”
37Så sagde Ruben til sin Fader: "Du må tage mine to Sønners Liv, hvis jeg ikke bringer ham til dig; betro ham til mig, og jeg skal bringe ham tilbage til dig!"
37मग रऊबेन आपल्या बापास म्हणाला, “बाबा, मी जर बन्यामीनाला मागे आणले नाही तर माझे दोन मुलगे तुम्ही मारुन टाका; बाबा, माझ्यावर विश्वास ठेवा! मी खरोखर बन्यामीनाला मागे तुमच्याकडे घेऊन येईन!”
38Men han sagde: "Min Søn skal ikke rejse derned med eder, thi hans Broder er død, og han alene er tilbage; tilstøder der ham en Ulykke på den Rejse, I har for, så bringer I mine grå Hår ned i Dødsriget med Sorg!"
38परंतु याकोब म्हणाला, “मी बन्यामीनाला तुमच्याबरोबर पाठविणार नाही; त्याचा भाऊ मरण पावला आणि आता माझी बायको राहेल हिचा एवढा एकच मुलगा राहिला आहे. मिसरच्या फेरीत त्याला काही अपाय झाला तर त्यामुळे मला मरण येईल; आणि अतिशय दु:खी म्हातारा माणूस म्हणून तुम्ही मला कबरेत पाठवाल.”