1HERREN talede fremdeles til Moses og Aron og sagde:
1परमेश्वर मोशेशी आणि अहरोनाशी बोलला. तो म्हणाला,
2Dette er det Lovbud, HERREN har kundgjort: Sig til Israelitterne, at de skal skaffe dig en rød, lydefri Kvie, der er uden Fejl og ikke har båret Åg.
2“परमेश्वराने इस्राएल लोकांना जी शिकवण दिली तिचे हे नियम आहेत. काहीही दोष नसलेली एक लाल गाय घ्या. त्या गायीला कसलीही इजा झालेली नसावी आणि त्या गायीने मानेवर कधीही जू घेतलेले नसावे.
3Den skal I overgive til Præsten Eleazar, og man skal føre den uden for Lejren og slagte den for hans Åsyn.
3ती गाय याजक एलाजारला द्या. एलाजार ती गाय छावणी बाहेर नेईल आणि तिथे तिला मारील.
4Så skal Præsten Eleazar tage noget af dens Blod på sin Finger og stænke det syv Gange i Retning af Åbenbaringsteltets Forside.
4नंतर एलाजार, हा याजक थोडे रकत आपल्या बोटावर घेईल आणि काही रकत दर्शनमंडपाकडे शिंपडेल. त्याने असे सात वेळा केले पाहिजे.
5Derpå skal Kvien brændes i hans Påsyn; dens Hud, Kød og Blod tillige med Skarnet skal opbrændes.
5नंतर संपूर्ण गाय त्याच्या समोर जाळली पाहिजे. कातडी, मास रकत आणि आतडे सर्वकाही जळले पाहिजे.
6Derefter skal Præsten tage Cedertræ, Ysop og karmoisinrødt Uld og kaste det på Bålet, hvor Kvien brænder.
6नंतर याजकाने गंधसरूची एक काठी, एजोबाची फांदी व लाल दोरी घ्यावी. याजकाने या गोष्टी गाय जळत असलेल्या जाळात फेकाव्या.
7Så skal Præsten tvætte sine Klæder og bade sit Legeme i Vand og derefter vende tilbage til Lejren. Men Præsten skal være uren til Aften.
7याजकाने स्वत:ला आणि त्याच्या कपड्यांना स्वच्छ पाण्याने धुवावे. आणि मगच छावणीत परत यावे. याजक संध्याकाळपर्यंत अशुद्ध असेल.
8Ligeledes skal den Mand, der brænder Kvien, tvætte sine Klæder med Vand og bade sit Legeme i Vand og være uren til Aften.
8ज्या माणसाने गायीला जाळले असेल त्याने स्वत:ला धुवावे. स्वत:चे कपडेही पाण्याने स्वच्छ धुवावे. तो संध्याकाळपर्यंत अशुद्ध असेल.
9Og en Mand, der er ren, skal opsamle Kviens Aske og lægge den hen på et rent Sted uden for Lejren, hvor den skal opbevares for Israelitternes Menighed for at bruges til Renselsesvand. Det er et Syndoffer.
9“नंतर जो माणूस शुद्ध असेल तो गायीची राख गोळा करेल. तो ती राख छावणीच्या बाहेर स्वच्छ जागी ठेवील. शुद्ध होण्याचा जेव्हा लोक खास विधी करतात त्यावेळी त्यांना या राखेचा उपयोग करता येईल. एखाद्याचे पाप नाहीसे करण्यासाठी सुध्दा या राखेचा उपयोग करण्यात येईल.
10Og den, der opsamler Kviens Aske, skal tvætte sine Klæder og være uren til Aften. For Israelitterne og den fremmede, der bor iblandt dem, skal dette være en evig gyldig Anordning:
10“ज्या माणसाने गायीची राख गोळा केली असेल त्याने त्याचे कपडे धुवावे. तो संध्याकाळपर्यंत अशुद्ध राहील. हे नियम नेहमी अस्तित्वात असतील.” हा नियम इस्राएलच्या सर्व नागरिकांसाठी आहे आणि तुमच्या बरोबर जे परदेशी लोक रहात आहेत त्यांच्यासाठीही हा नियम आहे.
11Den, der rører ved en død, ved noget som helst Lig, skal være uren i syv Dage.
11जर एखाद्याने प्रेताला हात लावला तर तो सात दिवस अशुद्ध राहील.
12Han skal lade sig rense for Synd med Asken på den tredje og syvende Dag, så bliver han ren; men renser han sig ikke på den tredje og syvende Dag, bliver han ikke ren.
12त्याने स्वत:ला तिसऱ्या दिवशी व नंतर सातव्या दिवशी खास पाण्याने धुवावे. जर त्याने असे केले नाही तर तो अशुद्धच राहील.
13Enhver, der rører ved en død, et Lig, og ikke lader sig rense for Synd, besmitter HERRENs Bolig, og det Menneske skal udryddes af Israel, fordi der ikke er stænket Renselsesvand på ham; han er uren, hans Urenhed klæber endnu ved ham.
13जर एखाद्याने प्रेताला हात लावला तर तो अशुद्ध होईल. जर माणूस अशुद्ध असताना पवित्र निवास मंडपात गेला तर मंडपही अशुद्ध होईल. म्हणून त्या माणसाला इस्राएल लोकांपासून दूर ठेवावे. जर अशुद्ध माणसावर खास पाणी शिंपडले नाही तर तो अशुद्ध राहील.
14Således er Loven: Når et Menneske dør i et Telt,, bliver enhver, der træder ind i Teltet, og enhver, der er i Teltet, uren i syv Dage;
14“जे लोक त्यांच्या मंडपात मरतात त्यांच्यासाठी हा कायदा आहे. जर एखादा माणूस त्याच्या मंडपात मेला तर त्या मंडपातले सगळे लोक आणि सगव्व्या वस्तू अशुद्ध होतील. ते सात दिवस अशुद्ध राहतील.
15og ethvert åbent Kar, et, der ikke er bundet noget over, bliver urent.
15आणि झाकण नसलेले प्रत्येक भांडे अशुद्ध होईल.
16Ligeledes bliver enhver, der på åben Mark rører ved en, der er dræbt med Sværd, eller ved en, der er død, eller ved Menneskeknogler eller en Grav, uren i syv Dage.
16जर एखाद्याने प्रेताला हात लावला तर तो सात दिवस अशुद्ध राहील. जर ते प्रेत बाहेर उघड्यावर असेल किंवा तो माणूस युद्धात मारला गेला असेल तरच हे लागू आहे. आणि जर एखाद्याने मेलेल्या माणसाच्या अस्थींना हात लावला तरी तो माणूस सात दिवस अशुद्ध होईल.
17For sådanne urene skal man da tage noget af Asken af det brændte Syndoffer og hælde rindende Vand derover i en Skål.
17“त्या माणसाला पुन्हा स्वच्छ करण्यासाठी जाळलेल्या गायीची राख तुम्ही वापरली पाहिजे. एखाद्या भांड्यात राखेवर ताजे पाणी टाका.
18Derpå skal en Mand, der er ren, tage en Ysopstængel, dyppe den i Vandet og stænke det på Teltet og på alle de Ting og Mennesker, der har været deri, og på den, der har rørt ved Menneskeknoglerne, den ihjelslagne, den døde eller Graven.
18शुद्ध माणसाने एजोबाची काठी घेऊन ती पाण्यात बुडवावी. नंतर ते पाणी तंबूवर, भांड्यावर आणि मंडपातल्या माणसांवर शिंपडावे. जो प्रेताला हात लावली त्याच्या बाबतीत हे करावे. तुम्ही हे प्रत्येकाला करा. जो युद्धात कबरेला हात लावील किंवा मेलेल्या माणसाच्या हाडांना हात लावील त्याच्या बाबतीत हे करा.
19Således skal den rene bestænke den urene på den tredje og syvende Dag og borttage hans Synd på den syvende Dag. Derefter skal han tvætte sine Klæder og bade sig i Vand, så er han ren, når det bliver aften.
19“नंतर शुद्ध माणसाने हे पाणी तिसऱ्या व सातव्या दिवशी अशुद्ध माणसाच्या अंगावर शिंपडावे. तो माणूस सातव्या दिवशी शुद्ध होईल. त्याने त्याचे कपडे पाण्यात धुवावे. तो संध्याकाळी शुद्ध होईल.
20Men den, som bliver uren og ikke lader sig rense for Synd, han skal udryddes af Forsamlingen; thi han har besmittet HERRENs Helligdom, der er ikke stænket Renselsesvand på ham, han er uren.
20“एखादा माणूस अशुद्ध झाल्यांनंतर पुन्हा शुद्ध झाला नाही तर त्याला इस्राएल लोकांपासून वेगळे ठेवावे. त्या माणसावर ते खास पाणी शिंपडले नाही आणि तो शुद्ध झाला नाही तर तो पवित्र निवास मंडपही अशुद्ध करील.
21Det skal være eder en evig gyldig Anordning. Den, der stænker Renselsesvandet, skal tvætte sine Klæder, og den, der rører ved Renselsesvandet, skal være uren til Aften.
21तुमच्यासाठी हा नियम सदैव असेल. ज्या माणसावर पाणी शिंपडणे त्या माणसाने स्वत:चे कपडे सुद्धा धुतले पाहिजेत. कुठल्याही माणसाने त्या खास पाण्याला स्वर्श केला तर तो संध्याकाळपर्यंत अशुद्ध राहील.
22Alt, hvad den urene rører ved skal være urent, og enhver, der rører ved ham, skal være uren til Aften.
22जर त्या अशुद्ध माणसाने दुसऱ्या कोणाला स्पर्श केला तर तो माणूस सुद्धा अशुद्ध होईल. तो माणूस संध्याकाळपर्यंत अशुद्ध राहील.