1Og HERREN talede til Moses og sagde:
1परमेश्वर मोशेशी बोलला. तो म्हणाला:
2"Skaf Israelitterne Hævn over Midjaniterne; så skal du samles til din Slægt!"
2“मी इस्राएल लोकांना मिद्यान्यांचा सूड घ्यायला मदत करीन. मोशे, तू त्यानंतर मरशील.”101
3Da talte Moses til Folket og sagde: "Udrust Mænd af eders Midte til Kamp, for at de kan falde over Midjan og fuldbyrde HERRENs Hævn på Midjan;
3तेव्हा मोशे लोकांशी बोलला. तो म्हणाला, “तुमच्यातल्या काहींची सैनिक म्हणून निवड करा. परमेश्वर त्यांचा उपयोग मिद्यान्याचा सूड घेण्यासाठी करील.
41000 Mand af hver af Israels Stammer skal I sende i Kamp!"
4इस्राएलच्या प्रत्येक वंशातून 1000 लोक निवडा.
5Af Israels Tusinder udtoges da 1000 af hver Stamme, i alt 12.000 Mand, rustede til Kamp.
5म्हणजे इस्राएलमधून 12,000 सैनिक होतील.”
6Og Moses sendte dem i kamp, 1000 af hver Stamme, og sammen med dem Pinehas, Præsten Eleazars Søn, der medbragte de hellige Redskaber og Alarmtrompeterne.
6मोशेने त्या 12,000 लोकांना लढाईवर पाठवले. त्याने त्यांच्याबरोबर याजक एलाजारचा मुलगा फिनहास याला पाठवले. फिनहासने बरोबर पवित्र गोष्टी, रणशिंगे आणि तुताऱ्या घेतल्या.
7De drog så ud i kamp mod Midjaniterne, som HERREN havde pålagt Moses, og dræbte alle af Mandkøn;
7लोक परमेश्वराच्या आज्ञेप्रमाणे मिद्यान्यांबरोबर लढले. त्यांनी सर्व मिद्यानी पुरुषांना मारले.
8og foruden de andre, der blev slået ihjel, dræbte de også Midjans Konger, Evi, Rekem, Zur, Hur og Reba, Midjans fem Konger; også Bileam, Beors Søn, dræbte de med Sværdet.
8त्यांनी जे लोक मारले त्यांत अवी, रेकेम, सूर, हूर व रेबा हे मिद्यानाचे राजे होते. त्यांनी बौराचा मुलगा बलामलांही तलवारीने मारले.
9Og Israelitterne bortførte Midjaniternes kvinder og Børn som Krigsfanger, og alt deres Kvæg alle deres Hjorde og alt deres Gods tog de med som Bytte;
9इस्राएल लोकांनी मिद्यानाच्या स्त्रियांना व मुलांना कैद करुन नेले. त्यांनी त्यांच्या गायी. मेंढ्या व इतर गोष्टीही नेल्या.
10og alle deres Byer på de beboede Steder og alle deres Teltlejre stak de Ild på.
10त्यांनी त्यांची सर्व शहरे व खेडीही जाळली.
11Og alt det røvede og hele Byttet, både Mennesker og Dyr, tog de med sig,
11त्यांनी त्यांची सर्व माणसे. पशू घेतले आणि त्यांना
12og de bragte Fangerne, Byttet og det røvede til Moses og Præsten Eleazar og Israelitternes Menighed i Lejren på Moabs Sletter ved Jordan over for Jeriko.
12मोशे, याजक एलाजार आणि इस्राएलच्या इतर लोकांकडे आणले. त्यांनी युद्धात ज्या गोष्टी घेतल्या त्या सर्व इस्राएलींच्या तळावर आणल्या. इस्राएलचा एक तळ यार्देन नदीच्या खोऱ्यात मवाबमध्ये होता. हा तळ यार्देन नदीच्या पूर्वेला यरीहोपलीकडे होता.
13Men Moses, Præsten Eleazar og alle Menighedens Øverste gik dem i Møde uden for Lejren,
13नंतर मोशे, याजक एलाजार आणि लोकांचे पुढारी सैनिकांना भेटण्यासाठी छावणीबाहेर गेले.
14og Moses blev vred på Hærens Førere, Tusindførerne og Hundredførerne, som kom tilbage fra Krigstoget.
14मोशे सैनिकांच्या प्रमुखावर खूप रागावला. तो युद्धावरुन परतलेल्या 1000 सैनिकांच्याप्रमुखावर आणि 100 सैनिकांच्या प्रमुखावर खूप रागावला.
15Og Moses sagde til dem: "Har I ladet alle Kvinder i Live?
15मोशे त्यांना म्हणाला, “तुम्ही स्त्रियांना जिवंत का ठेवले?
16Det var jo dem, der efter Bileams Råd blev Årsag til, at Israelitterne var troløse mod HERREN i den Sag med Peor, så at Plagen ramte HERRENs Menighed.
16या स्त्रिया इस्राएलच्या पुरुषांसाठी वाईट आहेत. लोक परमेश्वरा पासून दूर जातील. बलामच्या वेळी झाले तसे होईल. परमेश्वराच्या लोकांना पुन्हा रोगराई येईल.
17Dræb derfor alle Drengebørn og alle kvinder, der har kendt Mand og haft Samleje med Mænd;
17आताच मिद्यानाच्या सर्व मुलांना ठार मारा आणि पुरुषाबरोबर राहिलेल्या सर्व स्त्रियांना मारून टाका. कुठल्याही पुरुषाबरोबर लैंगिक संबंध असलेल्या सर्व स्त्रियांना मारून टाका.
18men alle Piger, der ikke har haft Samleje med Mænd, skal I lade i Live og beholde,
18आणि नंतर तुमच्या पैकी ज्यांनी दुसऱ्यांना मारले असेल त्यांनी सात दिवस तळाच्या बाहेर राहावे.
19Men selv skal I lejre eder uden for Lejren i syv Dage, enhver, som har dræbt nogen, og enhver, som har rørt ved en dræbt, og rense eder på den tredje og den syvende Dag, både I selv og eders Krigsfanger.
19तुम्ही प्रेताला केवळ हात जरी लावला असला तरीही तुम्ही बाहेर राहावे. तिसऱ्या दिवशी तुम्ही स्वत:ला आणि तुमच्या कैद्यांना शुद्ध करा. हीच गोष्ट पुन्हा सातव्या दिवशीही करा.
20Og enhver Klædning, enhver Læder ting, alt, hvad der er lavet af Gedehår,og alle Træredskaber skal I rense!"
20तुम्ही तुमचे सर्व कपडे धुवा. लाकूड, लोकर आणि चामडे यांपासून बनवलेल्या वस्तू धुवा. तुम्ही शुद्ध झालेच पाहिजे.”
21Og Præsten Eleazar sagde til Krigerne, der havde været med i Kampen: "Dette er det Lovbud, HERREN har givet Moses:
21नंतर याजक एलाजार सैनिकांशी बोलला. तो म्हणाला, “परमेश्वराने मोशेला सांगितले ते हे नियम आहेत. युद्धावरुन परत आलेल्या सैनिकांसाठी हे नियम आहेत. तुम्ही सोने, चांदी, तांबे,
22Kun Guld, Sølv, kobber, Jern, Tin og Bly,
22[This verse may not be a part of this translation]
23alt, hvad der kan tåle Ild, skal I lade gå gennem Ild, så bliver det rent; dog må det renses med Renselsesvand. Men alt, hvad der ikke kan tåle Ild, skal I lade gå gennem Vand.
23[This verse may not be a part of this translation]
24Og eders klæder skal I tvætte på den syvende Dag, så bliver I rene og kan gå ind i Lejren."
24सातव्या दिवशी तुम्ही तुमचे सर्व कपडे धुवा. नंतर तुम्ही शुद्ध व्हाल त्यानंतर तुम्ही तळावर येऊ शकता.”
25Og HERREN talede til Moses og sagde:
25नंतर परमेश्वर मोशेला म्हणाला,
26"Sammen med Præsten Eleazar og Overhovederne for Menighedens Fædrenehuse skal du opgøre det samlede Bytte, der er taget, både Mennesker og Dyr.
26“सैनिकांनी जे कैदी, प्राणी आणि इतर गोष्टी युद्धावरुन आणल्या आहेत त्यांची मोजदाद एलाजार याजक, तू आणि नेत्यांनी करावी.
27Derefter skal du dele Byttet i to lige store Dele mellem dem, der har taget Del i Krigen og været i Kamp, og hele den øvrige Menighed.
27नंतर युद्धावर गेलेल्या सैनिकांत आणि इस्राएलच्या इतर लोकांत त्यांची वाटणी करा.
28Derpå skal du udtage en Afgift til HERREN fra krigerne, der har været i Kamp, et Stykke af hver fem Hundrede, både af Mennesker, Hornkvæg, Æsler og Småkvæg;
28युद्धावर गेलेल्या सैनिकांच्या हिश्श्यातून काही भाग वेगळा करा. तो भाग परमेश्वराचा आहे. परमेश्वराचा 500 वस्तूत 1 वस्तू असा भाग आहे. त्यांत माणसे, गायी, गाढवे व मेंढ्या यांचा समावेश आहे.
29det skal du tage af den Halvdel, som tilfalder dem, og give Præsten Eleazar det som Offerydelse til HERREN.
29युद्धावरून सैनिकांनी आणलेल्या लुटीचा त्यांच्यातला अर्धा भाग घ्या. नंतर त्या वस्तू याजक एलाजारला द्या. तो भाग परमेश्वराचा आहे.
30Men af den Halvdel, der tilfalder de andre Israelitter, skal du tage et Stykke af hver halvtredsindstyve, både af Mennesker, Hornkvæg, Æsler og Småkvæg, alt Kvæget, og give det til Leviterne, som tager Vare på, hvad der er at varetage ved HERRENs Bolig!"
30नंतर लोकांच्या अर्ध्या भागातील प्रत्येक 50 वस्तू मधील एक वस्तू घ्या. त्यात माणसे, गायी, गाढवं, बकऱ्या व इतर प्राणी यांचा समावेश आहे. तो भाग लेवी लोकांना द्या. कारण लेवी लोक परमेश्वराच्या पवित्र निवास मंडपाची काळजी घेतात.”
31Da gjorde Moses og Præsten Eleazar, som HERREN havde pålagt Moses.
31म्हणून मोशे आणि एलाजारने परमेश्वराने मोशेला दिलेल्या आज्ञेप्रमाणे केले.
32Og det, de havde taget, det tiloversblevne af Byttet, som Krigsfolket havde gjort, udgjorde 675000 Stykker Småkvæg,
32सैनिकांनी 675000 बकऱ्या,
3372 000 Stykker Hornkvæg,
3372,000 गायी,
3461 000 Æsler
3481,000 गाढवे
35og 32008 Mennesker, Kvinder, der ikke havde haft Samleje med Mænd.
35आणि 32,000 स्त्रियां आणल्या. (यांत कोणत्याही पुरुषाबरोबर लैंगिक संबंध न आलेल्या स्त्रियांचाच फक्त समावेश आहे)
36Den Halvdel, der tilfaldt dem, der havde været i Kamp, udgjorde altså et Tal af 337500 Stykker Småkvæg,
36युद्धावर गेलेल्या सैनिकांना 337500 मेंढ्या मिळाल्या.
37hvoraf Afgiften til HERREN udgjorde 675 Stykker Småkvæg,
37त्यांनी 675 मेंढ्या परमेश्वराला दिल्या.
3836000 Stykker Hornkvæg, hvoraf 72 i Afgift til HERREN,
38सैनिकांना 36,000 गायी मिळाल्या. त्यांतील 72 गायी त्यांनी परमेश्वराला दिल्या.
3930500 Æsler, hvoraf til i Afgift til HERREN,
39सैनिकांना 30,500 गाढवे मिळाली. त्यांतील 61 गाढवें त्यांनी परमेश्वराला दिले.
40og 16000 Mennesker, hvoraf 32 i Afgift til HERREN.
40सैनिकांना 16,000 स्त्रीया मिळाल्या. त्यांपैकी 32 त्यांनी स्त्रीया परमेश्वराला दिल्या.
41Og Moses overgav Afgiften, HERRENs Offerydelse, til Præsten Eleazar, som HERREN havde pålagt Moses.
41मोशेने परमेश्वराच्या या सर्व भेटी त्याच्या आज्ञेनुसार याजक एलाजारला दिल्या.
42Og af den Halvdel, som tilfaldt de andre Israelitter, og som Moses havde taget som deres del fra de Mænd, der havde været i Kamp
42नंतर मोशेने लोकांतल्या हिश्श्याच्या अर्ध्या भागाची मोजणी केली. हा युद्धावर गेलेल्या सैनिकांकडून मोशेने घेतलेला अर्धा भाग होता.
43denne Menighedens Halvdel udgjorde 337 500 Stykker Småkvæg,
43लोकांना 337,500 मेंढ्या.
4436 000 Stykker Hornkvæg,
4436,000 गायी,
4530 500 Æsler
45गाढवे 30,500
46og 16000 Mennesker
46आणि 16,000 स्त्रिया मिळाल्या.
47af den Halvdel, som tilfaldt de andre Israelitter, udtog Moses et Stykke for hver halvtredsindstyve, både af Mennesker og Kvæg, og gav dem til Leviterne, som tog Vare på, hvad der var at varetage ved HERRENs Bolig, som HERREN havde pålagt Moses.
47प्रत्येक 50 वस्तूमागे मोशेने एक वस्तू परमेश्वरासाठी घेतली. त्यांत पशू आणि माणसे याचा समावेश होता. नंतर त्याने या वस्तू लेवींना दिल्या. कारण त्यांनी परमेश्वराच्या पवित्र निवास मंडपाची काळजी घेतली.
48Da trådte Førerne for Hærens Afdelinger, Tusindførerne og Hundredførerne, hen til Moses
48नंतर सैनिकांचे पुढारी (1000 सैनिकांचे व 100 सैनिकांचे पुढारी) मोशेकडे आले.
49og sagde til ham: "Dine Trælle har holdt Mandtal over de krigere, der stod under os; og der manglede ikke en eneste af os;
49त्यांनी मोशेला सांगितले, “आम्ही तुझ्या सेवकांनी आमचे सैनिक मोजले. आम्ही एकही सैनिक सोडला नाही.
50derfor frembærer nu enhver af os som Offergave til HERREN, hvad han har taget af Guldsmykker, Armbånd, Spange, Fingerringe, Ørenringe og Halssmykker, for at skaffe os Soning for HERRENs Åsyn."
50म्हणून आम्ही प्रत्येक सैनिकाकडून परमेशवराची भेट आणत आहोत. आम्ही सोन्याच्या वस्तू आणत आहोत-बाजूबंद, बांगड्या, आंगठ्या, कुड्या आणि हार. आम्हाला शुद्ध करण्यासाठी या परमेशवराच्या भेटी आहेत.”
51Moses og Præsten Eleazar modtog Guldet af dem, alskens med Kunst virkede Smykker;
51मोशेने सोन्याच्या सर्व वस्तू घेतल्या आणि त्या याजक एलाजारला दिल्या.
52og alt Offerydelsesguldet, som de ydede HERREN, udgjorde 16750 Sekel, hvilket Tusindførerne og Hundredførerne bragte som Gave.
52हजार आणि शंभर सैनिकावरच्या प्रमुखांनी जे सोने परमेश्वरला दिले त्याचे वजन 420 पौंड होते.
53Krigerne havde taget Bytte hver for sig.
53सैनिकांनी त्यांना युद्धात मिळालेल्या इतर वस्तू स्वत:जवळ ठेवल्या.
54Så modtog Moses og Præsten Eleazar Guldet af Tusindførerne og Hundredførerne og bragte det ind i Åbenbaringsteltet, for at det skulde bringe Israelitterne i Minde for HERRENs Åsyn.
54मोशे आणि एलाजार यांनी हजार आणि शंभर सैनिकांवरच्या प्रमुखांकडून सोने घेतले. नंतर त्यांनी ते सोने दर्शन मंडपात ठेवले. ही भेट म्हणजे इस्राएल लोकांनी परमेश्वराला आठवणी खातर दिलेली भेट होती.