1En ik, broeders, kon tot u niet spreken als tot geestelijken, maar als tot vleselijken, als tot jonge kinderen in Christus.
1परंतु बंधूंनो आध्यात्मिक लोक म्हणून मी तुमच्याशी बोलू शकत नव्हतो. त्याऐवजी मला तुमच्याशी देहिक लोकांसारखे आणि ख्रिस्तामधील बालकासारखे बोलावे लागले.
2Ik heb u met melk gevoed, en niet met vaste spijs; want gij vermocht toen nog niet; ja, gij vermoogt ook nu nog niet.
2मी तुम्हांला पिण्यासाठी दूध दिले, जड अन्र दिले नाही. कारण तुम्ही जड अन्र खाऊ शकत नव्हता. व आतासुद्धा तुम्ही खाऊ शकत नाही.
3Want gij zijt nog vleselijk; want dewijl onder u nijd is, en twist, en tweedracht, zijt gij niet vleselijk, en wandelt gij niet naar den mens?
3कारण तुम्ही अजूनसुद्धा दैहिक आहात. कारण तुमच्यात मत्सर व भांडणे चालू आहेत, तर तुम्ही दैहिक नाही काय, व जगातील लोकांसारखे वागत नाही काय?
4Want als de een zegt: Ik ben van Paulus; en een ander: Ik ben van Apollos; zijt gij niet vleselijk?
4कारण जेव्हा काही म्हणतात, “मी पौलाचा आह,” आणि इतर दुसरे म्हणतात, “मी अपुल्लोसाचा आहे,” तेव्हा तुम्ही जगिक लोकांसारखे वागत नाही काय?
5Wie is dan Paulus, en wie is Apollos, anders dan dienaars, door welken gij geloofd hebt, en dat, gelijk de Heere aan een iegelijk gegeven heeft?
5तर मग अपुल्लोस कोण आणि पौल कोण? आम्ही केवळ सेवक आहोत, ज्यांच्याद्वारे तुम्ही विश्वासणारे झाला आणि आम्हा प्रत्येकाला देवाने जे काम नेमून दिले ते काम आम्ही केले.
6Ik heb geplant, Apollos heeft nat gemaakt; maar God heeft den wasdom gegeven.
6मी बी लावले, अपुल्लोसाने त्याला पाणी घातले, पण देवाने त्याची वाढ केली.
7Zo is dan noch hij, die plant, iets, noch hij, die nat maakt, maar God, Die den wasdom geeft.
7म्हणून जो बी पेरतो तो किंवा जो पाणी घालतो तो महत्त्वाचा नाही, तर देव जो त्याची वाढ करतो तो महत्त्वाचा आहे.
8En die plant, en die nat maakt, zijn een; maar een iegelijk zal zijn loon ontvangen naar zijn arbeid.
8जे बी पेरतात व पाणी घालतात ते एक आहेत व प्रत्येकाला त्याच्या फळावर आधारित अशी मजूरी मिळेल
9Want wij zijn Gods medearbeiders; Gods akkerwerk, Gods gebouw zijt gij.
9कारण देवा समवेत आपण सर्वजण कामगार आहोत. तुम्ही देवाचे शेत आहात व देवाची इमारत आहात.
10Naar de genade Gods, die mij gegeven is, heb ik als een wijs bouwmeester het fondament gelegd; en een ander bouwt daarop. Maar een iegelijk zie toe, hoe hij daarop bouwe.
10आणि देवाच्या दानाप्रमाणे जे मला दिले होते त्याप्रमाणे सूज्ञ, कुशल बांधणाऱ्यांप्रमाणे पाया घातला. पण दुसरा कोणी तरी त्यावर बांधतो, परंतु प्रत्येकाने आपण त्यावर कसे बांधतो याविषयी खबरदारी घ्यावी.
11Want niemand kan een ander fondament leggen, dan hetgeen gelegd is, hetwelk is Jezus Christus.
11येशू ख्रिस्त जो पाया आहे त्याच्यावाचून इतर कोणीही दुसरा पाया घालू शकत नाही.
12En indien iemand op dit fondament bouwt: goud, zilver, kostelijke stenen, hout, hooi, stoppelen;
12जर कोणी त्या पायावर सोने, चांदी, मौल्यवान दगड, लाकूड, गवत किंवा पेंढा यांनी बांधतो,
13Eens iegelijks werk zal openbaar worden; want de dag zal het verklaren, dewijl het door vuur ontdekt wordt; en hoedanig eens iegelijks werk is, zal het vuur beproeven.
13तर प्रत्येक व्यक्तीचे काम स्पष्ट दिसून येईल. कारण तो दिवस ते स्पष्ट करील, तो दिवस अग्नीने प्रगट होईल व तोच अग्नि प्रत्येक माणसाचे काम कसे आहे हे ठरविण्यासाठी परीक्षा घेईल.
14Zo iemands werk blijft, dat hij daarop gebouwd heeft, die zal loon ontvangen.
14ज्या कोणाचे बांधकाम, जे त्या पायावर बांधलेले आहे ते टिकेल.
15Zo iemands werk zal verbrand worden, die zal schade lijden; maar zelf zal hij behouden worden, doch alzo als door vuur.
15त्याला बक्षीस मिळेल जर एखाद्याचे काम जळून गेले, तर त्याचे नुकसान होईल, परंतु जेव्हा तो इमारतीला लागलेल्या अग्नीपासून बचावासाठी पळून जाईल तेव्हा तो तारला जाईल.
16Weet gij niet, dat gij Gods tempel zijt, en de Geest Gods in ulieden woont?
16तुम्ही देवाचे मंदिर आहात आणि देवाचा आत्मा तुमच्यामध्ये राहतो हे तुम्हांला माहीत नाही काय?
17Zo iemand den tempel Gods schendt, dien zal God schenden; want de tempel Gods is heilig, welke gij zijt.
17जर कोणी देवाच्या मंदिराचा नाश करतो तर देव त्याचा नाश करील. कारण देवाचे मंदिर पवित्र आहे आणि ते तुम्ही आहात.
18Niemand bedriege zichzelven. Zo iemand onder u dunkt, dat hij wijs is in deze wereld, die worde dwaas, opdat hij wijs moge worden.
18कोणीही स्वत:ला फसवू नये. जर कोणी स्वत:ला या जगाच्या दृष्टिकोणानुसार शहाणा समजत असेल तर त्याने खरोखर ज्ञानी होण्यासाठी “मूर्ख” व्हावे.
19Want de wijsheid dezer wereld is dwaasheid bij God; want er is geschreven: Hij vat de wijzen in hun arglistigheid;
19कारण या जगाचे ज्ञान देवाच्या दृष्टीने मूर्खपणाचे आहे. असे लिहिले आहे, “देव शहाण्यांना हुशारीमध्ये पकडतो.”
20En wederom: De Heere kent de overleggingen der wijzen, dat zij ijdel zijn.
20आणि पुन्हा “देव जाणतो की, शहाण्यांचे विचार निरर्थक आहेत.”
21Niemand dan roeme op mensen; want alles is uwe.
21म्हणून मनुष्यांविषयी कोणीही फुशारकी मारु नये. कारण सर्व गोष्टी तुमच्या आहेत.
22Hetzij Paulus, hetzij Apollos, hetzij Cefas, hetzij de wereld, hetzij leven, hetzij dood, hetzij tegenwoordige, hetzij toekomende dingen, zij zijn alle uwe.
22तर तो पौल, अपुल्लोस, पेत्र, जग, जीवन किंवा मरण असो, वर्तमानकाळाच्या गोष्टी असोत अथवा भविष्यकाळाच्या गोष्टी असोत, सर्व गोष्टी तुमच्या आहेत.
23Doch gij zijt van Christus, en Christus is Gods.
23तुम्ही ख्रिस्तामध्ये आहात आणि ख्रिस्त देवाचा आहे.