1Aangaande nu de dingen, die den afgoden geofferd zijn, wij weten, dat wij allen te zamen kennis hebben. De kennis maakt opgeblazen, maar de liefde sticht.
1आता, मूर्तिंना अर्पण केलेल्या गोष्टीविषयी: आम्हाला माहीत आहे की, “आम्हा सर्वांना ज्ञान आहे.” ज्ञान लोकांना गर्वाने फुगविते. परंतु प्रीति लोकांना बलवान होत जाण्यास मदत करते.
2En zo iemand meent iets te weten, die heeft nog niets gekend, gelijk men behoort te kennen.
2जर एखाद्याला वाटत असेल की, त्याला काही माहीत आहे, तर जसे त्याला कळायला पाहिजे तसे त्याला माहीत नसते.
3Maar zo iemand God liefheeft, die is van Hem gekend.
3पण जर कोणी देवावर प्रीति करतो तर देवाला तो माहीत असतो.
4Aangaande dan het eten der dingen, die den afgoden geofferd zijn, wij weten, dat een afgod niets is in de wereld, en dat er geen ander God is dan een.
4म्हणून मूर्तिला वाहिलेल्या अन्राविषयी आपल्याला माहीत आहे की, “जगामध्ये खरी मूर्तिच नाही.” आणि त्या एकाशिवाय दुसरा देव नाही.
5Want hoewel er ook zijn, die goden genaamd worden, hetzij in den hemel, hetzij op de aarde (gelijk er vele goden en vele heren zijn),
5आणि जरी लोक त्यांना देव म्हणतात, तरी असे अनेक तथाकथित देव आहेत जे स्वर्गात किंवा पृथ्वीवर आहेत (आणि पुष्कळ देव व पुष्कळ प्रभु आहेत)
6Nochtans hebben wij maar een God, den Vader, uit Welken alle dingen zijn, en wij tot Hem; en maar een Heere, Jezus Christus, door Welken alle dingen zijn, en wij door Hem.
6परंतु आमच्यासाठी फक्त एकच देव जो पिता तो आहे. आणि ज्याच्यासाठी आपण जगतो आणि ज्याच्यापासून सर्व गोष्टी येतात आणि फक्त एकच प्रभु येशू ख्रिस्त आहे. ज्याच्याद्वारे सर्व गोष्टी अस्तित्वात येतात व ज्याच्याद्वारे आपण जगतो.
7Doch in allen is de kennis niet; maar sommigen, met een geweten des afgods tot nog toe, eten als iets dat den afgoden geofferd is; en hun geweten, zwak zijnde, wordt bevlekt.
7पण प्रत्येकाला हे ज्ञान नसते. काहींना, ज्यांना आतापर्यंत मूर्तीची उपासना करण्याची सक्य होती ते असे मांस खातात व असा विचार करतात ते मूर्तीला वाहिलेले होते. आणि त्यांची सद्सद्विवेकबुद्धि दुर्बल असल्याने त्यांच्या कृत्यांना डागाळलेली आहे.
8De spijze nu maakt ons Gode niet aangenaam; want hetzij dat wij eten, wij hebben geen overvloed; en hetzij dat wij niet eten, wij hebben geen gebrek.
8परंतु अन्र आपणाला देवाजवळ आणणार नाही. जर आम्ही खाल्ले नाही तर वाईट होणार नाही किंवा खाल्ले तर अधिक चांगले होणार नाही.
9Maar ziet toe, dat deze uw macht niet enigerwijze een aanstoot worde dengenen, die zwak zijn.
9तुमचा हा अधिकार जे दुर्बल आहोत त्यांच्यासाठी अपराध तर नाही याकडे लक्ष द्या.
10Want zo iemand u, die de kennis hebt, ziet in der afgoden tempel aanzitten, zal het geweten deszelven, die zwak is, niet gestijfd worden, om te eten de dingen, die den afgoden geofferd zijn?
10कारण तू जो या गोष्टीचे ज्ञान असलेला त्या तुला दुर्बल बुद्धिच्या कोणी मूर्तिच्या मंदिरात जेवताना पाहिले, तर तो दुर्बल असून त्याची विवेकबुद्धि आत्यंतिक प्रबळ झाल्याने मूर्तीला वाहिलेले मांस खाण्यास त्याला उत्तेजन मिळणार नाही काय?
11En zal de broeder, die zwak is, door uw kennis verloren gaan, om welken Christus gestorven is?
11तो जो दुर्बल आहे, त्या तुझ्या भावासाठी ख्रिस्त मरण पावला त्याचा तुझ्या ज्ञानामुळे नाश होतो.
12Doch gijlieden, alzo tegen de broeders zondigende, en hun zwak geweten kwetsende, zondigt tegen Christus.
12आणि अशा प्रकारे तुझ्या बंधूविरुद्ध पाप करुन आणि त्याच्या दुर्बल विवेकबुध्दीला जखम करुन तुम्ही ख्रिस्ताविरुद्ध पाप करता.
13Daarom, indien de spijs mijn broeder ergert, zo zal ik in eeuwigheid geen vlees eten, opdat ik mijn broeder niet ergere.
13म्हणून अन्र जर माझ्या बंधूना पाप करायला लावते तर मी कधीही मांस खाणार नाही. यासाठी की माझ्या बंधूने पाप करु नये.