1Bestraf een ouden man niet hardelijk, maar vermaan hem als een vader; de jonge als broeders;
1वडील माणसाला कठोरपणे बोलू नको, उलट पित्याप्रमाणे त्याला बोध कर.
2De oude vrouwen als moeders; de jonge als zusters, in alle reinheid.
2तरुणांना भावासारखे, वृद्ध स्त्रियांना आईसारखे, तरुण स्त्रियांना बहिणीसारखे पूर्ण शुद्ध भावाने वागीव.
3Eer de weduwen, die waarlijk weduwen zijn.
3ज्या विधवा खरोखरच निराधार आहेत त्यांची काळजी घे.
4Maar zo enige weduwe kinderen heeft, of kindskinderen, dat die leren eerst aan hun eigen huis godzaligheid oefenen, en den voorouderen wedervergelding te doen; want dat is goed en aangenaam voor God.
4पण जर एखाद्या विधवेला मुले किंवा नातवंडे असतील तर त्यांनी प्रथम आपल्या घरच्यांची काळजी घेऊन आपला धर्म प्रत्यक्षात आणावा आणि अशा प्रकारे आपल्या आईवडिलांची किंवा आजीआजोबांची परतफेड करावी. कारण हे देवाला मान्य आहे.
5Die nu waarlijk weduwe is, en alleen gelaten, die hoopt op God, en blijft in smekingen en gebeden nacht en dag.
5जी स्त्री खरी विधवा आहे, व तिची काळजी घेण्यासाठी कोणी नाही तिची आशा देवावर असते व ती रात्रंदिवस देवाकडे प्रार्थना व विनंत्या करीत असते.
6Maar die haar wellust volgt, die is levende gestorven.
6पण जी विधवा चैनीत राहते, ती जरी जिवंत असेल तरी ती खरोखर मेलेली आहे.
7En beveel dit, opdat zij onberispelijk zijn.
7म्हणून लोकांना याविषयी निक्षन सांग, यासाठी की, कोणालाही त्यांच्याकडे दोष दाखविण्यास वाव राहणार नाही.
8Doch zo iemand de zijnen, en voornamelijk zijn huisgenoten, niet verzorgt, die heeft het geloof verloochend, en is erger dan een ongelovige.
8पण जर कोणी त्याच्या स्वत:च्या नातेवाईकासाठी आणि विशेषत: त्याच्या कुटुंबातील जवळच्यांसाठी तरतूद करीत नाही, तर त्याने विश्वास नाकारलेला आहे. व तो अविश्वासू माणसांपेक्षा वाईट आहे.
9Dat een weduwe gekozen worde niet minder dan van zestig jaren, welke eens mans vrouw geweest zij;
9एखादी विधवा जी कमीत कमी साठ वर्षांची असेल, जिला सोडचिठ्ठी देण्यात आली नाही व जिचे दुसऱ्यांदा लग्र झाले नाही, अशाच स्त्रियांची विधवा म्हणून नोंद घ्यावी.
10Getuigenis hebbende van goede werken: zo zij kinderen opgevoed heeft, zo zij gaarne heeft geherbergd, zo zij der heiligen voeten heeft gewassen, zo zij den verdrukten genoegzame hulp gedaan heeft, zo zij alle goed werk nagetracht heeft.
10चांगले काम करण्याबद्दल तिचा नावलौकिक असेल व तिने मुलाबालांना वाढवल असेल, जिने अनोळखी लोकांचे स्वागत केले असेल, संताचे पाय धुतले असतील, त्रासात असलेल्यांना मदत केली असेल व सर्व चांगले काम करण्यात स्वत:ला वाहून घेतले असेल, तिचा विधवांच्या खास यादीत समावेश करावा.
11Maar neem de jonge weduwen niet aan; want als zij weelderig geworden zijn tegen Christus, zo willen zij huwelijken;
11पण तरुण विधवांची यादीत नोंद करण्याचे टाळावे. कारण जेव्हा त्या ख्रिस्ताला सोडून अविचारी होतात, तेव्हा त्यांना पुन्हा लग्न करावेसे वाटते.
12Hebbende haar oordeel, omdat zij haar eerste geloof hebben te niet gedaan.
12आणि त्या दोषी धरल्या जातील, कारण त्यांनी त्यांचे मूळ वचन मोडलेले असते.
13En meteen ook leren zij ledig omgaan bij de huizen; en zijn niet alleen ledig, maar ook klapachtig, en ijdele dingen doende, sprekende, hetgeen niet betaamt.
13आणखी, त्या आळशी, त्या आळशी बनतात व घरोघरी फिरतात. त्या आळशी बनतात एवढेच नाही तर इतर लोकांच्या भानगडीत स्वत:ला गुरफटून घेतात व इतरांविषयी खोटनाटे बोलतात. ज्या गोष्टी बोलू नयेत, त्या गोष्टी बोलतात.
14Ik wil dan, dat de jonge weduwen huwelijken, kinderen telen, het huis regeren, geen oorzaak van lastering aan de wederpartij geven.
14यासाठी माझी अशी इच्छा आहे की, तरुण स्त्रियांनी (विधवांनी) लग्ने करावीत. मुलांचे संगोपन करावे व आपले घर चालवावे. आपल्या शत्रूला आपली निंदा करण्यास वाव मिळू देऊ नये.
15Want enigen hebben zich alrede afgewend achter den satan.
15मी तर असे म्हणतो कारण काही विधवा सैतानामागे जाण्यासाठी वळल्यादेखील आहेत.
16Zo enig gelovig man, of gelovige vrouw weduwen heeft, dat die haar genoegzame hulp doe, en dat de Gemeente niet bezwaard worde, opdat zij degenen, die waarlijk weduwen zijn, genoegzame hulp doen moge.
16जर एखाद्या विश्वासणाऱ्या स्त्रीच्या घरात विधवा स्त्रिया असतील तर तिनेत्यांची काळजी घ्यावी व मंडळीवर भार टाकू नये. यासाठी की ज्या खरोखरच विधवा आहेत त्यांना ते मदत करु शकतील.
17Dat de ouderlingen, die wel regeren, dubbele eer waardig geacht worden, voornamelijk die arbeiden in het Woord en de leer.
17जे वडील मंडळीची चांगली सेवा करतात त्यांना दुप्पट मान देण्याच्या योग्यतेचे समजावे, विशेषत: जे उपदेश करण्याचे व शिकविण्याचे काम करतात त्यांना.
18Want de Schrift zegt: Een dorsenden os zult gij niet muilbanden; en: De arbeider is zijn loon waardig.
18कारण पवित्र शास्त्र म्हणने, “धान्याची मळणी करताना बैलाला मुसक्या बांधू नको.” आणि मजुरचा त्याच्या मजुरीवर हक्क आहे.”
19Neem tegen een ouderling geen beschuldiging aan, anders dan onder twee of drie getuigen.
19दोन किंवा तीन साक्षीदारांनी पाठिंबा दिल्याशिवाय वडिलावरील आरोप दाखल करु नकोस.
20Bestraf die zondigen in tegenwoordigheid van allen, opdat ook de anderen vreze mogen hebben.
20जे पाप करीत राहतात त्यांचा जाहीरपणे निषेध कर. यासाठी की, इतरांनाही भय वाटावे.
21Ik betuig voor God, en den Heere Jezus Christus, en de uitverkoren engelen, dat gij deze dingen onderhoudt, zonder vooroordeel, niets doende naar toegenegenheid.
21देव, येशू ख्रिस्त व निवडलेले देवदूत यांच्यासमोर मी निक्षून आज्ञा करतो की, तू कोणताही पूर्वग्रह न ठेवता या गोष्टी पाळ व पक्षपाताने काहीही करु नको.
22Leg niemand haastelijk de handen op, en heb geen gemeenschap aan anderer zonden; bewaar uzelven rein.
22देवाच्या सेवेसाठी नियुक्ती करण्याठी कोणावरही घाईने हात न ठेवण्याची सवय कर. इतरांच्या पापांत वाटेकरी होऊ नको. नेहमी स्वत:ला शुद्ध राख.
23Drink niet langer water alleen, maar gebruik een weinig wijn, om uw maag en uw menigvuldige zwakheden.
23नुसतेच पाणी पिण्याचे थांबव आणि तुझ्या पचनासाठी व वारंवारच्या दुखण्यासाठी द्राक्षारसाचा वापर कर.
24Van sommige mensen zijn de zonden te voren openbaar, en gaan voor tot hun veroordeling; en in sommigen ook volgen zij na.
24काही लोकांची पापे स्पष्ट आहेत. व ती त्यांच्याअगोदर न्यायालयात जातात पण दुसऱ्या लोकांची पापे त्यांच्या मागून जातात.
25Desgelijks ook de goede werken zijn te voren openbaar, en daar het anders mede gelegen is, kunnen niet verborgen worden.
25त्याचप्रमाणे, चांगली कामेही स्पष्ट आहेत ती सुध्दा कायमची लपविता येत नाहीत.