1Toen nu Rehabeam te Jeruzalem gekomen was, vergaderde hij het huis van Juda en Benjamin, eenhonderd en tachtig duizend, uitgelezenen, geoefend ten oorlog, om tegen Israel te strijden, opdat hij het koninkrijk weder aan Rehabeam bracht.
1यरुशलेमला आल्यावर रहबामने 1,80,000 उत्तम योध्दे जमवले. यहूदा आणि बन्यामिन या घराण्यांमधून त्याने ही निवड केली. इस्राएलशी युध्द करुन स्वत:कडे राज्य खेचून आणण्यासाठी त्याने ही जमवाजमव केली.
2Doch het woord des HEEREN geschiedde tot Semaja, den man Gods, zeggende:
2पण परमेश्वराचा माणूस शमाया याच्याकडे परमेश्वराचा संदेश आला. परमेश्वर त्याला म्हणाला,
3Zeg tot Rehabeam, den zoon van Salomo, den koning van Juda, en tot het ganse Israel in Juda en Benjamin, zeggende:
3“शमाया, यहूदाचा राजा, शलमनपुत्र रहबाम याच्याशी तू बोल.तसेच यहूदा ?आणि बन्यामिन इथल्या इस्राएल लोकांशीही बोल. त्यांना म्हणावे.
4Zo zegt de HEERE: Gij zult niet optrekken, noch strijden tegen uw broederen; een ieder kere weder tot zijn huis, want deze zaak is van Mij geschied. En zij hoorden de woorden des HEEREN, en zij keerden weder van tegen Jerobeam te trekken.
4परमेश्वराचे म्हणणे असे आहे ‘आपल्या बांधवांशीच लढू नका. प्रत्येकाने घरी जावे. मीच हे सर्व व्हायला कारणीभूत आहे.”‘ तेव्हा राजा रहबाम आणि त्याचे सैन्य यांनी परमेश्वराचा संदेश मानला आणि ते परतले. यराबामवर त्यांनी हल्ला केला नाही.
5Rehabeam nu woonde te Jeruzalem; en hij bouwde steden tot vastigheden in Juda.
5रहबाम यरुशलेममध्ये राहिला. हल्ल्यांचा प्रतिकार करायला सज्ज अशी भक्कम नगरे त्याने यहूदात उभाली.
6Hij bouwde nu Bethlehem, en Etham, en Thekoa,
6बेथलेहेम, एटाम, तकोवा,
7En Beth-Zur, en Socho, en Adullam,
7बेथ - सूर, शोखे, अदुल्लाम,
8En Gath, en Maresa, en Zif,
8गथ, मारेशा, सीफ,
9En Adoraim, en Lachis, en Azeka,
9अदोरइम, लाखीश, अजेका,
10En Zora, en Ajalon, en Hebron; dewelke in Juda en in Benjamin de vaste steden waren.
10सोरा, अयालोन व हेब्रोन या नगरांची डागडुजी केली. यहूदा आणि बन्यामिन मधली ही गावे चांगली भक्काम करण्यात आली.
11En hij sterkte deze vastigheden, en legde oversten daarin, en schatten van spijs, en olie, en wijn;
11नगरे मजबूत झाल्यावर रहबामने त्यांच्यावर नायक नेमले. अन्नसामग्री, तेल, द्राक्षारस यांचा साठा त्याने तेथे केला.
12En in elke stad rondassen en spiesen, en sterkte ze gans zeer; zo was Juda, en Benjamin zijne.
12प्रत्येक नगरात ढाली आणि भाले यांचा पुरवठा करुन गावे अधिकच मजबूत केली. यहूदा आणि बन्यामिन मधील ही नगरे आणि तेथील लोक यांना रहबामने आपल्या नियंत्रणाखाली ठेवले.
13Daartoe de priesteren en de Levieten, die in het ganse Israel waren, stelden zich bij hem uit al hun landpalen.
13समस्त इस्राएलमधील याजक आणि लेवी रहबामशी सहमत होते. ते त्याला येऊन मिळाले.
14Want de Levieten verlieten hun voorsteden en hun bezitting, en kwamen in Juda en in Jeruzalem; want Jerobeam en zijn zonen hadden hen verstoten, van het priesterdom des HEEREN te mogen bedienen.
14लेवींनी आपली शेती आणि शिवारे सोडली आणि ते यहूदा व यरुशलेम येथे आले. परमेश्वराप्रीत्यर्थ याजकाचे काम करायला यराबाम आणि त्याचे मुलगे यांनी लेवींना प्रतिबंध केला म्हणून ते आले.
15En hij had zich priesteren gesteld voor de hoogte, en voor de duivelen, en voor de kalveren, die hij gemaakt had.
15यराबामने बोकड आणि वासरे यांच्या मूर्ती उच्चस्थानी स्थापन केल्या आणि त्यांच्या पूजेसाठी आपले याजक निवडले.
16Na die kwamen ook uit alle stammen van Israel te Jeruzalem, die hun hart begaven, om den HEERE, den God Israels, te zoeken, dat zij den HEERE, den God hunner vaderen, offerande deden.
16इस्राएलच्या सर्व वंशातील जे लोक इस्राएलचा देव परमेश्वर याच्याशी एकनिष्ठ होते ते ही, लेवींनी इस्राएल सोडल्यावर, परमेश्वराला यज्ञार्पणे करण्यासाठी यरुशलेमला आले.
17Alzo sterkten zij het koninkrijk van Juda, en bekrachtigden Rehabeam, den zoon van Salomo, drie jaren; want drie jaren wandelden zij in den weg van David, en Salomo.
17त्यामुळे यहूदाचे राज्य बलकट झाले. त्यांनी शलमोनाचा पुत्र रहबाम याला तीन वर्षे पाठिंबा दिला. या काळात त्यांनी दावीद आणि शलमोन यांच्यासारखेच आचरण ठेवले.
18En Rehabeam nam zich, benevens Mahalath, de dochter van Jerimoth, den zoon van David, ter vrouwe Abihail, de dochter van Eliab, den zoon van Isai,
18रहबामने महलथशी विवाहा केला. तिचे वडील यरीमोथ आणि तिची आई अबीहईल. यरीमोथ हा दावीदाचा मुलगा. अबीहईल अलीयाबची मुलगी आणि अलीयाब हा इशायचा मुलगा.
19Dewelke hem zonen baarde, Jeus, en Semaria, en Zaham.
19महलथापासून रहबामला यऊश, शमऱ्या आणि जाहम हे मुलगे झाले.
20En na haar nam hij Maacha, de dochter van Absalom; deze baarde hem Abia, en Attai, en Ziza, en Selomith.
20मग रहबामने माकाशी विवाह केला. माका ही अबशालोमची नात. माकाला रहबामपासून अबीया, अत्थय, जीजा आणि शलोमीथ ही मुले झाली.
21En Rehabeam had Maacha, Absaloms dochter, liever dan al zijn vrouwen en zijn bijwijven; want hij had achttien vrouwen genomen, en zestig bijwijven; en hij gewon acht en twintig zonen en zestig dochteren.
21रहबामचे आपल्या इतर पत्नी आणि उपपत्नी यांच्यापेक्षा माकावर अधिक प्रेम होते. माका अबशालोमची नात. रहबामला अठरा पत्नी आणि साठ उपपत्नी होत्या. त्याला अठ्ठावीस मुलगे आणि साठ मुली होत्या.
22En Rehabeam stelde Abia, den zoon van Maacha, tot een hoofd, om een overste te zijn onder zijn broederen; want het was om hem koning te maken.
22अबीयाला रहबामने सर्व भावडांमध्ये अग्रक्रम दिला. कारण त्याला राजा करावे असा त्याचा मानस होता.
23En hij handelde verstandelijk, dat hij van al zijn zonen, door alle landen van Juda en Benjamin, in alle vaste steden verspreidde, denwelken hij spijze gaf in overvloed; en hij begeerde de veelheid van vrouwen.
23रहबामने मोठ्या चतुराईने आपल्या सर्व मुलांना यहूदा आणि बन्यामिनमधील नगरांमध्ये विखरुन ठेवले. त्यांना उत्तम रसद पुरवली. त्यांची लगे लावून दिली.