1Daarna zeide de HEERE tot Mozes: Ga in tot Farao, en zeg tot hem: Zo zegt de HEERE: Laat Mijn volk trekken, dat zij Mij dienen.
1मग परमेश्वराने मोशेला सांगितले, “जा आणि फारोला सांग, परमेश्वर म्हणतो, ‘माझ्या लोकांना माझी उपासना करण्याकारिता जाऊ दे!
2En indien gij het weigert te laten trekken, zie, zo zal Ik uw ganse landpale met vorsen slaan;
2जर तू माझ्या लोकांना जाऊ दिले नाहीस तर मी सारा देश बेडकांनी भरून टाकीन व सगळया देशाला पीडीन.
3Dat de rivier van vorsen zal krielen, die zullen opkomen, en in uw huis komen, en in uw slaapkamer, ja, op uw bed; ook in de huizen uwer knechten, en op uw volk, en in uw bakovens, en in uw baktroggen.
3नाईल नदीत बेडकांचा सुळसुळाट होईल. बेडूक नदीतून तुझ्या वाड्यात झोपण्याच्या खोलीत. बिछान्यात तसेच तुझ्या सेवकांच्या व अधिकाऱ्यांच्या घरात, भट्ट्यात पाण्यांच्या भांड्यात येतील.
4En de vorsen zullen opkomen, op u, en op uw volk, en op al uw knechten.
4ते तुझ्या, तुझ्या सेवकांच्या व लोकांच्या अंगावर चढतील.”‘
5Verder zeide de HEERE tot Mozes: Zeg tot Aaron: Strek uw hand uit met uw staf, over de stromen, en over de rivieren, en over de poelen; en doe vorsen opkomen over Egypteland.
5मग परमेश्वर मोशेला म्हणाला, “अहरोनाला त्याच्या हातातील काठी नद्या, नाले तलाव यांच्यावर उगारण्यास सांग म्हणजे मग बेडूक मिसर देशावर चढून येतील.”
6En Aaron strekte zijn hand uit over de wateren van Egypte, en er kwamen vorsen op en bedekten Egypteland.
6मग अहरोनाने मिसरमधील जलाशयांवर आपला हात उगारला तेव्हा बेडूक बाहेर आले आणि त्यांनी अवघा मिसर देश व्यापून टाकला.
7Toen deden de tovenaars ook alzo, met hun bezweringen; en zij deden vorsen over Egypteland opkomen.
7तेव्हा जादूगारांनी मंत्रतंत्राच्या योगे तसेच केले आणि मिसर देशावर आणखी बेडूक आणले.
8En Farao riep Mozes en Aaron, en zeide: Bidt vuriglijk tot den HEERE, dat Hij de vorsen van mij en van mijn volk wegneme; zo zal ik het volk trekken laten, dat zij den HEERE offeren.
8मग फारोने मोशे व अहरोन यांना बोलावून आणले. फारो त्यांना म्हणाला, “हे बेडूक माझ्यापासून, व माझ्या लोकांपासून दूर करण्याकरिता तुमच्या परमेश्वरालाविनंति करा मग तुमच्या परमेश्वराची उपासना करण्याकरिता मी तुम्हा लोकांना जाऊ देईन.”
9Doch Mozes zeide tot Farao: Heb de eer boven mij! Tegen wanneer zal ik voor u, en voor uw knechten, en voor uw volk, vuriglijk bidden, om deze vorsen van u en van uw huizen te verdelgen, dat zij alleen in de rivier overblijven?
9मोशे फारोला म्हणाला, “हे बेडूक केव्हा दूर करावेत अशी तुमची इच्छा आहे ते मला सांगा. मी तुमच्यासाठी, तुमच्या लोकांसाठी व तुमच्या सेवकांसाठी प्रार्थना करीन. मग बेडूक तुम्हापासून व तुमच्या घरातून दूर होतील आणि फक्त नदीत राहतील.”
10Hij dan zeide: Tegen morgen. En hij zeide: Het zij naar uw woord, opdat gij weet, dat er niemand is, gelijk de HEERE, onze God.
10फारोने उत्तर दिले, “उद्या.” तेव्हा मोशे म्हणाला, “तुमच्या म्हणण्याप्रमाणे होईल अशा प्रकारे तुम्हाला समजेल की आमच्या परमेश्वरासारखा दुसरा देव नाही.
11Zo zullen de vorsen van u, en van uw huizen, en van uw knechten, en van uw volk wijken; zij zullen alleen in de rivier overblijven.
11बेडूक तुम्हापासून तुमच्या घरातून, तुमचे सेवक व तुमचे लोक याच्यापासून निघून जातील; ते फक्त नदीत राहतील.”
12Toen ging Mozes en Aaron uit van Farao; en Mozes riep tot den HEERE, ter oorzake der vorsen, die Hij Farao had opgelegd.
12मग मोशे व अहरोन फारोपासून निघून गेले आणि फारोवर बेडूक आणले होते त्याविषयी मोशेने परमेश्वराला प्रार्थना केली.
13En de HEERE deed naar het woord van Mozes; en de vorsen stierven, uit de huizen, uit de voorzalen, en uit de velden.
13मग परमेश्वराने मोशेच्या विनंतीप्रमाणे केले. तेव्हा घरादारात, अंगणात व शेतात होते ते सर्व बेडूक मेले.
14En zij vergaderden ze samen bij hopen, en het land stonk.
14ते सडूलागले आणि त्यामुळे सर्व देशात घाण वास येऊ लागला.
15Toen nu Farao zag, dat er verademing was, verzwaarde hij zijn hart, dat hij naar hen niet hoorde, gelijk als de HEERE gesproken had.
15बेडकांची पीडा दूर झाली हे फारोने पाहिले आणि त्याचे मन पुन्हा कठीण झाले. त्याने मोशे व अहरोन यांनी विचारल्याप्रमाणे केले नाही. परमेश्वराने सांगितल्याप्रमाणेच हे झाले.
16Verder zeide de HEERE tot Mozes: Zeg tot Aaron: Strek uw staf uit, en sla het stof der aarde, dat het tot luizen worde, in het ganse Egypteland.
16मग परमेश्वर मोशेला म्हणाला, “अहरोनाला त्याची काठी जमिनीवरील धुळीवर मारण्यास सांग म्हणजे मग अवघ्या मिसर देशभर धुळीच्या उवा बनतील.”
17En zij deden alzo; want Aaron strekte zijn hand uit met zijn staf, en sloeg het stof der aarde, en er werden vele luizen aan de mensen, en aan het vee; al het stof der aarde werd luizen, in het ganse Egypteland.
17त्यांने तसे केले. अहरोनाने आपल्या हातातली काठी जमिनीवरील धुळीवर मारली, आणि त्यामुळे सगव्व्या मिसर देशात धुळीच्या उवा बनल्या; त्या पशूवर व माणसांवर चढल्या.
18De tovenaars deden ook alzo met hun bezweringen, opdat zij luizen voortbrachten; doch zij konden niet; zo waren de luizen aan de mensen, en aan het vee.
18जादुगारांनी त्यांच्या मंत्रतत्रांच्या जोरावर तसेच करण्याचा प्रयत्न केला परंतु धुळीतून त्यांना उवा बनविता आल्या नाहीत; त्या उवा पशूवर व लोकांच्या अंगावर राहिल्या.
19Toen zeiden de tovenaars tot Farao: Dit is Gods vinger! Doch Farao's hart verstijfde, zodat hij naar hen niet hoorde, gelijk de HEERE gesproken had.
19तेव्हा जादुगारांनी फारोला सांगितले की हा चमत्कार देवाच्या सामर्थ्यानेच झाला आहे. परंतु फारोने मन कठीण केले व त्यांचे म्हणणे ऐकायचे नाकारले आणि परमेश्वराने सांगितल्याप्रमाणेच हे झाले.
20Verder zeide de HEERE tot Mozes: Maak u morgen vroeg op, en stel u voor Farao's aangezicht; zie, hij zal aan het water uitgaan, en zeg tot hem: Zo zegt de HEERE: Laat Mijn volk trekken, dat zij Mij dienen;
20मग परमेश्वर मोशेला म्हणाला, “सकाळी लवकर ऊठ; आणि फारो नदीवर जाईल तेव्हा त्याच्याकडे जा. त्याला असे सांग की परमेश्वर म्हणतो, ‘माझी उपासना करण्यासाठी माझ्या लोकांना जाऊ दे!
21Want zo gij Mijn volk niet laat trekken, zie, zo zal Ik een vermenging van ongedierte zenden op u, en op uw knechten, en op uw volk, en in uw huizen; alzo dat de huizen der Egyptenaren met deze vermenging zullen vervuld worden, en ook het aardrijk, waarop zij zijn.
21जर तू त्यांना जाऊ देणार नाहीस तर मग तुझ्या घरात, तुझ्यावर, तुझ्या सेवकांवर गोमाशा येतील. अवघ्या मिसर देशातील घरे गोमाशांच्या थव्यांनी भरून जातील. गोमाशांचे थवे अंगणात व जमिनीवरही येतील.
22En Ik zal te dien dage het land Gosen, waarin Mijn volk woont, afzonderen, dat daar geen vermenging van ongedierte zij, opdat gij weet, dat Ik, de HEERE, in het midden dezes lands ben.
22परंतु मी इस्राएल लोकांशी मिसरच्या लोकांप्रमाणे वागणार नाही. तर ज्या गोशेन प्रातांत माझे लोक राहतात तेथे एकही गोमाशी असणार नाही. अशा प्रकारे तुम्हाला समजेल की मी परमेश्वर या पृथ्वीवर आहे.
23En Ik zal een verlossing zetten tussen Mijn volk en tussen uw volk; tegen morgen zal dit teken geschieden!
23तेव्हा उद्या माझ्या लोकांशी वागताना आणि तुमच्या लोकांशी वागताना मी भेद करीन आणि तोच माझा पुरावा असेन.”‘
24En de HEERE deed alzo; en er kwam een zware vermenging van ongedierte in het huis van Farao, en in de huizen van zijn knechten, en over het ganse Egypteland; het land werd verdorven van deze vermenging.
24अशा रीतीने परमेश्वराने जे सांगितले होते त्याप्रमाणे त्याने केले. मिसर देशात गोमाशांचे थवेच्या थवे आले. ते फारोच्या वाड्यात व त्याच्या सेवकांच्या घरात शिरले; ते सगव्व्या देशात पसरले. गोमाशाच्या त्या थव्यांनी देशाची नासाडी केली.
25Toen riep Farao Mozes en Aaron, en zeide: Gaat heen, en offert uwen God in dit land.
25म्हणून मग फारोने मोशे व अहरोन यांना बोलावून आणले व त्यांना सांगितले, “तुम्ही तुमच्या देवाला आमच्या येथेच म्हणजे आमच्या देशातच यज्ञ करा.”
26Mozes dan zeide: Het is niet recht, dat men alzo doe; want wij zouden der Egyptenaren gruwel den HEERE, onzen God, mogen offeren; zie, indien wij der Egyptenaren gruwel voor hun ogen offerden, zouden zij ons niet stenigen?
26परंतु मोशे म्हणाला, “तसे करणे योग्य होणार नाही कारण आमचा देव परमेश्वर ह्याला आम्ही जो यज्ञ करणार आहो तो यज्ञ तुम्हा मिसरच्या लोकांच्या दृष्टिने किळसवाणा असेल त्यामुळे आम्ही तो मिसरच्या लोकांसमोर केला तर ते आम्हावर दगडफेक करतील व आम्हाला मारून टाकतील.
27Laat ons den weg van drie dagen in de woestijn gaan, dat wij den HEERE onzen God offeren, gelijk Hij tot ons zeggen zal.
27तर आम्हास रानात तीन दिवसांच्या वाटेवर जाऊ द्या. व आमचा देव परमेश्वर ह्याला यज्ञ करू द्या. आमचा देव परमेश्वर ह्याने आम्हाला हे करावयास सांगितले आहे.”
28Toen zeide Farao: Ik zal u trekken laten, dat gijlieden den HEERE, uwen God, offert in de woestijn; alleen, dat gijlieden in het gaan geenszins te verre trekt! Bidt vuriglijk voor mij.
28तेव्हा फारो म्हणाला, “मी तुम्हाला तुमचा देव परमेश्वर ह्याला यज्ञ करण्याकरिता रानात जाऊ देतो परंतु तीन दिवसांच्या प्रवासापेक्षा जास्त पुढे जायचे नाही; तेव्हा आता जा व माझ्यासाठीही प्रार्थना करा.”
29Mozes nu zeide: Zie, ik ga van u, en zal tot den HEERE vuriglijk bidden, dat deze vermenging van ongedierte van Farao, van zijn knechten, en van zijn volk morgen wegwijke! Alleen, dat Farao niet meer bedriegelijk handele, dit volk niet latende gaan, om den HEERE te offeren.
29मोशे म्हणाला, “पाहा, मी जातो आणि तुझ्यापासून, तुझे लोक व सेवक या सर्वापासून उद्या गोमाशा दूर करण्याकरिता परमेश्वराला विंनती करतो परंतु यज्ञकरण्यास जाणाऱ्या आमच्या लोकांना तुम्ही अडवू नये.”
30Toen ging Mozes uit van Farao, en bad vuriglijk tot den HEERE.
30तेव्हा मोशे फारोपासून निघून गेला आणि त्याने परमेश्वराची प्रार्थना केली.
31En de HEERE deed naar het woord van Mozes, en de vermenging van ongedierte week van Farao, van zijn knechten, en van zijn volk; er bleef niet een over.
31आणि परमेश्वराने मोशेची विनंती मान्य केली व त्याने फारो. त्याचे सेवक व त्याचे लोक यांच्यापासून सर्व गोमाशा दूर केल्या. तेथे एकही गोमाशी राहिली नाही.
32Doch Farao verzwaarde zijn hart ook op ditmaal, en hij liet het volk niet trekken.
32परंतु फारो पुन्हा हट्टी व कठोर बनला आणि त्याने इस्राएली लोकाना जाऊ दिले नाही.