Dutch Staten Vertaling

Marathi

Hosea

13

1Als Efraim sprak, zo beefde men, hij heeft zich verheven in Israel; maar hij is schuldig geworden aan den Baal en is gestorven.
1इस्राएलमध्ये एफ्राईमने स्वत:चे महत्व वाढविले तो बोलत असे व लोक भीतीने थरथर कापत. पण एफ्राईमने पाप केले त्याने बआल देवताला पूजणे सुरु केले.
2En nu zijn zij voortgevaren te zondigen, en hebben zich van hun zilver een gegoten beeld gemaakt, afgoden naar hun verstand, die altemaal smedenwerk zijn; waarvan zij nochtans zeggen: De mensen, die offeren, zullen de kalveren kussen.
2ते इस्राएली अधिकच पाप करतात. ते स्वत:साठी मूर्ती तयार करतात. कारागिर चमत्कतिपूर्ण चांदीच्या मूर्ती घडवितात व ते लोक त्या मूर्तीशी बोलतात. ते त्या मूर्तीपुढे बळी देतात. सोन्याच्या वासरांचे ते चुंबन घेतात.
3Daarom zullen zij zijn als een morgenwolk, en als een vroegkomende dauw, die henengaat; als kaf van den dorsvloer, en als rook uit den schoorsteen wordt weggestormd.
3ह्याच कारणामुळे ते लोक लवकरच अदृश्य होतील. सकाळच्या धुक्याप्रमाणे त्यांची स्थिती होईल. सकाळी धुके थोड्यावेळ दिसते. व लगेच नाहीस होते. इस्राएलींची दशा खळ्यातून उडणाऱ्या फोलकटाप्रमाणे होईल. धुराड्यातून निघणारा धूर काही क्षणातच दिसेनासा होतो, तसे त्याचे होईल.
4Ik ben toch de HEERE, uw God, van Egypteland af; daarom zoudt gij geen God kennen dan Mij alleen, want er is geen Heiland dan Ik.
4“तुम्ही मिसर देशात असल्यापासून मी परमेश्वर तुमचा परमेश्वर आहे माझ्याशिवाय दुसरा देव तुम्हाला माहीत नव्हता. ज्याने तुम्हाला वाचविले तो मीच.
5Ik heb u gekend in de woestijn, in een zeer heet land.
5वाळवंटात, त्या रूक्ष प्रदेशात, मी तुम्हाला ओळखले.
6Daarna zijn zij, naardat hunlieder weide was, zat geworden; als zij zat zijn geworden, heeft zich hun hart verheven; daarom hebben zij Mij vergeten.
6मी इस्राएल लोकांना अन्न दिले. त्यांनी ते खाल्ले व ते संतुष्ट झाले,तृप्त झाले. ते गर्विष्ठ झाले आणि ते मलाच विसरले.
7Dies werd Ik hun als een felle leeuw; als een luipaard loerde Ik op den weg.
7“म्हणूनच मी त्यांच्याशी सिंहासारखा वागेन. रस्त्यावर दबा धरून बसलेल्या चित्याप्रमाणे मी होईन.
8Ik ontmoette hen als een beer, die van jongen beroofd is, en scheurde het slot huns harten; en Ik verslond ze aldaar als een oude leeuw; het wild gedierte des velds verscheurde hen.
8जिची पिल्ले तिच्यापासून हिरावून घेतली गेली आहेत अशी अस्वलाची मादी जसा हल्ला करील, तसाच मीही त्याच्यावर तुटून पडेन. मी त्यांच्यावर चढाई करीन. मी त्यांच्या छाती फाडीन. सिंह किंवा इतर हिस्र पशू आपली शिकार जशा फाडून खातात तसेच मी करीन.”
9Het heeft u bedorven, o Israel! want in Mij is uw hulp.
9“इस्राएल, मी तुला मदत केली. पण तू माझ्याविरुध्द गेलास म्हणून आता मी तुझा नाश करीन.
10Waar is uw koning nu? Dat hij u behoude in al uw steden! En uw richters, waar gij van zeidet: Geef mij een koning en vorsten?
10तुझा राजा कोठे आहे? तुझ्या सर्व नगरांत तो तुला वाचवू शकत नाही. तुझे न्यायाधीश कोठे आहेत? ‘मला राजा व नेते दे’ अशी विनवणी तू केली होतीस.
11Ik gaf u een koning in Mijn toorn en nam hem weg in Mijn verbolgenheid.
11मी रागावलो आणि तुला राजा दिला. माझा क्रोध अधिक भडकताच, मी तुझा राजा काढून घेतला.
12Efraims ongerechtigheid is samengebonden, zijn zonde is opgelegd.
12“एफ्राईमने आपला अपराध लपविण्याचा प्रयत्न केला. त्याचे पाप म्हणजे गुप्त गोष्ट हे असे त्याला वाटले पण त्याच्या पापाची शिक्षा त्याला मिळेल.
13Smarten ener barende vrouw zullen hem aankomen; hij is een onwijs kind; want anders zou hij geen tijd in de kindergeboorte blijven staan.
13त्याची शिक्षा प्रसूतिवेदनांप्रमाणे असेल. तो सुज्ञ मुलगा नसेल त्याची जन्मवेळ येईल, तेव्हा तो वाचणार नाही.
14Doch Ik zal hen van het geweld der hel verlossen, Ik zal ze vrijmaken van den dood: o dood! waar zijn uw pestilentien? hel! waar is uw verderf? Berouw zal van Mijn ogen verborgen zijn,
14“मी त्यांना थडग्यापासून वाचवीन मी त्यांचा मृत्यूपासून बचाव करीन. मरणा, तुझी रोगराई कोठे आहे? थडग्या, तुझी शक्ती कोठे गेली? मला सूड घ्यायचा नाही.
15Want hij zal vrucht voortbrengen onder de broederen; doch er zal een oostenwind komen, een wind des HEEREN, opkomende uit de woestijn; en zijn springader zal uitdrogen, diezelve zal den schat van alle gewenste huisraad roven.
15इस्राएल त्यांच्या भावांत वाढतो आहे. पण पूर्वेकडून जोराचा वारा येईल. परमेश्वराचा वारा वाळवंटाकडून वाहील. मग इस्राएलची विहीर आटून जाईल. त्याचा झरा कोरडा पडेल. वारा इस्राएलच्या खजिन्यातील प्रत्येक मौल्यवान वस्तू काढून घेईल.
16
16शोमरोनला शिक्षा झालीच पाहिजे, का? कारण तिने परमेश्वराकडे पाठ फिरविली. इस्राएली तलवारीला बळी पडतील. त्यांच्या मुलांची खांडोळी केली जाईल. त्यांच्या गर्भवती स्त्रियांना फाडून टाकले जाईल.”