1De last van Tyrus. Huilt, gij schepen van Tarsis! want zij is verwoest, dat er geen huis meer is, dat niemand er meer ingaat; uit het land Chittim is het aan hen openbaar geworden.
1सोरविषयी शोक संदेश तार्शीशच्या गलबतावरील प्रवाशांनो, तुमची गलबते जेथे लागतात ते बंदर उध्वस्त झाले आहे तेव्हा शोक करा. (कित्तीहून परतणाऱ्या गलबतांवरील प्रवाशांना ही बातमी सांगितली गेली.)
2Zwijgt, gij inwoners des eilands! gij, die de kooplieden van Sidon, over zee varende, vervulden,
2समुद्रकाठी राहणाऱ्या लोकांनो, दु:खाने स्तब्ध व्हा. सोर हे “सीदोनचे व्यापारी केंद्र आहे.” तेथील व्यापारी समुद्रपार जाऊन व्यापार करतात आणि धनदौलत आणतात.
3En wiens inkomst was het zaad van Sichor over de grote wateren, de oogst der rivier; en zij was de markt der heidenen.
3ते समुद्रमार्गे जाऊन धान्याचा शोध घेतात. नाईल नदीच्या तीरावर पिकलेले धान्य ते विकत घेतात आणि इतर राष्ट्रांत विकतात.
4Word beschaamd, o Sidon! want de zee spreekt, ja, de sterkte der zee, zeggende: Ik heb geen barensnood gehad, ik heb ook niet gebaard, en ik heb geen jongelingen groot gemaakt, en geen jonge dochters opgebracht.
4सीदोन, तू खरे म्हणजे जास्त खिन्न व्हायला पाहिजेस. का? कारण आता समुद्र व समुद्रातील किल्ला म्हणजे सोर म्हणतात, “मला मुले नाहीत. मी प्रसूतिवेदना अनुभवल्या नाहीत. मी मुलांना जन्म दिला नाही. मी मुलांना वाढवले नाही.”
5Gelijk als geweest is de tijding van Egypte, zal men ook in weedom zijn, als men van Tyrus horen zal.
5मिसरला सोरची वार्ता कळेल. ह्या वार्तेने मिसरला धक्का बसेल दु:ख होईल.
6Vaart over naar Tarsis, huilt, gij inwoners des eilands!
6गलबतांनो, तुम्ही तार्शीशला माघारी जाणे बरे! समुद्रकाठी राहणाऱ्या लोकांनी खिन्न व्हायला पाहिजे.
7Is dit uw vrolijk huppelende stad? welker oudheid wel van oude dagen af is; maar haar eigen voeten zullen haar verre wegdragen, om in vreemdelingschap te verkeren.
7पूर्वी तुम्ही सोरमध्ये मजा केली. आरंभापासून त्या शहराची वाढ होत आहे. त्या शहरवासीयांनी उपजीविकेसाठी दूरवर प्रवास केला आहे.
8Wie heeft dit beraadslaagd over Tyrus, die kronende stad, welker kooplieden vorsten zijn, welker handelaars de heerlijkste in het land zijn?
8सोर शहराने पुष्कळ नेते दिले. तेथील व्यापारी म्हणजे जणूराजपुत्रच. व्यापाऱ्यांना सगळीकडे मान मिळतो. मग सोरविरूध्द कट कोणी रचला?
9De HEERE der heirscharen heeft het beraadslaagd, opdat Hij ontheilige de hovaardij van alle sieraad, om al de heerlijksten der aarde verachtelijk te maken.
9ही सर्वशक्तिमान परमेश्वराचीच करणी होती. त्याने सोरचे महत्व कमी करायचे ठरविले.
10Ga door naar uw land, als een rivier, gij dochter van Tarsis! er is geen gordel meer.
10तार्शीशच्या गलबतांनो, तुम्ही स्वदेशी परत जाणे योग्य. लहान नदी जशी पार करतात, तसा समुद्र पार करा. तुम्हाला आता कोणीही अडवणार नाही.
11Hij heeft Zijn hand uitgestrekt over de zee, Hij heeft de koninkrijken beroerd; de HEERE heeft bevel gegeven tegen Kanaan, om haar sterkten te verdelgen.
11परमेश्वराने आपला हात समुद्रापर्यंत पसरला आहे. सोरविरूध्द लढण्यासाठी तो राज्यांना गोळा करीत आहे. त्याने, तार्शीशचे सुरक्षित ठिकाण सोर नष्ट करण्याची कनानला आज्ञा दिली आहे.
12En Hij heeft gezegd: Gij zult niet meer vrolijk huppelen, o gij verdrukte maagd, gij dochter van Sidon! Naar Chittim toe, maak u op, vaar over; ook zult gij aldaar geen rust hebben.
12परमेश्वर म्हणतो, “सीदोनच्या कुमारिके, तुझा नाश होईल. तू पुन्हा आनंदित होणार नाहीस.” पण सोरचे रहिवासी म्हणतात, “सायप्रस आम्हाला मदत करील.” पण जरी तुम्ही समुद्र पार करून सायप्रसला गेलात, तरी तुम्हाला तेथे आराम करायला जागा मिळणार नाही.
13Ziet, het land der Chaldeen; dit volk was er niet; Assur heeft het gefondeerd voor degenen, die in de wildernissen woonden; zij richtten hun sterkten op, en bouwden hun paleizen, maar Hij heeft het tot een vervallen hoop gesteld.
13मग सोर लोक म्हणतात, “बाबेलोनमधील लोक आम्हाला मदत करतील.” पण खास्द्यांच्या भूमीकडे (बाबेलोनकडे) पाहा. बाबेलोन आता देश राहिलेला नाही. अश्शूरने बाबेलोनवर हल्ला केला आणि त्याच्या भोवती युध्दस्तंभ उभारले. सुंदर घरातील सर्व चीजवस्तू सैनिकांनी लुटल्या. अश्शूरांनी बाबेलोनला जंगली जनावरांना राहण्यायोग्य बनविले. त्यांनी बाबेलोनला पूर्णपणे उजाड केले.
14Huilt, gij schepen van Tarsis! want ulieder sterkte is verstoord.
14तार्शीशच्या गलबतांनो, तुमचे सुरक्षिततेचे ठिकाण-सोर-हे नष्ट केले जाणार आहे म्हणून तुम्ही शोक करा.
15En het zal geschieden te dien dage, dat Tyrus zal vergeten worden zeventig jaren, gelijk eens konings dagen; maar ten einde van zeventig jaren zal in Tyrus als een hoerenlied zijn:
15सत्तर वर्षे सोर शहराला लोक विसरून जातील. (हा एका राज्याच्या कारकिर्दी इतका कालखंड आहे.) सत्तर वर्षांनंतर सोरची स्थिती पुढील गाण्यातील वेश्येसारखी असेल.
16Neem de harp, ga in de stad rondom, gij vergeten hoer! speel wel, zing veel liederen, opdat uwer gedacht worde!
16पुरूषांच्या विस्मरणात गेलेल्या वारांगने, तुझी सारंगी उचल आणि शहरातील रस्त्यातून फीर. सारंगीवर सुरेल गाणे वाजव. तुझे गाणे पुन्हा पुन्हा म्हण. म्हणजे लोकांना तुझी आठवण होईल.
17Want het zal geschieden ten einde van zeventig jaren, dat de HEERE Tyrus zal bezoeken, en dat zij wederkeren zal tot haar hoerenloon, en zij zal hoererij bedrijven met alle koninkrijken der aarde, die op den aardbodem zijn.
17सत्तर वर्षांनंतर परमेश्वर सोरबद्दल फेरविचार करील. आणि आपला निर्णय देईल. तेथे परत व्यापार सुरू होईल. ती पृथ्वीवरील सर्व देशांची वारांगना होईल.
18En haar koophandel en haar hoerenloon zal den HEERE heilig zijn, het zal niet ten schat vergaderd noch opgesloten worden; maar haar koophandel zal wezen voor hen, die voor den HEERE wonen, opdat zij eten tot verzadiging, en dat zij durig deksel hebben.
18पण तिने मिळविलेला पैसा ती जवळ ठेवणार नाही. व्यापारात तिला झालेला फायदा परमेश्वरासाठी राखून ठेवला जाईल. तो फायदा, ती परमेश्वराची सेवा करणाऱ्यांना देईल. मग परमेश्वराची सेवा करणाऱ्यांना पोटभर अन्न मिळेल. ते चांगले कपडे घालतील.