Dutch Staten Vertaling

Marathi

Isaiah

66

1Alzo zegt de HEERE: De hemel is Mijn troon, en de aarde is de voetbank Mijner voeten; waar zou dat huis zijn, dat gijlieden Mij zoudt bouwen, en waar is de plaats Mijner rust?
1देव असे म्हणाला, “आकाश माझे सिंहासन आहे आणि पृथ्वी हे माझे पाय ठेवण्याचे आसन आहे. मग तुम्ही माझ्यासाठी घर बांधू शकाल असे तुम्हाला वाटते का? नाही. तुम्हाला ते शक्य नाही. तुम्ही मला विश्रांतीसाठी जागा देऊ शकाल का? नाही. तुम्ही जागा देऊ शकणार नाही.
2Want Mijn hand heeft al deze dingen gemaakt, en al deze dingen zijn geweest, spreekt de HEERE; maar op dezen zal Ik zien, op den arme en verslagene van geest, en die voor Mijn woord beeft.
2मी स्वत:च सर्व गोष्टी निर्माण केल्या. मी घडविल्या म्हणून या सर्व गोष्टी येथे आहेत.” परमेश्वर असे म्हणाला, “मला सांगा, मी कोणत्या लोकांची काळजी घेतो? मी गरीब आणि नम्र लोकांची काळजी घेतो. हे लोक फार दु:खी आहेत. माझ्या शब्दांचे पालन करणाऱ्या लोकांची मी काळजी घेतो.
3Wie een os slacht, slaat een man; wie een lam offert, breekt een hond den hals; wie spijsoffer offert, is als die zwijnenbloed offert; wie wierook brandt ten gedenkoffer, is als die een afgod zegent. Dezen verkiezen ook hun wegen, en hun ziel heeft lust aan hun verfoeiselen.
3काही लोक बैलांना मारून होमार्पण देतात, पण ते लोकांनाही चोपतात ते लोक होमार्पण अर्पण करण्यासाठी मेंढ्या मारतात पण ते कुत्र्यांच्याही माना मुरगळतात. ते डुकराचे रक्त मला अर्पण करतात. ते लोक आठवणीने धूप जाळतात, पण ते त्यांच्या शून्य किंमतीच्या मूर्तीवरही प्रेम करतात. ते लोक त्यांचे स्वत:चे मार्ग निवडतात. माझे मार्ग निवडत नाहीत. ते त्यांच्या भयानक मूर्तीवर प्रेम करतात.
4Ik zal ook verkiezen het loon hunner handelingen, en hun vreze zal Ik over hen doen komen, omdat Ik geroepen heb, en niemand antwoordde, Ik gesproken heb, en zij niet hoorden, maar deden dat kwaad is in Mijn ogen, en verkoren hetgeen waartoe Ik geen lust had.
4म्हणून मी त्यांच्याच युक्त्या वापरायचे ठरविले आहे. ह्याचाच अर्थ ते ज्या गोष्टींना फार भितात, त्या वापरून मी त्यांना शिक्षा करीन. मी त्या लोकांना बोलाविले पण त्यांनी ऐकले नाही. मी त्यांच्याशी बोललो, पण त्यांना ते ऐकू आले नाही म्हणून मी त्यांच्यासाठी तीच गोष्टी करीन. मी ज्यांना पापे म्हटले, त्या गोष्टी त्यांनी केल्या. मला न आवडणाऱ्या गोष्टी त्यांनी निवडल्या.”
5Hoort des HEEREN woord, gij, die voor Zijn woord beeft! Uw broeders, die u haten, die u verre afzonderen, om Mijns Naams wil, zeggen: Dat de HEERE heerlijk worde! Doch Hij zal verschijnen tot ulieder vreugde, zij daarentegen zullen beschaamd worden.
5परमेश्वराच्या आज्ञा पाळणाऱ्या लोकहो तुम्ही परमेश्वर ज्या गोष्टी सांगतो त्या ऐकाव्या. “तुमच्या भावांनी तुमचा तिरस्कार केला. ते तुमच्याविरूध्द गेले, कारण तुम्ही मला अनुसरलात. तुमचे भाऊ म्हणाले, ‘परमेश्वराचा सन्मान केला गेल्यावर आम्ही परत तुमच्याकडे येऊ. मग आम्हाला तुमच्याबरोबर राहण्यात आनंद होईल.’त्या वाईट लोकांना शिक्षा केली जाईल.”
6Er zal een stem van een groot rumoer uit de stad zijn, een stem uit den tempel, de stem des HEEREN, Die Zijn vijanden de verdiensten vergeldt.
6ऐका! नगरातून आणि मंदिरातून मोठा आवाज येत आहे. परमेश्वर शत्रूला शिक्षा करीत असल्याचा तो आवाज आहे. त्यांना योग्य शिक्षा देव करीत आहे.
7Eer zij barensnood had, heeft zij gebaard, eer haar smart overkwam, zo is zij van een knechtje verlost.
7[This verse may not be a part of this translation]
8Wie heeft ooit zulks gehoord? Wie heeft dergelijks gezien? Zou een land kunnen geboren worden op een enigen dag? Zou een volk kunnen geboren worden op een enige reize? Maar Sion heeft weeen gekregen, en zij heeft haar zonen gebaard.
8[This verse may not be a part of this translation]
9Zou Ik de baarmoeder openbreken, en niet genereren? zegt de HEERE; zou Ik, Die genereer, voortaan toesluiten? zegt uw God.
9त्याचप्रमाणे मी सुध्दा नवीन निर्मिती होऊ न देता वेदना होऊ देणार नाही.” परमेश्वर पुढे म्हणतो, “जर मी तुम्हाला प्रसूतिवेदना दिल्या तर तुम्हाला नवीन राष्ट्र मिळाल्याशिवाय राहणार नाही असे मी तुम्हाला वचन देतो.” तुमचा देव असे म्हणाला.
10Verblijdt u met Jeruzalem, en verheugt u over haar, al haar liefhebbers! Weest vrolijk over haar met vreugde, gij allen, die over haar zijt treurig geweest!
10यरूशलेम, सुखी हो! यरूशलेमवर प्रेम करणारे तुम्ही लोकहो, सुखी व्हा! यरूशलेमला दु:खकारक गोष्टी घडल्या म्हणून तुमच्यातील काही लोकांना दु:ख झाले आहे. पण आता तुम्ही सुखी व्हावे.
11Opdat gij moogt zuigen, en verzadigd worden van de borsten harer vertroostingen; opdat gij moogt uitzuigen, en u verlusten met den glans harer heerlijkheid.
11का? कारण आईच्या स्तनातून येणाऱ्या दुधासारखी दया तुम्हाला मिळेल, ते “दूध” तुम्हाला खरी तृप्ती देईल. तुम्ही ते दूध प्याल आणि तुम्ही यरूशलेमच्या वैभवाने खरोखरीच आनंदित व्हाल.
12Want alzo zegt de HEERE: Ziet, Ik zal den vrede over haar uitstrekken als een rivier, en de heerlijkheid der heidenen als een overlopende beek; dan zult gijlieden zuigen; gij zult op de zijden gedragen worden, en op de knieen zeer vriendelijk getroeteld worden.
12परमेश्वर म्हणतो, “पाहा! मी तुम्हाला शांती देईन. मोठ्या नदीप्रमाणे ही शांती वाहत वाहत तुमच्याकडे येईल. पृथ्वीवरील सर्व राष्ट्रांच्या संपत्तीचा ओघ तुमच्याकडे येईल. पुराप्रमाणे हा संपत्तीचा ओघ येईल. तुम्ही लहान मुलासारखे व्हाल. तुम्ही ‘दूध’ प्याल. मी तुम्हाला उचलून कडेवर घेईन. मी तुम्हाला मांडीवर खेळवीन.
13Als een, dien zijn moeder troost, alzo zal Ik u troosten; ja, gij zult te Jeruzalem getroost worden.
13तुम्ही यरूशलेममध्ये आरामात राहाल. आई जशी मुलाला आराम देते, तसा मी तुम्हाला देईन.”
14En gij zult het zien, en uw hart zal vrolijk zijn, en uw beenderen zullen groenen als het tedere gras; dan zal de hand des HEEREN bekend worden aan Zijn knechten, en Hij zal Zijn vijanden gram worden.
14खरोखरी आनंद देणाऱ्या गोष्टी तुम्हाला दिसतील. तुम्ही स्वतंत्र व्हाल आणि गवताप्रमाणे वाढाल. परमेश्वराचे सेवक त्याचे सामर्थ्य पाहतील आणि परमेश्वराचे शत्रू त्याचा राग अनुभवतील.
15Want ziet, de HEERE zal met vuur komen, en Zijn wagenen als een wervelwind; om met grimmigheid Zijn toorn hiertoe te wenden, en Zijn schelding met vuurvlammen.
15पाहा! परमेश्वर अग्नी घेऊन येत आहे. परमेश्वराचे सैन्य धुळीचे लोट उडवीत येत आहे. आपल्या रागाचा उपयोग परमेश्वर लोकांना शिक्षा करण्यासाठी करील. परमेश्वर रागावल्यावर त्या लोकांना अग्नीच्या ज्वाळांनी शिक्षा करील.
16Want met vuur, en met Zijn zwaard zal de HEERE in het recht treden met alle vlees; en de verslagenen des HEEREN zullen vermenigvuldigd zijn.
16परमेश्वर लोकांना न्याय देईल. मग तो लोकांना अग्नीने आणि त्याच्या तलवारीने नाश करील. परमेश्वर खूप लोकांचा नाश करील.
17Die zichzelven heiligen, en zichzelven reinigen in de hoven, achter een in het midden derzelve, die zwijnenvlees eten, en verfoeisel, en muizen; te zamen zullen zij verteerd worden, spreekt de HEERE.
17हे लोक त्यांच्या खास बागांमध्ये पूजा करण्यासाठी शुचिर्भूत व्हावे म्हणून स्नान करतात. ते एकमेकांच्या मागून खास बागांमध्ये जातात. मग ते मूर्तीची पूजा करतात. पण परमेश्वर त्या सर्व लोकांचा नाश करील. “ते लोक डुक्कर, उंदीर ह्यांचे मांस व इतर घाणेरडया गोष्टी खातात. पण ह्या सर्व लोकांचा एकत्रितपणे नाश केला जाईल.” (परमेश्वराने स्वत: ह्या गोष्टी सांगितल्या)
18Hun werken en hun gedachten! Het komt, dat Ik vergaderen zal alle heidenen en tongen, en zij zullen komen, en zij zullen Mijn heerlijkheid zien.
18“ते लोक दुष्ट विचार करतात आणि पापे करतात म्हणून त्यांना शिक्षा करण्यासाठी मी येत आहे मी सर्व राष्ट्रांना व सर्व लोकांना गोळा करीन. सर्व लोक एकत्र येऊन माझे सामर्थ्य पाहतील.
19En Ik zal een teken aan hen zetten, en uit hen, die het ontkomen zullen zijn, zal Ik zenden tot de heidenen naar Tarsis, Pul, en Lud, de boogschutters, naar Tubal en Javan, tot de ver gelegen eilanden, die Mijn gerucht niet gehoord, noch Mijn heerlijkheid gezien hebben; en zij zullen Mijn heerlijkheid onder de heidenen verkondigen.
19काही लोकांवर मी खूण करीन. मी त्यांना वाचवीन. मी ह्या वाचविलेल्या काही लोकांना तार्शीश, पूल, लूद (धनुर्धाऱ्यांचा देश), तूबल, यवान आणि दूरूदरच्या देशांत पाठवीन. त्या लोकांनी कधीच माझी शिकवण ऐकलेली नाही. त्यांनी कधीच माझे तेज पाहिलेले नाही म्हणून वाचविले गेलेले लोक, त्या राष्ट्रांना माझ्या तेजाबद्दल सांगतील.
20En zij zullen al uw broeders uit alle heidenen den HEERE ten spijsoffer brengen, op paarden, en op wagenen, en op rosbaren, en op muildieren, en op snelle lopers, naar Mijn heiligen berg toe, naar Jeruzalem, zegt de HEERE, gelijk als de kinderen Israels het spijsoffer in een rein vat brengen ten huize des HEEREN.
20आणि ते सर्व राष्ट्रांतून तुमच्या भावा बहिणींना आणतील. ते त्यांना माझ्या पवित्र डोंगरावर, यरूशलेमला, आणतील. तुमची ही भावंडे घोड्यांवरून गाढवांवरून, उंटांवरून, रथांतून आणि गाड्यांतून येतील. तुमची ही भावंडे म्हणजे जणू काही इस्राएलच्या लोकांनी निर्मळ तबकांतून, परमेश्वराच्या मंदिरात आणलेले नजराणे असतील.
21En ook zal Ik uit dezelve enigen tot priesters en tot Levieten nemen, zegt de HEERE.
21ह्यातीलच काही लोकांना मी याजक व लेवी होण्यासाठी निवडीन.” परमेश्वर हे सर्व म्हणाला.
22Want gelijk als die nieuwe hemel en die nieuwe aarde, die Ik maken zal, voor Mijn aangezicht zullen staan, spreekt de HEERE, alzo zal ook ulieder zaad en ulieder naam staan.
22“मी नवे जग निर्माण करीन आणि नवा स्वर्ग व नवी पृथ्वी अक्षय राहतील. त्याचप्रमाणे तुमची नावे आणि मुले नेहमी माझ्याबरोबर असतील.
23En het zal geschieden, dat van de ene nieuwe maan tot de andere, en van den enen sabbat tot den anderen, alle vlees komen zal om aan te bidden voor Mijn aangezicht, zegt de HEERE.
23प्रत्येक पूजेच्या दिवशी, सर्व लोक माझी उपासना करण्यासाठी येतील. ते प्रत्येक शब्बाथला आणि महिन्याच्या पहिल्या दिवशी येतील.
24En zij zullen henen uitgaan, en zij zullen de dode lichamen der lieden zien, die tegen Mij overtreden hebben; want hun worm zal niet sterven, en hun vuur zal niet uitgeblust worden, en zij zullen allen vlees een afgrijzing wezen.
24“ते लोक माझ्या पवित्र नगरात येतील. आणि ते जर नगराच्या बाहेर गेले तर त्यांना माझ्याविरूध्द गेलेल्या लोकांची मृत शरीरे दिसतील. त्या मृत शरीरांत कधी न मरणारे किडे पडतील कधी न विझणारा अग्नी त्या मृत शरीरांना जाळून टाकील.”