1Alzo heeft de HEERE tot mij gezegd: Ga henen, en koop u een linnen gordel, en doe dien aan uw lenden, maar breng hem niet in het water.
1परमेश्वर मला असे म्हणाला: “यिर्मया, जा आणि तागाचा घागरा विकत घे. नंतर तो नेस. तो ओला होऊ देऊ नकोस.”
2En ik kocht een gordel naar het woord des HEEREN, en ik deed dien aan mijn lenden.
2परमेश्वराने सांगितल्याप्रमाणे मी एक तागाचा घागरा विकत आणला व नेसला.
3Toen geschiedde des HEEREN woord ten tweeden male tot mij, zeggende:
3नंतर मला परमेश्वराकडून दुसऱ्यांदा संदेश आला.
4Neem den gordel, dien gij gekocht hebt, die aan uw lenden is, en maak u op, en ga henen naar den Frath, en versteek dien aldaar in de klove ener steenrots.
4तो असा होता: “यिर्मया, तू विकत आणून नेसलेला घागरा घेऊन फरातला जा. तिथे तो खडकाला पडलेल्या चिरेत लपवून ठेव.”
5Zo ging ik henen, en verstak dien bij den Frath, gelijk als de HEERE mij geboden had.
5त्याप्रमाणे मी फरातला गेलो आणि अगदी परमेश्वराने सांगितल्याप्रमाणे घागरा लपवून ठेवला.
6Het geschiedde nu ten einde van vele dagen, dat de HEERE tot mij zeide: Maak u op, ga henen naar den Frath, en neem den gordel van daar, dien Ik u geboden heb aldaar te versteken.
6पुष्कळ दिवसांनी देव मला म्हणाला, “यिर्मया, फरातला जा व लपवून ठेवायला सांगितलेला घागरा परत घे.”
7Zo ging ik naar den Frath, en groef, en nam den gordel van de plaats, alwaar ik dien verstoken had; en ziet, de gordel was verdorven en deugde nergens toe.
7त्याप्रमाणे मी फरातला गेलो आणि घागरा उकरुन काढला. मी दगडाच्या चिरेत लपविलेला घागरा बाहेर काढला. पण आता तो इतका खराब झाला होता की मी तो नेसू शकत नव्हतो. तो अगदी निरुपयोगी झाला होता.
8Toen geschiedde des HEEREN woord tot mij, zeggende:
8मग मला परमेश्वराचा संदेश आला.
9Zo zegt de HEERE: Alzo zal Ik verderven de hovaardij van Juda, en die grote hovaardij van Jeruzalem.
9परमेश्वर मला म्हणाला, “ज्याप्रमाणे घागरा अगदी खराब आणि निरुपयोगी झाला, त्याचप्रमाणे यहूदातील आणि यरुशलेमधील अहंकारी लोकांचा नाश होईल.
10Ditzelve boze volk, dat Mijn woorden weigert te horen, dat in het goeddunken zijns harten wandelt, en andere goden navolgt, om die te dienen, en voor die zich neder te buigen; dat zal worden gelijk deze gordel, die nergens toe deugt.
10मी यहुदाच्या उद्दाम आणि पापी लोकांचा नाश करीन. ते लोक माझा संदेश ऐकण्याचे नाकारतात. ते दुराग्रही असून आपल्याला पाहिजे त्याच गोष्टी करतात. ते दुसऱ्या देवांना अनुसरतात व त्यांची पूजा करतात. यहूदाच्या अशा लोकांची गत ह्या तागाच्या घागऱ्याप्रमाणे होईल. त्यांचा नाश होऊन ते निरुपयोगी ठरतील.
11Want gelijk als een gordel kleeft aan de lenden eens mans, alzo heb Ik het ganse huis Israels en het ganse huis van Juda aan Mij doen kleven, spreekt de HEERE, om Mij te zijn tot een volk, en tot een naam, en tot lof, en tot heerlijkheid; maar zij hebben niet gehoord.
11घागरा जसा माणसाच्या कमरेभोवती घट्ठ लपेटला जातो, त्याप्रमाणे मी यहूदाची आणि इस्राएलची कुटुंबे माझ्या कमरेला लपेटली.” हा परमेश्वराकडून आलेला संदेश आहे. “त्या लोकांनी माझे व्हावे, मला कीर्ती, प्रशंसा आणि मान मिळवून द्यावा म्हणून मी असे केले. पण माझ्या लोकांना माझे ऐकावयाचे नाही.”
12Daarom zeg dit woord tot hen: Zo zegt de HEERE, de God Israels: Alle flessen zullen met wijn gevuld worden. Dan zullen zij tot u zeggen: Weten wij niet zeer wel, dat alle flessen met wijn gevuld zullen worden?
12“यिर्मया, यहूदाच्या लोकांना सांग की परमेश्वर, इस्राएलचा देव म्हणतो, ‘प्रत्येक चामड्याचा बुधला दारुने भरावा.’ ते लोक तुला हसतील आणि म्हणतील ‘प्रत्येक चामड्याचा बुधला दारुने भरावा हे आम्हाला माहीत आहे.’
13Maar gij zult tot hen zeggen: Zo zegt de HEERE: Ziet, Ik zal alle inwoners deze lands, zelfs de koningen, die op Davids troon zitten, en de priesters, en de profeten, en alle inwoners van Jeruzalem, opvullen met dronkenschap.
13मग तू त्यांना सांग, ‘परमेश्वराचे म्हणणे असे आहे की या देशात राहणाऱ्या प्रत्येक माणसाला मी दारुड्याप्रमाणे असहाय करीन. मी हे दावीदच्या सिंहासनावर बसलेल्या राजांबद्दल, याजकांबद्दल, संदेष्ट्यांबद्दल आणि यरुशलेममध्ये राहणाऱ्या यच्चयावत लोकांबद्दल बोलत आहे.
14En Ik zal hen in stukken slaan, den een tegen den ander, zo de vaders als de kinderen te zamen, spreekt de HEERE; Ik zal niet verschonen noch sparen, noch Mij ontfermen, dat Ik hen niet zou verderven.
14यहूदाच्या लोकांना मी धडपडायला भाग पाडीन. ते धडपडून एकमेकांच्या अंगावर पडतील. पिता पुत्र एकमेकांवर पडतील. हा परमेश्वराचा संदेश आहे. “‘मला त्याबद्दल वाईटही वाटणार नाही. आणि त्यांची दयाही येणार नाही. अनुकंपा येऊन मी यहूदाच्या लोकांचे पारिपत्य थांबविणार नाही.”‘
15Hoort en neemt ter ore, verheft u niet; want de HEERE heeft het gesproken.
15ऐका आणि लक्ष द्या. परमेश्वर तुमच्याशी बोलला आहे. उन्मत्त बनू नका.
16Geeft eer den HEERE, uw God, eer dat Hij het duister maakt, en eer uw voeten zich stoten aan de schemerende bergen; dat gij naar licht wacht, en Hij datzelve tot een schaduw des doods stelle, en tot een donkerheid zette.
16परमेश्वराचा, तुमच्या देवाचा मान राखा. त्याचे स्तवन करा, नाहीतर तो अंधकार पसरवील. अंधकारमय टेकड्यांवर पडण्याआधीच त्याचे स्तुतिस्तोत्र गा. तुम्ही यहूदाचे लोक प्रकाशाची वाट पाहता, पण परमेश्वर प्रकाशाचे गाढ अंधकारात रुपांतर करेल. तो प्रकाशाला दाट अंधारात बदलेल.
17Zult gijlieden dat dan nog niet horen, zo zal mijn ziel in verborgene plaatsen wenen vanwege den hoogmoed, en mijn oog zal bitterlijk tranen, ja, van tranen nederdalen, omdat des HEEREN kudde gevankelijk is weggevoerd.
17यहूदाच्या लोकांनो, तुम्ही जर परमेश्वराचे ऐकणार नसाल, तर मी एकांतात आक्रोश करीन. तुमचा उन्मत्तपणा मला आक्रोश करायला भाग पाडेल. मी दारुण आकांत करीन. माझे डोळे अश्रूंनी डबडबतील. का? कारण परमेश्वराच्या मेंढरांचा कळप (यहूदाचे लोक) पकडला जाईल.
18Zeg tot den koning en tot de koningin: Vernedert u, zet u neder; want uw ganse hoofdsieraad, de kroon uwer heerlijkheid, is nedergedaald.
18राजा आणि राणीला या गोष्टी सांगा, “तुमचे सुंदर मुकुट तुमच्या डोक्यांवरुन खाली पडलेत. तुम्ही आता तुमच्या सिंहासनावरुन खाली उतरा.”
19De steden van het zuiden zijn toegesloten, en er is niemand, die ze opent; het ganse Juda is weggevoerd, het is geheel en al weggevoerd.
19नेगेवच्या वाळवंटातील शहरे बंद केली गेली आहेत. कोणीही ती उघडू शकत नाही. यहूदाच्या सर्व लोकांना कैद करुन परागंदा करण्यात आले आहे.
20Hef uw ogen op, en zie, die daar van het noorden komen! waar is de kudde, die u gegeven was, de schapen uwer heerlijkheid?
20यरुशलेम, तो पाहा! उत्तरेकडून शत्रू चाल करुन येत आहे. तुझा कळप कोठे आहे? देवाने तुला या सुंदर कळपाचे दान दिले. त्याची तू काळजी घ्यावीस अशी अपेक्षा होती.
21Wat zult gij zeggen, wanneer Hij bezoeking over u doen zal, daar gij hem geleerd hebt tot vorsten, tot een hoofd over u te zijn; zullen u de smarten niet aangrijpen, als een barende vrouw?
21आता त्या कळपाबद्दल परमेश्वराने जाब विचारल्यास तू काय उत्तर देणार? तू लोकांना देवाबद्दल ज्ञान देशील अशी अपेक्षा होती. तुझे नेते लोकांना मार्गदर्शन करतील असे वाटत होते. पण त्यांनी त्यांचे कर्तव्य केले नाही. तेव्हा आता तुला प्रसुतिवेदनांप्रमाणे वेदना व त्रास भोगावा लागेल.
22Wanneer gij dan in uw hart zult zeggen: Waarom zijn mij deze dingen bejegend? Om de veelheid uwer ongerechtigheid, zijn uw zomen ontdekt, en uw hielen hebben geweld geleden.
22तू कदाचित् स्वत:ला विचारशील, “माझ्यावरच असा वाईट प्रसंग का आला?” तुझ्या अनेक पापांमुळे असे झाले. तुझ्या पापाबद्दल तुझा घागरा फाडला गेला आणि तुझी पादत्राणे काढून घेण्यात आली. तुझी मानहानी करण्यासाठी हे करण्यात आले.
23Zal ook een Moorman zijn huid veranderen? of een luipaard zijn vlekken? Zo zult gijlieden ook kunnen goed doen, die geleerd zijt kwaad te doen.
23काळा माणूस आपल्या कातडीचा रंग बदलू शकत नाही. किंवा चित्ता आपल्या अंगावरील ठिपके बदलू शकत नाही. त्याचप्रमाणे यरुशलेम, तू सुद्धा बदलणार नाहीस आणि चांगल्या गोष्टी करणार नाहीस तू नेहमीच वाईट गोष्टी करशील.
24Daarom zal Ik hen verstrooien als een stoppel, die doorgaat, door een wind der woestijn.
24“मी तुम्हाला तुमची घरे सोडून जाण्यास भाग पाडीन. तुम्ही दाही दिशांना सैरावैरा पळत सुटाल, वाळवंटातील वाऱ्याने दूर उडून जाणाऱ्या फोलकटाप्रमाणे तुमची गत होईल.
25Dit zal uw lot, het deel uwer maten zijn van Mij, spreekt de HEERE; gij, die Mij hebt vergeten, en op leugen vertrouwt.
25तुमच्याबाबत माझी योजना ही अशी आहे आणि त्याचप्रमाणे गोष्टी घडतील.” हा परमेश्वराचा संदेश आहे. “हे असे का घडेल? कारण तुम्हाला माझा विसर पडला. तुम्ही खोट्या देवावर विश्वास ठेवला.
26Zo zal Ik ook uw zomen ontbloten boven uw aangezicht, en uw schande zal gezien worden.
26यरुशलेम, मी तुझा घागरा डोक्याकडून खेचीन. प्रत्येकजण तुला पाहील आणि तुझी बेअब्रू होईल.
27Uw overspelen en uw hunkeringen, de schandelijkheid uws hoerdoms, op heuvelen, in het veld; Ik heb uw verfoeiselen gezien; wee u, Jeruzalem! zult gij niet rein worden? Hoe lang nog na dezen?
27मी तू केलेली भयानक कृत्ये पाहिली आहेत. जारांशी हसताना आणि संभोग करताना मी तुला पाहिले आहे. वेश्या बनायचेच तुझ्या मनात दिसते आहे. मी तुला डोंगरकपारीत आणि मैदानात पाहिले आहे. यरुशलेम, हे तुझ्या दृष्टीने वाईट आहे. या घृणास्पद पापें तू किती काळ करणार याचे मला नवल वाटते.”