Dutch Staten Vertaling

Marathi

Jeremiah

9

1Och, dat mijn hoofd water ware, en mijn oog een springader van tranen! zo zou ik dag en nacht bewenen de verslagenen van de dochter mijns volks.
1जर माझे मस्तक पाण्याने भरलेले असते आणि माझे डोळे अश्रूंचे झरे असते तर मी माझ्या नाश पावलेल्या लोकांसाठी अहोरात्र रडलो असतो.
2Och, dat ik in de woestijn een herberg der wandelaars had, zo zou ik mijn volk verlaten, en van hen trekken; want zij zijn allen overspelers, een trouweloze hoop.
2जर वाळवंटात माझी धर्मशाळा असती तर मी माझ्या लोकांना सोडून त्यांच्यापासून खूप दूर जाऊ शकलो असतो. का? कारण त्यांनी सर्वांनी देवाचा विश्वासघात केला आहे. ते देवाच्या विरुद्ध गेले आहेत.
3En zij spannen hun tong als hun boog tot leugen; zij worden geweldig in het land, doch niet tot waarheid; want zij gaan voort van boosheid tot boosheid, maar Mij kennen zij niet, spreekt de HEERE.
3“ते त्यांच्या जिभा धनुष्यासारख्या वापरतात. त्यातून खोट्याचे बाण उडतात. ह्या भूमीवर, सत्य नव्हे, तर असत्य, खोटे बलवान झाले आहे, हे लोक एका पापाकडून दुसऱ्या पापाकडे जातात. त्यांना माझे ज्ञान नाही.” परमेश्वर असे म्हणाला आहे.
4Wacht u, een iegelijk van zijn vriend, en vertrouwt niet op enigen broeder; want elk broeder doet niet dan bedriegen, en elk vriend wandelt in achterklap.
4“तुमच्या शेजाऱ्यावर नजर ठेवा. तुमच्या स्वत:च्या भावावरसुध्दा विश्वास ठेवू नका का? कारण प्रत्येक भाऊ लबाड आहे. प्रत्येक शेजारी चहाडखोर आहे.
5En zij handelen bedriegelijk, een ieder met zijn vriend, en spreken de waarheid niet; zij leren hun tong leugen spreken, zij maken zich moede met verkeerdelijk te handelen.
5प्रत्येकजण आपल्या शेजाऱ्याशी खोटे बोलतो, कोणीही खरे बोलत नाही. यहूदाच्या लोकांनी आपल्या जिभांना खोटे बोलण्यास शिकविले आहे त्यांना परत येणे अशक्य होईपर्यंत त्यांनी पाप केले.
6Uw woning is in het midden van bedrog; door bedrog weigeren zij Mij te kennen, spreekt de HEERE.
6एका वाईट गोष्टीमागून दुसरी वाईट गोष्ट आली. खोट्यामागून खोटे आले. लोकांनी मला जाणून घ्यायचे नाकारले.” परमेश्वराने ह्या सर्व गोष्टी सांगितल्या.
7Daarom zegt de HEERE der heirscharen alzo: Ziet, Ik zal hen smelten en zal hen beproeven; want hoe zou Ik anders doen ten aanzien der dochter Mijns volks?
7म्हणून, सर्वशाक्तिमान परमेश्वर म्हणतो: “धातू शुद्ध आहे की नाही हे बघण्यासाठी कामगार तो तापवितो.” त्याप्रमाणे मी यहूदाच्या लोकांची परीक्षा घेईन. मला दुसरा पर्याय नाही. माझ्या लोकांनी पाप केले.
8Hun tong is een moordpijl, zij spreekt bedrog; een ieder spreekt met zijn naaste van vrede met zijn mond, maar in zijn binnenste legt hij lagen.
8यहूदाच्या लोकांच्या जिभा टोकदार बाणाप्रमाणे आहेत. ते खोटे बोलतात. प्रत्येकजण शेजाऱ्याशी वरवर चांगले बोलतो. पण गुप्तपणे तो शेजाऱ्यावर हल्ला करण्याचा बेत आखत आहे.
9Zou Ik hen om deze dingen niet bezoeken? spreekt de HEERE; zou Mijn ziel zich niet wreken aan zulk een volk, als dit is?
9[This verse may not be a part of this translation]
10Ik zal een geween en een weeklage opheffen over de bergen, en een klaaglied over de herdershutten der woestijn; want zij zijn afgebrand, dat er niemand doorgaat, en men hoort er geen stem van vee; van de vogelen des hemels aan tot de beesten toe zijn zij weggezworven, doorgegaan!
10मी, यिर्मया, डोंगरासाठी आकांत करीन. मी वैराण शेतांसाठी शोकगीत गाईन. का? कारण सजीव सृष्टी नाहीशी केली गेली आहे. तेथून आता कोणीही प्रवास करीत नाही. गुरांचे हंबरणे ऐकू येत नाही. पक्षी दूर उडून गेले आहेत. प्राणी निघून गेले आहेत.
11En Ik zal Jeruzalem stellen tot steen hopen, tot een woning der draken; en de steden van Juda zal Ik stellen tot een verwoesting, zonder inwoner.
11“मी, परमेश्वर, यरुशलेम नगरी म्हणजे कचऱ्याचा ढीग करीन. मी कोल्ह्यांचे वसतिस्थान होईल. मी यहूदातील नगरे नष्ट करीन. मग तेथे कोणीही राहणार नाही.”
12Wie is de wijze man, die dit versta? En tot wien heeft de mond des HEEREN gesproken, dat hij het verkondige, waarom het land vergaan en afgebrand zij als een woestijn, dat er niemand doorgaat?
12ह्या गोष्टी समजू शकण्याइतका सुज्ञ कोणी आहे का? परमेश्वराकडून शिकविला गेलेला कोणी आहे का? परमेश्वराच्या संदेशाचे स्पष्टीकरण कोणी करु शकेल का? ह्या भूमीचा नाश का झाला? जेथे कोणीही जात नाही अशा वाळवंटासारखी ती का केली गेली?
13En de HEERE zeide: Omdat zij Mijn wet, die Ik voor hun aangezicht gegeven had, verlaten hebben, en naar Mijn stem niet gehoord, noch daarnaar gewandeld hebben;
13परमेश्वराने ह्या प्रश्नांची उत्तरे दिली. तो म्हणाला, “माझ्या शिकवणुकीला अनुसरायचे यहूदाच्या लोकांनी सोडून दिले. मी त्यांना पाठ दिले. पण त्यानी ऐकायचे नाकारले. ते माझ्या शिकवणुकीप्रमाणे वागले नाहीत.
14Maar hebben gewandeld naar het goeddunken huns harten, en naar de Baals, hetwelk hun vaders hun geleerd hadden.
14यहूदातील लोक त्यांच्या मर्जीप्रमाणे जगले ते दुराग्रही होते. बआल या खोट्या देवाला ते अनुसरले. त्यांच्या वडिलांनी त्यांना खोट्या देवांना अनुसरायला शिकविले.”
15Daarom zegt de HEERE der heirscharen, de God Israels, alzo: Ziet, Ik zal dit volk spijzen met alsem, en Ik zal hen drenken met gallewater;
15सर्वशक्तिमान परमेश्वर, इस्राएलचा देव म्हणतो, “लवकरच मी यहूदाच्या लोकांना कडू अन्न खायला लावीन, विषारी पाणी प्यायला लावीन.
16En Ik zal hen verstrooien onder de heidenen, die zij niet gekend hebben, zij noch hun vaders; en Ik zal het zwaard achter hen zenden, totdat Ik hen verteerd zal hebben.
16मी यहूदाच्या लोकांना दुसऱ्या राष्ट्रांतून विखरु टाकीन त्यांनी किंवा त्यांच्या वडिलांनी पूर्वी कधीही ज्यांच्याबद्दल ऐकले नव्हते अशा परक्या देशांत ते राहतील. मी तलवारी घेतलेले लोक पाठवीन. ते यहूदाच्या लोकांना ठार मारतील. सर्व लोकांचा नाश होईपर्यंत ते संहार करतील.”
17Zo zegt de HEERE der heirscharen: Merkt daarop, en roept klaagvrouwen, dat zij komen; en zendt henen naar de wijze vrouwen, dat zij komen.
17सर्वशक्तिमान परमेश्वर असे म्हणतो, “आता या गोष्टींचा विचार करा. प्रेतयात्रेच्या वेळी रडणाऱ्या भाडोत्री बायकांना बोलवा. त्या कामात वाकबगार असलेल्या स्त्रियांना बोलवा.
18En haasten, en een weeklage over ons opheffen, dat onze ogen van tranen nederdalen, en onze oogleden van water vlieten.
18लोक म्हणतात, ‘त्या बायकांना लवकर येऊन आमच्यासाठी रडू द्या मग आमचे डोळे भरुन येतील आणि अश्रूंचा पूर येईल.’
19Want er is een stem van weeklage gehoord uit Sion: Hoe zijn wij verstoord! wij zijn zeer beschaamd, omdat wij het land hebben verlaten, omdat zij onze woningen hebben omgeworpen.
19“सियोन मधून मोठ्याने रडण्याचा आवाज ऐकायला येतो आहे. ‘आपला खरोखरच नाश झाला आपली खरोखरच अप्रतिष्ठा झाली. आता आपण आपली भूमी सोडलीच पाहिजे. कारण आपली घरे नष्ट केली गेली. आता ती दगडधोंड्यांचा ढिगारा झाली आहेत.”‘
20Hoort dan des HEEREN woord, gij vrouwen! en uw oor ontvange het woord Zijns monds, en leert uw dochters weeklagen, en elke een haar metgezellin klaagliederen.
20आता, यहूदातील स्त्रियांनो, परमेश्वराकडून आलेला संदेश ऐका. परमेश्वराच्या तोंडचे शब्द ऐका. देव म्हणतो, “तुमच्या मुलींना मोठ्याने रडायला शिकवा. प्रत्येक बाईला शोकगीत गाता आलेच पाहिजे.
21Want de dood is geklommen in onze vensteren, hij is in onze paleizen gekomen, om de kinderkens uit te roeien van de wijken, de jongelingen van de straten.
21‘मृत्यू आला आहे. तो चढून खिडक्यातून आना आला. मृत्यू राजवाड्यात आला. रस्त्यांवर खेळणाऱ्या आमच्या मुलांकडे आला. सार्वजनिक ठिकाणी जमणाऱ्या तरुणांकडे तो आला.’
22Spreek: Zo spreekt de HEERE: Ja, een dood lichaam des mensen zal liggen, als mest op het open veld, en als een garve achter den maaier, die niemand opzamelt.
22“यिर्मया, या गोष्टी सांग: परमेश्वर म्हणतो, ‘मृत शरीरे खताप्रमाणे शेतांत पडतील. शेतकऱ्यांनी कापलेल्या धान्याप्रमाणे ती जमिनीवर पडतील. पण त्यांना गोळा करणारे कोणीही नसेल.”‘
23Zo zegt de HEERE: Een wijze beroeme zich niet in zijn wijsheid, en de sterke beroeme zich niet in zijn sterkheid; een rijke beroeme zich niet in zijn rijkdom;
23परमेश्वर म्हणतो, “शहाण्यांनी त्यांच्या शहाणपणाबद्दल, बलवानांनी त्यांच्या बळाबद्दल व श्रीमंतांनी त्यांच्या पैशाबद्दल बढाई मारु नये.” असे परमेश्वर म्हणतो.
24Maar die zich beroemt, beroeme zich hierin, dat hij verstaat, en Mij kent, dat Ik de HEERE ben, doende weldadigheid, recht en gerechtigheid op de aarde, want in die dingen heb Ik lust, spreekt de HEERE.
24पण कोणाला बढाईच मारायची असेल तर त्याला ह्या गोष्टीसाठी मारु द्या. तो मला ओळखायला शिकला म्हणून बढाई मारु द्या. मी परमेश्वर आहे, मी कृपाळू व न्यायी आहे, जगात चांगल्या गोष्टी मी करतो आणि त्या गोष्टी मला आवडतात हे कळल्याबद्दल त्याला बढाई मारु द्या.” हा परमेश्वराचा संदेश आहे.
25Ziet, de dagen komen, spreekt de HEERE, dat Ik bezoeking zal doen over alle besnedenen, met degenen, die de voorhuid hebben;
25परमेश्वराचा संदेश असा आहे “ज्यांची फक्त शारीरिक सुंता झाली आहे, अशांना शिक्षा करण्याची वेळ येत आहे.
26Over Egypte, en over Juda, en over Edom, en over de kinderen Ammons, en over Moab, en over allen, die aan de hoeken afgekort zijn, die in de woestijn wonen; want al de heidenen hebben de voorhuid, maar het ganse huis Israels heeft de voorhuid des harten.
26मिसर, यहुदा, अदोम, अम्मोन, मवाब यातील व वाळवंटात राहणाऱ्या इतर लोकांबद्दल मी बोलत आहे. ह्या देशातील लोकांची शारीरिक सुंताही खरोखरी झालेली नाही. पण इस्राएलच्या घराण्यातील लोकांच्या ह्दयाची सुंताही झालेली नाही.”