Dutch Staten Vertaling

Marathi

Job

15

1Toen antwoordde Elifaz, de Themaniet, en zeide:
1नंतर तेमानच्या अलीफजने ईयोबला उत्तर दिले:
2Zal een wijs man winderige wetenschap voor antwoord geven, en zal hij zijn buik vullen met oostenwind?
2“ईयोब, जर तू खरोखरच शहाणा असशील तर तू पोकळ शब्दांनी उत्तर देणार नाहीस. शहाणा माणूस गरम हवेने इतका भरलेला नसतो.
3Bestraffende door woorden, die niet baten, en door redenen, met dewelke hij geen voordeel doet?
3विद्वान निरुपयोगी शब्दांनी आणि निरर्थक बोलण्याने वाद घालत बसेल असे तुला वाटते का?
4Ja, gij vernietigt de vreze, en neemt het gebed voor het aangezicht Gods weg.
4ईयोब तुला जर तुझ्या मनाप्रमाणे वागू दिले तर कोणीही माणूस देवाला मान देणार नाही आणि त्याची प्रार्थना करणार नाही.
5Want uw mond leert uw ongerechtigheid, en gij hebt de tong der arglistigen verkoren.
5तुझ्या बोलण्यावरुन तुझे पाप चांगले कळते. ईयोब तू हुशारीने बोलून तुझे पाप लपवायचा प्रयत्न करीत आहेस.
6Uw mond verdoemt u, en niet ik; en uw lippen getuigen tegen u.
6तू चुकत आहेस हे सिध्द करण्याची मला आवश्यकता वाटत नाही. का? कारण तू तुझ्या तोंडाने जे बोलतोस ते तू चुकात असल्याचे सिध्द करतात. तुझे स्वत:चेच ओठ तुझ्याविरुध्द बोलतात.
7Zijt gij de eerste een mens geboren? Of zijt gij voor de heuvelen voortgebracht?
7“ईयोब, जन्माला येणारा तू पहिलाच माणूस आहेस असे तुला वाटते का? टेकड्या निर्माण व्हायच्या आधीच तू जन्मलास का?
8Hebt gij den verborgen raad Gods gehoord, en hebt gij de wijsheid naar u getrokken?
8तू देवाच्या गुप्त मसलती ऐकल्यास का? केवळ तूच एक शहाणा माणूस आहेस असे तुला वाटते का?
9Wat weet gij, dat wij niet weten? Wat verstaat gij, dat bij ons niet is?
9ईयोब, तुझ्यापेक्षा आम्हाला जास्त माहिती आहे. तुला न कळणाऱ्या गोष्टी आम्हाला समजतात.
10Onder ons is ook een grijze, ja, een stokoude, meerder van dagen dan uw vader.
10केस पांढरे झालेले लोक आणि वृध्द आमच्याशी सहमत आहेत. होय, तुझ्या वडिलांपेक्षा वृध्द असलेले लोक आमच्या बाजूला आहेत.
11Zijn de vertroostingen Gods u te klein, en schuilt er enige zaak bij u?
11देव तुझे सांत्वन करतो पण ते तुला पुरेसे वाटत नाही. देवाचा निरोप आम्ही तुला अगदी हळुवारपणे दिला आहे.
12Waarom rukt uw hart u weg, en waarom wenken uw ogen?
12ईयोब, तू का समजून घेत नाहीस? तू सत्य का पाहात नाहीस?
13Dat gij uw geest keert tegen God, en zulke redenen uit uw mond laat uitgaan.
13तू हे रागाचे शब्द उच्चारतोस तेव्हा तू देवाच्या विरुध्द जातोस.
14Wat is de mens, dat hij zuiver zou zijn, en die geboren is van een vrouw, dat hij rechtvaardig zou zijn?
14“मनुष्य कधीही निष्कलंक असू शकत नाही. मनुष्यप्राणी देवापेक्षा अधिक बरोबर असू शकत नाही.
15Zie, op Zijn heiligen zou Hij niet vertrouwen, en de hemelen zijn niet zuiver in Zijn ogen.
15देव त्याच्या पवित्र दूतांवर विश्र्वास ठेवत नाही. देवाशी तुलना करता स्वर्गसुध्दा निर्मळ नाही.
16Hoeveel te meer is een man gruwelijk en stinkende, die het onrecht indrinkt als water?
16मनुष्याप्राणी सर्वांत वाईट आहे, तो अशुध्द आणि कुजलेला आहे. तो वाईट गोष्टी पाण्यासारख्या पितो.
17Ik zal u wijzen, hoor mij aan, en hetgeen ik gezien heb, dat zal ik vertellen;
17“ईयोब, तू माझे ऐक मी तुला नीट सांगतो. मला जे माहीत आहे ते मी तुला सांगतो.
18Hetwelk de wijzen verkondigd hebben, en men voor hun vaderen niet verborgen heeft;
18विद्वानांनी ज्या गोष्टी मला सांगीतल्या, त्या मी तुला सांगतो. विद्वानांच्या पूर्वजांनी त्यांना या गोष्टी सांगीतल्या. त्यांनी माझ्यापासून कुठलीही गुप्त गोष्ट लपवून ठेवली नाही.
19Denwelken alleen het land gegeven was, en door welker midden niemand vreemds doorging.
19ते त्यांच्या देशात एकटे राहात होते, तिथून दुसऱ्या देशांतील लोक जात नसत. त्यामुळे इतरांनी कुणी त्यांना काही विचित्र कल्पना सांगितल्या नाहीत.
20Te allen dage doet de goddeloze zichzelven weedom aan; en weinige jaren in getal zijn voor den tiran weggelegd.
20हे विद्वान लोक म्हणाले, “दुष्ट माणूस जीवनभर यातना भोगतो. क्रूर माणूस मरण येईपर्यंत भीतीने कापत असतो. (क्रूर माणसाचे दिवस भरलेले असतात. तो त्या दिवसांत ही यातना भोगतो.)
21Het geluid der verschrikkingen is in zijn oren; in den vrede zelven komt de verwoester hem over.
21त्याला प्रत्येक आवाजाची भीती वाटते. जेव्हा आपण सुरक्षित आहोत असे त्याला वाटते तेव्हा त्याचा शत्रू त्याच्यावर हल्ला करतो.
22Hij gelooft niet uit de duisternis weder te keren, maar dat hij beloerd wordt ten zwaarde.
22दुष्ट माणूस निराश झालेला असतो. व त्याला अंधारातून सुटका होण्याची आशा नसते. त्याला मारण्यासाठी तलवार टपून बसलेली असते.
23Hij zwerft heen en weder om brood, waar het zijn mag; hij weet, dat bij zijn hand gereed is de dag der duisternis.
23तो इकडे तिकडे भटकत राहातो परंतु त्याचे शरीर गिधाडांचे अन्न असते. आपला मृत्यू अगदी जवळ आला आहे हे त्याला माहीत असते.
24Angst en benauwdheid verschrikken hem; zij overweldigt hem, gelijk een koning, bereid ten strijde.
24त्याला काळजी आणि यातना भयभीत करतात. एखाद्या राजाप्रमाणे त्याला नष्ट करण्यासाठी त्या त्याच्यावर हल्ला करतात.
25Want hij strekt tegen God zijn hand uit, en tegen den Almachtige stelt hij zich geweldiglijk aan.
25का? कारण दुष्ट मनुष्य देवाची आज्ञा मानायला तयार नसतो. तो त्याच्या मुठी देवासमोर नाचवतो. तो सर्वशक्तिमान देवाचा पराभव करायचा प्रयत्न करतो.
26Hij loopt tegen Hem aan met den hals, met zijn dikke, hoog verhevene schilden.
26दुष्ट माणूस अतिशय हट्टी असतो. तो जाड आणि मजबूत ढालीने देवावर हल्ला करतो.
27Omdat hij zijn aangezicht met zijn vet bedekt heeft, en rimpelen gemaakt om de weekdarmen;
27“माणूस श्रीमंत आणि धष्टपुष्ट असू शकतो.
28En heeft bewoond verdelgde steden, en huizen, die men niet bewoonde, die gereed waren tot steen hopen te worden.
28पण त्याचे शहर धुळीला मिळेल. त्याच्या घराचा नाश होईल. त्याचे घर रिकामे होईल.
29Hij zal niet rijk worden, en zijn vermogen zal niet bestaan; en hun volmaaktheid zal zich niet uitbreiden op de aarde.
29दुष्ट माणूस फार दिवस श्रीमंत राहू शकत नाही. त्याची संपत्ती खूप दिवस टिकत नाही. त्याची पिके जास्त वाढत नाहीत.
30Hij zal van de duisternis niet ontwijken, de vlam zal zijn scheut verdrogen; hij zal wijken door het geblaas zijns monds.
30दुष्ट माणसाची काळोखापासून सुटका नसते. तो त्या झाडासारखा असतो ज्याची पाने रोगामुळे मरतात आणि वारा त्यांना दूर उडवून नेतो.
31Hij betrouwe niet op ijdelheid, waardoor hij verleid wordt; want ijdelheid zal zijn vergelding wezen.
31निरुपयोगी गोष्टींवर विश्वास ठेवून दुष्ट माणसाने स्वत:चीच फसवणूक करुन घेऊ नये, का? कारण त्याला त्यातून काहीही मिळणार नाही.
32Als zijn dag nog niet is, zal hij vervuld worden; want zijn tak zal niet groenen.
32आयुष्य संपायच्या आधीच दुष्ट माणूस म्हातारा आणि शुष्क झालेला असेल. तो पुन्हा कधीही हिरव्या न होणाऱ्या फंादीसारखा असेल.
33Men zal zijn onrijpe druiven afrukken, als van een wijnstok, en zijn bloeisel afwerpen, als van een olijfboom.
33दुष्ट माणूस द्राक्ष न पिकता गळून गेलेल्या द्राक्षाच्या वेलीसारखा असेल. तो फूल गळून गेलेल्या जैतून झाडाप्रमाणे असेल.
34Want de vergadering der huichelaren wordt eenzaam, en het vuur verteert de tenten der geschenken.
34का? कारण ज्यांच्या जवळ देव नसतो त्यांच्याजवळ काहीही नसते. जे लोक पैशावर प्रेम करतात त्यांची घरे आगीत भस्मसात होतात.
35Zijn ontvangen moeite, en baren ijdelheid, en hun buik richt bedrog aan.
35दुष्ट माणसे सतत दुष्टपणा करण्यासाठी आणि त्रास देण्यासाठी योजना आखत असतात. ते लोकांना फसविण्यासाठी योजना तयार करतात.”