Dutch Staten Vertaling

Marathi

Job

22

1Toen antwoordde Elifaz, de Themaniet, en zeide:
1मग तेमानीच्या अलीफजने उत्तर दिले:
2Zal ook een man Gode voordelig zijn? Maar voor zichzelven zal de verstandige voordelig zijn.
2“देवाला आपल्या मदतीची गरज आहे का? नाही. अतिशय विद्वान माणसाचा सुध्दा देवाला फारसा उपयोग नाही.
3Is het voor den Almachtige nuttigheid, dat gij rechtvaardig zijt; of gewin, dat gij uw wegen volmaakt?
3तुमचे योग्य तऱ्हेने जगणे देवाला काही मदत करते का? नाही. तुम्ही त्या सर्वशक्तिमान देवाचे अनुसरण केलेत तर त्यातून त्याला काही मिळते का? नाही.
4Is het om uw vreze, dat Hij u bestraft, dat Hij met u in het gericht komt?
4“ईयोब, देवाने तुला दोषी ठरवून शिक्षा का द्यावी? तू त्याला भितोस तू त्याची भक्ती करतोस म्हणून?
5Is niet uw boosheid groot, en uwer ongerechtigheden geen einde?
5“नाही. तो तसे करतो कारण तू खूप पाप केले आहेस. ईयोब, तू पाप करणे कधीच थांबवले नाहीस.
6Want gij hebt uw broederen zonder oorzaak pand afgenomen, en de klederen der naakten hebt gij uitgetogen.
6कदाचित् तू तुझ्या भावाला काही पैसे दिले असशील आणि त्याने ते परत करावे म्हणून त्याच्याकडून एखादी वस्तू गहाण ठेवून घेतली असशील. कदाचित् तू गरीबाकडून त्याची वस्त्रे पैशासाठी गहाण ठेवून घेतली असशील. तसे करण्याला कदाचित् काही सबळ कारणही नसेल.
7Den moede hebt gij geen water te drinken gegeven, en van den hongerige hebt gij het brood onthouden.
7तू कदाचित् थकलेल्या आणि भुकेल्या लोकांना पाणी आणि अन्न दिले नसशील.
8Maar was er een man van geweld, voor dien was het land, en een aanzienlijk persoon woonde daarin.
8ईयोब, तुझ्याकडे पुष्कळ शेतजमीत आहे आणि लोक तुला मान देतात.
9De weduwen hebt gij ledig weggezonden, en de armen der wezen zijn verbrijzeld.
9पण कदाचित् तू विधवांना काहीही न देता घालवून दिले असशील, ईयोब, तू कदाचित पोरक्या मुलांची फसवणूक केली असशील.
10Daarom zijn strikken rondom u, en vervaardheid heeft u haastelijk beroerd.
10म्हणूनच तुझ्या भोवती सापळे आहेत आणि अचानक आलेल्या संकटांनी तू घाबरुन जात आहेस.
11Of gij ziet de duisternis niet, en des water overvloed bedekt u.
11म्हणूनच सर्वत्र इतका अंधार आहे की तुला काही दिसत नाही आणि तू पुराच्या पाण्याने चहुबाजूंनी वेढला आहेस.
12Is niet God in de hoogte der hemelen? Zie toch het opperste der sterren aan, dat zij verheven zijn.
12“देव स्वर्गाच्या सर्वात उंच भागात राहतो. तारे किती उंचावर आहेत ते बघ. देव सर्वात उंच ताऱ्यांमधून खाली वाकून बघतो,
13Daarom zegt gij: Wat weet er God van? Zal Hij door de donkerheid oordelen?
13पण ईयोब, तू कदाचित् म्हणशील देवाला काय समजते? देव काळ्याकुटृ ढाांतून आपल्याकडे बघून निवाडा करु शकतो का?
14De wolken zijn Hem een verberging, dat Hij niet ziet; en Hij bewandelt den omgang der hemelen.
14आकाशाच्या किनाऱ्यावरुन चालताना त्याने आपल्याला बघू नये म्हणून दाट ढग त्याला आपल्यापासून लपवतात.
15Hebt gij het pad der eeuw waargenomen, dat de ongerechtige lieden betreden hebben?
15“ईयोब, दुष्ट लोक पूर्वी ज्या जुन्या वाटेवरुन चालत गेले त्याच वाटेवरुन आज तू चालतो आहेस.
16Die rimpelachtig gemaakt zijn, als het de tijd niet was; een vloed is over hun grond uitgestort;
16त्या दुष्टांना मरणघाटिका जवळ येण्यापूर्वीच त्यांचा नाश करण्यात आला. ते पुरात वाहून गेले.
17Die zeiden tot God: Wijk van ons! En wat had de Almachtige hun gedaan?
17त्या लोकांनी देवाला सांगितले, ‘आम्हाला एकटे सोड तो सर्वशक्तिमान देव आम्हाला काहीही करु शकत नाही.’
18Hij had immers hun huizen met goed gevuld; daarom is de raad der goddelozen verre van mij.
18आणि देवानेच त्याची घरे चांगल्या वस्तूंनी भरली होती. नाही मी दुष्टांच्या उपदेशाचे पालन करु शकत नाही.
19De rechtvaardigen zagen het, en waren blijde, en de onschuldige bespotte hen;
19चांगले लोक दुष्टांचे निर्दालन झालेले पाहतील आणि संतोष पावतील. भोळे लोक वाईट लोकांना हसतात.
20Dewijl onze stand niet verdelgd is, maar het vuur hun overblijfsel verteerd heeft.
20“खरोखरच आमच्या शत्रूंचा नाश झाला आहे. त्यांची संपत्ती आगीत नष्ट होत आहे.’
21Gewen u toch aan Hem, en heb vrede; daardoor zal u het goede overkomen.
21“ईयोब, तू आता देवाला शरण जा. त्याच्याशी सलोखा कर. तू हे केलेस तर तुला खूप चांगल्या गोष्टी मिळतील.
22Ontvang toch de wet uit Zijn mond, en leg Zijn redenen in uw hart.
22त्यांच्या वचनांचा स्विकार कर. तो काय म्हणतो त्याकडे नीट लक्ष दे.
23Zo gij u bekeert tot den Almachtige, gij zult gebouwd worden; doe het onrecht verre van uw tenten.
23ईयोब, तू सर्वशक्तिमान देवाकडे परत ये म्हणजे तुझी स्थिती पूर्ववत् होईल. परंतु तू तुझ्या घरातून वाईट गोष्टींचे उच्चाटन केले पाहिजेस.
24Dan zult gij het goud op het stof leggen, en het goud van Ofir bij den rotssteen der beken;
24तू तुझ्या जवळ असलेल्या सोन्याला मातीमोल मानले पाहिजेस. तू तुझ्या सर्वात चांगल्या सोन्याला दरीतल्या दगडाएवढी किंमत दिली पाहिजेस.
25Ja, de Almachtige zal uw overvloedig goud zijn, en uw krachtig zilver zijn;
25सर्वशक्तिमान देवच तुझे सोने असू दे. त्यालाच तुझा चांदीचा ढीग समज.
26Want dan zult gij u over den Almachtige verlustigen, en gij zult tot God uw aangezicht opheffen.
26नंतर तू सर्वशक्तिमान देवाला अनुभवू शकशील. तू त्याच्याकडे बघू शकशील.
27Gij zult tot Hem ernstiglijk bidden, en Hij zal u verhoren; en gij zult uw geloften betalen.
27तू त्याची प्रार्थना करशील आणि तो तुझे ऐकेल आणि ज्या गोष्टी करण्याचे तू वचन दिले होतेस त्या गोष्टी तू करशील.
28Als gij een zaak besluit, zo zal zij u bestendig zijn; en op uw wegen zal het licht schijnen.
28तू जर काही करायचे ठरवलेस तर तू त्यात यशस्वी होशील. आणि तुझा भविष्यकाळ खरोखरच उज्ज्वल असेल.
29Als men iemand vernederen zal, en gij zeggen zult: Het zij verhoging; dan zal God den nederige van ogen behouden.
29देव अहंकारी लोकांना मान खाली घालायला लावतो. परंतु विनम्र लोकांना तो मदत करतो.
30Ja, Hij zal dien bevrijden, die niet onschuldig is, want hij wordt bevrijd door de zuiverheid uwer handen.
30नंतर तू चुका करणाऱ्या लोकांना मदत करु शकशील. तू देवाजवळ प्रार्थना केलीस तर तो त्या लोकांना क्षमा करेल. का? कारण तू अतिशय पवित्र असशील.”