Dutch Staten Vertaling

Marathi

Job

28

1Gewisselijk, er is voor het zilver een uitgang, en een plaats voor het goud, dat zij smelten.
1“लोकांना जेथून चांदी मिळते अशा खाणी असतात आणि लोक जेथे सोने वितळवतात आणि ते शुध्द करतात अशा जागा असतात.
2Het ijzer wordt uit stof genomen, en uit steen wordt koper gegoten.
2लोक जमिनीतून लोखंड काढतात. दगडांमधून तांबे वितळवले जाते.
3Het einde, dat God gesteld heeft voor de duisternis, en al het uiterste onderzoekt hij; het gesteente der donkerheid en der schaduw des doods.
3मजूर गुहेत दिवा नेतात. ते गुहेत अगदी खोलवर शोध घेतात. ते अगदी खोल अंधारात दगडांचा शोध घेतात.
4Breekt er een beek door, bij dengene, die daar woont, de wateren vergeten zijnde van den voet, worden van den mens uitgeput, en gaan weg.
4ते अशुध्द धातूचा शोध घेत घेत अगदी खोलवर जातात. लोकांच्या राहाण्याच्या जागेपासून ते खूप लांबवर आणि खोलवर जातात. जिथे आजपर्यंत कोणीही गेला नसेल तिथे ते जातात. ते दोरीला लोंबकळत इतरांपेक्षा खूप खोल जातात.
5Uit de aarde komt het brood voort, en onder zich wordt zij veranderd, alsof zij vuur ware.
5वरच्या जमिनीत धान्य उगवते. परंतु जमिनीच्या खाली काही वेगळेच असते, धातू शुध्द असतो अगदी अग्नीत वितळवल्यासारखा.
6Haar stenen zijn de plaats van den saffier, en zij heeft stofjes van goud.
6जमिनीच्या खाली इंद्रनील मणी आणि शुध्द सोन्याचे दाणे असतात.
7De roofvogel heeft het pad niet gekend, en het oog der kraai heeft het niet gezien.
7रानटी पक्ष्यांना भूपृष्ठाखालील वाटांविषयी काही माहिती नसते. कुठल्याही बहिरी ससाण्याने त्या अंधारवाटा पाहिलेल्या नसतात.
8De jonge hoogmoedige dieren hebben het niet betreden, de felle leeuw is daarover niet heengegaan.
8रानटी जनावरे त्या वाटांवरुन गेलेली नसतात. सिंहही त्या वाटेने गेलेला नसतो.
9Hij legt zijn hand aan de keiachtige rots, hij keert de bergen van den wortel om.
9मजूर अगदी कठीण खडक खोदतात. ते मजूर डोंगर पोखरतात आणि त्यांना बोडके करतात.
10In de rotsstenen houwt hij stromen uit, en zijn oog ziet al het kostelijke.
10मजूर खडकातून बोगदा खणतात आणि खडकातला खजिना बघतात.
11Hij bindt de rivier toe, dat niet een traan uitkomt, en het verborgene brengt hij uit in het licht.
11पाणी अडवण्यासाठी मजूर धरण बांधतात. ते दडलेल्या वस्तू बाहेर प्रकाशात आणतात.
12Maar de wijsheid, van waar zal zij gevonden worden? En waar is de plaats des verstands?
12“पण माणसाला शहाणपण कुठे मिलेल? समजूतदारपणा शोधण्यासाठी आपल्याला कुठे जावे लागेल?
13De mens weet haar waarde niet, en zij wordt niet gevonden in het land der levenden.
13शहाणपण किती मोलाचे आहे ते आपल्याला कळत नाही. पृथ्वीवरचे लोक जमीन खणून शहाणपण शोधू शकत नाहीत.
14De afgrond zegt: Zij is in mij niet; en de zee zegt: Zij is niet bij mij.
14महासागर म्हणतो, ‘माझ्याजवळ शहाणपण नाही.’ सागर म्हणतो, ‘माझ्याजवळीही ते नाही.’
15Het gesloten goud kan voor haar niet gegeven worden, en met zilver kan haar prijs niet worden opgewogen.
15तुम्ही शुध्द सोने देऊन शहाणपण विकत घेऊ शकत नाही. ते विकत घेण्यासाठी जगात तेवढी चांदी नाही.
16Zij kan niet geschat worden tegen fijn goud van Ofir, tegen den kostelijken Schoham, en den Saffier.
16तुम्ही ओफिरच्या सोन्याने किंवा मौल्यवान शोहमच्या खड्याने वा नीलमण्याने शहाणपण विकत घेऊ शकत नाही.
17Men kan het goud of het kristal haar niet gelijk waarderen; ook is zij niet te verwisselen voor een kleinood van dicht goud.
17शहाणपण सोन्यापेक्षा किंवा स्फटिकापेक्षा मौल्यवान असते. सोन्यात जडवलेले मौल्यवान खडेही शहाणपण विकत घेऊ शकत नाही.
18De Ramoth en Gabisch zal niet gedacht worden; want de trek der wijsheid is meerder dan der Robijnen.
18शहाणपण पोवळ्यापेक्षा वा स्फटिकापेक्षाही मौल्यवान आहे. माणकापेक्षा ही त्याचे मोल अधिक आहे.
19Men kan de Topaas van Morenland haar niet gelijk waarderen; en bij het fijn louter goud kan zij niet geschat worden.
19इथिओपियातले पीत स्फटिक शहाणपणापेक्षा अधिक मौल्यवान नाहीत. शुध्द सोन्याने तुम्ही तो विकत घेऊ शकत नाही.
20Die wijsheid dan, van waar komt zij, en waar is de plaats des verstands?
20“मग शहाणपणा कुठून येतो? समजूतदारपणा आपल्याला कुठे मिळेल?
21Want zij is verholen voor de ogen aller levenden, en voor het gevogelte des hemels is zij verborgen.
21पृथ्वीवरील सर्व जिवंत प्राण्यापासून शहाणपण लपवून ठेवले आहे. आकाशातले पक्षीसुध्दा ते बघू शकत नाहीत.
22Het verderf en de dood zeggen: Haar gerucht hebben wij met onze oren gehoord.
22मृत्यू आणि विनाश म्हणतात, ‘आम्हाला शहाणपण सापडले नाही. आम्ही त्याबद्दलच्या फक्त अफवाच ऐकल्या आहेत.’
23God verstaat haar weg, en Hij weet haar plaats.
23“फक्त देवालाच शहाणपणाकडे नेणारा मार्ग माहीत आहे. फक्त देवालाच तो कुठे आहे ते माहीत आहे.
24Want Hij schouwt tot aan de einden der aarde, Hij ziet onder al de hemelen.
24देवाला पृथ्वीचे अगदी शेवटचे टोकसुध्दा दिसू शकते. त्याला आकाशाखालचे सर्व काही दिसते.
25Als Hij den wind het gewicht maakte, en de wateren opwoog in mate;
25देवाने वाऱ्याला त्यांची शक्ती दिली. सागराला किती मोठे करायचे ते त्यानेच ठरवले.
26Als Hij den regen een gezette orde maakte, en een weg voor het weerlicht der donderen;
26पावसाला कोठे पाठवायचे ते त्यानेच ठरवले आणि वादळाने कुठे जायचे तेही त्यानेच ठरवले.
27Toen zag Hij haar, en vertelde ze; Hij schikte ze, en ook doorzocht Hij ze.
27त्याच वेळी देवाला शहाणपण दिसले आणि त्याने त्याचा विचार केला. शहाणपणाचे मूल्य किती आहे ते त्याने जोखले आणि त्या शहाणपणाला संमती दिली.
28Maar tot den mens heeft Hij gezegd: Zie, de vreze des HEEREN is de wijsheid, en van het kwade te wijken is het verstand.
28आणि देव लोकांना म्हणाला, “परमेश्वराची भीती बाळगा व त्याला मान द्या तेच शहाणपण आहे. वाईट गोष्टी करु नका तोच समजूतदारपणा आहे.”