1Daarna opende Job zijn mond, en vervloekte zijn dag.
1नंतर ईयोबने आपले तोंड उघडले आणि आपल्या जन्मदिवसाला शाप दिला. इयोब आपल्या जन्मदिवसाला शाप देतो
2Want Job antwoordde en zeide:
2[This verse may not be a part of this translation]
3De dag verga, waarin ik geboren ben, en de nacht, waarin men zeide: Een knechtje is ontvangen;
3[This verse may not be a part of this translation]
4Diezelve dag zij duisternis; dat God naar hem niet vrage van boven; en dat geen glans over hem schijne;
4तो दिवस काळाकुटृ झाला असता, देवाला त्याचे विस्मरण झाले असते, त्या दिवशी उजेड पडला नसता तर फार बरे झाले असते.
5Dat de duisternis en des doods schaduw hem verontreinigen; dat wolken over hem wonen; dat hem verschrikken de zwarte dampen des dags!
5तो दिवस मृत्यूसारखा काळा होवो. ढगही त्या दिवशी लपले असते आणि काळ्या ढगांनी प्रकाशाला घाबरवले असते तर बरे झाले असते असे मला वाटते.
6Diezelve nacht, donkerheid neme hem in; dat hij zich niet verheuge onder de dagen des jaars; dat hij in het getal der maanden niet kome!
6अंधाराने त्या रात्रीला ठेवून घ्यावे. दिनदर्शिकेतून ती रात्र नष्ट होवो. तिचा अंर्तभाव कुठल्याही महिन्यात होऊ नये.
7Ziet, diezelve nacht zij eenzaam; dat geen vrolijk gezang daarin kome;
7त्या रात्रीतून काहीही निर्माण होऊ नये. आनंददायी आवाज त्या रात्री ऐकू न येवोत.
8Dat hem vervloeken de vervloekers des dags, die bereid zijn hun rouw te verwekken;
8जादुगाराने शापवाणी उच्चारावी आणि माझ्या जन्मदिवसाला शापावे. ते लिव्याथानाला चेतविण्यास सदैव तत्पर असतात.
9Dat de sterren van zijn schemertijd verduisterd worden; hij wachte naar het licht, en het worde niet; en hij zie niet de oogleden des dageraads!
9त्या दिवसाचे पहाटेचे तारे काळे होवोत. त्या रात्रीला पहाटेच्या प्रकाशाची वाट बघू दे पण तो प्रकाश कधीही न येवो. सूर्याचे पाहिले किरण तिला कधीही न दिसोत.
10Omdat hij niet toegesloten heeft de deuren mijns buiks, noch verborgen de moeite van mijn ogen.
10का? कारण त्या रात्रीने माझ्या जन्माला अटकाव केला नाही. ही संकटे बघण्यापासून तिने मला परावृत केले नाही.
11Waarom ben ik niet gestorven van de baarmoeder af, en heb den geest gegeven, als ik uit den buik voortkwam?
11मी जन्माला आलो तेव्हाच का मरुन गेलो नाही? मी जन्मत:च का मेलो नाही?
12Waarom zijn mij de knieen voorgekomen, en waartoe de borsten, opdat ik zuigen zou?
12माझ्या आईने मला आपल्या मांडीवर का घेतले? तिने मला स्तनपान का दिले?
13Want nu zou ik nederliggen, en stil zijn; ik zou slapen, dan zou voor mij rust wezen;
13मी जर जन्मत:च मेलो असतो तर आता मी अगदी शांत असतो. पूर्वी होऊन गेलेल्या राजेलोकांच्यात आणि विद्वानांच्यामध्ये मी झोपी गेलो असतो आणि विश्रींती घेतली असती तर किती बरे झाले असते.
14Met de koningen en raadsheren der aarde, die voor zich woeste plaatsen bebouwden;
14त्या लोकांनी आपल्यासाठी प्रासाद आणि शहरे बांधली परंतु आता ती ओसाड आणि उध्वस्त झाली आहेत.
15Of met de vorsten, die goud hadden, die hun huizen met zilver vervulden.
15ज्या राजांनी आपली थडगी वा घरे सोन्या रुप्यांनी भरली त्यांच्या बरोबरच माझेही दफन झाले असते तर बरे झाले असते.
16Of als een verborgene misdracht, zou ik niet zijn; als de kinderkens, die het licht niet gezien hebben.
16मी जन्मत:च मेलेले आणि जमिनीत पुरले गेलेले मूल का झालो नाही? दिवसाच्या प्रकाशाचा किरणही न पाहिलेले मूल मी असतो तर बरे झाले असते.
17Daar houden de bozen op van beroering, en daar rusten de vermoeiden van kracht;
17वाईट लोक थडग्यात गेल्यानंतरच त्रास देण्याचे थांबवितात. आणि जे लोक दमलेले असतात त्यांना थडग्यात विश्रांती मिळते.
18Daar zijn de gebondenen te zamen in rust; zij horen de stem des drijvers niet.
18थडग्यात कैद्यांनाही विसावा मिळतो. तेथे त्यांना रक्षकांचे ओरडणे ऐकू येत नाही.
19De kleine en de grote is daar; en de knecht vrij van zijn heer.
19थडग्यात, स्मशानात अनेक प्रकारचे लोक असतात, लहान थोर सर्व तेथे असतात, गुलामांचीही तेथे आपल्या मालकापासून सुटका होते.
20Waarom geeft Hij den ellendigen het licht, en het leven den bitterlijk bedroefden van gemoed?
20“दु:खी कष्टी लोकांनी का जगत राहायचे? ज्याचा आत्मा कटू आहे अशाला जीवन का द्यायचे?
21Die verlangen naar den dood, maar hij is er niet; en graven daarnaar meer dan naar verborgene schatten;
21ज्याला मरायचे आहे त्याला मरण येत नाही, दु:खी माणूस गुप्त खजिन्यापेक्षा मृत्यूच्या शोधात असतो.
22Die blijde zijn tot opspringens toe, en zich verheugen, als zij het graf vinden;
22ते लोक थडगे दिसल्यावर अधिक सुखी होतील. आपली कबर मिळाली की आनंदी होतील.
23Aan den man, wiens weg verborgen is, en dien God overdekt heeft?
23परंतु देव त्यांचे भविष्य नेहमी गुप्त ठेवतो आणि त्यांच्या भोवती संरक्षक भिंत उभारतो.
24Want voor mijn brood komt mijn zuchting; en mijn brullingen worden uitgestort als water.
24जेव्हा खायची प्यायची वेळ होते तेव्हा मी दु:खाचा नि:श्वास टाकतो सुखाचा नाही! माझ्या तक्रारी, माझे गाऱ्हाणे पाण्यासारखे बाहेर ओतले जाते.
25Want ik vreesde een vreze, en zij is mij aangekomen; en wat ik schroomde, is mij overkomen.
25काहीतरी भयानक घडणार असल्याची मला सतत धास्ती वाटत होती. आणि तेच घडले. जे भयानक घडणार आहे अशी भीती वाटत होती तेच माझ्या बाबतीत घडले.
26Ik was niet gerust; en was niet stil, en rustte niet; en de beroering is gekomen.
26मी शांत होऊ शकत नाही. मी स्वस्थ राहू शकत नाही. मी विसावा घेऊ शकत नाही. मी अतिशय अस्वस्थ आहे.