Dutch Staten Vertaling

Marathi

Job

38

1Daarna antwoordde de HEERE Job uit een onweder, en zeide:
1नंतर परमेश्वर वावटळींतून ईयोबशी बोलला. तो म्हणाला:
2Wie is hij, die den raad verduistert met woorden zonder wetenschap?
2“जो मूर्खासारखा बोलत आहे तो हा अज्ञानी मनुष्य कोण आहे?
3Gord nu, als een man, uw lenden, zo zal Ik u vragen, en onderricht Mij.
3ईयोब, स्वत:ला सावर आणि मी जे प्रश्र विचारतो त्याची उत्तरे द्यायला तयार हो.
4Waar waart gij, toen Ik de aarde grondde? Geef het te kennen, indien gij kloek van verstand zijt.
4“ईयोब, मी पृथ्वी निर्माण केली तेव्हा तू कुठे होतास? तू स्वत:ला इतका शहाणा समजत असशील तर मला उत्तर दे.
5Wie heeft haar maten gezet, want gij weet het; of wie heeft over haar een richtsnoer getrokken?
5तू जर एवढा चलाख असशील तर जग इतके मोठे असावे हे कुणी ठरवले ते सांग. मोजायच्या दोरीने ते कुणी मोजले का?
6Waarop zijn haar grondvesten nedergezonken, of wie heeft haar hoeksteen gelegd?
6पृथ्वीचा पाया कशावर घातला आहे? तिची कोनशिला कुणी ठेवली?
7Toen de morgensterren te zamen vrolijk zongen, en al de kinderen Gods juichten.
7जेव्हा ते घडले तेव्हा पहाटेच्या ताऱ्यांनी गायन केले आणि देवपुत्रांनी आनंदाने जयजयकार केला.
8Of wie heeft de zee met deuren toegesloten, toen zij uitbrak, en uit de baarmoeder voortkwam?
8“ईयोब, जेव्हा समुद्र पृथ्वीच्या पोटातून बाहेर पडला तेव्हा दरवाजे बंद करुन त्याला कुणी अडवला?
9Toen Ik de wolk tot haar kleding stelde, en de donkerheid tot haar windeldoek;
9त्यावेळी मी त्याला मेघांनी झाकले आणि काळोखात गुंडाळले.
10Toen Ik voor haar met Mijn besluit de aarde doorbrak, en zette grendel en deuren;
10मी समुद्राला मर्यादा घातल्या आणि त्याला कुलुपांनी बंद केलेल्या दरवाजाबाहेर थोपविले.
11En zeide: Tot hiertoe zult gij komen, en niet verder, en hier zal hij zich stellen tegen den hoogmoed uwer golven.
11मी समुद्राला म्हणालो, ‘तू इथपर्यंतच येऊ शकतोस या पलिकडे मात्र नाही. तुझ्या उन्मत्त लाटा इथेच थांबतील.’
12Hebt gij van uw dagen den morgenstond geboden? Hebt gij den dageraad zijn plaats aangewezen;
12“ईयोब, तुझ्या आयुष्यात तू कधीतरी पहाटेला आरंभ करायला आणि दिवसाला सुरु व्हायला सांगितलेस का?
13Opdat hij de einden der aarde vatten zou; en de goddelozen uit haar uitgeschud zouden worden?
13ईयोब, तू कधी तरी पहाटेच्या प्रकाशाला पृथ्वीला पकडून दुष्ट लोकांना त्यांच्या लपायच्या जागेतून हुसकायला सांगितलेस का?
14Dat zij veranderd zou worden gelijk zegelleem, en zij gesteld worden als een kleed?
14पहाटेच्या प्रकाशात डोंगरदऱ्या नीट दिसतात. दिवसाच्या प्रकाशात ह्या जगाचा आकार अंगरख्याला असलेल्या घडीप्रमाणे ठळक दिसतात. ओल्या मातीवर उमटलेल्या ठशाप्रमाणे त्या जागा दिसतात.
15En dat van de goddelozen hun licht geweerd worde, en de hoge arm worde gebroken?
15दुष्ट लोकांना दिवसाचा प्रकाश आवडत नाही. प्रकाश दैदीप्यमान असतो तेव्हा त्यांना त्यांच्या वाईट गोष्टी करता येत नाहीत.
16Zijt gij gekomen tot aan de oorsprongen der zee, en hebt gij in het onderste des afgronds gewandeld?
16“ईयोब, सागराला जिथे सुरुवात होते तिथे अगदी खोल जागेत तू कधी गेला आहेस का? समुद्राच्या तळात तू कधी चालला आहेस का?
17Zijn u de poorten des doods ontdekt, en hebt gij gezien de poorten van de schaduw des doods?
17ईयोब, मृत्युलोकात नेणारे दरवाजे तू कधी पाहिलेस का? काळोख्या जगात नेणारे दरवाजे तू कधी बघितलेस का?
18Zijt gij met uw verstand gekomen tot aan de breedte der aarde? Geef het te kennen, indien gij dit alles weet.
18ईयोब, ही पृथ्वी किती मोठी आहे ते तुला कधी समजले का? तुला जर हे सर्व माहीत असेल तर मला सांग.
19Waar is de weg, daar het licht woont? En de duisternis, waar is haar plaats?
19“ईयोब, प्रकाश कुठून येतो? काळोख कुठून येतो?
20Dat gij dat brengen zoudt tot zijn pale, en dat gij merken zoudt de paden zijns huizes?
20ईयोब, तू प्रकाशाला आणि काळोखाला ते जिथून आले तेथे परत नेऊ शकशील का? तिथे कसे जायचे ते तुला माहीत आहे का?
21Gij weet het, want gij waart toen geboren, en uw dagen zijn veel in getal.
21ईयोब, तुला या सर्व गोष्टी नक्कीच माहीत असतील. तू खूप वृध्द आणि विद्वान आहेस मी तेव्हा या गोष्टी निर्माण केल्या तेव्हा तू जिवंत होतास होय ना?”
22Zijt gij gekomen tot de schatkameren der sneeuw, en hebt gij de schatkameren des hagels gezien?
22“ईयोब, मी ज्या भांडारात हिम आणि गारा ठेवतो तिथे तू कधी गेला आहेस का?
23Dien Ik ophoude tot den tijd der benauwdheid, tot den dag des strijds en des oorlogs!
23मी बर्फ आणि गारांचा साठा संकटकाळासाठी, युध्द आणि लढाईच्या दिवसांसाठी करुन ठेवतो.
24Waar is de weg, daar het licht verdeeld wordt, en de oostenwind zich verstrooit op de aarde?
24ईयोब, सूर्य उगवतो त्या ठिकाणी तू कधी गेला आहेस का? पूर्वेकडचा वारा जिथून सर्व जगभर वाहातो तिथे तू कधी गेला आहेस का?
25Wie deelt voor den stortregen een waterloop uit, en een weg voor het weerlicht der donderen?
25जोरदार पावसासाठी आकाशात पाट कोणी खोदले? गरजणाऱ्या वादळासाठी कुणी मार्ग मोकळा केला?
26Om te regenen op het land, waar niemand is, op de woestijn, waarin geen mens is;
26वैराण वाळवंटात देखील कोण पाऊस पाडतो?
27Om het woeste en het verwoeste te verzadigen, en om het uitspruitsel der grasscheutjes te doen wassen.
27निर्जन प्रदेशात पावसाचे खूप पाणी पडते आणि गवत उगवायला सुरुवात होते.
28Heeft de regen een vader, of wie baart de druppelen des dauws?
28ईयोब, पावसाला वडील आहेत का? दवबिंदू कुठून येतात?
29Uit wiens buik komt het ijs voort, en wie baart den rijm des hemels?
29हिमाची आई कोण आहे? आकाशातून पडणाऱ्या हिमकणास कोण जन्म देतो?
30Als met een steen verbergen zich de wateren, en het vlakke des afgrond wordt omvat.
30पाणी दगडासारखे गोठते. सागराचा पृष्ठभागदेखील गोठून जातो.
31Kunt gij de liefelijkheden van het Zevengesternte binden, of de strengen des Orions losmaken?
31“ईयोब, तू कृत्तिकांना बांधून ठेवू शकशील का? तुला मृगशीर्षाचे बंध सोडता येतील का?
32Kunt gij de Mazzaroth voortbrengen op haar tijd, en den Wagen met zijn kinderen leiden?
32ईयोब, तुला राशीचक्र योग्यवेळी आकाशात आणता येईल का? किंवा तुला सप्तर्षीना त्यांच्या समूहासह मार्ग दाखवता येईल का?
33Weet gij de verordeningen des hemels, of kunt gij deszelfs heerschappij op de aarde bestellen?
33ईयोब, तुला आकाशातील नियम माहीत आहेत का? तुला त्याच नियमांचा पृथ्वीवर उपयोग करता येईल का?
34Kunt gij uw stem tot de wolken opheffen, opdat een overvloed van water u bedekke?
34“ईयोब, तुला मेघावर ओरडून त्यांना तुझ्यावर वर्षाव करायला भाग पाडता येईल का?
35Kunt gij de bliksemen uitlaten, dat zij henenvaren, en tot u zeggen: Zie, hier zijn wij?
35तुला विद्युतलतेला आज्ञा करता येईल का? ती तुझ्याकडे येऊन. ‘आम्ही आलो आहोत काय आज्ञा आहे?’ असे म्हणेल का? तुझ्या सांगण्याप्रमाणे ती तुला हवे तिथे जाईल का?
36Wie heeft de wijsheid in het binnenste gezet? Of wie heeft den zin het verstand gegeven?
36“ईयोब, लोकांना शहाणे कोण बनवतो? त्यांच्यात अगदी खोल शहाणपण कोण आणतो?
37Wie kan de wolken met wijsheid tellen, en wie kan de flessen des hemels nederleggen?
37ईयोब, ढग मोजण्याइतका विद्वान कोण आहे? त्यांना पाऊस पाडायला कोण सांगतो?
38Als het stof doorgoten is tot vastigheid, en de kluiten samenkleven?
38त्यामुळे धुळीचा चिखल होतो आणि धुळीचे लोट एकमेकास चिकटतात.
39
39“ईयोब, तू सिंहासाठी अन्न शोधून आणतोस का? त्यांच्या भुकेल्या पिल्लांना तू अन्न देतोस का?
40
40ते सिंह त्यांच्या गुहेत झोपतात. ते गवतावर दबा धरुन बसतात आणि भक्ष्यावर तुटून पडतात.
41
41ईयोब, डोंब कावळ्याला कोण अन्न देतो? जेव्हा त्याची पिल्ले देवाकडे याचना करतात आणि अन्नासाठी चारी दिशा भटकतात तेव्हा त्यांना कोण अन्न पुरवितो?