1Heeft niet de mens een strijd op de aarde, en zijn zijn dagen niet als de dagen des dagloners?
1ईयोब म्हणाला: “मनुष्याला पृथ्वीवर खूप धडपड करावी लागते. त्याचे आयुष्य मजुराच्या आयुष्यासारखे असते.
2Gelijk de dienstknecht hijgt naar de schaduw, en gelijk de dagloner verwacht zijn werkloon;
2गुलामाप्रमाणे माणसालाही उन्हातान्हात काम केल्यानंतर थंडगार सावलीची गरज भासते. माणूस काम केल्यानंतर पगाराच्या दिवसाची वाट वघणान्या मजुराप्रमाणे आहे.
3Alzo zijn mij maanden der ijdelheid ten erve geworden, en nachten der moeite zijn mij voorbereid.
3महिन्या मागून महिने निराशेत निघून गेले. माझ्या वाट्याला रात्रीमागून रात्र कष्टाचीच आली.
4Als ik te slapen lig, dan zeg ik: Wanneer zal ik opstaan, en Hij den avond afgemeten hebben? En ik word zat van woelingen tot aan den schemertijd.
4मी झोपी जाण्याच्या वेळी विचार करतो उठण्यासाठी किती वेळ आहे याचा आणि रात्र संपतच नाही. सूर्य उगवेपर्यंत मी या कुशीवरुन त्या कुशीवर तळमळत असतो.
5Mijn vlees is met het gewormte en met het gruis des stofs bekleed; mijn huid is gekliefd en verachtelijk geworden.
5माझे शरीर किड्यांनी आणि घार्णीनी भरलेले आहे. माझी कातडी सोलवटलेली आणि वाहत्या जखमांनी भरलेली आहे.
6Mijn dagen zijn lichter geweest dan een weversspoel, en zijn vergaan zonder verwachting.
6“माझे दिवस विणकऱ्याच्या मागापेक्षा भरभर जातात आणि माझे आयुष्य आशेशिवाय संपते.
7Gedenk, dat mijn leven een wind is; mijn oog zal niet wederkomen, om het goede te zien.
7देवा, माझे आयुष्य म्हणजे केवळ श्र्वास आहे हे आठव. मी पुन्हा कधीही काही चांगले पाहणार नाही.
8Het oog desgenen, die mij nu ziet, zal mij niet zien; uw ogen zullen op mij zijn; maar ik zal niet meer zijn.
8आणि तुम्ही मला पुन्हा कधीही पाहणार नाही. तुम्ही मला शोधाल तेव्हा मी गेलेला असेन.
9Een wolk vergaat en vaart henen; alzo die in het graf daalt, zal niet weder opkomen.
9ढग दिसेनासा होतो आणि निघून जातो. त्याचप्रमाणे माणूस मरतो आणि थडग्यात पुरला जातो. तो पुन्हा कधीही परत येत नाही.
10Hij zal niet meer wederkeren tot zijn huis, en zijn plaats zal hem niet meer kennen.
10तो त्याच्या जुन्या घरात कधीही परत येणार नाही. त्याचे घर त्याला ओळखणार नाही.
11Zo zal ik ook mijn mond niet wederhouden, ik zal spreken in benauwdheid mijns geestes; ik zal klagen in bitterheid mijner ziel.
11“तेव्हा मी गप्प बसणार नाही. मी बोलेन. माझ्या आत्म्याला क्लेश होत आहेत. माझा आत्मा अगदी कडू जहर झाला आहे म्हणून मी तक्रार करीन.
12Ben ik dan een zee, of walvis, dat Gij om mij wachten zet?
12देवा, तू माझ्यावर पाहारा का करीत आहेस? मी समुद्र आहे की त्यातला अक्राळ विक्राळ प्राणी?
13Wanneer ik zeg: Mijn bedstede zal mij vertroosten, mijn leger zal van mijn klacht wat wegnemen;
13माझे अंथरुणच मला स्वस्थता देऊ शकेल. माझा बिछानाच मला विश्रांती आणि स्वास्थ्य देईल.
14Dan ontzet Gij mij met dromen, en door gezichten verschrikt Gij mij;
14पण देवा, मी जेव्हा स्वस्थ पडतो तेव्हा तू मला भयानक स्वप्नांनी घाबरवतोस. आणि तुझ्या दृष्टांतांनी मला भय वाटते.
15Zodat mijn ziel de verworging kiest; den dood meer dan mijn beenderen.
15म्हणून जगण्यापेक्षा गुदमरुन मरणे मी पसंत करतो.
16Ik versmaad ze, ik zal toch in der eeuwigheid niet leven; houd op van mij, want mijn dagen zijn ijdelheid.
16मी माझ्या जीवनाचा तिरस्कार करतो. मी आशा सोडून दिली आहे. मला जगण्याची आसक्ती नाही. मला एकटा सोडून दे. माझ्या जीवनाला काही अर्थ नाही.
17Wat is de mens, dat Gij hem groot acht, en dat Gij Uw hart op hem zet?
17देवा, माणूस तुला इतका महत्वाचा वाटतो? तू त्याला इतका आदर का दाखवावास? तू त्याची दखल तरी का घेतोस?
18En dat Gij hem bezoekt in elken morgenstond; dat Gij hem in elken ogenblik beproeft?
18तू त्याला रोज सकाळी का भेटतोस? आणि क्षणाक्षणाला त्याची परीक्षा का घेतोस?
19Hoe lang keert Gij U niet af van mij, en laat niet van mij af, totdat ik mijn speeksel inzwelge?
19देवा, तू एक क्षणभरही माझ्यावरची तुझी नजर वळवीत नाहीस. तू मला एक क्षणही एकटा सोडीत नाहीस.
20Heb ik gezondigd, wat zal ik U doen, o Mensenhoeder? Waarom hebt Gij mij U tot een tegenloop gesteld, dat ik mijzelven tot een last zij?
20देवा, तू लोकांवर नजर ठेवतोस. मी पाप केले असले तरी मी आता काय करु शकतो? तू मला तुझे लक्ष्य का बनवत आहेस? मी तुझ्यासाठी एक समस्या बनलो आहे का?
21En waarom vergeeft Gij niet mijn overtreding, en doet mijn ongerechtigheid niet weg? Want nu zal ik in het stof liggen; en Gij zult mij vroeg zoeken, maar ik zal niet zijn.
21तू मला माझ्या पापाबद्दल क्षमा का करुन टाकीत नाहीस? मी लवकरच मरेन आणि माझ्या थडग्यात जाईन. तू नंतर माझा शोध घेशील पण मी गेलेला असेन.”