Dutch Staten Vertaling

Marathi

Job

9

1Maar Job antwoordde en zeide:
1मग ईयोब उत्तरा दाखल म्हणाला:
2Waarlijk, ik weet, dat het zo is; want hoe zou de mens rechtvaardig zijn bij God?
2“तू जे काही म्हणत आहेस ते खरे असल्याची जाणीव मला आहे, परंतु देवापुढे माणूस कसा बरोबर ठरेल?
3Zo Hij lust heeft, om met hem te twisten, niet een uit duizend zal hij Hem beantwoorden.
3मनुष्य देवाशी वाद घालू शकत नाही. देव हजार प्रश्र्न विचारु शकतो आणि माणसाला त्याच्या एकाही प्रश्र्नाचे उत्तर देता येत नाही.
4Hij is wijs van hart, en sterk van kracht; wie heeft zich tegen Hem verhard, en vrede gehad?
4देव खूप विद्वान आहे आणि त्याची शक्ती अमर्याद आहे. देवाशी युध्द करु शकणारा माणूस जखमी झाल्याशिवाय कसा राहील?
5Die de bergen verzet, dat zij het niet gewaar worden, Die ze omkeert in Zijn toorn;
5देव क्रोधित झाला की पर्वत हलवतो आणि लोकांना ते कळत देखील नाही.
6Die de aarde beweegt uit haar plaats, dat haar pilaren schudden;
6पृथ्वीचा थरकाप करण्यासाठी देव भूकंप पाठवतो. देव पृथ्वीचा पायाच हलवून टाकतो.
7Die de zon gebiedt, en zij gaat niet op; en verzegelt de sterren;
7देव सूर्याशी बोलू शकतो आणि त्याला उगवू देत नाही. ताऱ्यांनी चमकू नये म्हणून देव त्यांना लपवू शकतो.
8Die alleen de hemelen uitbreidt, en treedt op de hoogten der zee;
8देवाने एकट्याने आकाश निर्माण केले. तो सागराच्या लाटांवर चालतो.
9Die den Wagen maakt, den Orion, en het Zevengesternte, en de binnenkameren van het Zuiden;
9[This verse may not be a part of this translation]
10Die grote dingen doet, die men niet doorzoeken kan; en wonderen, die men niet tellen kan.
10लोकांना न कळणाऱ्या आश्र्चर्यकारक गोष्टीही देवानेच निर्मिल्या. देवाच्या अद्भुत कृत्यांची सीमा नाही.
11Zie, Hij zal voor mij henengaan, en ik zal Hem niet zien; en Hij zal voorbijgaan, en ik zal Hem niet merken.
11देव जेव्हा माझ्या जवळून जातो तेव्हा मी त्याला बघू शकत नाही. तो जातो तरी त्याची महानता माझ्या लक्षात येत नाही.
12Zie, Hij zal roven, wie zal het Hem doen wedergeven? Wie zal tot Hem zeggen: Wat doet Gij?
12देवाने जरी काही घेतले तरी त्याला कोणीही अडवू शकत नाही. ‘तू काय करीत आहेस?’ असे त्याला कुणी विचारु शकत नाही.
13God zal Zijn toorn niet afkeren; onder Hem worden gebogen de hovaardige helpers.
13देव त्याचा क्रोध काबूत ठेवणार नाही. राहाबाचे मदतनीससुध्दा देवाला घाबरतात.”
14Hoeveel te min zal ik Hem antwoorden, en mijn woorden uitkiezen tegen Hem?
14म्हणून मी देवाशी वाद घालू शकत नाही. त्याच्याशी काय बोलावे ते मला सुचणार नाही.
15Denwelken ik, zo ik rechtvaardig ware, niet zou antwoorden; mijn Rechter zal ik om genade bidden.
15मी निष्याप आहे, पण मी त्याला उत्तर देऊ शकणार नाही. मी केवळ माझ्या देवाची कृपादृष्टी मिळावी म्हणून याचना करु शकतो.
16Indien ik roep, en Hij mij antwoordt; ik zal niet geloven, dat Hij mijn stem ter ore genomen heeft.
16मी हाक मारल्यानंतर त्याने ओ दिली तरी तो माझे ऐकतो यावर मी विश्वास ठेवणार नाही.
17Want Hij vermorzelt mij door een onweder, en vermenigvuldigt mijn wonden zonder oorzaak.
17देव मला चिरडण्यासाठी वादळे पाठवील. काहीही कारण नसताना तो मला जखमा देईल.
18Hij laat mij niet toe mijn adem te verhalen; maar Hij verzadigt mij met bitterheden.
18देव मला माझा श्वास परत घेऊ देणार नाही. तो मला अधिक कष्ट देईल.
19Zo het aan de kracht komt, zie, Hij is sterk; en zo het aan het recht komt, wie zal mij dagvaarden?
19मी देवाचा पराभव करु शकत नाही. तो सर्वशक्तिमान आहे. मी त्याला न्यायालयात खेचू शकत नाही आणि त्याला माझ्या बाबतीत न्यायी बनवू शकत नाही. देवाला न्यायालयात नेण्यासाठी बळांचा वापर कोण करेल?
20Zo ik mij rechtvaardig, mijn mond zal mij verdoemen; ben ik oprecht, Hij zal mij toch verkeerd verklaren.
20मी निष्पाप असलो तरी, माझे बोलणेच मला अपराधी बनवते. मी निष्पाप आहे, पण मी बोलल्यावर माझे तोंडच मला अपराधी शाबीत करते.
21Ben ik oprecht, zo acht ik toch mijn ziel niet; ik versmaad mijn leven.
21मी निष्पाप आहे, पण काय विचार करावा ते मला कळत नाही. मी माझ्याच आयुष्याचा धिक्कार करतो.
22Dat is een ding, daarom zeg ik: Den oprechte en den goddeloze verdoet Hij.
22मी स्वत:शीच म्हणतो: ‘सगळ्याच्याच बाबतीत हे घडते. पापी लोकांसारखेच निष्पाप लोकही मरतात. देवच सगळ्यांचे जीवन संपवतो.’
23Als de gesel haastelijk doodt, bespot Hij de verzoeking der onschuldigen.
23काही तरी भयानक घडते आणि निष्पाप माणूस मरतो तेव्हा देव त्याला फक्त हसतो का?
24De aarde wordt gegeven in de hand des goddelozen; Hij overdekt het aangezicht harer rechteren; zo niet, wie is Hij dan?
24एखादा वाईट माणूस सत्ता बळकावतो तेव्हा देव पुढाऱ्यांना जे घडते आहे ते बघण्यापासून दूर ठेवतो का? हे जर खरे असेल तर देव म्हणजे आहे तरी कोण?
25En mijn dagen zijn lichter geweest dan een loper; zij zijn weggevloden, zij hebben het goede niet gezien.
25“माझे दिवस एखाद्या धावपटू पेक्षाही वेगाने धावतात. माझे दिवस उडून जातात आणि त्यात सुखाचा लवलेशही नसतो.
26Zij zijn voorbijgevaren met jachtschepen; gelijk een arend naar het aas toevliegt.
26भूर्जपत्रापासून बनवलेली जहाज जशी वेगात जाते तसे माझे दिवस वेगात सरतात. गरुडाने आपल्या भक्ष्यावर झडप घालावी त्या प्रमाणे माझे दिवस अतिशय वेगात जातात.
27Indien mijn zeggen is: Ik zal mijn klacht vergeten, en ik zal mijn gebaar laten varen, en mij verkwikken;
27“मी जरी म्हणालो, ‘की मी तक्रार करणार नाही, माझे दु:ख विसरेन, मी चेहऱ्यावर हास्य आणेन.
28Zo schroom ik voor al mijn smarten; ik weet, dat Gij mij niet onschuldig zult houden.
28तरी त्यामुळे काहीही बदल होणार नाही. दु:खाचे मला अजूनही भय वाटते.
29Ik zal toch goddeloos zijn; waarom dan zal ik ijdellijk arbeiden?
29मी आधीच अपराधी ठरवला गेलो आहे. मग प्रयत्न तरी कशाला करायचे? मी म्हणतो, ‘विसरुन जा सारे!’
30Indien ik mij wasse met sneeuwwater, en mijn handen zuivere met zeep;
30मी माझे अंग बफर्ाने धुतले आणि हात साबणाने स्वच्छ केले.
31Dan zult Gij mij in de gracht induiken, en mijn klederen zullen van mij gruwen.
31तरीही देव मला घाणीच्या खड्ड्यात ढकलेल. नंतर माझे स्वत:चे कपडे देखील माझा तिरस्कार करतील.
32Want Hij is niet een man, als ik, dien ik antwoorden zou, zo wij te zamen in het gericht kwamen.
32देव माझ्यासारखा माणूस नाही. म्हणूनच मी त्याला उत्तर देऊ शकत नाही. आम्ही न्यायालयात एकमेकांना भेटू शकणार नाही.
33Er is geen scheidsman tussen ons, die zijn hand op ons beiden leggen mocht.
33दोन्ही बाजू ऐकून घेणारा कुणी मध्यस्थ असावा असे मला वाटते. मध्यस्थ आम्हा दोघांना सारख्याच न्यायाने तोलणारा असावा.
34Dat Hij van op mij Zijn roede wegdoe, en dat Zijn verschrikking mij niet verbaasd make;
34देवाच्या शिक्षेची छडी दूर करणारा कुणी असावा असे मला वाटते. त्यामुळे देव मला भीती घालू शकणार नाही.
35Zo zal ik spreken, en Hem niet vrezen; want zodanig ben ik niet bij mij.
35नंतर देवाला न घाबरता मला जे काही म्हणायचे आहे ते मी म्हणू शकेन. परंतु आता मात्र मी तसे करु शकत नाही.