Dutch Staten Vertaling

Marathi

Judges

6

1Maar de kinderen Israels deden, dat kwaad was in de ogen des HEEREN; zo gaf hen de HEERE in de hand der Midianieten, zeven jaren.
1नंतर पुन्हा इस्राएल लोकांनी परमेश्वराने निषिध्द म्हणून सांगितलेल्या गोष्टी केल्या. तेव्हा परमेश्वराने मिद्यानच्या लोकांच्या अंमलाखाली त्यांना सलग सात वर्षे ठेवले.
2Als nu de hand der Midianieten sterk werd over Israel, maakten zich de kinderen Israels, vanwege de Midianieten, de holen, die in de bergen zijn, en de spelonken, en de vestingen.
2मिद्यानचे लोक बलशाली होतेच, पण इस्राएल लोकांशी क्रौर्यानेही वागत. तेव्हा इस्राएल लोकांनी लपून बसण्यासाठी डोंगरांमध्ये गुहा केल्या. गुहांमध्ये आणि दुर्गम अशा ठिकाणी ते अन्नधान्य ठेवत.
3Want het geschiedde, als Israel gezaaid had, zo kwamen de Midianieten op, en de Amalekieten, en die van het oosten kwamen ook op tegen hen.
3कारण मिद्यानी आणि पूर्वेकडील अमालेकी वारंवार त्यांच्या पिकांची नासधूस करत.
4En zij legerden zich tegen hen, en verdierven de opkomst des lands, tot daar gij komt te Gaza; en zij lieten geen leeftocht overig in Israel, noch klein vee, noch os, noch ezel.
4ते या प्रदेशात तळ देत आणि इस्राएल लोकांनी पेरलेल्या पिकांचा नाश करत. थेट गज्जा पर्यंतच्या जमिनीतील उत्पन्नाची वाट लावली. त्यामुळे इस्राएल लोकांसाठी काहीच शिल्लक राहिले नाही. शेव्व्यामेंढ्या, गुरेढोरे, गाढवे देखील त्यांना राहिली नाहीत.
5Want zij kwamen op met hun vee en hun tenten; zij kwamen gelijk de sprinkhanen in menigte, dat men hen en hun kemelen niet tellen kon; en zij kwamen in het land, om dat te verderven.
5आपला कुटुंब कबिला आणि जनावरे यांच्या सकट मिद्यानी लोकांनी येऊन तेथे तळ ठोकला. टोळधाडीसारखे ते घुसले. ते लोक व त्यांचे उंट यांची संख्या अक्षरश: अगाणित होती. त्यांनी या प्रदेशात येऊन त्याची नासधूस करायला सुरुवात केली.
6Alzo werd Israel zeer verarmd, vanwege de Midianieten. Toen riepen de kinderen Israels tot den HEERE.
6त्यामुळे इस्राएल लोक कंगाल झाले. त्यांनी मदतीसाठी परमेश्वराच्या नावाने आक्रोश करायला सुरुवात केली.
7En het geschiedde, als de kinderen Israels tot den HEERE riepen, ter oorzake van de Midianieten;
7मिद्यानी लोकांच्या छळणुकीमुळे इस्राएल लोकांनी परमेश्वराचा धावा केला.
8Zo zond de HEERE een man, die een profeet was, tot de kinderen Israels; die zeide tot hen: Alzo zegt de HEERE, de God Israels: Ik heb u uit Egypte doen opkomen, en u uit het diensthuis uitgevoerd;
8तेव्हा परमेश्वराने एका संदेष्ट्याला त्यांच्याकडे पाठवले. तो संदेष्टा इस्राएल लोकांना म्हणाला, “इस्राएलच्या परमेश्वर देवाचे म्हणणे असे आहे. “मिसरमध्ये तुम्ही गुलाम होता. तेथून मी तुम्हाला सोडवून बाहेर आणले.
9En Ik heb u verlost van de hand der Egyptenaren, en van de hand van allen, die u drukten; en Ik heb hen voor uw aangezicht uitgedreven, en u hun land gegeven;
9मिसरच्या समर्थ लोकांपासून तुमची सुटका केली. नंतर कनानी लोकांनी तुम्हाला जाच केला. पुन्हा मी तुम्हाला वाचवले. त्यांना मी तो देश सोडायला लावला, आणि त्यांची भूमी तुम्हाला दिली.’
10En Ik zeide tot ulieden: Ik ben de HEERE, uw God; vreest de goden der Amorieten niet, in welker land gij woont; maar gij zijt Mijner stem niet gehoorzaam geweest.
10मग मी तुम्हाला सांगितले, “मी तुमचा देव परमेश्वर आहे. तुम्ही अमोरी लोकांच्या देशात राहाल पण त्यांच्या दैवतांची उपासना करु नका.’ पण तुम्ही माझे ऐकले नाही.”
11Toen kwam een Engel des HEEREN, en zette Zich onder den eik, die te Ofra is, welke aan Joas, den Abi-ezriet, toekwam; en zijn zoon Gideon dorste tarwe bij de pers, om die te vluchten voor het aangezicht der Midianieten.
11याच सुमाराला गिदोन नावाच्या माणसाकडे परमेश्वराचा दूत आला. आणि अफ्रा येथे योवाशच्या मालकीच्या ओक वृक्षाखाली बसला. योवाश अबियेजरच्या कुळातील होता. गिदोन योवाशचा मुलगा होता. गिदोन द्राक्षकुंडात गव्हाची झोडणी करत होता. परमेश्वराचा दूत गिदोनच्या शेजारी बसला. गिदोन मिद्यानांपासून गहू लपवून ठेवत होता.
12Toen verscheen hem de Engel des HEEREN, en zeide tot hem: De HEERE is met u, gij strijdbare held!
12त्याला दर्शन देऊन परमेश्वराचा दूत म्हणाला, “हे वीरा, परमेश्वर तुझ्याबरोबर असो.”
13Maar Gideon zeide tot Hem: Och, mijn Heer! zo de HEERE met ons is, waarom is ons dan dit alles wedervaren? en waar zijn al Zijn wonderen, die onze vaders ons verteld hebben, zeggende: Heeft ons de HEERE niet uit Egypte opgevoerd? Doch nu heeft ons de HEERE verlaten, en heeft ons in der Midianieten hand gegeven.
13तेव्हा गिदोन म्हणाला, “परमेश्वर आमच्याबरोबर आहे तर मग आमच्यावर ही वेळ का यावी? आमच्या पूर्वजांसाठी त्याने मोठे चमत्कार केले असे ऐकले आहे. परमेश्वराने आमच्या पूर्वजांना मिसरमधून सोडवले असे ते सांगतात. पण परमेश्वराने तर आमची साथ सोडली आहे. मिद्यानी लोकांच्या तावडीत आम्ही सापडलो आहोत.”
14Toen keerde zich de HEERE tot hem, en zeide: Ga heen in deze uw kracht, en gij zult Israel uit der Midianieten hand verlossen; heb Ik u niet gezonden?
14मग परमेश्वर गिदोनकडे वळला व म्हणाला, “तुझ्या शक्तीचा वापर कर मिद्यानी लोकांपासून इस्राएल लोकांची सोडवणूक कर. त्यांना वाचवण्यासाठी मी तुला पाठवत आहे.”
15En hij zeide tot Hem: Och, mijn Heer! waarmede zal ik Israel verlossen? Zie, mijn duizend is het armste in Manasse, en ik ben de kleinste in mijns vaders huis.
15पण गिदोन उत्तरादाखल म्हणाला, “मला क्षमा कर कारण मी इस्राएल लोकांना कसा काय वाचवू शकणार? मनश्शेच्या वंशात सगव्व्यात दुबळे माझे कूळ आहे आणि मी घरातला सर्वात धाकटा”
16En de HEERE zeide tot hem: Omdat Ik met u zal zijn, zo zult gij de Midianieten slaan, als een enigen man.
16तेव्हा परमेश्वर गिदेनला म्हणाला, “मी तुझ्या बरोबर आहे तू मिद्यानी लोकांचा पराभव करू शकशील आपण एकाच माणसाशी लढत आहोत असे तुला वाटेल.”
17En hij zeide tot Hem: Indien ik nu genade gevonden heb in Uw ogen, zo doe mij een teken, dat Gij het zijt, Die met mij spreekt.
17गिदोन परमेश्वराला म्हणाला, “तुझी माझ्यावर कृपादृष्टी असली तर तू खरोखरच परमेश्वर असल्याची मला खात्री पटवून दे.
18Wijk toch niet van hier, totdat ik tot U kome, en mijn geschenk uitbrenge, en U voorzette. En Hij zeide: Ik zal blijven, totdat gij wederkomt.
18आणि कृपा करून येथेच थांब. तुला अर्पण करायला मी भेट घेऊन येतो. तोपर्यंत येथून निघून जाऊ नको.” तेव्हा परमेश्वर म्हणाला, “तू परत येईपर्यंत मी थांबतो.
19En Gideon ging in, en bereidde een geitenbokje, en ongezuurde koeken van een efa meels; het vlees legde hij in een korf, en het sop deed hij in een pot; en hij bracht het tot Hem uit, tot onder den eik, en zette het nader.
19मग गिदोन गेला आणि त्याने एक करडू शिजवले. शिवाय, वीस पौंड पीठ घेऊन त्याचे बेखमीर भाकरी केल्या मग शिजवलेले मांस एका टोपलीत आणि त्याचा रस्सा एका पातेल्यात घेतला. मग बेखमीर भाकरींसह ते सर्व अन्न ओक वृक्षाखाली येऊन परमेश्वराला दिले.”
20Doch de Engel Gods zeide tot hem: Neem het vlees en de ongezuurde koeken, en leg ze op dien rotssteen, en giet het sop uit; en hij deed alzo.
20परमेश्वराचा दूत तेव्हा गिदोनला म्हणाला, “ते मांस आणि बेखमीर भाकरी त्या खडकावर ठेव आणि त्यावर रस्सा ओत.” गिदोनने त्याप्रमाणे केले.
21En de Engel des HEEREN stak het uiterste van den staf uit, die in Zijn hand was, en roerde het vlees en de ongezuurde koeken aan; toen ging er vuur op uit de rots, en verteerde het vlees en de ongezuurde koeken. En de Engel des HEEREN bekwam uit zijn ogen.
21परमेश्वराचा दूताच्या हातात एक काठी होती. तिच्या टोकाने त्याने मांसाला व बेखमीर भाकरींना स्पर्श केला. तत्क्षणी खडकातून अग्नी प्रकट झाला. मांस व भाकरी जळून भस्मसात झाले आणि परमेश्वराचा दूत अदृश्य झाला.
22Toen zag Gideon, dat het een Engel des HEEREN was; en Gideon zeide: Ach, Heere, HEERE! daarom, omdat ik een Engel des HEEREN gezien heb van aangezicht tot aangezicht.
22तेव्हा गिदोनच्या लक्षात आले की इतका वेळ आपण परमेश्वराच्या दूताशी बोलत होतो. तेव्हा तो चित्कारला, “सर्व शक्तिमान परमेश्वरा! मी परमेश्वराच्या दूताला समोरासमोर पाहिले!”
23Doch de HEERE zeide tot hem: Vrede zij u, vrees niet, gij zult niet sterven.
23तेव्हा परमेश्वर त्याला म्हणाला, “शांत हो! घाबरु नकोस. तू मरणार नाहीस.”
24Toen bouwde Gideon aldaar den HEERE een altaar, en noemde het: De HEERE is vrede! het is nog tot op dezen dag in Ofra der Abi-ezrieten.
24त्याठिकाणी गिदोनने परमेश्वराच्या उपासनेसाठी वेदी बांधली. तिचे नाव “परमेश्वर म्हणजे शांती” असे ठेवेले अफ्रा येथे ही वेदी अजूनही आहे. अफ्रा म्हणजे अबियेजेर कुटुंबाचे वसतिस्थान आहे.
25En het geschiedde in dienzelven nacht, dat de HEERE tot hem zeide: Neem een var van de ossen, die van uw vader zijn, te weten, den tweeden var, van zeven jaren; en breek af het altaar van Baal, dat van uw vader is, en houw af het bos, dat daarbij is.
25त्याच रात्री परमेश्वर गिदोनशी बोलला. तो म्हणाला, “तू तुझ्या वडीलांचा, सात वर्षाचा पूर्ण वाढलेला बैल घे. तुझ्या वडीलांनी बआल या खोट्या दैवताची वेदी बांधली आहे. तिच्या शेजारी लाकडी स्तंभही आहे. अशेरा या देवीच्या सन्मानार्थ तो आहे. बैलाकरवी तू तुझ्या वडीलांच्या मालकीची ती वेदी नष्ट कर आणि अशेरा स्तंभाची मोडतोड कर.
26En bouw den HEERE, uw God, een altaar, op de hoogte dezer sterkte, in een bekwame plaats; en neem den tweeden var, en offer een brandoffer met het hout der hage, die gij zult hebben afgehouwen.
26मग परमेश्वर देवासाठी योग्य अशा वेदीची उंचवट्यावर उभारणी कर. त्या वेदीवर या बैलाचा बळी देऊन त्याला जाळ. या यज्ञापर्णासाठी अशेरा स्तंभाच्या लाकडांचा वापर कर.”
27Toen nam Gideon tien mannen uit zijn knechten, en deed, gelijk als de HEERE tot hem gesproken had. Doch het geschiedde, dewijl hij zijns vaders huis en de mannen van die stad vreesde, van het te doen bij dag, dat hij het deed bij nacht.
27तेव्हा आपल्या दहा सेवकांच्या मदतीने गिदोनने परमेश्वराच्या सांगण्याप्रमाणे केले. त्याने ते केले खरे पण घरातील आणि नगरातील माणसे बघतील या भीतीने हे काम त्याने दिवसाढवव्व्या न करता रात्री केले.
28Als nu de mannen van die stad des morgens vroeg opstonden, ziet, zo was het altaar van Baal omgeworpen, en de haag, die daarbij was, afgehouwen, en die tweede var was op het gebouwde altaar geofferd.
28सकाळी लोक उठून बघतात तर बआलची वेदी उध्वस्त झोलेली! वेदीच्या शेजारचा अशेरा स्तंभ मोडून पडलेला. गिदोनने बांधलेली वेदी आणि तिच्यावर अर्पण केलेल्या बैलालाही त्यांनी पाहिले.
29Zo zeiden zij, de een tot de ander: Wie heeft dit stuk gedaan? En als zij onderzochten en navraagden, zo zeide men: Gideon, de zoon van Joas, heeft dit stuk gedaan.
29नगरातील लोक मग एकमेकांना विचारू लागले. “आपली वेदी कोणी पाडली? आपला अशेरा स्तंभ कोणी मोडला? या नवीन वेदीवर बैलाचे यज्ञार्पण कोणी केले?” असे अनेक प्रश्न ते आपले कुतूहल शमवायला विचारु लागले. कोणीतरी त्यांना सांगितले, “योवाशचा मुलगा गिदोन याने हे केले आहे.”
30Toen zeiden de mannen van die stad tot Joas: Breng uw zoon uit, dat hij sterve, omdat hij het altaar van Baal heeft omgeworpen, en omdat hij de haag, die daarbij was, afgehouwen heeft.
30तेव्हा नगरवासी योवाशकडे येऊन त्याला म्हणाले, “तुझ्या मुलाला बाहेर आण. त्याने बआल वेदीची आणि तिच्या शेजारच्या अशेरा स्तंभाची मोडतोड केलेली आहे. तेव्हा त्याला मृत्युदंड दिलाच पाहिजे.”
31Joas daarentegen zeide tot allen, die bij hem stonden: Zult gij voor den Baal twisten; zult gij hem verlossen? Die voor hem zal twisten, zal nog dezen morgen gedood worden! Indien een hij god is, hij twiste voor zichzelven, omdat men zijn altaar heeft omgeworpen.
31तेव्हा भोवतालच्या जमावाला योवाश म्हणाला, “तुम्ही बआलाची बाजू घेणार का? त्याला तारणार का? जो बआलाची बाजू घेईल त्याला सकाळपर्यंत मृत्युदंड दिला जावा. बआल जर खरा देव असेल तर जेव्हा लोक वेदीची मोडतोड करायचा प्रयत्न करतील तेव्हा स्वत:चे रक्षण त्याने स्वत:च करुन दाखवावे.”
32Daarom noemde hij hem te dien dage Jerubbaal, zeggende: Baal twiste tegen hem, omdat hij zijn altaar heeft omgeworpen.
32योवाश पुढे म्हणाला, “जर गिदोनने बआलच्या वेदीचा विध्वंस केला आहे तर बआलाच त्याच्याशी वाद करु द्या.” त्या दिवसापासून योवाशने गिदोनला नवे नाव दिले ते म्हणजे यरुब्बाल.
33Alle Midianieten nu, en Amalekieten, en de kinderen van het oosten, waren samenvergaderd, en zij trokken over, en legerden zich in het dal van Jizreel.
33मिद्यानी, अमालेकी आणि पूर्वेकडील इतर लोक एकत्र येऊन इस्राएल लोकांविरुध्द लढण्यास सज्ज झाले. यार्देन पलीकडे जाऊन त्यांनी एज्रीलच्या खोऱ्यात तळ दिला.
34Toen toog de Geest des HEEREN Gideon aan, en hij blies met de bazuin, en de Abi-ezrieten werden achter hem bijeengeroepen.
34गिदोनच्या ठायी परमेश्वराच्या आत्म्याचा संचार झाला आणि गिदोन सामर्ध्यवान बनला. अबियेजर कुटुंबातील लोकांना आपल्या मागोमाग येण्याचे आवाहन करण्यासाठी त्याने रणशिंग फुंकले.
35Ook zond hij boden in gans Manasse, en die werden ook achter hem bijeengeroepen; desgelijks zond hij boden in Aser, en in Zebulon, en in Nafthali; en zij kwamen op, hun tegemoet.
35मनश्शेच्या वंशातील सर्व लोकांकडे त्याने दूत रवाना केले. दूतांनी त्या लोकांना शस्त्रास्त्रे घेऊन युध्दासाठी सज्ज राहायला सांगितले. आशेर, जबुलून आणि नफताली यांच्या कडेही गिदोनने आपल्या दूतांकरवी असाच निरोप पाठवला. तेव्हा तेही सर्व लोक गिदोनला येऊन मिळाले.
36En Gideon zeide tot God: Indien Gij Israel door mijn hand zult verlossen, gelijk als Gij gesproken hebt;
36मग गिदोन परमेश्वराला म्हणाला, “माझ्या हातून तू इस्राएल लोकांना वाचवणार आहेस, याची मला साक्ष पटव.
37Zie, ik zal een wollen vlies op den vloer leggen; indien er dauw op het vlies alleen zal zijn, en droogte op de ganse aarde, zo zal ik weten, dat Gij Israel door mijn hand zult verlossen, gelijk als Gij gesproken hebt.
37मी आता खव्व्यात कातरलेली लोकर ठेवतो. सर्व जमीन कोरडी राहून फक्त लोकरीवर दव पडलेले आढळले तर मला समजेल की इस्राएल लोकांचा बचाव करण्यासाठी म्हटल्याप्रमाणे तू माझा उपयोग करणार आहेस.”
38En het geschiedde alzo; want hij stond des anderen daags vroeg op, en drukte het vlies uit, en hij wrong den dauw uit het vlies, een schaal vol waters.
38आणि नेमके तसेच घडले. गिदोन दुसऱ्या दिवशी भल्या पहाटे उठला आणि त्याने लोकर दाबून पाहिली तर त्यातून वाटीभर पाणी निघाले.
39En Gideon zeide tot God: Uw toorn ontsteke niet tegen mij, dat ik alleenlijk ditmaal spreke; laat mij toch alleenlijk ditmaal met het vlies verzoeken; er zij toch droogte op het vlies alleen, en op de ganse aarde zij dauw.
39ते पाहून गिदोन परमेश्वराला म्हणाला, “माझ्यावर रागवू नको. मला आणखी एक गोष्ट विचारू दे. लोकरीद्वारे मला आणखी एकदा तुझी परीक्षा घ्यायची आहे. ह्या वेळी आजूबाजूची जमीन दवाने भिजलेली असताना लोकर मात्र कोरडी राहू दे.”
40En God deed alzo in denzelven nacht; want de droogte was op het vlies alleen, en op de ganse aarde was dauw.
40परमेश्वराने त्या रात्री तसेच करुन दाखवले. फक्त लोकर तेवढी कोरडी राहून भोवतालची जमीन दवाने ओली झाली होती.