1En Jezus, vol des Heiligen Geestes, keerde wederom van de Jordaan, en werd door den Geest geleid in de woestijn;
1येशू पवित्र आत्म्याने पूर्ण भरुन यार्देन नदीहून परतला. मग आत्म्याने त्याला अरण्यात नेले.
2En werd veertig dagen verzocht van den duivel; en at gans niet in die dagen, en als dezelve geeindigd waren, zo hongerde Hem ten laatste.
2तेथे सैतानाने त्याला चाळीस दिवस मोहात टाकले. त्या दिवसांत येशूने काहीही खाल्ले नाही. जेव्हा ती वेळ संपली, तेव्हा येशूला भूक लागली.
3En de duivel zeide tot Hem: Indien Gij Gods Zoon zijt, zeg tot dezen steen, dat hij brood worde.
3सैतान त्याला म्हणाला, “जर तू देवाचा पुत्र आहेस, तर या दगडांची भाकर करुन दाखव.”
4En Jezus antwoordde hem, zeggende: Er is geschreven, dat de mens bij brood alleen niet zal leven, maar bij alle woord Gods.
4येशून त्याला उत्तर दिले, “असे लिहिले आहे: “मनुष्य फक्त भाकरीनेच जगेल असे नाही.”‘ अनुवाद 8:3
5En als Hem de duivel geleid had op een hogen berg, toonde hij Hem al de koninkrijken der wereld, in een ogenblik tijds.
5मग सैतान त्याला वर घेऊन गेला. आणि एका क्षणात जगातील सर्व राज्ये त्याला दाखविली.
6En de duivel zeide tot Hem: Ik zal U al deze macht, en de heerlijkheid derzelver koninkrijken geven; want zij is mij overgegeven, en ik geef ze, wien ik ook wil;
6सैतान त्याला म्हणाला, “मी तुला या सर्व राज्याचे अधिकार व गौरव देईन कारण ते मला दिलेले आहे. आणि मी माझ्या मर्जीनुसार ते देऊ शकतो.
7Indien Gij dan mij zult aanbidden, zo zal het alles Uw zijn.
7जर तू माझी उपसना करशील, तर हे सर्व तुझे होईल.”
8En Jezus, antwoordende, zeide tot hem: Ga weg van Mij, satan, want er is geschreven: Gij zult den Heere, uw God, aanbidden, en Hem alleen dienen.
8येशूने उत्तर दिले, पवित्र शास्त्रात असे लिहिले आहे: “तू प्रभु तुझा देव याचीच उपासना केली पाहिजे, आणि फक्त त्याचीच सेवा केली पाहिजे.”‘ अनुवाद 6:13
9En hij leidde Hem naar Jeruzalem, en stelde Hem op de tinne des tempels, en zeide tot Hem: Indien Gij de Zoon Gods zijt, werp Uzelven van hier nederwaarts;
9नंतर त्याने त्याला यरुशलेमाला नेले. आणि मंदिराच्या उंच टोकावर त्याला उभे केले. आणि तो म्हणाला, “जर तू देवाचा पुत्र आहेस तर येथून खाली उडी मार!
10Want er is geschreven, dat Hij Zijn engelen van U bevelen zal, dat zij U bewaren zullen;
10असे लिहिले आहे: “तो मुझे संरक्षण करण्याची देवादूतांना आज्ञा करील.’ स्तोत्र. 91;11 आणि असेही लिहीले आहे:
11En dat zij U op de handen nemen zullen, opdat Gij Uw voet niet te eniger tijd aan een steen stoot.
11“ते तुला आपल्या हातावर उचलून धरतील, त्यामुळे तुझा पाय दगडावर आपटणार नाही.”‘ स्तोत्र. 91:12
12En Jezus, antwoordende, zeide tot hem: Er is gezegd: Gij zult den Heere, uw God, niet verzoeken.
12येशून उत्तर दिले. “पवित्र शास्त्रत असेही म्हटले आहे, “तु प्रभु, तुझा देव याची परीक्षा पाहू नकोस.”‘ अनुवाद 6:16
13En als de duivel alle verzoeking voleindigd had, week hij van Hem voor een tijd.
13म्हणून सैतानाने प्रत्येक प्रकारे भुरळ घालण्याचे संपविल्यावर, योग्य वेळ येईपर्यंत तो येशूला सोडून गेला.
14En Jezus keerde wederom, door de kracht des Geestes, naar Galilea; en het gerucht van Hem ging uit door het gehele omliggende land.
14मग आत्म्याच्या सामर्थ्यात येशू गालीलास परतला आणि त्याच्याविषयीची बातमी सगळीकडे पसरली.
15En Hij leerde in hun synagogen, en werd van allen geprezen.
15त्याने त्यांच्या सभास्थानात शिकविले, आणि सर्वांनी त्याची स्तुति केली.
16En Hij kwam te Nazareth, daar Hij opgevoed was, en ging, naar Zijn gewoonte, op den dag des sabbats in de synagoge; en stond op om te lezen.
16मग तो नासरेथला गेला. जेथे तो लहानाचा मोठा झाला होता, आणि शब्बाथ दिवशी त्याच्या प्रथेप्रमाणे तो सभास्थानात गेला, तो वाचण्यासाठी उभा राहिला,
17En Hem werd gegeven het boek van den profeet Jesaja; en als Hij het boek opengedaan had, vond Hij de plaats, daar geschreven was;
17आणि यशया संदेष्ट्याचे पुस्तक त्याला देण्यात आले. त्याने ते पुस्तक उघडले आणि जो भाग शोधून काढला, त्या ठिकाणी असे लिहिले आहे:
18De Geest des Heeren is op Mij, daarom heeft Hij Mij gezalfd; Hij heeft Mij gezonden, om den armen het Evangelie te verkondigen, om te genezen, die gebroken zijn van hart;
18“प्रभूचा आत्मा मजवर आहे, कारण त्याने मला अभिषेक केला आहे, यासाठी की, गरिबांना सुवार्ता सांगण्यासाठी बंदीवान म्हणून नेलेल्यांस स्वातंत्र्याची घोषणा करण्यासाठी, आंधळ्यांना दृष्टि मिळावी व त्यांनी बघावे यासाठी, जुलूूम होणाऱ्यांची सुटका करण्यासाठी
19Om den gevangenen te prediken loslating, en den blinden het gezicht, om de verslagenen heen te zenden in vrijheid; om te prediken het aangename jaar des Heeren.
19आणि प्रभूच्या कृपेच्या वर्षाची घोषणा करण्यासाठी त्याने मला पाठविले आहे.” यशया 61:1-2
20En als Hij het boek toegedaan en den dienaar wedergegeven had, zat Hij neder; en de ogen van allen in de synagoge waren op Hem geslagen.
20मग त्याने पुस्तक बंद केले आणि सेवकाला परत दिले व तो खाली बसला. सभास्थानातील प्रत्येक जण त्याच्याकडे रोखून पाहत होता.
21En Hij begon tot hen te zeggen: Heden is deze Schrift in uw oren vervuld.
21त्यांने त्यांच्याशी बोलण्यास सुरुवात केली: “तुमच्या ऐकण्यामुळे आज हे शास्त्रवचन पूर्ण झाले.”
22En zij gaven Hem allen getuigenis, en verwonderden zich over de aangename woorden, die uit Zijn mond voortkwamen; en zeiden: Is deze niet de Zoon van Jozef?
22तेव्हा प्रत्येकाने त्याच्याविषयी चांगले उद्गार काढले. आणि त्याच्या मुखातून येणाऱ्या कृपेच्या शब्दांबद्दल ते आश्चर्यचकित झाले. आणि ते म्हणाले, “हा योसेफाचाच मुलगा नव्हे काय?”
23En Hij zeide tot hen: Gij zult zonder twijfel tot Mij dit spreekwoord zeggen: Medicijnmeester, genees Uzelven; al wat wij gehoord hebben, dat in Kapernaum geschied is, doe dat ook hier in Uw vaderland.
23तो त्यांना म्हणाला, “अर्थात, तुम्ही मला ही म्हण लागू कराल; ‘वैद्या, स्वत:ला बरे कर.’ कफर्णहूमात ज्या गोष्टी तू केल्याचे आम्ही ऐकले त्या गोष्टी तुझ्या स्वत:च्या गावातसुद्धा कर.” मग तो म्हणाला,
24En Hij zeide: Voorwaar Ik zeg u, dat geen profeet aangenaam is in zijn vaderland.
24“मी तुम्हांला खरे सांगतो, कोणीही संदेष्टा त्याच्या स्वत:च्या गावात स्वीकारला जात नाही.
25Maar Ik zeg u in der waarheid: Er waren vele weduwen in Israel in de dagen van Elias, toen de hemel drie jaren en zes maanden gesloten was, zodat er grote hongersnood werd over het gehele land.
25मी तुम्हांला खरे सांगतो, इस्राएलात एलीयाच्या काळात पुष्कळ विधवा होत्या, जेव्हा साडेतीन वर्षेपर्यंत पाऊस पडला नाही आणि सर्व प्रदेशात मोठा दुष्काळ पडला होता
26En tot geen van haar werd Elias gezonden, dan naar Sarepta Sidonis, tot een vrouw, die weduwe was.
26तरीही एलीयाला इतर कोणत्याही विधवेकडे पाठविण्यात आले नाही. त्याला सिदोन प्रांतातील सारफथ येथील विधवेकडेच पाठविण्यात आले.
27En er waren vele melaatsen in Israel, ten tijde van den profeet Elisa; en geen van hen werd gereinigd, dan Naaman, de Syrier.
27अलीशा संदेष्ट्याच्या वेळेस इस्राएलात अनेक कुष्ठरोगी होते परंतु त्यापैकी कोणीही शुद्ध झाला नाही. केवळ सूरीया येथील नामान कुष्ठरोग्यालाच शुद्ध करण्यात आले होते.”
28En zij werden allen in de synagoge met toorn vervuld, als zij dit hoorden.
28जेव्हा सभास्थानातील लोकांनी हे ऐकले, तेव्हा ते फार रागावले.
29En opstaande, wierpen zij Hem uit, buiten de stad, en leidden Hem op den top des bergs, op denwelken hun stad gebouwd was, om Hem van de steilte af te werpen.
29ते लोक उठले आणि त्यांनी त्याला (येशूला) शहराबाहेर घालवून दिले आणि ज्या टेकडीवर त्यांचे गाव वसले होते, त्या टेकडीच्या कड्याकडे त्याला ढकलून देण्यासाठी घेऊन गेले.
30Maar Hij, door het midden van hen doorgegaan zijnde, ging weg.
30परंतु तो त्यांच्यातून निघून आपल्या वाटेने गेला.
31En Hij kwam af te Kapernaum, een stad van Galilea, en leerde hen op de sabbatdagen.
31नंतर तो गालीलातील कफर्णहूम गावी गेला. तो त्यांना शब्बाथ दिवशी शिक्षण देत असे.
32En zij versloegen zich over Zijn leer, want Zijn woord was met macht.
32ते त्याच्या शिकवणीने आश्चर्यचकित झाले, कारण तो अधिकारवाणीने शिकवीत असे.
33En in de synagoge was een mens, hebbende een geest eens onreinen duivels; en hij riep uit met grote stemme,
33सभास्थानात एक मनुष्या होता, त्याच्यात अशुद्ध आत्मा होता.
34Zeggende: Laat af, wat hebben wij met U te doen, Gij Jezus Nazarener? Zijt Gij gekomen, om ons te verderven? Ik ken U, wie Gij zijt, namelijk de Heilige Gods.
34तो मोठ्याने ओरडून म्हणाला, “हे नासरेथच्या येशू, तुला आमच्याकडून काय पाहिजे? तू आमचा नाश करावयास आला आहेस काय? तू कोण आहेस हे मला माहीत आहे: देवाचा पवित्र तोच तू आहेस.”
35En Jezus bestrafte hem, zeggende: Zwijg stil, en ga van hem uit. En de duivel, hem in het midden geworpen hebbende, voer van hem uit, zonder hem iets te beschadigen.
35येशूने त्याला दटावले आणि म्हटले, “शांत राहा आणि त्याच्यातून नीघ!” तेव्हा त्या अशुद्ध आत्म्याने त्या मनुष्याला जमिनीवर खाली ढकलले व त्या माणसाला काहीही इजा न करता तो बाहेर आला.
36En er kwam een verbaasdheid over allen; en zij spraken samen tot elkander, zeggende: Wat woord is dit, dat Hij met macht en kracht den onreinen geesten gebiedt, en zij varen uit?
36सर्व जण आश्चर्यचकित झाले व एकमेकांशी बोलू लागले, “हे कोणत्या प्रकारचे शब्द आहेत? अधिकाराने आणि सामर्थ्याने तो अशुद्ध आत्म्यांना आज्ञा करतो व ते बाहेर येतात.”
37En het gerucht van Hem ging uit in alle plaatsen des omliggenden lands.
37अशा प्रकारे त्या भागात त्याच्याविषयी सगळीकडे ही बातमी पसरली.
38En Jezus, opgestaan zijnde uit de synagoge, ging in het huis van Simon; en Simons vrouws moeder was met een grote koorts bevangen, en zij baden Hem voor haar.
38येशू सभास्थानातून निघून शिमोनाच्या घरी गेला. शिमोनाची सासू अति तापाने आजारी होती. त्यांनी येशूला तिला बरे करण्याविषयी विनविले.
39En staande boven haar, bestrafte Hij de koorts, en de koorts verliet haar; en zij van stonde aan opstaande, diende henlieden.
39येशू तिच्याजवळ उभा राहिला. त्याने तापाला आज्ञा दिली व ताप निघाला. ती ताबडतोब उठली आणि त्यांची सेवा करु लागली.
40En als de zon onderging, brachten allen, die kranken hadden, met verscheidenen ziekten bevangen, die tot Hem, en Hij legde een iegelijk van hen de handen op, en genas dezelve.
40सूर्य मावळतीला जात असताना, ज्यांची माणसे निरनिराळ्या रोगांनी आजारी होती त्या सर्वांना लोकांनी त्याच्याकडे आणले. प्रत्येकाच्या डोक्यावर हात ठेवून त्याने त्यांना बरे केले.
41En er voeren ook duivelen uit van velen, roepende en zeggende: Gij zijt de Christus, de Zone Gods! En hen bestraffende, liet Hij die niet spreken, omdat zij wisten, dat Hij de Christus was.
41कित्येकांमधून अशुद्ध आत्मे बाहेर आले. ते अशुद्ध आत्मे ओरडत होते आणि म्हणत होते, “तू देवाचा पुत्र आहेस.” परंतु त्याने त्यांना दटावले व बोलू दिले नाही कारण त्यांना माहीत होते की, तो ख्रिस्त आहे.
42En als het dag werd, ging Hij uit, en trok naar een woeste plaats; en de scharen zochten Hem, en kwamen tot bij Hem, en hielden Hem op, dat Hij van hen niet zou weggaan.
42जेव्हा दिवस उगवला तेव्हा तो एकांत स्थळी गेला. पण लोक त्याला शोधत होते. तो जेथे होता तेथे ते लगेच आले. आणि त्याने त्यांच्यातून निघून जाऊ नये म्हणून प्रयत्न केले.
43Maar Hij zeide tot hen: Ik moet ook anderen steden het Evangelie van het Koninkrijk Gods verkondigen; want daartoe ben Ik uitgezonden.
43तेव्हा तो त्यांना म्हणाला, “देवाच्या राज्याची सुवार्ता मला इतर गावांमध्येही सांगितली पाहिजे. कारण याच कारणासाठी मला पाठविले आहे.”
44En Hij predikte in de synagogen van Galilea.
44आणि तो यहूदियाच्या वेगवेगळ्या सभास्थानात उपदेश करीत होता.