1Dit nu zijn de priesters en de Levieten, die met Zerubbabel, den zoon van Sealthiel, en Jesua, optogen: Seraja, Jeremia, Ezra,
1यहुदाच्या प्रदेशात परत आलेले याजक व लेवी पुढीलप्रमाणे: शल्तीएलचा मुलगा जरूब्बाबेल आणि येशूवा यांच्याबरोबर ते आले. त्यांच्या नावांची यादी अशी: सराया, यिर्मया, एज्रा,
2Amarja, Malluch, Hattus,
2अमऱ्या, मललूख हत्तूश,
3Sechanja, Rehum, Meremoth,
3शखन्या, रहूम मरेमोथ,
4Iddo, Ginnethoi, Abia,
4इद्दो, गिन्नथोई, अबीया,
5Mijamin, Maadja, Bilga,
5मियामीन, माद्या, बिलगा,
6Semaja, en Jojarib, Jedaja,
6शमया, योयरीब, यदया.
7Sallu, Amok, Hilkia, Jedaja; dat waren de hoofden der priesteren, en hun broederen, in de dagen van Jesua.
7सल्लू आमोक, हिल्कीया, यदया, हे लोक येशूवाच्या कारकिर्दीत, याजक आणि त्यांचे नातलग यांचे प्रमुख होते.
8En de Levieten waren: Jesua, Binnui, Kadmiel, Serebja, Juda, Matthanja; hij en zijn broederen waren over de dankzeggingen.
8लेवी असे: येशूवा, बिन्नुइ, कदमीएल, शेरेब्या, यहूदा, आणि मत्तन्या, हे लोक तसेच मत्तन्याचे नातेवाईक देवाच्या स्तुतिस्तोत्रांचे प्रमुख होते.
9En Bakbukja, en Unni, hun broederen, waren tegen hen over in de wachten.
9बकबुक्या आणि उन्नी हे या लेव्यांचे नातलग होते. देवाच्या स्तुतिउपासनेच्या वेळी हे दोघे त्यांच्या पलीकडे उभे राहात.
10Jesua nu gewon Jojakim, en Jojakim gewon Eljasib, en Eljasib gewon Jojada,
10येशूवा योयाकीमचा पिता. योयाकीम एल्याशीबाचा जन्मदाता. एल्याशीबाचा मुलगा योयादा.
11En Jojada gewon Jonathan, en Jonathan gewon Jaddua.
11योयादाने योनाथानला जन्म दिला आणि योनाथानने यद्दवाला.
12En in de dagen van Jojakim waren priesters, hoofden der vaderen: van Seraja was Meraja; van Jeremia, Hananja;
12योयाकीमच्या काळात याजकांच्या घराण्यांचे मुख्य असलेले लोक पुढील प्रमाणे: सरायाच्या घराण्याचा प्रमुख मराया. यिर्मयाच्या घराण्याचा प्रमुख हनन्या
13Van Ezra, Mesullam; van Amarja, Johanan;
13एज्राच्या घराण्याचा प्रमुख मशुल्लाम. अमऱ्याच्या घराण्याचा प्रमुख यहोहानान.
14Van Melichu, Jonathan; van Sebanja, Jozef;
14मल्लूखीच्या घराण्याचा प्रमुख योनाथान शबन्याच्या घराण्याचा प्रमुख योसेफ
15Van Harim, Adna; van Merajoth, Helkai;
15हरिमच्या घराण्याचा प्रमुख अदना. मरामोथच्या घराण्याचा प्रमुख हेलकइ.
16Van Iddo, Zacharia; van Ginnethon, Mesullam;
16हद्दोच्या घराण्याचा प्रमुख जखऱ्या. गिन्नथोनच्या घराण्याचा प्रमुख मशुल्लाम.
17Van Abia, Zichri; van Minjamin, van Moadja, Piltai;
17अबीयाच्या घराण्याचा प्रमुख जिख्री. मिन्यामिन आणि मोवद्या यांच्या घराण्याचा प्रमुख पिल्तय.
18Van Bilga, Sammua; van Semaja, Jonathan;
18बिलगाच्या घराण्याचा प्रमुख शम्मूवा शमयाच्या घराण्याचा प्रमुख यहोनाथान.
19En van Jojarib, Matthenai; van Jedaja, Uzzi;
19योयारीबच्या घराण्याचा प्रमुख मत्तनय. यदयाच्या घराण्याचा प्रमुख उज्जी.
20Van Sallai, Kallai; van Amok, Heber;
20सल्लयाच्या घराण्याचा प्रमुख कल्लय आमोकच्या घराण्याचा प्रमुख एबेर
21Van Hilkia, Hasabja; van Jedaja, Nethaneel.
21हिल्कीयाच्या घराण्याचा प्रमुख हशब्या यदायाच्या घराण्याचा प्रमुख नथनेल.
22Van de Levieten werden in de dagen van Eljasib, Jojada, en Johanan, en Jaddua, de hoofden der vaderen beschreven; mitsgaders de priesteren, tot het koninkrijk van Darius, den Perziaan.
22एल्याशीब, योयादा, योहानान व यद्दवा यांच्या दिवसात ज्या लेव्यांच्या आणि याजकांच्या घराण्यांचे प्रमुख होते त्यांची नावे पारसी राजा दारयावेश याच्या कारकिर्दीत लिहून ठेवलेली आहेत.
23De kinderen van Levi, de hoofden der vaderen, werden beschreven in het boek der kronieken, tot de dagen van Johanan, den zoon van Eljasib, toe.
23लेवी घराण्यातील वंशजांच्या कुटुंबप्रमुखांची नावे एल्याशीबचा मुलगा योहानान याच्या काळापर्यत इतिहासाच्या पुस्तकात लिहिलेली आहेत.
24De hoofden dan der Levieten waren Hasabja, Serebja, en Jesua, de zoon van Kadmiel, en hun broederen tegen hen over, om te prijzen en te danken, naar het gebod van David, den man Gods, wacht tegen wacht.
24लेव्यांचे प्रमुख असे होते: हशब्या, शेरेब्या, कदमीएलचा मुलगा येशूवा, आणि त्यांचे भाऊ देवाची गौरव गीते आणि स्तोत्रे गाण्यासाठी हे भाऊ त्यांच्या पलीकडे उभे राहात. एक समूह दुसऱ्या समूहाला प्रत्युत्तर करी. देवाचा माणूस दावीद याची तशीच आज्ञा होती.
25Matthanja en Bakbukja, Obadja, Mesullam, Talmon en Akkub, waren poortiers, de wacht waarnemende bij de schatkamers der poorten.
25दरवाजांच्या पलीकडच्या कोठारांवर पहारे करणाऱ्या द्वारपालांची नावे अशी: मत्तन्या, बकबुक्या, ओबद्या, मशुल्लाम, तल्मोन अक्कूब,
26Dezen waren in de dagen van Jojakim, den zoon van Jesua, den zoon van Jozadak, en in de dagen van Nehemia, den landvoogd, en van den priester Ezra, den schriftgeleerde.
26हे द्वारपाल योचाकीमच्या कारकिर्दीत सेवेत होते. योयाकीम हा येशूवाचा मुलगा आणि येशूवा योसादाकचा. नहेम्या हा राज्यपाल आणि एज्रा हा याजक व लेखक यांच्याच काळात हे द्वारपाल होते.
27In de inwijding nu van Jeruzalems muur, zochten zij de Levieten uit al hun plaatsen, dat zij hen te Jeruzalem brachten, om de inwijding te doen met vreugde, en met dankzeggingen, en met gezang, cimbalen, luiten, en met harpen.
27यरुशलेमची तटबंदीची भिंत लोकांनी अर्पण केली. त्यांनी सर्व लेव्यांना यरुशलेमला एकत्र आणले. यरुशलेमची भिंत अर्पण करायच्या समारंभासाठी हे लेवी आपापल्या गावांहून आले. देवाची स्तुतिगीते आणि धन्यवादगीते गाण्यासाठी ते आले. त्यांनी झांजा, सतार व वीणा ही वाद्ये वाजवली.
28Alzo werden de kinderen der zangers verzameld, zo uit het vlakke veld rondom Jeruzalem, als uit de dorpen van de Netofathieten;
28[This verse may not be a part of this translation]
29En uit het huis van Gilgal, en uit de velden van Geba en Asmaveth; want de zangers hadden zich dorpen gebouwd rondom Jeruzalem.
29[This verse may not be a part of this translation]
30En de priesters en de Levieten reinigden zichzelven; daarna reinigden zij het volk, en de poorten, en den muur.
30नंतर याजक व लेवी यांनी समारंभपूर्वक स्वत:चे शुध्दीकरण केले. त्यानंतर त्यांनी बाकीचे लोक, वेशी, यरुशलेमची भिंत यांनाही शुध्द करण्याचा समारंभ केला.
31Toen deed ik de vorsten van Juda opgaan op den muur; en ik stelde twee grote dankkoren en omgangen, een ter rechterhand op den muur, naar de Mistpoort toe.
31यहुदाच्या नेत्यांना मी वर जाऊन तटबंदीवर थांबायला सांगितले. देवाला धन्यवाद देण्यासाठी गायकांचे दोन मोठे वृंदही मी नेमले. त्यातल्या एका गटाने राखेच्या ढिगाच्या वेशीकडे उजवीकडच्या भिंतीच्या वर जावयाचे होते.
32En achter hen ging Hosaja, en de helft der vorsten van Juda.
32होशया आणि यहुदाचे निम्मे अधिकारी त्यांच्या मागोमाग गेले.
33En Azarja, Ezra, en Mesullam,
33अजऱ्या, एज्रा, मशुल्लाम,
34Juda, en Benjamin, en Semaja, en Jeremia;
34यहूदा, बन्यामीन, शमया, यिर्मया हे ही त्यांच्या पाठोपाठ होते.
35En van de priesters kinderen met trompetten: Zecharja, de zoon van Jonathan, den zoon van Semaja, den zoon van Matthanja, den zoon van Michaja, den zoon van Zakkur, den zoon van Asaf;
35काही याजकही त्यांच्यापाठोपाठ रणशिंग वाजवत भिंतीकडे निघाले. जखऱ्या देखील त्यांच्या मागे निघाला. (जखऱ्या योनाथानचा मुलगा, योनाथान शमयाचा मुलगा, शमया मत्तन्याचा, मत्तन्या मिखाचा, मिखाचा जक्कूरचा आणि जक्कूर आसाफचा मुलगा)
36En zijn broeders, Semaja, en Azareel, Milalai, Gilalai, Maai, Nethaneel, en Juda, Hanani, met muziekinstrumenten van David, den man Gods; en Ezra, de schriftgeleerde, ging voor hun aangezicht heen.
36आसाफचे भाऊ म्हणजे शमया, अजरेल, मिललई, गिललइ, माई नथनेल, यहूदा, हनानी हे ही वाद्ये घेऊन निघाले. ही वाद्ये देवाचा माणूस दावीद याने केली होती. भिंत अर्पण करण्यासाठी जो लोकांचा गट आलेला होता त्यांना एज्रा हा लेखक पुढे घेऊन गेला.
37Voorts naar de Fonteinpoort, en tegen hen over, gingen zij op bij de trappen van Davids stad, door den opgang des muurs, boven Davids huis, tot aan de Waterpoort, tegen het oosten.
37झऱ्याच्या वेशीपाशी ते पोहोंचले. पायऱ्या चढून ते दावीदनगरापर्यंत गेले. नगराच्या तटंबैदीच्या भिंतीवर ते होते. दावीदच्या घरावरुन चालत जाऊन ते पाण्याच्या वेशीकडे गेले.
38Het tweede dankkoor nu ging tegenover, en ik achter hetzelve, met de helft des volks, op den muur, van boven den Bakoventoren, tot aan den breden muur;
38गायकांचा दुसरा गट दुसऱ्या दिशेला, डावीकडे निघाला. भिंतीच्यावर ते पोचेपर्यंत मी त्यांच्या पाठोपाठ होतो. अर्धे लोकही त्यांच्या मागोमाग गेले. भटृयांच्या दुर्गावरुन ते रुंद कोटाकडे गेले.
39En van boven de poort van Efraim, en boven de Oude poort, en boven de Vispoort, en den toren Hananeel, en den toren Mea, tot aan de Schaapspoort, en zij bleven staan in de Gevangenpoort.
39मग ते पुढील वेशींवरुन गेले. एफ्राईमची वेस जुनी वेस, मत्स्य वेस. हनानेलचा दुर्ग आणि शतकाचा दुर्ग यांच्यावरुन ते पुढे गेले. मेंढरांच्या वेशीपर्यंत जाऊन ते पहाऱ्याच्या वेशीजवळ ते थांबले
40Daarna stonden de beide dankkoren in Gods huis; ook ik en de helft der overheden met mij.
40मग गायकांचे दोन्ही समूह देवाच्या मंदिरात आपापल्या जागी गेले. मी माझ्या जागी उभा राहिलो. अधिकाऱ्यांपैकी निम्म्यांनी मंदिरातील आपापल्या जागा घेतल्या.
41En de priesters, Eljakim, Maaseja, Minjamin, Michaja, Eljoenai, Zacharja, Hananja, met trompetten;
41मग पुढील याजक आपापल्या जागी उभे राहिले: एल्याकीम, मासेया, मिन्यामीन, मीखाया, एल्योएनाई, जखऱ्या, हनन्या या याजकांजवळ त्यांचे रणशिंग होते.
42Voorts Maaseja, en Semaja, en Eleazar, en Uzzi, en Johanan, en Malchia, en Elam, en Ezer; ook lieten zich de zangers horen, met Jizrahja, den opziener.
42मग मासेया, शमाया, एलाजार, उज्जी, यहोहानान, मल्खीया, एलाम व एजेर हे याजक मंदिरात आपापल्या जागी उभे राहिले. मग यिज्र ह्याच्या अधिपत्याखाली या दोन्ही गायक गटांनी गायनाला सुरुवात केली.
43En zij offerden deszelven daags grote slachtofferen, en waren vrolijk; want God had hen vrolijk gemaakt met grote vrolijkheid; en ook waren de vrouwen en de kinderen vrolijk; zodat de vrolijkheid van Jeruzalem tot van verre gehoord werd.
43या खास दिवशी याजकांनी बरेच यज्ञ केले. सर्वजण अतिशय आनंदात होते. देवाने सर्वांना आनंदित केले होते. बायका आणि मुलेसुध्दा अतिशय हर्षभरित झाली होती. दूरवरच्या लोकांनाही यरुशलेममधला आनंदाचा जल्लोष ऐकू येत होता.
44Ook werden ten zelfden dage mannen gesteld over de kameren, tot de schatten, tot de hefofferen, tot de eerstelingen en tot de tienden, om daarin uit de akkers der steden te verzamelen de delen der wet, voor de priesteren en voor de Levieten; want Juda was vrolijk over de priesteren en over de Levieten, die daar stonden.
44त्यादिवशी कोठारांवरील लोकांच्या नेमणुका केल्या आपल्या झाडांची पहिली फळे वहिली आणि धान्यातला एकदशांश वाटा लोक घेऊन आले. कोठारप्रमुखांनी या वस्तू कोठारात ठेवल्या. सेवेत असलेले याजक व लेवी यांच्याबद्दल यहुद्यांना अतिशय समाधान होते. म्हणून त्यांनी कोठारात ठेवायला पुष्कळशा गोष्टी आणून दिल्या.
45En de wacht huns Gods waarnamen, en de wacht der reiniging, ook de zangers, en de poortiers, naar het gebod van David en zijn zoon Salomo.
45याजक आणि लेवी यांनी देवासाठी करायची ती सर्व कृत्ये केली. लोकांच्या शुध्दीकरणाचे विधी त्यांनी पार पाडले. गायक व द्वारपाल यांनी आपली कामगिरी बजावली. दावीद आणि शलमोन यांच्या आज्ञेबरहुकूम त्यांनी सर्व यथसांग केले.
46Want in de dagen van David en Asaf, van ouds, waren er hoofden der zangers, en des lofgezangs, en der dankzeggingen tot God.
46(फार पूर्वी, दावीदच्या काळी आसाफ गायकांचा मुख होता. त्याच्याजवळ देवाची स्तुतिगीते आणि धन्यवादगीते पुष्कळ होती.
47Daarom gaf gans Israel, in de dagen van Zerubbabel, en in de dagen van Nehemia, de delen der zangers en der poortiers, van elk dagelijks op zijn dag; en zij heiligden voor de Levieten, en de Levieten heiligden voor de kinderen van Aaron.
47अशाप्रकारे जरुब्बाबेल आणि नहेम्या यांच्या काळांत समस्त इस्राएली लोकांनी गायक आणि द्वारपाल यांच्यासाठी रोजच्या रोज लागेल ते दिले. इतर लेव्यांसाठीही लोकांनी काही रक्कम बाजूला ठेवली. आणि अहरोनच्या वंशजांसाठी (म्हणजेच याजकांसाठी) लेव्यांनी पैसे वेगळे ठेवले.