1Verder sprak de HEERE tot Mozes, zeggende:
1परमेश्वर मोशेला म्हणाला,
2Maak u twee zilveren trompetten; van dicht werk zult gij ze maken; en zij zullen u zijn tot de samenroeping der vergadering, en tot den optocht der legers.
2“चांदीचे दोन घडीव कर्णे बनव. लोकांना एकत्र जमविण्यासाठी आणि तळ कधी हलवावा हे सांगण्यासाठी त्यांचा उपयोग होईल.
3Als zij met dezelve blazen zullen, dan zal de gehele vergadering tot u vergaderd worden, aan de deur van de tent der samenkomst.
3तू जर दोन्ही कर्णे बराच वेळपर्यंत वाजविले तर मग सर्व लोकांनी दर्शन मंडपासमोरील अंगणात जमावे.
4Maar als zij met de ene zullen blazen, dan zullen tot u vergaderd worden de oversten, de hoofden der duizenden van Israel.
4परंतु बराच वेळ एकच कर्णा वाजविला तर मग फकत इस्राएलांच्या बारा वंशाच्या प्रमुखांनीच तुला भेटावयास यावे.
5Als gij met een gebroken geklank blazen zult, dan zullen de legers, die tegen het oosten gelegerd zijn, optrekken.
5“कर्ण्यांचा थोडा गजर झाला म्हणजे लोकांनी आपला तळ हलवावा हे सांगण्याचा तो एक मार्ग होईल. पहिल्याच वेळी जेव्हा तू कर्ण्याचा थोडा गजर करशील तेव्हा दर्शनमंडपाच्या पूर्वेकडील छावण्यातील वंशानी पुढे चालण्यास सुरवात करावी.
6Maar als gij ten tweeden male met een gebroken klank blazen zult, zullen de legers, die tegen het zuiden legeren, optrekken; met een gebroken klank zullen zij blazen tot hun optochten.
6दुसऱ्या वेळी थोडाच वेळ तू कर्णा वाजवशील तेव्हा दक्षिणेकडील छावण्यातील वंशानी पुढे निघण्यास सुरवात करावी.
7Maar in het verzamelen van de gemeente, zult gij blazen, doch geen gebroken geklank maken.
7परंतु विशेष कारणासाठी मंडळी एकत्र जमावावयाची असेल तर कर्णे वेगळ्या प्रकारे म्हणजे एकाच सरळ सारख्याच सुरात वाजवावेत.
8En de zonen van Aaron, de priesters, zullen met die trompetten blazen; en zij zullen ulieden zijn tot een eeuwige inzetting bij uw geslachten.
8फकत अहरोनाच्या याजक असलेल्या मुलांनीच कर्णे वाजवावीत. तुम्हाला पिढ्यान्पिढ्याचा कायमचा विधीनियम आहे.
9En wanneer gijlieden in uw land ten strijde zult trekken tegen den vijand, die u benauwt, zult gij ook met die trompetten een gebroken klank maken; zo zal uwer gedacht worden voor het aangezicht des HEEREN, uws Gods, en gij zult van uw vijanden verlost worden.
9“जर तुम्ही तुमच्या देशातच शत्रूशी लढत असाल, तर त्यांच्याशी लढावयास जाण्यापूर्वी तुम्ही मोठमोठ्याने कर्णे वाजवावेत. परमेश्वर तुमचा कर्ण्यांचा आवाज ऐकेल आणि तो तुमच्या शत्रूपासून तुमचे रक्षण करील.
10Desgelijks ten dage uwer vrolijkheid, en in uw gezette hoogtijden, en in de beginselen uwer maanden, zult gij ook met de trompetten blazen over uw brandofferen, en over uw dankofferen; en zij zullen u ter gedachtenis zijn voor het aangezicht uws Gods; Ik ben de HEERE, uw God!
10तसेच तुम्ही सणाच्या व इतर आनंदाच्या प्रसंगी व नवीन चंद्राच्या दिवशी पौर्णिमेच्या दिवशी किंवा महिन्याच्या पहिल्या दिवशी-तुमची होमार्पणे, शांत्यार्पणे वाहताना तुम्ही कर्णे वाजवावेत; तुमच्या परमेश्वराला तुमची आठवण करुन देण्याचा हा एक विशेष मार्गच आहे; हे तुम्ही करावे अशी मी तुम्हास आज्ञा देतो. मी तुमचा देव परमेश्वर आहे.”
11En het geschiedde in het tweede jaar, in de tweede maand, op den twintigsten van de maand, dat de wolk verheven werd van boven den tabernakel der getuigenis.
11इस्राएल लोकांनी मिसर देश सोडल्यानंतर दुसऱ्या वर्षी दुसऱ्या महिन्याच्या विसाव्या दिवशी कराराचा कोश असलेल्या पवित्र निवास मंडपावरील ढग वर गेला.
12En de kinderen Israels togen op, naar hun tochten, uit de woestijn Sinai; en de wolk bleef in de woestijn Paran.
12तेव्हा इस्राएल लोकांनी आपला प्रवास सुरू केला. त्यांनी सीनायचे रान सोडले आणि ढग पारानाच्या रानात थांवेपर्यंत ते प्रवासकरीत गेले.
13Alzo togen zij vooreerst op, naar den mond des HEEREN, door de hand van Mozes.
13छावणी हलवण्याची इस्राएल लोकांची ही पहिलीच वेळ होती. परमेश्वराने त्यांना मोशेकडून दिलेल्या आज्ञेप्रमाणे त्यांनी हे केले.
14Want vooreerst toog op de banier van het leger der kinderen van Juda, naar hun heiren; en over zijn heir was Nahesson, de zoon van Amminadab.
14यहुदाच्या छावणीतील तीन गट पहिल्याने निघाले. त्यांच्या निशाणा मागे ते चालले. पहिला गट यहुदाच्या कुळाचा होता. अम्मीनादाबाचा मुलगा नहशोन त्यांचा सेनानायक होता.
15En over het heir van den stam der kinderen van Issaschar was Nethaneel, den zoon van Zuar.
15त्यानंतर इस्साखारचे कूळ निघाले. सुवाराचा मुलगा नथनेल त्यांचा नेता होता.
16En over het heir van den stam der kinderen van Zebulon was Eliab, de zoon van Helon.
16आणि मग जबुलूनाचे कूळ निघाले. हेलोनाचा मुलगा अलीयाब त्यांचा नेता होता.
17Toen werd de tabernakel afgenomen, en de zonen van Gerson, en de zonen van Merari togen op, dragende den tabernakel.
17मग पवित्र निवास मंडप उतरविण्यात आला आणि गेर्षोन व मरारी वंशाचे लोक पवित्र निवास मंडप घेऊन निघाले. तेव्हा ह्या वंशाचे लोक नंतरच्या रांगते होते.
18Daarna toog de banier van het leger van Ruben, naar hun heiren; en over zijn heir was Elizur, de zoon van Sedeur.
18त्यानंतर रऊबेन वंशाच्या छावणीतील तीन गट निघाले. लोक त्यांच्या निशानामागे चालले होते. त्यातील पहिला गट रऊबेन कुळाचा होता. शदेयुराचा मुलगा अलीसूर त्यांचा सेनानायक होता.
19En over het heir van den stam der kinderen van Simeon was Selumiel, de zoon van Zurisaddai.
19त्यानंतर शिमोन कुळाचे लोक निघाले. सुरीशदैचा मुलगा शलूमीयेल हा त्यांचा सेनानायक होता.
20En over het heir van den stam der kinderen van Gad was Eljasaf, de zoon van Dehuel.
20नंतर गाद वंशाच्या दलाचे लोक निघाले. रगुवेलाचा मुलगा एल्यासाप त्यांचा सेनानायक होता.
21Toen togen op de Kohathieten, dragende het heiligdom; en de anderen richtten den tabernakel op, tegen dat dezen kwamen.
21मग कहाथी लोक पवित्र स्थानातील पवित्र वस्तू घेऊन निघाले. ते अशावेळी जाऊन पोहोंचले की त्यांच्या येण्याओगोदर इतर लोकांनी पवित्र निवास मंडप उभा करुन तयार ठेवला होता.
22Daarna toog op de banier van het leger der kinderen van Efraim, naar hun heiren; en over het heir was Elisama, de zoon van Ammihud.
22त्यानंतर एफ्राइम वंशाच्या छावणीतील तीन गट निघाले. लोक त्यांच्या निशाणामागे चालले होते. त्यात पहिला गट एफ्राइम कुळाचा होता. अम्मीहूदाचा मुलगा अलीशामा त्यांचा सेनानायक होता.
23En over het heir van den stam der kinderen van Manasse was Gamaliel, de zoon van Pedazur.
23त्यानंतर मनश्शे कुळाचे लोक निघाले. पदाहसुराचा मुलगा गमलीयेल त्यांचा सेनानायक होता.
24En over het heir van den stam der kinderen van Benjamin was Abidan, de zoon van Gideoni.
24मग बन्यामीन कुळाचे लोक निघाले. गिदोनीचा मुलगा अबीदान त्यांचा सेनानायक होता.
25Toen toog op de banier van het leger der kinderen van Dan, samensluitende al de legers, naar hun heiren; en over zijn heir was Ahiezer de zoon van Ammisaddai.
25छावण्यांच्या रागेतील सर्वात शेवटची तीन दले दान वंशाची होती. ती पुढे गेलेल्या दलांचे संरक्षण करणारी पिछाडीची तुकडी होती. तिच्यात पहिले दान कुळाचे लोक होते. ते त्यांच्या निशाणामागे चालले होते. अम्मीशद्दैचा मुलगा अहीएजर त्यांचा सेनानायक होता.
26En over het heir van den stam der kinderen van Aser was Pagiel, de zoon van Ochran.
26त्यानंतर आशेर कुळाचे लोक निघाले. आक्रानाचा मुलगा पगीयेल त्यांचा सेनानायक होता.
27En over het heir van den stam der kinderen van Nafthali was Ahira, de zoon van Enan.
27मग नफताली कुळाचे लोक निघाले. एनानाचा मुलगा अहीरा त्यांचा सेनानायक होता.
28Dit waren de tochten der kinderen Israels, naar hun heiren, als zij reisden.
28इस्राएल लोक ठिक ठिकाणाहून प्रवास करिताना ह्या क्रमाने निघत.
29Mozes nu zeide tot Hobab, den zoon van Rehuel, den Midianiet, den schoonvader van Mozes: Wij reizen naar die plaats, van welke de HEERE gezegd heeft: Ik zal u die geven; ga met ons, en wij zullen u weldoen, want de HEERE heeft over Israel het goede gesproken.
29मोशेचा सासरा रगुवेल ह्याचा मुलगा होबाब ह्याला मोशे म्हणाला, “देवाने आम्हाला वचन दिलेल्या देशात आम्ही जात आहोत. तू आमच्याबरोबर चल. आम्ही तुझ्याशी चांगले वागू; इस्राएल लोकांना उत्तम गोष्टी देण्याचे परमेश्वराने वचन दिले आहे.”
30Doch hij zeide tot hem: Ik zal niet gaan; maar ik zal naar mijn land en naar mijn maagschap gaan.
30परंतु होबाबाने उत्तर दिले, “नाही, मी तुमच्याबरोबर येणार नाही. मला माझ्या देशात व माझ्या लोकात परत गेले पाहिजे.”
31En hij zeide: Verlaat ons toch niet; want dewijl gij weet, dat wij ons legeren in de woestijn, zo zult gij ons tot ogen zijn.
31मग मोशे त्याला म्हणाला, “मी विनंती करितो की तू आम्हाला सोडून जाऊ नको; कारण ह्या रानाची आमच्यापेक्षा तुला अधिक माहिती आहे. तू आमचा वाटाड्या होऊ शकतोस.
32En het zal geschieden, als gij met ons zult gaan, en het goede geschieden zal, waarmede de HEERE bij ons weldoen zal, dat wij u ook weldoen zullen.
32तू आमच्याबरोबर येशील तर परमेश्वर आम्हाला ज्या ज्या चांगल्या गोष्टी देईल त्यात आम्ही तुला वाटा देऊ.”
33Zo togen zij drie dagreizen van den berg des HEEREN; en de ark des verbonds des HEEREN reisde voor hun aangezicht drie dagreizen, om voor hen een rustplaats uit te speuren.
33मग होबाब मान्य झाला. आणि परमेश्वराच्या पर्वतापासून ते प्रवास करीत निघाले. याजकांनी परमेश्वराचा पवित्र कराराचा कोश घेतला व ते लोकांच्यापुढे चालले. मुक्कामासाठी जागा शोधताना तीन दिवस तो पवित्र कोश त्यांनी वाहिला.
34En de wolk des HEEREN was des daags over hen, als zij uit het leger verreisden.
34प्रत्येक दिवशी परमेश्वराचा ढग त्यांच्यावर राहून त्यांना मार्ग दाखवीत असे.
35Het geschiedde nu in het optrekken van de ark, dat Mozes zeide: Sta op, HEERE! en laat Uw vijanden verstrooid worden, en Uw haters van Uw aangezicht vlieden!
35लोक जेव्हा पवित्र कराराचा कोश उचलून मुक्काम हलवीत तेव्हा मोशे म्हणत असे, “हे परमेश्वरा, ऊठ तुझ्या शत्रूंची सर्व दिशांना पांगापांग होवो, तुझे सर्व शत्रू तुजपासून पळून जावोत.”
36En als zij rustte, zeide hij: Kom weder, HEERE! tot de tien duizenden der duizenden van Israel!
36आणि जेव्हा पवित्र कराराचा कोश त्याच्या जागी ठेवला जाई तेव्हा मोशे म्हणत असे, “हे परमेश्वरा, इस्राएलाच्या लाखो लोकांकडे परत ये.”