1Desgelijks in de zevende maand, op den eersten der maand, zult gij een heilige samenroeping hebben; geen dienstwerk zult gij doen; het zal u een dag des geklanks zijn.
1“सातव्या महिन्याच्या पहिल्या दिवशी खास सभा असेल. त्या दिवशी तुम्ही काहीही काम करणार नाही. हा कर्णा वाजवण्याचा दिवस आहे.
2Dan zult gij een brandoffer, ten liefelijken reuk, den HEERE bereiden: een jongen var, een ram, zeven volkomen eenjarige lammeren;
2तुम्ही होमार्पणे द्याल. त्याचा सुवास परमेश्वराला आनंदित करील. तुम्ही एक बैल, एक मेंढा आणि एक वर्षांची सात कोकरे अर्पण करा. ती सर्व दोषरहित असावीत.
3En hun spijsoffer van meelbloem, met olie gemengd; drie tienden tot den var, twee tienden tot den ram.
3तुम्ही 24 कप पीठ तेलात मिसळून बैलाबरोबर, 16 कप पीठ
4En een tiende tot een lam, tot die zeven lammeren toe;
4मेंढ्याबरोबर व आठ कप पीठ प्रत्येक कोकराबरोबर अर्पण कराल.
5En een geitenbok ten zondoffer, om over ulieden verzoening te doen;
5एक बकरासुद्धा पापार्पण म्हणून द्या. त्यामुळे तुम्ही शुद्ध व्हाल.
6Behalve het brandoffer der maand, en zijn spijsoffer, en het gedurig brandoffer, en zijn spijsoffer, met hun drankofferen, naar hun wijze, ten liefelijken reuk, ten vuuroffer den HEERE.
6अमावास्याचे होमार्पण आणि धान्यार्पण ही नेहमीच्या अर्पणांव्यरिरिक्त असतील. आणि ही रोजच्या धान्यार्पणे व पेयार्पणे यांच्या व्यतिरीक्त असतील. हे सर्व नियमाप्रमाणे केले पाहिजे. ही सर्व अग्नीबरोबर करावयाची अर्पणे आहेत. त्यांचा सुवास परमेश्वराला आनंदित करील.
7En op den tienden dezer zevende maand zult gij een heilige samenroeping hebben, en gij zult uw zielen verootmoedigen; geen werk zult gij doen;
7“सातव्या महिन्याच्या दहाव्या दिवशी एक खास सभा बोलावण्यात येईल. त्या दिवशी तुम्ही अन्न घ्यायचे नाही आणि काही कामही करायचे नाही.
8Maar gij zult brandoffer, ten liefelijken reuk, den HEERE offeren: een jongen var, een ram, zeven eenjarige lammeren; volkomen zullen zij u zijn;
8तुम्ही होमार्पणे द्यायची. त्यांचा सुवास परमेश्वराला आनंदित करील. तुम्ही एक बैल, एक मेंढा आणि एक वर्ष वयाचे सात कोकरे अर्पण करावेत. ते दोषरहित असले पाहिजेत.
9En hun spijsoffer van meelbloem, met olie gemend: drie tienden tot den var, twee tienden tot den enen ram;
9त्याबरोबर तुम्ही 24 कप पीठ तेलात मिसळून बैलाबरोबर, 16 कप पीठ
10Tot elk een tiende tot een lam, tot die zeven lammeren toe;
10मेंढ्या बरोबर आणि आठ कप पीठ प्रत्येक कोकरा बरोबर अर्पण केले पाहिजे.
11Een geitenbok ten zondoffer, behalve het zondoffer der verzoeningen, en het gedurig brandoffer; en zijn spijsoffer, met hun drankofferen.
11पापार्पण म्हणून तुम्ही एक बकराही अर्पण कराल. प्रायश्चित्ताच्यादिवशी करावयाच्या पापार्पणाबरोबरच ही अर्पणे द्यायची. तसेच रोजच्या बळीच्या, धान्याच्या व पेयाच्या अर्पणाबरोबर ही अर्पणे करावीत.
12Insgelijks op den vijftienden dag dezer zevende maand, zult gij een heilige samenroeping hebben; geen dienstwerk zult gij doen; maar zeven dagen zult gij den HEERE een feest vieren.
12“सातव्या महिन्याच्या पंधराव्या दिवशी एक खास सभा असेल. तो मंडपाचा सण असेल. त्या दिवशी तुम्ही काहीही काम करायचे नाही आणि परमेश्वरासाठी सात दिवसांची खास सुट्टी साजरी करायची.
13En gij zult een brandoffer ten vuuroffer offeren, ten liefelijken reuk den HEERE: dertien jonge varren, twee rammen, veertien eenjarige lammeren; zij zullen volkomen zijn;
13तुम्ही होमार्पणे करावीत. ही अग्नीबरोबर करावयाची अर्पणे आहेत. त्यांचा सुवास परमेश्वराला आनंदित करील. तुम्ही 13 बैल, 2 मेंढे,
14En hun spijsoffer van meelbloem, met olie gemengd: drie tienden tot een var, tot die dertien varren toe; twee tienden tot een ram, onder die twee rammen;
14कोकरे अर्पण कराल. ते सर्व दोषरहित असले पाहिजेत. 14तुम्ही 24 कप पीठ तेलात मिसळून प्रत्येक बैलाबरोबर, 16 कप पीठ प्रत्येक मेंढ्याबरोबर व
15En tot elke een tiende tot een lam, tot die veertien lammeren toe;
15आठ कप पीठ प्रत्येक कोकरा बरोबर अर्पण करावे.
16En een geitenbok ten zondoffer; behalve het gedurig brandoffer, zijn spijsoffer, en zijn drankoffer.
16तुम्ही एक बकराही अर्पण केला पाहिजे. रोजच्या अर्पणाव्यातिरिक्त आणि त्याबरोबरच्या धान्य व पेय यांच्या अर्पणाव्यातिरिक्त ही अर्पणे असतील.
17Daarna op den tweeden dag: twaalf jonge varren, twee rammen, veertien volkomen eenjarige lammeren;
17“या सुट्ठीच्या दुसऱ्या दिवशी तुम्ही 12 बैल, 2 मेंढे आणि 1 वर्षाचे 14 कोकरे अर्पण करावेत. ती दोषरहित असावी.
18En hun spijsoffer, en hun drankofferen tot de varren, tot de rammen, en tot de lammeren, in hun getal, naar de wijze;
18बैल, मेंढे आणि कोकरे यांच्याबरोबर तुम्ही योग्य प्रमाणात धान्यार्पण आणि पेयार्पण केले पाहिजे.
19En een geitenbok ten zondoffer; behalve het gedurig brandoffer, en zijn spijsoffer, met hun drankofferen.
19एक बकरा पापार्पण म्हणून द्यावा. ही सर्व रोजच्या बळीच्या व धान्य व पेय यांच्या अर्पणाव्यतिरिक्त असली पाहिजे.
20En op den dertienden dag: elf varren, twee rammen, veertien volkomen eenjarige lammeren;
20“या सुट्ठीच्या तिसऱ्या दिवशी तुम्ही 11 बैल, 2 मेंढे आणि एक वर्षाचे 14 कोकरे अर्पण करावेत. ते दोषरहित असले पाहिजेत.
21En hun spijsofferen, en hun drankofferen tot de varren, tot de rammen, en tot de lammeren, in hun getal, naar de wijze;
21बैल, मेंढे आणि कोकरे यांच्याबरोबर तुम्ही योग्यप्रमाणात धान्यार्पण व पेयार्पण केले पाहिजे.
22En een bok ten zondoffer; behalve het gedurig brandoffer, en zijn spijsoffer, en zijn drankoffer.
22पापार्पण म्हणून एक बकराही द्यावा. हे सर्व रोजच्या बळीच्या व धान्य व पेय यांच्या अर्पणाव्यतिरिक्त असले पाहिजे.
23Verder op den vierden dag: tien varren, twee rammen, veertien volkomen eenjarige lammeren;
23“सुट्ठीच्या चौथ्या दिवशी तुम्ही 10 बैल, 2 मेंढे व 1 वर्षाचे 14 कोकरे अर्पण करवेत. ते निर्दोष असले पाहिजेत.
24Hun spijsoffer, en hun drankofferen tot de varren, tot de rammen, en tot de lammeren, in hun getal, naar de wijze;
24बैल, मेंढे व कोकरे यांच्याबरोबर तुम्ही योग्यप्रमाणात धान्यार्पण व पेयार्पणही केले पाहिजे.
25En een geitenbok ten zondoffer; behalve het gedurig brandoffer, zijn spijsoffer, en zijn drankoffer.
25एक बकरा पापार्पण म्हणून दिला पाहिजे. हे सर्व रोजच्या बळी, धान्य व पेय यांच्या अर्पणाव्यतिरिक्त असले पाहिजे.
26En op den vijfden dag: negen varren, twee rammen, en veertien volkomen eenjarige lammeren;
26“सुट्ठीच्या पाचव्या दिवशी तुम्ही 9 बैल, 2 मेंढे व एक वर्षाचे 14 कोकरे अर्पण केले पाहिजे. ते दोषरहित असावेत
27En hun spijsoffer, en hun drankofferen tot de varren, tot de rammen, en tot de lammeren, in hun getal, naar de wijze;
27बैल, मेंढे व कोकरे यांच्याबरोबर तुम्ही योग्यप्रमाणात धान्यार्पण व पेयार्पण ही केले पाहिजे.
28En een bok ten zondoffer; behalve het gedurig brandoffer, en zijn spijsoffer, en zijn drankoffer.
28एक बकरा पापार्पण म्हणून दिला पाहिजे. हे सर्व रोजच्या बळी, धान्य व पेय यांच्या अर्पणा व्यतिरिक्त असले पाहिजे.
29Daarna op den zesden dag: acht varren, twee rammen, veertien volkomen eenjarige lammeren;
29“सुट्ठीच्या सहाव्या दिवशी तुम्ही 8 बैल, 2 मेंढे व एक वर्षांचे 14 कोकरे अर्पण केले पाहिजेत. ते दोषरहित असावेत.
30En hun spijsoffer, en hun drankofferen tot de varren, tot de rammen, en tot de lammeren, in hun getal, naar de wijze;
30बैल, मेंढे व कोकरे यांच्याबरोबर तुम्ही योग्यप्रमाणात धान्यार्पण, व पेयार्पणही केले पाहिजे.
31En een bok ten zondoffer; behalve het gedurig brandoffer, zijn spijsoffer, en zijn drankofferen.
31एक बकरा पापार्पण म्हणून द्यावा. हे सर्व रोजच्या बळी, धान्य व पेय यांच्या अर्पणाव्यतिरिक्त असले पाहिजे.
32En op den zevenden dag: zeven varren, twee rammen, veertien volkomen eenjarige lammeren;
32“सुट्ठीच्या सातव्या दिवशी तुम्ही 7 बैल, 2 मेंढे व एक वर्षांचे 14 कोकरे अर्पण करावेत. ते दोषरहित असावेत.
33En hun spijsoffer, en hun drankofferen tot de varren, tot de rammen, en tot de lammeren, in hun getal, naar hun wijze;
33बैल, मेंढे व कोकरे यांच्याबरोबर तुम्ही योग्यप्रमाणात धान्यार्पण व पेयार्पणही केले पाहिजे.
34En een bok ten zondoffer; behalve het gedurig brandoffer, zijn spijsoffer, en zijn drankoffer.
34एक बकरा पापार्पण म्हणून द्यावा. हे सर्व रोजच्या बळी, धान्य व पेय यांच्या अर्पणाव्यतिरिक्त असले पाहिजे.
35Op den achtsten dag zult gij een verbodsdag hebben; geen dienstwerk zult gij doen.
35“या सुट्ठीच्या आठव्या दिवशी तुमच्यासाठी एक खास सभा भरवावी. त्या दिवशी तुम्ही कोणतेही काम करू नये.
36En gij zult een brandoffer ten vuuroffer offeren, ten liefelijken reuk den HEERE; een var, een ram, zeven volkomen eenjarige lammeren;
36तुम्ही होमार्पण करावे. ते अग्नीबरोबर करायचे अर्पण असेल. त्याचा सुवास परमेश्वराला आनंदित करील. तुम्ही एक बैल, 1 मेंढा व एक वर्षाचे सात कोकरे अर्पण करावेत. ते दोषरहित असावेत.
37Hun spijsoffer, en hun drankofferen tot den var, tot den ram, en tot de lammeren, in hun getal, naar de wijze;
37प्रत्येक बैल, मेंढा व कोकरा यांच्याबरोबर तुम्ही योग्यप्रमाणात धान्यार्पण व पेयार्पण दिले पाहिजे.
38En een bok ten zondoffer; behalve het gedurig brandoffer, en zijn spijsoffer, en zijn drankoffer.
38एक बकरा पापार्पण म्हणून दिला पाहिजे. हे सर्व रोजच्या बळी, धान्य व पेय यांच्या अर्पणाव्यतिरिक्त असले पाहिजे.
39Deze dingen zult gij den HEERE doen op uw gezette hoogtijden; behalve uw geloften, en uw vrijwillige offeren, met uw brandofferen, en met uw spijsofferen, en met uw drankofferen, en met uw dankofferen.
39“या खास सुट्टीत तुम्ही होमार्पण व पेयार्पण ही नवस व शांत्यर्पणाची अर्पणे म्हणून आणली पाहिजेत. ही सर्व अर्पणे तुम्ही परमेश्वराला करावीत. ही सर्व अर्पणे तुम्हाला परमेश्वराला खास भेट द्यायची असेल किंवा परमेश्वराला काही खास वचन दिले आहे म्हणून द्यावयाच्या अर्पणाव्यतिरिक्त असतील.”
40En Mozes sprak tot de kinderen Israels naar al wat de HEERE Mozes geboden had.
40मोशेने परमेश्वराच्या या सर्व आज्ञा इस्राएल लोकांना सांगितल्या.