1Paulus, een gevangene van Christus Jezus, en Timotheus, de broeder, aan Filemon, den geliefde, en onzen medearbeider,
1ख्रिस्त येशूकरीता कैदी झालेला पौल, व आपला बंधु तिमथ्य यांजकडून, आमचा प्रिय बंधु व सहकारी फिलेमोन
2En aan Appia, de geliefde, en aan Archippus, onzen medestrijder, en aan de Gemeente, die te uwen huize is:
2आणि आमची बहीण अफ्फिया, अर्खिप्प, आमचा सहसैनिक, आणि तुझ्या घरात जी मंडळी एकत्र येते, यांना:
3Genade zij ulieden en vrede van God, onzen Vader, en den Heere Jezus Christus.
3देव आमचा पिता याजपासून व प्रभु येशू ख्रिस्तापासून कृपा व शाति असो.
4Ik dank mijn God, uwer altijd gedachtig zijnde in mijn gebeden;
4जेव्हा मी प्रार्थनेत तुझी आठवण करतो, तेव्हा नेहमी मी माझ्या देवाचे उपकार मानतो.
5Alzo ik hoor uw liefde en geloof, hetwelk gij hebt aan den Heere Jezus, en jegens al de heiligen;
5कारण तुइया प्रेमाविषयी आणि तुझ्या विश्वासाविषयी, जो विश्वास तू प्रभु येशूवर ठेवतोस त्याविषयी मी ऐकतो, च्या देवाच्या सर्व लोकांसाठी जे प्रेम तुझ्याकडे आहे. त्याविषयी मी ऐकतो,
6Opdat de gemeenschap uws geloofs krachtig worde in de bekendmaking van alle goed, hetwelk in ulieden is door Christus Jezus.
6मी अशी प्रार्थना करतो की, ज्या विश्वासाचा सहभागी तू आमच्याबरोबर आहेस, तो विश्वास आमच्यामध्ये असलेल्या ख्रिस्त येशूमधील सर्व चांगल्या गोष्टी त्या सखोलपणे समजण्यासाठी तुला मार्गदर्शन करोत.
7Want wij hebben grote vreugde en vertroosting over uw liefde, dat de ingewanden der heiligen verkwikt zijn geworden door u, broeder!
7तुझ्या प्रेमामुळे मला मोठा आनंद आणि समाधान मिळाले आहे. कारण बंधु, तुझ्या प्रयत्नांमुळे देवाच्या लोकांची अंत:करणे संजीवित झाली आहेत.
8Daarom, hoewel ik grote vrijmoedigheid heb in Christus, om u te bevelen, hetgeen betamelijk is;
8म्हणून, जरी मी तुझा बंधु म्हणून तुला तुझे योग्य कर्तव्य करण्याविषयी आज्ञा करुन सांगण्याचे धैर्य असले, तरी
9Zo bid ik nochtans liever door de liefde, daar ik zodanig een ben, te weten Paulus, een oud man, en nu ook een gevangene van Jezus Christus.
9[This verse may not be a part of this translation]
10Ik bid u dan voor mijn zoon, denwelken ik in mijn banden heb geteeld, namelijk Onesimus;
10मी तुला माझ्या मुलासमान असलेला अनेसिम, ज्याच्याशी मी तुरुंगात असताना पित्याप्रमाणे वागलो, त्याजविषयी कळकळीने विनवितो की,
11Die eertijds u onnut was, maar nu u en mij zeer nuttig; denwelken ik wedergezonden heb;
11पूर्वी तो तुला निरुपयोगी होता पण आता तो तुलाच नाही तर मलासुद्धा उपयोगी आहे.
12Doch gij, neem hem, dat is mijn ingewanden, weder aan;
12मी त्याला तुझ्याकडे परत पाठवीत आहे. मी असे म्हणायला हवे की, मी त्याला पाठवीत असताना जणू काय माझे ह्रदयच पाठवित आहे.
13Denwelken ik wel had willen bij mij behouden, opdat hij mij voor u dienen zou in de banden des Evangelies.
13त्याला येथे माझ्याजवळ ठेवायला मला आवडेल यासाठी की सुवार्तेमुळे मिळालेल्या तुरुंगवासामध्ये त्याने तुझ्या जागी माझी मदत करावी.
14Maar ik heb zonder uw goedvinden niets willen doen, opdat uw goeddadigheid niet zou zijn als naar bedwang, maar naar vrijwilligheid.
14परंतु तुझ्या संमतीशिवाय मला काहीही करायचे नव्हते. यासाठी की तुझे कोणतेही चांगले कार्य दडपणामुळे होऊ नये तर तुझ्या खुशीने व्हावे.
15Want veellicht is hij daarom voor een kleinen tijd van u gescheiden geweest, opdat gij hem eeuwig zoudt weder hebben.
15कदाचित त्याला थोड्या काळासाठी तुझ्यापासून दूर घेतले जाणे यासाठी झाले असावे की, तू त्याला कायमचे तुझ्याजवळ घ्यावे.
16Nu voortaan niet als een dienstknecht, maar meer dan een dienstknecht, namelijk een geliefden broeder, inzonderheid mij, hoeveel te meer dan u, beide in het vlees en in den Heere.
16एक गुलाम म्हणून नव्हे, उलट गुलामापेक्षाही चांगला एक भाऊ म्हणून घ्यावे. मी त्याच्यावर खूप प्रेम करतो. पण तू त्याच्यावर त्याहीपेक्षा अधिक प्रेम करशील, फक्त एक मनुष्य म्हणूनच नव्हे, तर प्रभूमधील एक बंधु म्हणून.
17Indien gij mij dan houdt voor een metgezel, zo neem hem aan, gelijk als mij.
17तर जर मग तू मला खरोखर भागीदार समजतोस, तर माझे स्वागत जसे तू केले असतेस तसे त्याचे स्वागत कर.
18En indien hij u iets verongelijkt heeft, of schuldig is, reken dat mij toe.
18आणि जर त्याने तुझे काही नुकसान केले असेल किंवा काही देणे लागत असेल तर ते माझ्या नावावर लाव.
19Ik, Paulus, heb het geschreven met deze mijn hand, ik zal het betalen; opdat ik u niet zegge, dat gij ook uzelven mij daartoe schuldig zijt.
19मी, पौल, हे माझ्या स्वत:च्या हातांनी लिहीत आहे: मी याची तुला परतफेड करीन. (मी तुला हे सांगण्याची गरज नाही की, तुझे स्वत:चे जीवन तू मला देणे लागतोस.)
20Ja, broeder, laat mij uwer hierin genieten in den Heere; verkwik mijn ingewanden in den Heere.
20होय बंधु, प्रभूमध्ये मला तुझ्यापासून काही फायदा हवा आहे. ख्रिस्तामध्ये माझे अंत:करण उल्हासित कर.
21Ik heb aan u geschreven, vertrouwende op uw gehoorzaamheid; en ik weet, dat gij doen zult ook boven hetgeen ik zeg.
21तुझ्या आज्ञाधारकपणाविषयी मला खात्री आहे म्हणून मी तुला लिहीत आहे. मला माहीत आहे की, मी सांगत असलेल्या गोष्टीपेक्षा तू अधिक करशील.
22En bereid mij ook tegelijk een herberg; want ik hoop, dat ik door uw gebeden ulieden zal geschonken worden.
22शिवाय कृपा करुन माझ्या विश्रांती करिता खोली तयार करुन ठेव. कारण माझा विश्वास आहे की, तुमच्या प्रार्यनांचा परीणाम म्हणून मला सुरक्षितरीच्या तुमच्या स्वाधीन करण्यात येईल.
23U groeten Epafras, mijn medegevangene in Christus Jezus,
23येशू ख्रिस्तामध्ये माझ्यासह बंदिवान एपफ्रास
24Markus, Aristarchus, Demas, Lukas, mijn medearbeiders.
24तसेच मार्क, अरिस्तार्ख, देमास व लूक जे माझे सहकाही आहेत, ते सलाम सांगतात.
25De genade van onzen Heere Jezus Christus zij met uw geest. Amen.
25प्रभु येशू ख्रिस्ताची कृपा तुमच्या आत्म्याबरोबर असो. आमेन.