Dutch Staten Vertaling

Marathi

Proverbs

18

1Die zich afzondert, tracht naar wat begeerlijks; hij vermengt zich in alle bestendige wijsheid.
1काही लोकांना इतरांभोवती राहायला आवडत नाही. त्यांना जे पाहिजे तेच ते करतात. आणि त्यांना जर कुणी उपदेश केला तर ते अस्वस्थ होतात.
2De zot heeft geen lust aan verstandigheid, maar daarin, dat zijn hart zich ontdekt.
2मूर्खाला इतरांपासून शिकायची इच्छा नसते. त्याला फक्त स्वत:च्याच कल्पना सांगायच्या असतात.
3Als de goddeloze komt, komt ook de verachting en met schande versmaadheid.
3लोकांना वाईट माणूस आवडत नाही. लोक त्या मूर्खाची चेष्टा करतात.
4De woorden van den mond eens mans zijn diepe wateren; en de springader der wijsheid is een uitstortende beek.
4शहाण्या माणसाचे शब्द शहाणपणाच्या खोल विहिरीतून उसळून वर येणाऱ्या पाण्यासारखे असतात.
5Het is niet goed, het aangezicht des goddelozen aan te nemen, om den rechtvaardige in het gericht te buigen.
5लोकांचा न्यायनिवाडा करताना तुम्ही न्यायी असायला हवे. जर तुम्ही दोषी माणसाला सोडून दिले तर ते चांगल्या लोकांवर अन्याय केल्यासारखे होईल.
6De lippen des zots komen in twist, en zijn mond roept naar slagen.
6मूर्ख माणूस त्याच्या बोलण्यामुळे स्वत:वर संकट ओढवून घेतो. त्याचे शब्द भांडण सुरु करु शकतात.
7De mond des zots is hemzelven een verstoring, en zijn lippen een strik zijner ziel.
7मूर्ख माणूस बोलतो तेव्हा स्वत:चाच नाश करुन घेतो. त्याचेच शब्द त्याला अडचणीत आणतात.
8De woorden des oorblazers zijn als dergenen, die geslagen zijn, en die dalen in het binnenste des buiks.
8लोकांना नेहमी अफवा ऐकायला आवडतात. ते पोटात जाणाऱ्या चांगल्या अन्नासारखे असते.
9Ook die zich slap aanstelt in zijn werk, die is een broeder van een doorbrenger.
9जो माणूस कामात ढिला आणि मंद असतो. तो त्या गोष्टींचा कामाचा नाश करणाऱ्या माणसाइतकाच वाईट असतो.
10De Naam des HEEREN is een Sterke Toren; de rechtvaardige zal daarhenen lopen, en in een Hoog Vertrek gesteld worden.
10परमेश्वराच्या नावात खूप शक्ती आहे. तो बळकट बुरुजाप्रमाणे आहे. चांगले लोक त्यांच्याकडे जाऊ शकतात आणि सुरक्षित होतात.
11Des rijken goed is de stad zijner sterkte, en als een verheven muur in zijn inbeelding.
11श्रीमंती आपले रक्षण करेल असे श्रीमंतांना वाटते. ती बळकट किल्ल्याप्रमाणे आहे असे त्यांना वाटते.
12Voor de verbreking zal des mensen hart zich verheffen; en de nederigheid gaat voor de eer.
12गर्विष्ठ माणसाचा लवकरच नाश होईल. पण विनम्र माणसाचा गौरव होईल.
13Die antwoord geeft, eer hij zal gehoord hebben, dat is hem dwaasheid en schande.
13तुम्ही उत्तर देण्याचा प्रयत्न करण्यापूर्वी इतरांना त्यांचे बोलणे संपवू द्या. त्यामुळे तुम्ही गोंधळणार नाही आणि मूर्खही ठरणार नाही.
14De geest eens mans zal zijn krankheid ondersteunen; maar een verslagen geest, wie zal dien opheffen?
14आजारपणात माणसाचे मन त्याला जिवंत ठेवू शकते. पण जर आता सारे काही व्यर्थ आहे असे त्याला वाटत असेल तर सारीच आशा संपते.
15Het hart der verstandigen bekomt wetenschap, en het oor der wijzen zoekt wetenschap.
15शहाण्या माणसाला नेहमी अधिक शिकायची इच्छा असते. तो माणूस नेहमी अधिक ज्ञान मिळवण्यासाठी लक्षपूर्वक ऐकत असतो.
16De gift des mensen maakt hem ruimte, en zij geleidt hem voor het aangezicht der groten.
16जर तुम्हाला महत्वाच्या माणसाला भेटायची इच्छा असेल तर त्याला नजराणा द्या. नंतर तुम्ही त्याला सहजपणे भेटू शकता.
17Die de eerste is in zijn twistzaak, schijnt rechtvaardig te zijn; maar zijn naaste komt, en hij onderzoekt hem.
17सुरुवातीला बोलणारा माणूस नेहमी बरोबर आहे असे तोपर्यंत वाटत असते, जोपर्यंत कुणीतरी येऊन त्याला प्रश्र विचारीत नाही.
18Het lot doet de geschillen ophouden, en maakt scheiding tussen machtigen.
18दोन बलवान माणसे वाद घातल असली तर तो वाद चिठ्ठ्या टाकून सोडवणे चांगले.
19Een broeder is wederspanniger dan een sterke stad; en de geschillen zijn als een grendel van een paleis.
19जर तुम्ही मित्राचा अपमान केलात तर त्याला परत जिंकणे हे बळकट तटबंदी असलेले शहर जिंकण्यापेक्षा कठीण असते. आणि वादविवाद लोकांना एकमेकांपासून राजवाड्याच्या प्रवेशद्वारांवरील आडव्या बळकट खांबांइतके दूर नेतात.
20Van de vrucht van ieders mond zal zijn buik verzadigd worden; hij zal verzadigd worden van de inkomst zijner lippen.
20तुम्ही जे बोलता त्याचा तुमच्या आयुष्यावर परिणाम होतो. जर तुम्ही चांगले बोललात तर तुमच्या बाबतीत चांगल्या गोष्टी घडतील. जर तुम्ही वाईट बोललात तर वाईट गोष्टी घडतील.
21Dood en leven zijn in het geweld der tong; en een ieder, die ze liefheeft, zal haar vrucht eten.
21जीवन किंवा मरणही देणारे शब्द जीभ बोलू शकते. आणि ज्यांना बोलायला आवडते त्यांनी त्यांच्या बोलण्याच्या परिणामाचा स्वीकार करायची तयारी ठेवली पाहिजे.
22Die een vrouw gevonden heeft, heeft een goede zaak gevonden, en hij heeft welgevallen getrokken van den HEERE.
22जर तुम्हाला बायको मिळाली, तर तुम्हाला चांगली गोष्ट मिळाली असे होईल. परमेवर तुमच्यावर खुश आहे असे ते दर्शवते.
23De arme spreekt smekingen; maar de rijke antwoordt harde dingen.
23गरीब माणूस मातीची भीक मागेल. पण श्रीमंत माणूस उत्तर देतानासुध्दा मग्रूर असतो.
24Een man, die vrienden heeft, heeft zich vriendelijk te houden; want er is een liefhebber, die meer aankleeft dan een broeder.
24काही मित्रांबरोबर असणे आनंददायी असते. पण जवळचा मित्र भावापेक्षाही चांगला असतो.