Dutch Staten Vertaling

Marathi

Proverbs

6

1Mijn zoon! zo gij voor uw naaste borg geworden zijt, voor een vreemde uw hand toegeklapt hebt;
1मुला, दुसन्याच्या कर्जाला जामीन राहू नकोस. त्या माणसाला कर्जांची परतफेड करता आली नाही तर तू ते परत करण्याचे वचन का दिलेस? तू दुसऱ्याच्या कर्जाची हमी घेतलीस का?
2Gij zijt verstrikt met de redenen uws monds; gij zijt gevangen met de redenen uws monds.
2तर मग तू अडकलास. तुला तुझ्या शब्दांनीच अडकवले.
3Doe nu dit, mijn zoon! en red u, dewijl gij in de hand uws naasten gekomen zijt; ga, onderwerp uzelven, en sterk uw naaste.
3तू त्या माणसाच्या शक्तीखाली आलास. मग त्याच्याकडे जा आणि स्वत:ला सोडव. त्याच्या कर्जापासून तुझी सुटका करण्यासाठी त्याची भीक माग.
4Laat uw ogen geen slaap toe, noch uw oogleden sluimering.
4विश्रांतीसाठी वा झोपण्यासाठी सुध्दा थांबू नकोस.
5Red u, als een ree uit de hand des jagers, en als een vogel uit de hand des vogelvangers.
5शिकाऱ्यापासून हरिण जसे दूर पळते तसा तू सापळ्यापासून दूर राहा. जाळ्यातून उडून जाणान्या पक्ष्याप्रमाणे स्वत:ला सोडव.
6Ga tot de mier, gij luiaard! zie haar wegen, en word wijs;
6आळशी माणसा, तुला मुंगी सारखे व्हायला हवे. मुंगी काय करते ते बघ. मुंगी पासून शीक.
7Dewelke, geen overste, ambtman noch heerser hebbende,
7मुंगीला राजा नाही, वरिष्ठ नाही की नेता नाही.
8Haar brood bereidt in den zomer, haar spijs vergadert in den oogst.
8पण उन्हाळ्यात ती सगळे अन्न गोळा करते. मुंगी तिचे अन्न साठवते आणि हिवाळ्यात तिच्याजवळ भरपूर अन्न असते.
9Hoe lang zult gij, luiaard, nederliggen? Wanneer zult gij van uw slaap opstaan?
9आळशी माणसा, तू किती वेळ झोपून राहाणार आहेस? तू विश्रांतीतून केव्हा उठणार आहेस?
10Een weinig slapens, een weinig sluimerens, een weinig handvouwens, al nederliggende;
10आळशी माणूस म्हणतो, “मला थोडी झोप हवी. मी हथे थोड्या वेळासाठी पडतो.”
11Zo zal uw armoede u overkomen als een wandelaar, en uw gebrek als een gewapend man.
11परंतु तो झोपतच राहातो. आणि गरीब होत राहातो. लवकरच त्याच्याजवळ काहीही नसेल. चोर अचानक येऊन सर्व काही घेऊन जातो त्याचप्रमाणे त्याला अचानक गरीबी येईल.
12Een Belialsmens, een ondeugdzaam man gaat met verkeerdheid des monds om;
12दुष्ट आणि कवडीमोल माणूस खोटे बोलतो. आणि वाईट गोष्टी सांगतो.
13Wenkt met zijn ogen, spreekt met zijn voeten, leert met zijn vingeren;
13तो डोळे मिचकावतो आणि लोकांना मूर्ख बनविण्यासाठी खुणा करतो.
14In zijn hart zijn verkeerdheden, hij smeedt te aller tijd kwaad; hij werpt twisten in.
14तो माणूस दुष्ट असतो, तो नेहमी वाईट गोष्टी करण्याच्या योजना आखतो. तो सगळीकडे संकटे आणतो.
15Daarom zal zijn verderf haastelijk komen; hij zal schielijk verbroken worden, dat er geen genezen aan zij.
15पण त्याला शिक्षा होईल. त्याच्यावर अचानक संकट येईल. त्याचा त्वरित नाश होईल. आणि त्याला काहीही मदत मिळू शकणार नाही.
16Deze zes haat de HEERE; ja, zeven zijn Zijn ziel een gruwel:
16परमेश्वर या सहा, नाही सात गोष्टींचा तिरस्कार करतो.
17Hoge ogen, een valse tong, en handen, die onschuldig bloed vergieten;
17डोळे, जे माणूस गर्विष्ठ आहे हे दाखवतात. जीभ, जी खोटे बोलते, हात, जे निरपराध्यांना ठार मारतात.
18Een hart, dat ondeugdzame gedachten smeedt; voeten, die zich haasten, om tot kwaad te lopen;
18ह्रदय जे वाईट गोष्टी करण्याच्या योजना आखते. पाय जे वाईट गोष्टी करायला धाव घेतात.
19Een vals getuige, die leugenen blaast; en die tussen broederen krakelen inwerpt.
19माणूस जो खोटे बोलतो आणि कोर्टात खऱ्या नसलेल्या गोष्टी सांगतो. माणूस जो वादविवादाला सुरुवात करतो आणि दुसऱ्यांमध्ये भांडणे लावून देतो.
20Mijn zoon, bewaar het gebod uws vaders, en verlaat de wet uwer moeder niet.
20माझ्या मुला, तुझ्या वडिलांची आज्ञा लक्षात ठेव. आणि तुझ्या आईची शिकवण विसरु नकोस.
21Bind ze steeds aan uw hart, hecht ze aan uw hals.
21त्याचे शब्द नेहमी लक्षात ठेव. त्यांच्या शिकवणीला तुझ्या आयुष्याचाच एक भाग बनव.
22Als gij wandelt, zal dat u geleiden; als gij nederligt, zal het over u de wacht houden; als gij wakker wordt, zal hetzelve met u spreken.
22त्यांची शिकवण तुला जिथे जायचे असेल तिथे नेईल. तू झोपलास की ती तुझ्यावर लक्ष ठेवेल आणि तू जेव्हा उठशील तेव्हा ती तुझ्याशी बोलेल आणि तुला मार्ग दाखवील.
23Want het gebod is een lamp, en de wet is een licht, en de bestraffingen der tucht zijn de weg des levens;
23तुझ्या आईवडिलांची शिकवण आणि आज्ञा प्रकाशाप्रमाणे असून त्या तुला योग्य मार्ग दाखवतात. ते तुला योग्य मार्ग दाखवतात आणि जीवनाचा मार्ग आचरायला शिकवतात.
24Om u te bewaren voor de kwade vrouw, voor het gevlei der vreemde tong.
24त्यांची शिकवण तुला दुष्ट स्त्रीकडे जाण्यापासून परावृत्त करते. नवऱ्याला सोडून आलेल्या बाईच्या भुरळ पाडणाऱ्या बोलण्यापासून ते शब्द तुझे रक्षण करतात.
25Begeer haar schoonheid niet in uw hart, en laat ze u niet vangen met haar oogleden.
25ती स्त्री सुंदर असेल. पण ते सौंदर्य तुझ्यात जळू देऊ नकोस आणि तुला त्याची भुरळ पडू देऊ नकोस. तू तिच्या डोळ्यांनी जायबंदी होऊ नकोस.
26Want door een vrouw, die een hoer is, komt men tot een stuk broods; en eens mans huisvrouw jaagt de kostelijke ziel.
26वेश्येचा मोबदला एक भाकरीचा असेल. पण दुसऱ्याच्या बायकोची किंमत म्हणून तुला तुझे जीवित द्यावे लागेल.
27Zal iemand vuur in zijn boezem nemen, dat zijn klederen niet verbrand worden?
27जर एखाद्याने स्वत:वर निखारे ओतले तर त्याचे कपडेसुध्दा जळतील.
28Zal iemand op kolen gaan, dat zijn voeten niet branden?
28जरा एखादा माणूस निखाऱ्यांवर चालला तर त्याचे पाय भाजतील.
29Alzo die tot zijns naasten huisvrouw ingaat; al wie haar aanroert, zal niet onschuldig gehouden worden.
29दुसऱ्या माणसाच्या बायकोबरोबर झोपणाऱ्याचेही असेच होते. त्या माणसाला दु:ख भोगावे लागते.
30Men doet een dief geen verachting aan, als hij steelt om zijn ziel te vullen, dewijl hij honger heeft;
30[This verse may not be a part of this translation]
31En gevonden zijnde, vergeldt hij het zevenvoudig; hij geeft al het goed van zijn huis.
31[This verse may not be a part of this translation]
32Maar die met een vrouw overspel doet, is verstandeloos; hij verderft zijn ziel, die dat doet;
32पण जो माणूस व्यभिचाराचे पाप करतो तो मूर्ख असतो. तो स्वत:चा नाश करीत असतो. तो स्वत:च त्याच्या नाशाला कारणीभूत असतो.
33Plage en schande zal hij vinden, en zijn smaad zal niet uitgewist worden.
33लोकांना त्याच्याबद्दल वाटणारा आदर नाहीसा होतो. आणि त्याच्यावरचा लज्जेचा डाग कधीही धुतला जाणार नाही.
34Want jaloersheid is een grimmigheid des mans; en in den dag der wraak zal hij niet verschonen.
34त्या स्त्रीचा नवरा मत्सरी होईल, त्या नवऱ्याला खूप राग येईल. त्या दुसऱ्या माणसाला शिक्षा करण्यासाठी तो काय वाट्टेल ते करेल.
35Hij zal geen verzoening aannemen; en hij zal niet bewilligen, ofschoon gij het geschenk vergroot.
35त्याचा राग शांत करण्यासाठी कितीही पैसा दिला तरी तो पुरेसा ठरणार नाही.