1O HEERE! waarom staat Gij van verre? waarom verbergt Gij U in tijden van benauwdheid?
1परमेश्वरा, तू इतक्या दूर का राहतोस? संकटात पडलेले लोक तुला पाहू शकत नाहीत.
2De goddeloze vervolgt hittiglijk in hoogmoed de ellendige; laat hen gegrepen worden in de aanslagen, die zij bedacht hebben.
2गर्विष्ठ आणि दुष्ट लोक वाईट योजना आखतात. आणि गरीब लोकांना त्रास देतात.
3Want de goddeloze roemt over den wens zijner ziel; hij zegent den gierigaard, hij lastert den HEERE.
3दुष्ट लोक आपल्याला हव्या असलेल्या गोष्टींबद्दल बढाया मारतात. आधाशी लोक देवाला शाप देतात. अशा रीतीने दुष्ट लोक आपण परमेश्वराला तुच्छ मानतो असे दाखवून देतात.
4De goddeloze, gelijk hij zijn neus omhoog steekt, onderzoekt niet; al zijn gedachten zijn, dat er geen God is.
4वाईट लोक देवाची प्रार्थना न करण्याइतके गर्विष्ठ आहेत ते त्यांच्या सर्व वाईट योजना आखतात आणि जगात देवच नसल्यासारखे वागतात.
5Zijn wegen maken ten allen tijde smarte; Uw oordelen zijn een hoogte, verre van hem; al zijn tegenpartijders, die blaast hij aan.
5दुष्ट लोक नेहमीच काहीतरी वेडे वाकडे करीत असतात. देवाचे नियम आणि शहाणपणाच्या गोष्टी त्यांच्या लक्षात देखील येत नाहीत. देवाचे शत्रू त्यांच्या शिकवण्याकडे लक्ष देत नाहीत.
6Hij zegt in zijn hart; Ik zal niet wankelen; want ik zal van geslacht tot geslacht in geen kwaad zijn.
6आपले काहीही वाईट होणार नाही असे त्या लोकांना वाटते ते म्हणतात “आपण मजा करु आणि आपल्याला कधीही शिक्षा होणार नाही.”
7Zijn mond is vol van vloek, en bedriegerijen, en list; onder zijn tong is moeite en ongerechtigheid.
7ते लोक नेहमी शाप देत असतात. ते लोकांबद्दल नेहमी वाईट बोलत असतात. ते सतत वाईट योजना आखत असतात.
8Hij zit in de achterlage der hoeven, in verborgene plaatsen doodt hij den onschuldige; zijn ogen verbergen zich tegen den arme.
8ते गुप्त जागी लपून बसतात आणि लोकांना पकडण्यासाठी वाट पाहातात. ते दुसऱ्यांना त्रास देण्यासाठी लपतात ते निष्पाप लोकांना ठार मारतात.
9Hij legt lagen in een verborgen plaats, gelijk een leeuw in zijn hol; hij legt lagen, om den ellendige te roven; hij rooft den ellendige, als hij hem trekt in zijn net.
9ते दुष्ट लोक खाण्यासाठी एखादा प्राणी पकडणाऱ्या सिंहासारखे असतात. ते गरीबांवर हल्ला करतात. दुष्टांनी तयार केलेल्या सापळड्यात गरीब अडकतात.
10Hij duikt neder, hij buigt zich; en de arme hoop valt in zijn sterke poten.
10ते दुष्ट गरीब आणि आधीच पीडलेल्या लोकांना पुन्हा पुन्हा त्रास देतात.
11Hij zegt in zijn hart: God heeft het vergeten, Hij heeft Zijn aangezicht verborgen, Hij ziet niet in eeuwigheid.
11“देव आपल्याला विसरला, तो आपल्यापासून कायमचा दूर गेला. आपल्यावर काय प्रसंग आलेला आहे हे देव बघत नाही” असा विचार गरीब लोक करतात.
12Sta op, HEERE God! hef Uw hand op, vergeet de ellendigen niet.
12परमेश्वरा, ऊठ! आणि काहीतरी कर. देवा, दुष्टांना शिक्षा कर गरीबांना विसरु नकोस.
13Waarom lastert de goddeloze God? zegt in zijn hart: Gij zult het niet zoeken?
13वाईट लोक देवाविरुध्द का जातात? कारण देव आपल्याला शिक्षा करणार नाही असे त्यांना वाटते.
14Gij ziet het immers; want Gij aanschouwt de moeite en het verdriet, opdat men het in Uw hand geve; op U verlaat zich de arme, Gij zijt geweest een Helper van den wees.
14परमेश्वरा, ते लोक अतिशय दुष्ट आणि वाईट गोष्टी करतात ते तू बघतोस तू त्याकडे लक्ष दे आणि काहीतरी कर. संकटांनी पिडलेले लोक तुझ्याकडे मदतीसाठी येतात. परमेश्वरा, निराधारला मदत करणारा तूच एक आहेस. म्हणून त्यांना मदत कर.
15Breek den arm des goddelozen en bozen. zoek zijn goddeloosheid, totdat Gij haar niet vindt.
15परमेश्वरा, दुष्टांचे निर्दालन कर.
16De HEERE is Koning eeuwiglijk en altoos; de heidenen zijn vergaan uit Zijn land.
16त्या लोकांना तुझ्या भूमीतून घालवून दे.
17HEERE! Gij hebt den wens der zachtmoedigen gehoord; Gij zult hun hart sterken, Uw oor zal opmerken;
17परमेश्वरा, गरीबांना काय हवे ते तू ऐकलेस. त्यांची प्रार्थना ऐक आणि त्यांना काय हवे ते दे.
18Om den wees en verdrukte recht te doen; opdat een mens van de aarde niet meer voortvare geweld te bedrijven.
18परमेश्वरा आई बाप नसलेल्या पोरक्या मुलांचे रक्षण कर. दुखी लोकांना आणखी कष्ट सोसायला लावू नकोस. दुष्टांना इथे राहायला भीती वाटेल इतके त्यांना घाबरवून