Dutch Staten Vertaling

Marathi

Psalms

105

1Looft den HEERE, roept Zijn Naam aan, maakt Zijn daden bekend onder de volken.
1परमेश्वराला धन्यावाद द्या. त्याच्या नावाचा धावा करा. राष्ट्रांना तो करत असलेल्या अद्भुत गोष्टींबद्दल सांगा.
2Zingt Hem, psalmzingt Hem, spreekt aandachtelijk van al Zijn wonderen.
2परमेश्वराला गाणे गा. त्याची स्तुतिगीते गा. तो ज्या अद्भुत गोष्टी करतो त्याबद्दल सांगा.
3Roemt u in den Naam Zijner heiligheid; het hart dergenen, die den HEERE zoeken, verblijde zich.
3परमेश्वराच्या पवित्र नावाचा अभिमान बाळगा. तुम्ही लोक परमेश्वराला शोधत आला, सुखी व्हा.
4Vraagt naar den HEERE en Zijn sterkte; zoekt Zijn aangezicht geduriglijk.
4शक्तीसाठी परमेश्वराकडे जा. मदतीसाठी नेहमी त्याच्याकडे जा.
5Gedenkt Zijner wonderen, die Hij gedaan heeft, Zijner wondertekenen, en der oordelen Zijns monds.
5तो ज्या आश्चर्यकारक गोष्टी करतो त्याची आठवण ठेवा त्याचे चमत्कार आणि त्याचे शहाणपणाचे निर्णय याची आठवण ठेवा.
6Gij zaad van Abraham, Zijn knecht, gij kinderen van Jakob, Zijn uitverkorene!
6तुम्ही त्याचा सेवक अब्राहाम याचे वंशज आहात. तुम्ही याकोबाचे, देवाने निवडलेल्या माणसाचे वंशज आहात.
7Hij is de HEERE, onze God; Zijn oordelen zijn over de gehele aarde.
7परमेश्वर आपला देव आहे. परमेश्वर सर्व जगावर राज्य करतो.
8Hij gedenkt Zijns verbonds tot in der eeuwigheid, des woords, dat Hij ingesteld heeft, tot in duizend geslachten;
8परमेश्वर देवाच्या कराराची सदैव आठवण ठेवा. हजारो पिढ्या त्याच्या आज्ञांची आठवण ठेवा.
9Des verbonds, dat Hij met Abraham heeft gemaakt, en Zijns eeds aan Izak;
9देवाने अब्राहाम बरोबर करार केला. देवाने इसहाकला वचन दिले.
10Welken Hij ook gesteld heeft aan Jakob tot een inzetting, aan Israel tot een eeuwig verbond,
10नंतर त्याने याकोबासाठी नियम केला. देवाने इस्राएल बरोबर करार केला. तो सदैव राहील.
11Zeggende: Ik zal u geven het land Kanaan, het snoer van ulieder erfdeel.
11देव म्हणाला, “मी तुला कनानची जमीन देईन. ती जमीन तुझ्या मालकीची होईल.”
12Als zij weinig mensen in getal waren, ja, weinig en vreemdelingen daarin;
12अब्राहामचे कुटुंब लहान होते, तेव्हा देवाने हे वचन दिले. ते केवळ काही वेळ तिथे घालवणारे परके लोक होते.
13En wandelden van volk tot volk, van het ene koninkrijk tot het andere volk;
13ते एका राष्ट्रातून दुसऱ्या राष्ट्रात, एका राज्यातून दुसऱ्या राज्यात प्रवास करत होते.
14Hij liet geen mens toe hen te onderdrukken; ook bestrafte Hij koningen om hunnentwil, zeggende:
14पण देवाने लोकांना त्यांना वाईट वागणूक देऊ दिली नाही. देवाने राजांना त्यांना दु:ख न देण्याची ताकीद दिली.
15Tast Mijn gezalfden niet aan, en doet Mijn profeten geen kwaad.
15देव म्हणाला, “मी निवडलेल्या माणसांना दु:ख देऊ नका. माझ्या संदेष्ट्यांचे काही वाईट करु नका.”
16Hij riep ook een honger in het land; Hij brak allen staf des broods.
16देवाने त्या देशात दुष्काळ आणला. लोकांना खायला पुरेसे अन्न नव्हते.
17Hij zond een man voor hun aangezicht henen; Jozef werd verkocht tot een slaaf.
17पण देवाने योसेफ नावाच्या माणसाला त्यांच्या पुढे पाठवले. योसेफ गुलाम सारखा विकला गेला.
18Men drukte zijn voeten in den stok; zijn persoon kwam in de ijzers.
18त्यांनी योसेफाच्या पायाला दोर बांधले. त्यांनी त्याच्या मानेभोवती लोखंडी कडे घातले.
19Tot den tijd toe, dat Zijn woord kwam, heeft hem de rede des HEEREN doorlouterd.
19योसेफाने सांगितलेल्या गोष्टी प्रत्यक्ष घडेपर्यंत तो गुलामच राहिला. परमेश्वराच्या संदेशामुळे योसेफ बरोबर होता हे सिध्द झाले.
20De koning zond, en deed hem ontslaan; de heerser der volken liet hem los.
20तेव्हा मिसरच्या राजाने त्याला मोकळे सोडले. राष्ट्रांच्या प्रमुखाने त्याला तुंरुंगातून बाहेर काढले.
21Hij zette hem tot een heer over zijn huis, en tot een heerser over al zijn goed;
21त्याने योसेफला आपल्या घराचा मुख्य नेमले. योसेफने त्याच्या मालकीच्या सर्व वस्तूंची काळजी घेतली.
22Om zijn vorsten te binden naar zijn lust, en zijn oudsten te onderwijzen.
22योसेफने इतर प्रमुखांना सूचना दिल्या. योसेफने वृध्दांना शिकवले.
23Daarna kwam Israel in Egypte, en Jakob verkeerde als vreemdeling in het land van Cham.
23नंतर इस्राएल मिसरमध्ये आला. याकोब हामच्या देशातच राहिला.
24En Hij deed Zijn volk zeer wassen, en maakte het machtiger dan Zijn tegenpartijders.
24याकोबाचे कुटुंब खूप मोठे झाले. ते त्यांच्या शत्रूंपेक्षा खूप बलवान झाले.
25Hij keerde hun hart om, dat zij Zijn volk haatten, dat zij met Zijn knechten listiglijk handelden.
25म्हणून मिसरचे लोक याकोबाच्या कुटुंबाचा द्वेष करु लागले. त्यांनी त्याच्या गुलामांविरुध्द योजना आखल्या.
26Hij zond Mozes, Zijn knecht, en Aaron, dien Hij verkoren had.
26म्हणून देवाने त्याचा सेवक मोशे आणि देवाने निवडलेला त्याचा याजक अहरोन यांना पाठविले.
27Zij deden onder hen de bevelen Zijner tekenen, en de wonderwerken in het land van Cham.
27देवाने मोशे आणि अहरोन यांचा हामच्या देशात अनेक चमत्कार करण्यात उपयोग करुन घेतला.
28Hij zond duisternis, en maakte het duister; en zij waren Zijn woord niet wederspannig.
28देवाने अतिशय दाट काळोख पाठवला, पण मिसरमधल्या लोकांनी त्याचे ऐकले नाही.
29Hij keerde hun wateren in bloed, en Hij doodde hun vissen.
29म्हणून देवाने पाण्याचे रक्तात रुपांतर केले आणि सगळे मासे मेले.
30Hun land bracht vorsen voort in overvloed, tot in de binnenste kameren hunner koningen.
30त्यांचा देश बेडकांनी भरुन गेला. राजाच्या शयनकक्षात देखील बेडूक होते.
31Hij sprak, en er kwam een vermenging van ongedierte, luizen, in hun ganse landpale.
31देवाने आज्ञा केली आणि माशा व चिलटे आली. ती सगळीकडे होती.
32Hij maakte hun regen tot hagel, vlammig vuur in hun land.
32देवाने पावसाचे गारात रुपांतर केले. सर्व देशांत विजा पडल्या.
33En Hij sloeg hun wijnstok en hun vijgeboom, en Hij brak het geboomte hunner landpalen.
33देवाने त्यांच्या द्राक्षांच्या वेली व अंजीराची झाडे नष्ट केली. देवाने त्यांच्या देशातले प्रत्येक झाड नष्ट केले.
34Hij sprak, en er kwamen sprinkhanen en kevers, en dat zonder getal;
34देवाने आज्ञा केली आणि टोळ व नाकतोडे आले. ते संख्येने इतके होते की ते मोजता येत नव्हते.
35Die al het kruid in hun land opaten, ja, aten de vrucht hunner landbouwe op.
35टोळ व नाकतोड्यांनी देशातली सर्व झाडे खाऊन टाकली. त्यांनी शेतातली सर्व पिके खाल्ली.
36Hij versloeg ook alle eerstgeborenen in hun land, de eerstelingen al hunner krachten.
36आणि नंतर देवाने त्यांच्या देशातल्या सर्व पहिल्या अपत्यांना ठार मारले. देवाने त्यांच्या मोठ्या मुलांना मारले.
37En Hij voerde hen uit met zilver en goud; en onder hun stammen was niemand, die struikelde.
37नंतर देवाने त्यांच्या माणसांना मिसरबाहेर काढले. त्यांनी बरोबर सोने आणि चांदी आणली. देवाचा कुठलाही माणूस ठेच लागून पडला नाही.
38Egypte was blijde, als zij uittrokken, want hun verschrikking was op hen gevallen.
38देवाचे लोक गेल्याचे पाहून मिसरला आनंद झाला. कारण त्यांना देवाच्या लोकांची भीती वाटत होती.
39Hij breidde een wolk uit tot een deksel, en vuur om den nacht te verlichten.
39देवाने ढग पांघरुणासारखे पसरले. देवाने अग्रिच्या खांबाचा रात्री प्रकाशासाठी उपयोग केला.
40Zij baden, en Hij deed kwakkelen komen, en Hij verzadigde hen met hemels brood.
40लोकांनी अन्नाची मागणी केली आणि देवाने लावे आणले. देवाने त्यांना स्वर्गातली भाकरी भरपूर दिली.
41Hij opende een steenrots, en er vloeiden wateren uit, die gingen door de dorre plaatsen als een rivier.
41देवाने खडक फोडला आणि त्यातून पाणी उसळून बाहेर आले. वाळवटांत नदी वाहू लागली.
42Want Hij dacht aan Zijn heilig woord, aan Abraham, Zijn knecht.
42देवाला त्याच्या पवित्र वचनाची आठवण होती. देवाला त्याचा सेवक अब्राहाम याला दिलेल्या वचनाची आठवण आली.
43Alzo voerde Hij Zijn volk uit met vrolijkheid, Zijn uitverkorenen met gejuich.
43देवाने त्याच्या माणसांना मिसरमधून बाहेर आणले. लोक आनंदाने नाचत बागडत, गाणी म्हणत बाहेर आले.
44En Hij gaf hun de landen der heidenen, zodat zij in erfenis bezaten den arbeid der volken;
44देवाने त्याच्या माणसांना इतर लोक राहात असलेला देश दिला. देवाच्या माणसांना इतरांनी काम करुन मिळवलेल्या वस्तू मिळाल्या.
45Opdat zij Zijn inzettingen onderhielden, en Zijn wetten bewaarden. Hallelujah!
45देवाने असे का केले? त्याच्या माणसांनी त्याचे नियम पाळावे म्हणून त्यांनी त्याची शिकवण काळजीपूर्वक आचरावी म्हणून, परमेश्वराची स्तुती करा.