Dutch Staten Vertaling

Marathi

Psalms

116

1Ik heb lief, want de HEERE hoort mijn stem, mijn smekingen;
1परमेश्वर माझी प्रार्थना ऐकतो ते मला खूप आवडते.
2Want Hij neigt Zijn oor tot mij; dies zal ik Hem in mijn dagen aanroepen.
2मी त्याला मदतीसाठी हाक मारतो आणि ती तो ऐकतो ते मला खूप आवडते.
3De banden des doods hadden mij omvangen, en de angsten der hel hadden mij getroffen; ik vond benauwdheid en droefenis.
3मी जवळ जवळ मेलो होतो. मृत्यूचे दोर माझ्या भोवती आवळले गेले होते. माझ्या भोवती थडगे आवळले जात होते. मी खूप घाबरलो होतो आणि चिंतित झालो होतो.
4Maar ik riep den Naam des HEEREN aan, zeggende: Och HEERE! bevrijd mijn ziel.
4नंतर मी परमेश्वराचे नाव घेतले. मी म्हणालो, “परमेश्वरा, मला वाचव.”
5De HEERE is genadig en rechtvaardig, en onze God is ontfermende.
5परमेश्वर खूप चांगला आणि कृपाळू आहे. देव दयाळू आहे.
6De HEERE bewaart de eenvoudigen; ik was uitgeteerd, doch Hij heeft mij verlost.
6परमेश्वर असहाय्य लोकांची काळजी घेतो. मला कोणाची मदत नव्हती आणि परमेश्वराने माझा उध्दार केला.
7Mijn ziel! keer weder tot uw rust, want de HEERE heeft aan u welgedaan.
7माझ्या आत्म्या शांत हो! परमेश्वर तुझी काळजी घेतो आहे.
8Want Gij, HEERE! hebt mijn ziel gered van de dood, mijn ogen van tranen, mijn voet van aanstoot.
8देवा, तू माझ्या आत्म्याला मृत्यूपासून वाचवलेस तू माझे अश्रू थोपविलेस. तू मला पतनापासून वाचविलेस.
9Ik zal wandelen voor het aangezicht des HEEREN, in de landen der levenden.
9मी सजीवांच्या भूमीत परमेश्वराची सेवा करणे चालूच ठेवीन.
10Ik heb geloofd, daarom sprak ik; ik ben zeer bedrukt geweest.
10“माझा सत्यानाश झाला” असे मी म्हणालो तरी मी विश्वास ठेवणे चालूच ठेवले.
11Ik zeide in mijn haasten: Alle mensen zijn leugenaars.
11मी घाबरलो होतो तेव्हा सुध्दा मी म्हणालो होतो, सगळे लोक खोटारडे आहेत.
12Wat zal ik den HEERE vergelden voor al Zijn weldaden aan mij bewezen?
12मी परमेश्वराला काय देऊ शकतो? माझ्या जवळ जे आहे ते मला परमेश्वरानेच दिले आहे.
13Ik zal den beker der verlossingen opnemen, en den Naam des HEEREN aanroepen.
13त्याने मला वाचवले म्हणून मी त्याला पेय अर्पण करीन आणि मी परमेश्वराला त्याच्या नावाने हाक मारीन.
14Mijn geloften zal ik den HEERE betalen, nu, in de tegenwoordigheid van al Zijn volk.
14मी परमेश्वराला कबूल केलेल्या गोष्टी देईन. आता मी त्याच्या लोकांसमोर जाईन.
15Kostelijk is in de ogen des HEEREN de dood Zijner gunstgenoten.
15परमेश्वराच्या एखाद्या भक्ताचा मृत्यू परमेश्वराच्या दृष्टीने महत्वपूर्ण असतो. परमेश्वरा, मी तुझा सेवक आहे.
16Och, HEERE! zekerlijk ik ben Uw knecht, ik ben Uw knecht, een zoon Uwer dienstmaagd; Gij hebt mijn banden losgemaakt.
16मी तुझा सेवक आहे. मी तुझी दासी असलेल्या स्त्रीचा मुलगा आहे. परमेश्वरा, तू माझा पहिला गुरु आहेस.
17Ik zal U offeren, offerande van dankzegging, en den Naam des HEEREN aanroepen.
17मी तुला धन्यवाद म्हणून स्तुति अर्पण करीन. मी परमेश्वराचे नामस्मरण करीन.
18Mijn geloften zal ik den HEERE betalen, nu, in de tegenwoordigheid van al Zijn volk.
18मी कबूल केलेल्या गोष्टी परमेश्वराला देईन. आता मी त्याच्या सर्व लोकांसमोर जाईन.
19In de voorhoven van het huis des HEEREN, in het midden van u, o Jeruzalem! Hallelujah!
19मी यरुशलेम मध्या मंदिरात जाईन. परमेश्वराचा जयजयकार करा.