1Een psalm van David, voor den opperzangmeester. HEERE! Gij doorgrondt en kent mij.
1परमेश्वरा, तू माझी परीक्षा घेतलीस तुला माझ्याबद्दल सर्व काही माहीत आहे.
2Gij weet mijn zitten en mijn opstaan; Gij verstaat van verre mijn gedachten.
2मी केव्हा बसतो आणि केव्हा उठतो ते तुला माहीत आहे तुला माझे विचार खूप दुरुनही कळतात.
3Gij omringt mijn gaan en mijn liggen; en Gij zijt al mijn wegen gewend.
3परमेश्वरा, मी कुठे जातो आणि केव्हा झोपतो ते तुला कळते. मी जे जे करतो ते सर्व तुला माहीत आहे.
4Als er nog geen woord op mijn tong is, zie, HEERE! Gij weet het alles.
4परमेश्वरा, मला काय म्हणायचे आहे ते तुला माझे शब्द तोंडातून बाहेर पडायच्या आधीच कळते.
5Gij bezet mij van achteren en van voren, en Gij zet Uw hand op mij.
5परमेश्वरा, तू माझ्या सभोवताली आहेस. माझ्या पुढे आणि माझ्या मागे आहेस तू तुझा हात हळूवारपणे माझ्यावर ठेवतोस.
6De kennis is mij te wonderbaar, zij is hoog, ik kan er niet bij.
6तुला जे सर्वकाही माहीत आहे त्याचे मला आश्र्चर्य वाटते ते समजून घेणे मला खूप कठीण वाटते.
7Waar zou ik heengaan voor Uw Geest en waar zou ik heenvlieden voor Uw aangezicht?
7मी जिथे जातो तिथे तिथे तुझा आत्मा असतो. परमेश्वरा, माझी तुझ्यापासून सुटका नाही.
8Zo ik opvoer ten hemel, Gij zijt daar; of bedde ik mij in de hel, zie, Gij zijt daar.
8परमेश्वरा, मी जर स्वर्गात गेलो तर तिथे तू असतोस मी जर खाली मृत्यूलोकात गेलो तर तिथे ही तू असतोस.
9Nam ik vleugelen des dageraads, woonde ik aan het uiterste der zee;
9परमेश्वरा, मी जर पूर्वेकडे, जिथे सूर्य उगवतो तिथे गेलो तर तिथे ही तू असतोस. मी जर पश्चिमेकडे समुद्रावर गेलोतर तिथे ही तू असतोस.
10Ook daar zou Uw hand mij geleiden, en Uw rechterhand zou mij houden.
10तिथेही तुझा उजवा हात मला धरतो. आणि तू मला हाताने धरुन नेतोस.
11Indien ik zeide: De duisternis zal mij immers bedekken; dan is de nacht een licht om mij.
11परमेश्वरा, कदाचित् मी तुझ्यापासून लपण्याचा प्रयत्न करीन आणि म्हणेन, “दिवस रात्रीत बदलला आहे आणि आता काळोख मला खरोखरच लपवेल.”
12Ook verduistert de duisternis voor U niet; maar de nacht licht als de dag; de duisternis is als het licht.
12पण परमेश्वरा, काळोख देखील तुझ्यासाठी पुरेसा दाट नाही तुझ्यासाठी रात्र दिवसासारखीच प्रकाशमय आहे.
13Want Gij bezit mijn nieren; Gij hebt mij in mijner moeders buik bedekt.
13परमेश्वरा, तू माझे संपूर्ण शरीर निर्माण केलेस मी माझ्या आईच्या गर्भात होतो तेव्हाच तुला माझ्याबद्दल सर्वकाही माहीत होते.
14Ik loof U, omdat ik op een heel vreselijke wijze wonderbaarlijk gemaakt ben; wonderlijk zijn Uw werken! ook weet het mijn ziel zeer wel.
14परमेश्वरा, मी तुझी स्तुती करतो. तू मला अद्भुत आणि अतिशय सुंदररीतीने निर्मिलेस तू जे केलेस ते खूपच अद्भुत आहे हे मला चांगलेच माहीत आहे.
15Mijn gebeente was voor U niet verholen, als ik in het verborgene gemaakt ben, en als een borduursel gewrocht ben, in de nederste delen der aarde.
15तुला माझ्याबद्दल सारे माहीत आहे माझे शरीर आईच्या गर्भात लपून आकार घेत होते तेव्हा तू माझी हाडे वाढत असताना पाहिलीस.
16Uw ogen hebben mijn ongevormden klomp gezien; en al deze dingen waren in Uw boek geschreven, de dagen als zij geformeerd zouden worden, toen nog geen van die was.
16माझे अवयव वाढत असताना तू पाहिलेस तू तुझ्या पुस्तकात त्यांची यादी केलीस. तू माझी रोज पाहणी केलीस. त्यातला एकही अवयव हरवलेला नाही.
17Daarom, hoe kostelijk zijn mij, o God, Uw gedachten! hoe machtig veel zijn haar sommen!
17तुझे विचार मला महत्वाचे आहेत, देवा तुला खूप माहिती आहे.
18Zoude ik ze tellen? Harer is meer, dan des zands; word ik wakker, zo ben ik nog bij U.
18मी जर ती मोजू लागलो तर ती वाळूच्या कणांपेक्षाही जास्त असेल. आणि जेव्हा माझी झोप संपेल तेव्हामी तुझ्याजवळच असेन.
19O God! dat Gij den goddeloze ombracht! en gij, mannen des bloeds, wijkt van mij!
19देवा, दुष्ट लोकांना मारुन टाक. त्या खुन्यांना माझ्यापासून दूर ने.
20Die van U schandelijk spreken, en Uw vijanden ijdellijk verheffen.
20ते वाईट लोक तुझ्याबद्दल वाईट बोलतात. ते तुझ्या नावाविषयी वाईट सांगतात.
21Zou ik niet haten HEERE! die U haten? en verdriet hebben in degenen, die tegen U opstaan?
21परमेश्वरा, जे लोक तुझा तिरस्कार करतात त्यांचा मी तिरस्कार करतो. जे लोक तुझ्याविरुध्द जातात त्यांचा मी तिरस्कार करतो.
22Ik haat hen met volkomen haat, tot vijanden zijn zij mij.
22मी त्यांचा संपूर्ण तिरस्कार करतो. तुझे शत्रू माझेही शत्रू आहेत.
23Doorgrond mij, o God! en ken mijn hart; beproef mij, en ken mijn gedachten.
23परमेश्वरा, माझ्याकडे बघ आणि माझे मन जाण माझी परीक्षा घे आणि माझे विचार जाणून घे.
24En zie, of bij mij een schadelijke weg zij; en leid mij op den eeuwigen weg.
24माझ्या मनात काही दुष्ट विचार आहेत का ते बघ आणि मला “सनातन मार्गाचा” रस्ता दाखव.