Dutch Staten Vertaling

Marathi

Psalms

33

1Gij rechtvaardigen! zingt vrolijk in den HEERE; lof betaamt den oprechten.
1चांगले लोकहो! परमेश्वरापाशी आंनद व्यक्त करा. न्यायी लोकांनो त्याची स्तुती करा.
2Looft den HEERE met de harp; psalmzingt Hem met de luit, en het tiensnarig instrument.
2वीणा वाजवून परमेश्वराचे स्तवन करा. दहा तारांच्या वीणेवर परमेश्वराचे गुणगान गा.
3Zingt Hem een nieuw lied; speelt wel met vrolijk geschal.
3त्याच्यासाठी नवे गाणे गा. आनंदीहून चांगल्या रीतीने वाजवा.
4Want des HEEREN woord is recht, en al Zijn werk getrouw.
4देवाचा शब्द खरा असतो तो जे काही करतो त्यावर तुम्ही विसंबून राहू शकता.
5Hij heeft gerechtigheid en gericht lief; de aarde is vol van de goedertierenheid des HEEREN.
5देवाला चांगलुपणा आणि न्यायीवृत्ती आवडते. परमेश्वराने पृथ्वी त्याच्या प्रेमाने भरुन टाकली.
6Door het Woord des HEEREN zijn de hemelen gemaakt, en door den Geest Zijns monds al hun heir.
6परमेश्वराने आज्ञा केली आणि जगाची निर्मिती झाली देवाच्या तोंडातल्या श्वासाने पृथ्वीवरील सर्व गोष्टी निर्माण झाल्या.
7Hij vergadert de wateren der zee als op een hoop; Hij stelt den afgronden schatkameren.
7देवाने समुद्रातील पाणी एका ठिकाणी आणले. तो समुद्राला त्याच्या जागेवर ठेवतो.
8Laat de ganse aarde voor den HEERE vrezen; laat alle inwoners van de wereld voor Hem schrikken.
8पृथ्वीवरील प्रत्येकाने परमेश्वराची भीती बाळगली पाहिजे आणि त्याला मान दिला पाहिजे या जगात राहणाऱ्या प्रत्येकाने त्याला भ्यायला पाहिजे.
9Want Hij spreekt, en het is er; Hij gebiedt, en het staat er.
9का? देव फक्त आज्ञा करतो आणि त्याप्रमाणे गोष्टी घडतात. आणि त्याने जर “थांब” म्हटले तर ती गोष्ट थांबते.
10De HEERE vernietigt den raad der heidenen; Hij breekt de gedachten der volken.
10राष्ट्रांचा उपदेश कवडी मोलाचा आहे तो त्यांच्या सगळ्या योजनांचा नाश करु शकतो.
11Maar de raad des HEEREN bestaat in eeuwigheid, de gedachten Zijns harten van geslacht tot geslacht.
11परंतु परमेश्वराचा उपदेश सदैव चांगला असतो त्याच्या योजना पिढ्यान्पिढ्या चांगल्या असतात.
12Welgelukzalig is het volk, welks God de HEERE is; het volk, dat Hij Zich ten erve verkoren heeft.
12ज्या लोकांचा देव परमेश्वर आहे ते लोक सुखी आहेत. देवाने त्यांची विशेष माणसं म्हणून निवड केली.
13De HEERE schouwt uit den hemel, en ziet alle mensenkinderen.
13परमेश्वराने स्वर्गातून खाली पाहिले. त्याला सर्व लोक दिसले.
14Hij ziet uit van Zijn vaste woonplaats op alle inwoners der aarde.
14त्याने त्याच्या सिंहासनावरुन पृथ्वीवर राहणाऱ्या लोकांकडे पाहिले.
15Hij formeert hun aller hart; Hij let op al hun werken.
15देवाने प्रत्येकाचे मन निर्माण केले. प्रत्येक जण काय विचार करतो ते देवाला माहीत असते.
16Een koning wordt niet behouden door een groot heir; een held wordt niet gered door grote kracht;
16राजा त्याच्या स्व:तच्या सामर्थ्याने सुरक्षित राहू शकत नाही. शूर सैनिक त्याच्या स्व:तच्या शक्तीमुळे सुरक्षित राहू शकत नाही.
17Het paard feilt ter overwinning, en bevrijdt niet door zijn grote sterkte.
17घोडे युध्दात विजय मिळवू शकत नाहीत. त्यांची शक्ती तुम्हाला पळून जायला मदत करु शकत नाही.
18Ziet, des HEEREN oog is over degenen, die Hem vrezen, op degenen, die op Zijn goedertierenheid hopen.
18परमेश्वर त्याच्या भक्तांवर नजर ठेवतो आणि त्यांची काळजी घेतो. जे लोक त्याची भक्ती करतात त्यांचे तो रक्षण करतो.
19Om hun ziel van den dood te redden, en om hen bij het leven te houden in den honger.
19देव त्यांना मरणापासून वाचवतो ते भुकेले असतील तेव्हा त्यांना तो शक्ती देतो.
20Onze ziel verbeidt den HEERE: Hij is onze Hulp en ons Schild.
20म्हणून आपण परमेश्वरासाठी थांबू. तो आपली मदत आणि ढाल आहे.
21Want ons hart is in Hem verblijd, omdat wij op den Naam Zijner heiligheid vertrouwen.
21देव आपल्याला आनंदी करतो. आम्ही त्याच्या पवित्र नावावर खरोखरच विश्वास ठेवतो.
22Uw goedertierenheid, HEERE! zij over ons; gelijk als wij op U hopen.
22परमेश्वरा, आम्ही मनापासून तुझी उपासना करतो म्हणून तू तुझे महान प्रेम आम्हाला दाखव.