1Een psalm van Asaf. O God! Heidenen zijn gekomen in Uw erfenis; zij hebben den tempel Uwer heiligheid verontreinigd; zij hebben Jeruzalem tot steenhopen gesteld.
1देवा, काही लोक तुझ्या माणसांशी लढायला आले. त्या लोकांनी तुझ्या पवित्र मंदिराचा नाश केला. त्यांनी यरुशलेम उध्वस्त केले.
2Zij hebben de dode lichamen Uwer knechten aan het gevogelte des hemels tot spijs gegeven; het vlees Uwer gunstgenoten aan het gedierte des lands.
2शत्रूंनी तुझ्या सेवकांची प्रेते रानटी पक्ष्यांना खाण्यासाठी ठेवली त्यांनी तुझ्या भक्तांची प्रेते रानटी पशूंना खाण्यासाठी ठेवली.
3Zij hebben hun bloed rondom Jeruzalem als water vergoten; en er was niemand, die hen begroef.
3देवा, शत्रूंनी तुझी इतकी माणसे मारली की रक्त पाण्यासारखे वाहायला लागले. प्रेते पुरायला एखादा माणूसही उरला नाही.
4Wij zijn onzen naburen een smaadheid geworden; een spot en schimp dien, die rondom ons zijn.
4आमच्या भोवतालच्या लोकांनी आमचा पाणउतारा केला आमच्या भोवतालची माणसे आम्हाला पाहून हसली आणि त्यांनी आमची चेष्टा केली.
5Hoe lang, HEERE? Zult Gij eeuwiglijk toornen? Zal Uw ijver als vuur branden?
5देवा, तू आमच्यावर कायमचाच रागावणार आहेस का? देवा, तुझे भावनोद्रेक आम्हाला आगीत असेच जाळत राहणार आहेत का?
6Stort Uw grimmigheid uit over de heidenen, die U niet kennen, en over de koninkrijken, die Uw Naam niet aanroepen.
6देवा, तू तुझा राग ज्या देशांना तू माहीत नाहीस अशा देशांकडे वळव. जे देश तुझी उपासना करीत नाहीत अशा देशांकडे तुझा राग वळव.
7Want men heeft Jakob opgegeten, en zij hebben zijn liefelijke woning verwoest.
7त्या देशांनी याकोबाचा नाश केला त्यांनी याकोबाच्या देशाचा सर्वनाश केला.
8Gedenk ons de vorige misdaden niet; haast U, laat Uw barmhartigheden ons voorkomen; want wij zijn zeer dun geworden.
8देवा, कृपा करुन आमच्या पूर्वजांनी केलेल्या पापाची शिक्षा आम्हाला करु नकोस. आम्हांला लवकरात लवकर तुझी दया दाखव. आम्हांला तुझी खूप खूप गरज आहे.
9Help ons, o God onzes heils! ter oorzake van de eer Uws Naams; en red ons, en doe verzoening over onze zonden, om Uws Naams wil.
9देवा, रक्षणकर्त्या, आम्हाला मदत कर. आम्हाला वाचव त्यामुळे तुझ्या नावाला गौरव प्राप्त होईल. आमची पापे तुझ्या नावाच्या भल्यासाठी पुसून टाक.
10Waarom zouden de heidenen zeggen: Waar is hun God? Laat de wraak des vergoten bloeds Uwer knechten onder de heidenen voor onze ogen bekend worden.
10इतर देशांना “कुठे आहे तुमचा देव? तो तुम्हाला मदत करु शकत नाही का?” असे म्हणू देऊ नकोस. देवा, त्या लोकांना शिक्षा कर म्हणजे आम्ही ते बघू शकू. तुझ्या सेवकांना मारल्याबद्दल त्यांना शिक्षा कर.
11Laat het gekerm der gevangenen voor Uw aanschijn komen; behoud overig de kinderen des doods, naar de grootheid Uws arms.
11कैद्यांच्या कण्हण्याकडे लक्ष दे देवा, मारण्यासाठी ज्यांची निवड झाली होती त्यालोकांना तुझ्या सामर्थ्याने वाचव.
12En geef onze naburen zevenvoudig weder in hun schoot hun smaad, waarmede zij U, o Heere! gesmaad hebben.
12देवा, आमच्या भोवतालच्या माणसांनी आम्हांला जो त्रास दिला त्याबद्दल त्यांना सात वेळा शिक्षा दे. तुझा अपमान केल्याबद्दल त्यांना शिक्षा कर.
13Zo zullen wij, Uw volk en de schapen Uwer weide, U loven in eeuwigheid, van geslacht tot geslacht; wij zullen Uw roem vertellen.
13आम्ही तुझी माणसे आहोत, आम्ही तुझ्या कळपातल्या मेंढ्या आहोत. आम्ही सदैव तुझी स्तुती करु. देवा, आम्ही अगदी सर्वकाळ तुझी स्तुती करु.