1De openbaring van Jezus Christus, die God hem gegeven heeft, om Zijn dienstknechten te tonen de dingen, die haast geschieden moeten; en die Hij door Zijn engel gezonden, en Zijn dienstknecht Johannes te kennen gegeven heeft;
1हे येशू ख्रिस्ताचे प्रकटीकरण आहे. ज्या गोष्टी लवकरच घडणे आवश्यक आहे, ते आपल्या सेवकांना दाखविण्यासाठी देवाने येशूला हे देवापासून प्राप्त झाले ख्रिस्ताने त्याच्या देवदूताला पाठवून या सर्व गोष्टी योहानाला दाखविण्यास सांगितले.
2Dewelke het woord Gods betuigd heeft, en de getuigenis van Jezus Christus, en al wat hij gezien heeft.
2योहानाने जे काही पाहिले त्या सर्व गोष्टींविषयी साक्ष दिली की येसू ख्रिस्ताने हे त्याला सांगितले; देवाकडून आलेला हा संदेश आहे.
3Zalig is hij, die leest, en zijn zij, die horen de woorden dezer profetie, en die bewaren, hetgeen in dezelve geschreven is; want de tijd is nabij.
3जी व्यक्ती देवाकडून आलेल्या या संदेशाचे शब्द उघडपणे वाचते ती धन्य आहे. आणि जे लोक हा संदेश ऐकतात आणि त्यामध्ये लिहिलेल्या गोष्टी पाळतात ते धन्य आहेत. कारण आता जास्त वेळ उरला नाही.
4Johannes aan de zeven Gemeenten, die in Azie zijn: genade zij u en vrede van Hem, Die is, en Die was, en Die komen zal; en van de zeven geesten, die voor Zijn troon zijn;
4योहानाकडून, आशिया प्रांतातील सात मंडळ्यांना: जो आहे, जो होता व जो येणार आहे त्या एकापासून (देवापासून): आणि त्याच्या सिंहासनासमोरील सात आत्म्यांकडून तुम्हांस कृपा व शांति असो.
5En van Jezus Christus, Die de getrouwe Getuige is, de Eerstgeborene uit de doden, en de Overste der koningen der aarde. Hem, Die ons heeft liefgehad, en ons van onze zonden gewassen heeft in Zijn bloed.
5आणि येशू ख्रिस्त विश्वासू साक्षी आहे, जो मेलेल्यांमधून उठविले गेलेल्यांमध्ये पहिला आहे. पृथ्वीवरील राजांचा तो सत्ताधीश आहे. आणि जो येशू आमच्यावर प्रेम करतो, ज्या येशूने आम्हाला आमच्या पापांपासून त्याच्या रक्ताने मुक्त केले;
6En Die ons gemaakt heeft tot koningen en priesters Gode en Zijn Vader; Hem, zeg ik, zij de heerlijkheid en de kracht in alle eeuwigheid. Amen.
6ज्याने आम्हांला राज्य आणि देवपित्याची सेवा करणारे याजक बनविले त्या येशूला गौरव व सामर्थ्य अनंतकाळपर्यंत असोत! आमेन.
7Ziet, Hij komt met de wolken en alle oog zal Hem zien, ook degenen, die Hem doorstoken hebben; en alle geslachten der aarde zullen over Hem rouw bedrijven; ja, amen.
7पहा, येशू ढगांसह येत आहे! प्रत्येक व्यक्ति त्याला पाहील, ज्यांनी त्याला भोसकले ते सुद्धा त्याला पाहतील. पृथ्वीवरील सर्व लोक त्याच्यामुळे आक्रोश करतील, होय, असेच होईल! आमेन.
8Ik ben de Alfa en de Omega, het Begin en het Einde, zegt de Heere, Die is, en Die was, en Die komen zal, de Almachtige.
8प्रभु देव म्हणातो, “मी अल्फा आणि ओमेगा आहे. मी जो आहे, जो होतो आणि जो येत आहे. मी सर्वसमर्थ आहे.”
9Ik, Johannes, die ook uw broeder ben, en medegenoot in de verdrukking, en in het Koninkrijk, en in de lijdzaamheid van Jezus Christus, was op het eiland, genaamd Patmos, om het Woord Gods, en om de getuigenis van Jezus Christus.
9मी योहान आहे, आणि मी तुमचा बंधु आहे. आपण ख्रिस्तामध्ये एकत्र आहोत आणि आपण या गोष्टींमध्ये वाटेकरी आहोत. दु:खसहनात, राज्यात, धीराने सहन करण्यात, येशूच्या सत्यात आणि देवाच्या संदेशात मी विश्वासू होतो त्यामुळे मी पात्म नावाच्या बेटावर होतो.
10En ik was in den geest op den dag des Heeren; en ik hoorde achter mij een grote stem, als van een bazuin,
10प्रभूच्या दिवशी आत्म्याने माझा ताबा घेतला. माइया मागे मी एक मोठा आवाज ऐकला. तो आवाज कर्ण्यासारखा ऐकू आला.
11Zeggende: Ik ben de Alfa en de Omega, de Eerste en de Laatste; en hetgeen gij ziet, schrijf dat in een boek, en zend het aan de zeven Gemeenten, die in Azie zijn, namelijk naar Efeze, en naar Smyrna, en naar Pergamus, en naar Thyatire, en naar Sardis, en naar Filadelfia, en naar Laodicea.
11तो आवाज म्हणाला, “तू या सर्व गोष्टी पाहतोस त्या तू पुस्तकात लिही, आणि सात मंडळ्यांना पाठव: इफिस, स्मुर्णा, पर्गम, थुवतीरा, सार्दीस, फिलदेल्फिया आणि लावदिकीया.”
12En ik keerde mij om, om te zien de stem, die met mij gesproken had; en mij omgekeerd hebbende, zag ik zeven gouden kandelaren;
12माझ्याबरोबर कोण बोलत आहे हे पाहण्यासाठी मी मागे वळलो, जेव्हा मी मागे वळालो, तेव्हा मी सोन्याच्या सात दीपसमया पाहिल्या.
13En in het midden van de zeven kandelaren Een, den Zoon des mensen gelijk zijnde, bekleed met een lang kleed tot de voeten, en omgord aan de borsten met een gouden gordel;
13मी कोणाला तरी दीपस्तंभामध्ये पाहिले जो “मनुष्याच्या पुत्रासारखा” होता. त्याने लांब पायघोळ झगा घातला होता. त्याने सोन्याचा पट्टा छातीवर बांधला होता.
14En Zijn hoofd en haar was wit, gelijk als witte wol, gelijk sneeuw; en Zijn ogen gelijk een vlam vuurs;
14त्याचे डोके आणि केस बफर्ासारख्या पांढऱ्या लोकरीप्रमाणे शुभ्र होते. त्याचे डोळे अग्नीच्या ज्वालेसारखे होते.
15En Zijn voeten waren blinkend koper gelijk, en gloeiden als in een oven; en Zijn stem als een stem van vele wateren.
15त्याचे पाय भट्टीत गरम झाल्यानंतर चमकणाऱ्या पितळासारखे होते. त्याचा आवाज पुराचे पाणी जसा आवाज करते तसा होता.
16En Hij had zeven sterren in Zijn rechterhand; en uit Zijn mond ging een tweesnijdend scherp zwaard; en Zijn aangezicht was, gelijk de zon schijnt in haar kracht.
16त्याच्या उजव्या हातात सात तारे होते. त्याच्या तोंडातून दोन्ही बाजूंनी तीक्ष्ण धार असणारी तरवार निघाली. तो दिवसाच्या मध्यान्ही अतिशय प्रखर तेजाने प्रकाशणाऱ्या सूर्यासारखा दिसत होता.
17En toen ik Hem zag, viel ik als dood aan Zijn voeten; en Hij legde Zijn rechterhand op mij, zeggende tot mij: Vrees niet; Ik ben de Eerste en de Laatste;
17जेव्हा मी त्याला पाहिले, तेव्हा मी मेलेल्या माणसा सारखा त्याच्या पायजवळ पडलो त्याने त्याचा उजवा हात माइयावर ठेवला आणि म्हणाला, “घाबरु नको! मी पहिला आणि शेवटला आहे. मी जिवंत आहे,
18En Die leef, en Ik ben dood geweest; en zie, Ik ben levend in alle eeuwigheid. Amen. En Ik heb de sleutels der hel en des doods.
18मी मेलो होतो, पण पाहा; मी अनंतकाळासाठी जिवंत आहे! आणि माइया जवळ मरणाच्या व अधोलोकाच्या किल्ल्या आहेत.
19Schrijf, hetgeen gij gezien hebt, en hetgeen is, en hetgeen geschieden zal na dezen:
19म्हणून ज्या गोष्टी तू पाहतोस त्या लिही. ज्या गोष्टी आता घडत आहेत त्या लिही. आणि ज्या गोष्टी नंतर घडणार आहेत त्याही लिही.
20De verborgenheid der zeven sterren, die gij gezien hebt in Mijn rechter hand, en de zeven gouden kandelaren. De zeven sterren zijn de engelen der zeven Gemeenten; en de zeven kandelaren, die gij gezien hebt, zijn de zeven Gemeenten.
20जे सात तारे तू माइया हातात पाहिलेस आणि ज्यात सात सोन्याच्या दीपसमया तू पाहिल्यास त्यांचा गुपित अर्थ हा आहे: सात दीपसमया या सात मंडळ्या आहेत. आणि सात तारे हे सात मंडळ्यांचे देवदूत आहेत.