Dutch Staten Vertaling

Marathi

Ruth

3

1En Naomi, haar schoonmoeder, zeide tot haar: Mijn dochter! zoude ik u geen rust zoeken, dat het u welga?
1काही दिवसांनी रूथची सासू नामी रूथला म्हणाली, “मुली, आता मला तुझ्यासाठी नवरा आणि चांगले घर शोधून काढायला हवें. त्यातच तुझे भले आहे.
2Nu dan, is niet Boaz, met wiens maagden gij geweest zijt, van onze bloedvriendschap? Zie, hij zal dezen nacht gerst op den dorsvloer wannen.
2बवाज त्यासाठी योग्य आहे तो आपला जवळचा आप्तच आहे. त्याच्याकडच्या कामकरी बायकांबरोबर तू काम केले आहेस. आज रात्री तो खव्व्यात मळणीसाठी मुक्कामाला असेल.
3Zo baad u, en zalf u, en doe uw klederen aan, en ga af naar den dorsvloer; maar maak u den man niet bekend, totdat hij geeindigd zal hebben te eten en te drinken.
3त न्हाऊन माखून तयार हो. चांगले ठेवणीतले कपडे घाल आणि रात्री खव्व्यावर जा. बवाजचे जेवणखाण होईपर्यंत त्याच्या नजरेला पडू नको.
4En het zal geschieden, als hij nederligt, dat gij de plaats zult merken, waar hij zal nedergelegen zijn; ga dan in, en sla zijn voetdeksel op, en leg u; zo zal hij u te kennen geven, wat gij doen zult.
4जेवण झाल्यावर तो विश्रांती घ्यायला आडवा होईल. लक्ष असू दे म्हणजे तो कुठे आहे ते तुला कळेल. तेव्हा तू पुढे हो आणि त्याच्या पायावरचे पांधरूण काढून तिथेच त्याच्याजवळ पड लगेच काय करायचे ते तोच मग तुला सांगेल.”
5En zij zeide tot haar: Al wat gij tot mij zegt, zal ik doen.
5तेव्हा रूथने सासूच्या म्हणण्याप्रमाणे वागायचे कबूल केले.
6Alzo ging zij af naar den dorsvloer, en deed naar alles, wat haar schoonmoeder haar geboden had.
6ती खव्व्याकडे गेली. सासूने सांगितले होते त्याप्रमाणे वागली.
7Als nu Boaz gegeten en gedronken had, en zijn hart vrolijk was, zo kwam hij om neder te liggen aan het uiterste van een koren hoop. Daarna kwam zij stilletjes in, en sloeg zijn voetdeksel op, en legde zich.
7जेवणखाण झाल्यावर बवाज समाधानाने सुस्तावला. धान्याच्या राशीजवळच झोपायला गेला. तेव्हा अजिबात चाहूल लागू न देता रूथ तिथे गेली आणि त्याच्या पायावरचे पांधरूण तिने दूर सारले. मग त्याच्या पायाशी पडून राहिली.
8En het geschiedde te middernacht, dat die man verschrikte, en om zich greep; en ziet, een vrouw lag aan zijn voetdeksel.
8मध्यरात्रीच्या सुमाराला बवाज झोपेतच कुशीवर वळला आणि जागा झाला. आपल्या पायाजवळ एका बाईला पाहून तो डचकला.
9En hij zeide: Wie zijt gij? En zij zeide: Ik ben Ruth, uw dienstmaagd, breid dan uw vleugel uit over uw dienstmaagd, want gij zijt de losser.
9ती कोण, हे त्याने विचारले. ती म्हणाली, “मी रूथ तुमची दासी. तुम्ही आपले पंख माझ्यावर पसरा तुम्हीच माझे त्राते आहात.”
10En hij zeide: Gezegend zijt gij den HEERE, mijn dochter! Gij hebt deze uw laatste weldadigheid beter gemaakt dan de eerste, dewijl gij geen jonge gezellen zijt nagegaan, hetzij arm of rijk.
10तेव्हा बवाज म्हणाला, “परमेश्वर तुझे भले करो. माझ्यावर तुझ्या प्रेमाची पाखर तू घातली आहेस. तू नामीशी आधी वागलीस त्यापेक्षाही भलेपणाने तू माझ्याशी वागते आहेस. तू तूझ्या जोगा गरीब, श्रीमंत अशा कोणत्याही तरूण मनुष्याबरोबर गेली असतीस. पण तू तसे केले नाहीस.
11En nu, mijn dochter, vrees niet; al wat gij gezegd hebt, zal ik u doen; want de ganse stad mijns volks weet, dat gij een deugdelijke vrouw zijt.
11तेव्हा आता घाबरू नकोस. तू म्हणशील तसे मी करतो. तू एक चांगली बाई आहेस हे गावातील लोकांना ठाऊक आहे.
12Nu dan, wel is waar, dat ik een losser ben; maar er is nog een losser, nader dan ik.
12शिवाय, मी तुमचा जवळचा नातलग आहे हेही खरे. पण माझ्याहीपेक्षा जवळचा असा तुमचा एक आप्त आहे.
13Blijf dezen nacht over; voorts in den morgen zal het geschieden, indien hij u lost, goed, laat hem lossen; maar indien het hem niet lust u te lossen, zo zal ik u lossen, zo waarachtig als de HEERE leeft; leg u neder tot den morgen toe.
13आजची रात्र तू इथेच राहा. तो तुला मदत करतो का ते मी सकाळी त्याला वचारून बघतो. तो तयार झाला तर उत्तमच. पण त्याने नकार दिला तर परमेश्वरची शपथ मी तुझ्याशी लग्न करीन. अलीमलेखची गेलेली जमीन तुम्हाला परत मिळवून देईन तेव्हा सकाळपर्यंत इथेच थांब.”
14Alzo lag zij neder aan zijn voetdeksel tot den morgen toe; en zij stond op, eer dat de een den ander kennen kon; want hij zeide: Het worde niet bekend, dat een vrouw op den dorsvloer gekomen is.
14त्याप्रमाणे रूथ सकाळपर्यंत बवाजच्या पायाजवळ पडून राहिली. फटफटायच्या आधीच अजून अंधार असतानाच लोक एकमेकांना ओळखायला लागण्यापूर्वाच ती उठली. बवाज तिला म्हणाला, “कालची रात्र तू इथे होतीस हे कोणाला कळू द्यायचे नाही.”
15Voorts zeide hij: Lang den sluier, die op u is, en houd dien; en zij hield hem; en hij mat zes maten gerst, en legde ze op haar; daarna ging hij in de stad.
15पुढे तो म्हणाला, “तू पांघरलेला रूमाल काढ आणि समोर पसर.” तिने तो पसरल्यावर त्याने एक बुशेल माप सातू त्यात टाकले. तिच्या सासूसाठी ती भेट होती. नीट गाठोडे बांधून त्याने ते तिच्या हवाली केले.मग तो शहरात निघून गेला.
16Zij nu kwam tot haar schoonmoeder, dewelke zeide: Wie zijt gij, mijn dochter? En zij verhaalde haar alles, wat die man haar gedaan had.
16रूथ सासूकडे गेली. सासूने दाराशी येऊन कोण आहे ते पाहिले. रूथने घराते येऊन बवाज बरोबर जे जे घडले ते सांगितले.
17Ook zeide zij: Deze zes maten gerst heeft hij mij gegeven; want hij zeide tot mij: Kom niet ledig tot uw schoonmoeder.
17ती म्हणाली,”त्याने तुमच्यासाठी भेट म्हणून हे सातू दिले आहे. रिकाम्या हाताने तुमच्याकडे यायचे नाही असे त्याने मला बजावले.”
18Toen zeide zij: Zit stil, mijn dochter, totdat gij weet, hoe de zaak zal vallen; want die man zal niet rusten, tenzij dat hij heden deze zaak voleind hebbe.
18नामी म्हणाली, “मुली, पुढे काय होणार आहे हे आपल्याला कळेपर्यंत धीर धर. अंगावर घेतलेले काम पार पडेपर्यत तो स्वस्थ बसणार नाही. दिवस मावळायच्या आतच काय ते आपल्याला कळेल.”